Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Showing posts with label कारणे. Show all posts
Showing posts with label कारणे. Show all posts

Monday, 2 December 2019

जागतिक हवामान बदल, बाबी व परीणाम, कारणे, अभ्यास साधने


हवामान बदल- जागतीक स्तरावरील हवामानाच्य आकृतीबंधात सातत्याने होणाऱ्या बदलास `हवामान बदल` असे म्हणतात. यामध्ये मोसमी वाऱ्याचा प्रवाहातील बदल, ऋतूंमधील बदल, वृक्षांच्या बहराच्या कालावधीतील बदल, पुर आणि दुष्काळाच्या वारंवारीतेत होणारी वाढ इ. चा समावेश असतो.

हवामान बदलाच्या बाबी व परीणाम-
1 पुरांची वारंवाता आणि तीव्रतेत झालेली वाढ- गेल्या काही कालावधीत पुरांच्या संख्येत व कालावधीत वाढ झालेली असल्याचे येते उदा. 2005 साली मुंबईत पर्जन्यामुळे आलेला पुर, तसेच सन 2013 मध्ये केदारनाथ येथे झालेली ढगफुटी, भुस्खलन व पुर. जगाच्या विवीध भागात पुरांच्या विविध भागात पुरांच्या वारंवारीतेत वाढ झालेली आहे.

2 दुष्काळ आणि चक्रीवादळे यांच्या तीव्रतेत व वारंवारितेत होणारी वाढ- तापमानाच्या वाढीमुळे इ. स. 1970 पासून पृथ्वीवर दुष्काळाच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. जागतीक तापमान वाढीमुळे सागरीय जलाचे तापमान वाढुन सागरीभागावरील पाण्याचे रेणू जास्त सक्रीय होतात व पाण्याच्या वाफेचे प्रमाणही वाढत आहे त्यामुळे वातावरणात मोठया प्रमाणात बाष्प निर्माण होते यामुळे आवर्त व प्रत्यावर्ताची निर्मीती व तीव्रतेत वाढ होते. त्यातुन चक्रीवादळे व दुष्काळ निर्माण होतात.


3 पीक वाढीच्या कालावधीत व कृषी उत्पन्नात बदल होणे- वातावरणातील वाढत्या कार्बन डायऑक्सॉईड मुळे हवामान, कृषी, वायु व मानवी आरोग्यावर परीणाम होत आहे. वातावरणातील कार्बनडायऑक्साईड चे प्रमाण 350 ppm पेक्षा जास्त हे पर्यावरणास घातक आहे. तसेच त्याचा परीणाम पर्जन्यमानावर ही होते व पर्जन्यमानाचा परीणाम पीक वाढीवर होत असतो.

4 वर्षावने आणि हवामान बदल- वने ही पृथ्वीचे तापमान कमी ठेवण्यास मदत करतात. रुंदपर्णी वर्षावनांच्या प्रदेशात वनस्पतींच्या अच्छादनामुळे बाप्पीभवनाचा वेग कमी होऊन नैसर्गीकरीत्या हवा शीतल राखली जाते. परंतु मोठया प्रमाणात या वनाची तोड किंवा ही वने जाळल्याने तेथील हवा उष्ण व कोरडी होऊ लागते. तसेच वने जाळल्याने तेथे कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळला जातो त्यामुळे वातावरणावर ताण निर्माण होतो. मोठया प्रमाणावर होणाऱ्या निर्वनीकरणामुळे पर्जन्याचा आकृतीबंध व पर्जन्याच्या प्रमाणात बदल झालेला आहे.

हवामान बदलाची नैसर्गिक कारणे-

1 सौरउर्जा- सुर्यापासून मिळणारी उर्जा ही सर्वत्र व सर्वकाळ सारखी नसते. सौरउर्जा ही तापमानावर परीणाम करीत असते त्यामुळे त्याचा परीणाम प्रत्यक्ष हवामानावरही होत असतो.

2‍ पृथ्वीचे सुर्यापासुनचे अंतर (मिलन्कोव्हीच थेरी)- यानुसार सुर्याचे पृथ्वीपासून चे अंतर कमी होते तेव्हा पृथ्वीवरील तापमानात वाढ होणे तर सूर्यापासून पृथ्वीचे अंतर वाढणे तेव्हा पृथ्वीचे तापमान कमी होते.  जेव्हा पृथ्वी सुर्यापासून दूर जाते तेव्हा पृथ्वीवर हिमयुग येण्याची शक्यता जास्त असते.

3 ज्वालामुखीय उद्रेक- ज्वालामुखीच्या उद्रेकातुन वातावरणात अनेक वायु बाहेर पडत असतात त्यात सल्फर डायऑक्साईड ही असतो. हे वायु बऱाच काळापर्यंन्त वातावरणात टिकुन राहतात त्यामुळे बऱ्याच वेळा हे वायु वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर लांबपर्यन्त पसरतात. बऱ्याच वेळा या वायुमुळे ‍पृथ्वीवर सौरताप कमी पोहचतो. मागील दोन शतकात तसेच सन 1982 (एल सिऑन) व सन 1991 (पिंटाबू) मध्ये झालेल्या मोठया ज्वालामुखी उद्रेकांमुळे  सार्वात कमी तापमानांच्या वर्षांच्या नोंदी झालेल्या आहेत. तसेच काही वर्षांसाठी काही प्रमाणात तापमान घटल्याच्याही नोंदी आहेत.

