ज्वालामुखी
ज्वालामुखी- सर्वसामान्य पणे बाह्य प्रावरणातून वायूरुप, द्रवरुप लाव्हा आणि घनरुप पदार्थ हे उद्रेकाच्या स्वरुपात पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात, त्या प्रक्रियेस ज्वालामुखी असे म्हणतात.
ज्वालामुखीचे वर्गीकरण-
1 उद्रेकानुसार- I) केंद्रीय उद्रेक
II) भेगीय उद्रेक
2 कालावधी व सातत्य यावरुन-
I) जागृत ज्वालामुखी, (जपान- फुजियामा, भूमध्यसागरातील स्ट्राँम्बोली)
II) निद्रिस्त ज्वालामुखी,
(इटली-व्हिस्यूव्हियस, अलास्का- काटमाई)
III) सुप्त किंवा मृत ज्वालामुखी- (आफ्रिकेतील माउंट किलीमांजारो)
●ज्वालामुखीच्या
उद्रेकामधून बाहेर पडणारे पदार्थ-
A) द्रवरुप पदार्थ- यामध्ये वितळलेल्या खडकांच्या द्रवरुप पदर्थांचा समावेश असतो. यास भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात मॅग्मा व भूपृष्ठावर आल्यानंतर लाव्हा असे म्हणतात. द्रवरुप पदर्थांचे सिलीकांच्या असलेल्या प्रमाणावरुन दोन प्रकार पडतात.
i) आम्ल लाव्हा- यामध्ये सिलीकांचे प्रमाण जास्त असल्याने वितलन बिंदु उच्च असतो. हा असल्याने त्यांचे वहन संथ गतीने होते.
ii) अल्कली लाव्हा- या
मध्ये सिलीकांचे प्रमाण कमी असल्याने वितलन बिंदु कमी असतो. हा पातळ असल्याने तो
जास्त प्रवाही असतो.
B) घनरुप पदार्थ- धुलीकण आणि खडकांचे तुकडे यांचा यात समावेश
असतो. त्यांच्यातही खालील प्रमाणे गट करता येतात. यांच्या आकारावरुन व उद्रेकावरुन
धुलीकण व खडकांच्या या एकत्रीत समुहास पुढील संज्ञा वापरल्या जातात.
|
|
ज्वालामुखीय धूळ |
उद्रेकाच्या वेळी धुलीकण व आणि खडकांचे तुकडे
अतिशय सूक्ष्म असतात त्यावेळी त्यांना ज्वालामुखीय धूळ म्हणतात. |
राख |
उद्रेकाच्या वेळी धुलीकण, खडकांचे लहान आकाराचे
तुकडे अशा घनरुप पदार्थांना राख म्हणतात. |
सकोणाश्म |
उद्रेकाच्या
वेळी धुलीकण व खडक हे घनरुप पदार्थ जेव्हा टोकदार असतात तेव्हा त्यांना ‘सकोणाश्म’ म्हणतात. |
ज्वालामुखीबॉम्ब |
काही वेळा घनरुप लाव्हा पदार्थ हा हवेमध्ये
लहान तुकडयांच्या स्वरुपात जमिनीवर पडण्याअगोदर फेकला जातो त्यास ‘ज्वालामुखीय
बॉम्ब’ म्हणतात. |
C) वायुरुप पदार्थ- उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी मुखाच्या
वर धुराचे गडद ढग दिसुन येतात. धुराच्या ढगाच्या आकारावरुन त्यास ‘फुलकोबी ढग’
म्हणतात. यामधील काही वायु ज्वलनशील असल्याने ज्वालामुखीच्या मुखाशी ज्वाला निर्माण
होतात.
●ज्वालामुखीय भूरुपे-
1) लाव्हा घुमट- ज्यावेळी मॅग्मा हा मुखातून बाहेर येऊन
तेथेच घनरुप बनतो. त्यावेळी तेथेच घुमटाकार टेकडीची निर्मिती होते. मॅग्माचा
प्रवाहीपणा अशा घुमटांचे आकार ठरवतो.
* तीव्र उताराच्या उंच घुमटाकार टेकडयांची निर्मिती
आम्ल लाव्हारसापासून होते.
* कमी उंचीचे विस्तृततळ असलेले घुमट अल्कली
लाव्हापासून तयार होतात.
2) लाव्हा पठारे- भेगीय ज्वालामुखीतून मोठया प्रमाणात
विस्तृत भूपृष्ठावर पसरणाऱ्या लाव्हारसापासून लाव्हा पठारांची उत्पत्ती होते. उदा.
भारतातील दख्खनचे पठार
3) ज्वालामुखीय
काहील (कॅल्डेरा) / ज्वालामुखीय विवर- ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी
काहीवेळा खूप मोठया प्रमाणावर पदार्थ बाहेर पडत असतांना त्याचवेळी खूप मोठया
प्रमाणात दाबमुक्ती होते अशा वेळी उद्रेकानंतर या भागात मोठया आकाराचे व खोल खळगे
तयार होते त्यास ज्वालामुखीय काहील (कॅल्डेरा) म्हणतात. कालांतराने येथे पाणी साचून
सरोवरांचीही निर्मिती होते.
*अशाच
लहान आकाराच्या काहीलांना ज्वालामुखीय विवर म्हणतात
4)विवर सरोवर-.ज्या
ज्वालामुखीचा एका उद्रेकानंतर, पुन्हा दीर्घकाळ उद्रेक झालेला नसतो त्याला मृत
ज्वालामुखी असे म्हटले जाते. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखीय काहील
निर्माण झालेला असतो त्या काहील / खड्डयामध्ये पावसाचे पाणी भरले जाते त्यामुळे मृतज्वालामुखी
मध्ये विवर सरोवराची निर्मिती होते
5) ज्वालामुखीय खुंटा- ज्यावेळी ज्वालामुखीच्या मुखाशी लाव्हारसाचे घनीभवन होते त्यावेळी
तेथे ज्वालामुखीय खुंटा या भूरुपांची निर्मिती होते
6) खंगारक शंकू- ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठया
प्रमाणात बाहेर पडणारे घनरुप पदार्थ, राख, अर्धवट जळालेले पदार्थ व सकोणाश्म यांना
खंगारक म्हणतात. या खंगारकाच्या संचयनातून तयार झालेल्या शंक्वाकृती टेकडी
ला खंगारक शंकू म्हणतात. उदा. इटलीतील नुओवो पर्वत
7) समिश्र
शंकू-
लाव्हारस व अर्धवट जळालेले पदार्थ अशा दोन वेगवेगळया पदार्थांच्या एकावर एक तयार
झालेल्या स्तरांमुळे तयार झालेल्या शंकुला संमिश्र शंकू म्हणतात. या प्रक्रियेत
दोन वेगवेगळया पदार्थांपासून शंकू तयार झालेला असतो म्हणून याला समिश्र शंकू
म्हणतात