हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी उचललेली पाऊले-
1) 9 मे 1992 ला रिओ दी जनेरिओ येथील वसुंधरा
परिषदेत सर्व राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय पर्यावरण करार स्विकारलेला आहे.
2) क्योटो प्रोटोकॉल या आंतररष्ट्रीय करारामध्ये
सदस्य राष्टांकडून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहणे बाबत
सहमती करण्यात आलेली आहे.
3) ओझोन वायूचा नाश करणाऱ्या उत्पादनांचा वापर
हळूहळू बंद करण्या बाबत 1987 साली मॉस्ट्रेअल करार करण्यात आला आहे.
4) पॅरिस करारा नुसार जागतिक तापमान वाढ 1.5 अं.से
मर्यादीत राखण्या बाबत ठरले आहे.
हवामान बदल आणि भारत-
हवामान बदलाचा सर्वात जास्त धोका विकसशिल देश,
अत्यल्प विकसित देश, छोटया बेटांवरील देश यांना होत असतो. उदा.फिजी बेटांचा समूह
येत्या पन्नास वर्षात समुद्राच्या पाण्याखाली जाऊ शकतात.
स्वच्छ
उर्जा व पर्यावरणाची सुरक्षितता या धोरणांचा अवलंब करण्यासाठी भारत सरकार
संवेदनशील आहे व हवामान बदलांबाबत महत्वपूर्ण पाऊले उचलत आहे.
1 हवामान बदलाचा राष्ट्रीय कृती आराखडा(NAPCC)- भारतात सन 2008 च्या या
आराखडया नुसार वेगवेगळया आठ अभियानांच्या माध्यमातुन हवामान बदल रोखणे बाबत पाऊले
उचलले गेलेली आहेत.
2 हवामान बदल अनुकूल निधी- हवामान
बदलामुळे बाधीत झालेल्या राज्यांना/ प्रदेशांना मदत करणे कामी नाबार्ड संस्थेस
स्वतंत्र्य जबाबदारी देण्यात आलेली आहे.
3 राष्ट्रीय स्वच्छ उर्जा निधी- भारतात
कोळशाच्या वापरावर कर लावून स्वच्छ उर्जा अभियानाच्या संशोधन व विकासासाठी निधी
जमा केला जातो प्रकल्पाच्या खर्चासाठी 40% निधी कर्ज किंवा अनुदान दिले जाते.
हवामानाचे बदल रोखण्यासाठी जीवनशैलीतील बदल-
1 कमी अंतर पायी चालत जाणे,
2 गरजेपुरतीच खरेदी करणे,
3 उर्जा बचत करणारी उपकरणांचा वापर,
4 लाकुड, कोळसा सारख्या जैव इंधनाचा वापर कमी
करणे
5 प्लॅस्टीकचा वापर थांबविणे
स्वाध्याय-
साखळी पुर्ण करा.
उत्तर-
अ
|
ब
|
क
|
बर्फाचे वितळणे
|
समुद्रपातळीत वाढ
|
पूर
|
सौरतापाचे परिणाम
|
अवकाळी पाऊस
|
आवर्तांच्या संख्येत वाढ
|
हरितगृह वायू
|
मिथेन
|
शेती
|
जागतिक हवामान बदल
|
पृथ्वीवरील सरासरी तापमान
|
पृथ्वीवरील जीवसुष्टी
|
चूकीचा घटक
ओळखा-
1) जागतिक तापमान वाढीची कारणे- चूकीचा घटक- इ) सूर्याचे भासमान भ्रमण्
2) हवामान बदलाचे मापदंड- चूकीचा घटक ई) कमाल आणि किमान तापमानात वाढ
3) हवामान बदल अभ्यासण्याची साधने- चूकीचा घटक ई) प्राचीन किल्ले
4) जागतिक हवामान बदल रोखण्याचे उपाय-चूकीचा घटक इ) सार्वजनिक वाहतुकीस
बंदी