योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा
1 लोकसंख्येच्या वितरणावर
परिणाम करणारा प्राकृतिक घटक
अ)
शेती
ब)
खाणकाम
क)
वाहतूक
ड) हवामान
लोकसंख्येच्या
वितरणावर परिणाम करणारा हवामान हा प्राकृतिक घटक आहे
2 लोकसंख्येच्या वितरणावर
परिणाम करणारा मानवी घटक
अ) शेती
ब)
हवामान
क)
पाण्याची उपलब्धता
ड)
मृदा
लोकसंख्येच्या
वितरणावर परिणाम करणारा शेती हा मानवी घटक आहे
3 लोकसंख्या संक्रमण
सिद्धांतांत या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ
अतिशय स्थिर असते
अ) पहिला टप्पा
ब)
दुसरा टप्पा
क)
तिसरा टप्पा
ड)
चौथा टप्पा
लोकसंख्या
संक्रमण सिद्धांत पहिल्या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ
अतिशय स्थिर असते
4 लोकसंख्या संक्रमण
सिद्धांतात हा टप्पा शून्य वाढ दर्शवणारा टप्पा म्हणून ओळखला जातो
अ)
दुसरा टप्पा
ब)
तिसरा
टप्पा
क)
चौथा टप्पा
ड) पाचवा टप्पा
लोकसंख्या
संक्रमण सिद्धांत पाचवा टप्पा हा 0 वाढ
दर्शवणारा टप्पा म्हणून ओळखला जातो
5 लोकसंख्या वयोरचना
मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा असून शिर्षाकडे तो निमुळता होत आहे याचा अर्थ…..
अ)
जन्मदर आणि मृत्युदर हे दोन्ही अगदी कमी
ब)
जन्मदर कमी तर मृत्यूदर
अगदी कमी
क)
जन्मदर जास्त व मृत्यूदर
कमी
ड) जन्मदर व मृत्युदर दोन्ही जास्त
लोकसंख्या
व रचना मनोऱ्याचा
तळ विस्तारत जाणारा असून शिष्याकडे तो निमुळता होत जातो याचा अर्थ जन्म व मृत्यू
दोन्ही दर जास्त आहेत असा होतो
6 स्त्री व पुरुषांचे
लोकसंख्येतील प्रमाण म्हणजे
अ) लिंग-गुणोत्तर
ब)
वयोरचना
क)
साक्षरता
ड)
व्यवसायिक संरचना
स्त्री
व पुरुषांचे लोकसंख्येतील प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर होय
7 देशात ज्या व्यक्तीस
लिहिता-वाचता आणि गणिती प्रक्रिया समजून करता येतात त्या व्यक्तीस काय संबोधतात.
अ) निरक्षर
ब) साक्षर
क) तज्ञ
ड) अडाणी
देशात
ज्या व्यक्तीस लिहिता-वाचता आणि गणिती प्रक्रिया समजून करता येतात त्या व्यक्तीस साक्षर
म्हणतात
8 भारत देशाची अर्थव्यवस्था
अजूनही कृषिप्रधान असून तेथील कार्यशील लोकसंख्या प्रामुख्याने या व्यवसायात
गुंतलेली आहे
अ) चतुर्थक
ब) तृतीय
क) द्वितीय
ड) प्राथमिक
भारत
देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषिप्रधान असून येथील कार्यशील लोकसंख्या
प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आहे
9 काही जमाती गुरांच्या
चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात, हे स्थलांतर कोणत्या स्वरूपाचे असू शकते.
अ) बाह्य स्थलांतर
ब) दीर्घकालीन स्थलांतर
क) हंगामी स्थलांतर
ड) सामाजिक स्थलांतर
काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात, हे स्थलांतर हंगामी स्थलांतर म्हणून ओळखले जाते.
10 एखाद्या रस्त्यालगत किंवा
रेल्वे लाईन अथवा कालव्याला लागून ही वस्ती आढळते.
अ) आयताकृती वस्ती
ब) आकारहीन वस्ती
क) वर्तुळाकार वस्ती
ड) रेषीय वस्ती
एखाद्या
रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन किंवा कालव्याला लागून रेषीय वस्त्या आढळतात
या पेक्षा जास्त प्रश्न पहाण्यासाठी येथे क्लिक करा
https://geographyjuniorcollege.com/choose-the-correct-option/
इयत्ता अकरावी व बारावी भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारीत
विविध नोट्स, माहीती, महत्वाचे व्हिडीओ साठी आमच्या टेलिग्राम गृपला खालील लिंकवर
क्लिक करुन ज्वाइन्ट व्हा.
https://t.me/joinchat/HG6jb0X987uWjEGt
बारावी भूगोल काही महत्वाचे व्हिडीओ खालील लिंकवर जाऊन पहा
1) बारावी भूगोल चूक की बरोबर ते लिहा व सुचनेनुसार विधाने पुर्ण करा
2) बारावी भूगोल अयोग्य / चूकीचा घटक ओळखा Identify the wrong components
3) A : विधान R: कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा
4) बारावी भूगोल अचूक गट ओळखा Identify the correct group
5) बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील योग्य पर्याय (घटक) निवडून विधाने पूर्ण करा
6) बारावी भूगोल सरावप्रश्न संचातील अचूक सहसंबंध ओळखुन साखळी पूर्ण करा चे उत्तरे Complete the chain
7) बारावी प्रात्यक्षिक भूगोल प्रश्नपत्रिका नमुना आराखडा, अंतर्गत मुल्यमापन व गुणदाण
8) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 04 विदा विश्लेषण: गुणानुक्रम सहसंबंध
9) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 08 स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण : मानवी वस्ती
10) बारावी भूगोल लोकसंख्या भूगोल भाग -1 लोकसंख्या वितरण व घनता