4 गोल्डीलॉक विभाग- शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वी ही सुर्यमालीकेतील जिवसृष्टी व वास्तव्यास योग्य अशा पट्टयात आहे. पुर्वी पृथ्वीवरील तापमान अतिथंड होते तेव्हा पृथ्वी या पट्टयात नव्हती. परंतु हा पट्टा कालानुरुप सुर्यापासुन दुर सरकत असल्याने पृथ्वी या पट्टयात आलेली आहे. या पट्टयात आल्यावर पृथ्वीवर जिवसृष्टीची निर्मीती झालेली आहे. अशा पट्टयाला शास्त्रज्ञ गोल्डीलॉक विभाग म्हणतात. गोल्डीलॉक विभाग हा सूर्यापासून दूर सरकत आहे. या पट्टयात होणाऱ्या अशा बदलामुळे पृथ्वीचे हवामान थंड किंवा ऊबदार होते.

हवामान बदलाची मानव निर्मीत कारणे-

·         जैविक इंधनाच्या ज्वलनातून मुख्यत: कार्बन डायऑक्साईड उत्सर्जीत होणे
·         मोठया प्रमाणातील निर्वनीकरणामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाणा वाढते.
हिमानी कालखंड- जेव्हा हिमनदयांचा विस्तार होतो तेव्हा अतिशय थंड हवामान असते त्यास हिमानी  कालखंड म्हणतात.
आंतरहिमानी कालखंड- हिमानी कालखंडात जेव्हा तापमान वाढते व हिमनदयांचीपिछेहाट होते अशा कालखंडास आंतरहिमानी कालखंड म्हणतात.

हवामान बदल अभ्यासण्याची काही साधने- (पूरा हवामान)

      प्राचीन हवामानाचा अभ्यास म्हणजेच पूरा हवामान शास्त्र (प्राचीन हवामान) होय. मानवी मागील 140 वर्षापुर्वी पासून हवामानाचा अभ्यास करण्यासाठी विविध उपकराणांचा उपयोग करीत आहे. पंरतु त्यापुर्वी ही हवामानाचा अभ्यास केला जात होता हवामानाच्या अभ्यासाची साधने पुढील प्रमाणे सांगता येतील.

1 प्रवाळ कट्टे- प्रवाळकट्टे हे हवामानाच्या बदलांना फार संवेदनशील असतात. सागरी प्रवाळ हे कॅल्शिसम कार्बोनेटला शोषून त्यापासून प्रवाळाचे सांगाडे तयार करतात. सागरी जलाचे तापमान बदलते तेव्हा सांगाडयातील कॅल्शियम कार्बोनेटची घनता ही बदलते.
      समुद्रातील प्रवाळाची उन्हाळयातील घनता व हिवाळयातील घनता वेगळी असते. प्रवाळाच्या वर्तुळांची  वाढ ही ऋतुनुसार होत असते आणि याच वर्तुळांव्दारे पाण्याचे तापमान आणि प्रवाळांची वाढ कोणत्या ऋतूत झाली हे आपणास कळू शकते.

2 वृक्षखोडावरील वर्तुळे-  पर्यावरणातील बदलत्या स्थितीनुरुप वर्तुळांच्या निर्मीतीत भिन्नता जाणवते. त्याच वर्तुळांच्या बदलांचा मागोवा घेत पूरा पर्यावरणाच्या बदलांचा अभ्यास करता येतो.

3 बर्फाच्या पृष्ठाखालील घेतलेले हिमाचे नमुने- अंटार्क्टिका व ग्रीनलँड या हिमक्षेत्रावरील पूष्ठावर हिमाचे थरावर थर साचतात. त्यात हिवाळयातील बर्फाचे थर व उन्हाळयातील बर्फाचे थर हे वेगवेगळे जाणवतात. व प्रत्येक वर्षी निर्माण होणारे हे बर्फाचे थर त्या वर्षातील हिमाबद्दल भरपुर माहिती पुरवतात.

·         पृथ्वीवरील अनेक प्रदेशांनी अधुन-मधुन आर्द्र व शुष्क कालावधी अनुभवलेला आहे. त्याची उदाहरणे खालील प्रमाणे
1 सुमारे 8000 वर्षापूर्वी राजस्थानचा प्रदेश आर्द्र व थंड होता.
2 हडप्पा संस्कृतीच्या सुमारे 4000 वर्षापूर्वी पासून शुष्कता निर्माण झाली होती.
3 भूगर्भिय काळामध्ये, सुमारे 500 ते 300 दशलक्ष वर्षापुर्वी पृथ्वी सुध्दा उबदार होती.