चूक
की बरोबर ते सांगा
1 ऑस्ट्रेलिया खंडात कायम
निवासी लोकसंख्या सर्वात कमी आहे-
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
2 आशिया खंडाची
खंडांतर्गत भूमिची टक्केवारी सर्वात कमी आहे-
उत्तर- हे विधान चूक आहे
3 अंटार्टिका खंडावर
लोकसंख्येची घनता दाट आहे
उत्तर- हे विधान चूक आहे
4 विषुववृत्तीय
प्रदेशांमध्ये लोकसंख्येची घनता अतिशय कमी आढळते
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
5 तिबेटच्या पठारावर
लोकसंख्या घनता अधिक आहे
उत्तर- हे विधान चूक आहे
6 ध्रुवीय प्रदेशात
लोकसंख्येची घनता जास्त आढळते
उत्तर- हे विधान चूक आहे
7 स्थलांतरामुळे शहरात
अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
8 नागरी भागाकडे
लोकसंख्येच्या स्थलांतराचे प्रमाण अधिक आढळते
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
9 प्रदेशाची स्वयम् स्वयंपूर्णता स्थलांतरामुळे
संपुष्टात येते
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
10 लोकसंख्येतील
साक्षरता प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
11 लोकसंख्येच्या
वास्तव्याच्या ठिकाणावरून ग्रामीण व शहरी असे दोन वर्ग करता येतात
उत्तर- हे विधान बरोबर
आहे.
12 मानव हा समाजशील
प्राणी असल्याने तो नेहमी समूहाने राहणे पसंत करतो
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
13 एका केंद्राच्या
भोवती केंद्रीय वस्तीचा विकास होतो.
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
14 दोन नद्यांच्या किंवा
रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्रकाठी चौकोनी वस्त्या आढळतात
उत्तर- हे विधान चूक आहे
15 ग्रामीण व नागरी
क्षेत्रांमधील भूमीस ग्रामीण नागरी झालरक्षेत्र असे म्हणतात
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
16 दक्षिण आफ्रिकेच्या
कल्हरी वाळवंटातील बुशमेन आदिवासी जमाती त्यांच्या चरितार्थासाठी शिकार करतात
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
17 उष्णकटिबंधीय सदाहरित
वनातील वृक्षांचे लाकूड अतिशय मऊ असते
उत्तर- हे विधान चूक आहे
18 सूचिपर्णी
वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेले असतात.
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
19 जपान आणि चीन सारख्या
काही देशांमध्ये मासेमारीचे पारंपारिक कौशल्य उच्च दर्जाचे आहे
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
20 शेती खालील प्रदेश
आणि पशुपालन यांचे वितरण बऱ्याच प्रदेशात एकत्रित आढळून येत नाही
उत्तर- हे विधान चूक आहे
21 मानवाने समुद्र व
महासागराच्या तळातून सुद्धा तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली
आहे
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
22 शेती या व्यवसायात
गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण आफ्रिका खंडात जास्त आहे
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
23 उद्योगांचे वर्गीकरण
आकार, कच्च्या मालाचे स्त्रोत, उत्पादनाचे स्वरूप
आणि मालकी या आधारे केले जाते
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
24 तृतीय आर्थिक
व्यवसायात प्राथमिक व्यवसाय प्रमाणे निसर्गातून जसेच्या तसे उत्पादन घेतले जाते
उत्तर- हे विधान चूक आहे
25 व्यापार म्हणजे दोन
किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाण-घेवाण होय
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
26 आंतरराष्ट्रीय
व्यापार चालणे किंवा बंद होणे हे शासन धोरणावर अवलंबून असते
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
27 पर्यटन हा एक
महत्त्वाचा तृतीयक आर्थिक व्यवसाय आहे
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
28 समान गुणधर्माच्या आधारे सदर
प्रदेशाची श्रेणीबद्ध उतरंड करता येते
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
29 भौगोलिक घटकांचा
वाहतुकीवर व व्यापारावर परिणाम होतो
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
30 अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर उद्योगांचा विकास कमी झाला आहे
उत्तर- हे विधान चूक आहे
31 निरक्षरता, दारिद्र्य
यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो
उत्तर- हे विधान बरोबर आहे.
32 गायरान किंवा कायम चराऊ जमीन ही प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या
किंवा शासनाच्या मालकीची असते
उत्तर- हे विधान बरोबर आहे.