Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Thursday 11 March 2021

प्रात्यक्षिक क्र 1 सर्वेक्षणाव्दारे माहिती गोळा करणे : ॲपच्या साहय्याने सर्वेक्षण

 

श्री स्वामी समर्थ

प्रात्यक्षिक क्र 1 सर्वेक्षणाव्दारे माहिती गोळा करणे : ॲपच्या साहय्याने सर्वेक्षण

 

       भूगोलात विविध प्रकारची सांख्यिकीय माहिती अभ्यासली जाते, ज्यात हवामान, भूरचना, लोकसंख्या, भूमी उपयोजन स्थलांतर, शहरांपासूनचे अंतर, रस्त्यांची लांबी, आरोग्य इ. घटक आहेत यासाठी अशा घटकांच्या माहिती संकलनाचे कार्य भूगोल अभ्यासकाला करावे लागते.

 

उद्देश-  सर्वेक्षणासाठी प्रश्नावली तयार करणे व सर्वेक्षणाचे आयोजन करणे.

उद्दीष्टे-  1) सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट व व्याप्ती ठरविणे.

        2) उत्कृष्ट प्रश्नावलीची वैशिष्टये समजून घेणे.

        3) सर्वेक्षणासाठी एक चांगली प्रश्नावली तयार करणे.

 

सर्वेक्षणाची Kml / PDF डाऊलनलोड केल्यावर त्यावरुन सर्वेक्षणाची विदा प्राप्त होईल.  

सर्वेक्षणाच्या आकडेवारी / विदेवरुन खालील प्रमाणे विविध मुद्दयांचे अनुशंगाने आपणास विदेचे विश्लेषण करता येईल

 

1) नमुना सर्वेक्षणातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर-

 

केलेल्या 15 कुटुबांच्या सर्वेक्षणातील एकूण पुरुष व स्त्रियांची संख्या शोधून त्यावरुन लिंग गुणोत्तर काढणे.


एकुण पुरुष

एकुण स्त्रिया

इतर

एकूण

21

19

0

40

 

 






                             

 

निष्कर्ष- नमुना सर्वेक्षणातील लोकसंख्येचे लिंगगुणोत्तर 905 असुन ते 1000 पेक्षा कमी आहे. याचा अर्थ दर हजार पुरुषांच्या प्रमाणात स्त्रियांची संख्या कमी आहे. हे गुणोत्तर चांगले माणले जात नाही.

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  

2)  नमुना सर्वेक्षणाची स्त्री-पुरुष वयोरचना-

केलेल्या 15 कुटूबांच्या सर्वेक्षणातील सदस्यांच्या लिंग व वयाचा विचार करुन लोकसंख्येचा मनोरा तयार करणे.

वयोगट (वर्षात)

स्त्री ()

पुरुष ()

एकूण(अ+ब)

 

0-10

1

1

2

10-15

2

3

5

15-20

1

4

5

20-30

4

0

4

30-40

6

5

11

40-50

5

5

10

50-60

0

3

3

60+

0

0

0

एकूण

19

21

40

 



 

 

 निष्कर्ष- वरील मनोऱ्यात कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त आढळत आहे. म्हणजेच अवलंबित्वाचे प्रमाण कमी आहे. या मनोऱ्यात वृध्दांचे वयोगटाचे प्रमाणही कमी दिसते. याचा अर्थ सर्वेक्षित कुटुबांमध्ये वैदयकीय खर्चाचे प्रमाण कमी असणार आहे.

 

3) कुटूंब संदस्याचा शैक्षणिक स्तर-

केलेल्या 15 कुटूबांच्या सर्वेक्षणातील कुटुंबातील सदस्यांच्या शैक्षणिक स्तराचे विश्लेषण करणे-

 

प्राप्त शैक्षणिक पात्रता

पुरुषांची संख्या (अ)

स्त्रिंयाची संख्या (ब)

एकुण    (अ+ ब)

निरक्षर

0

2

2

प्राथमिकपेक्षा कमी

1

0

1

प्राथमिक

0

2

2

उच्च्‍ प्राथमिक

1

1

2

माध्यमिक

6

2

8

उच्च्‍ माध्यमिक

2

6

8

पदवीधर

7

4

11

पदव्युत्‍

4

2

6

पदव्युत्तरपेक्षा जास्त

0

0

0

एकूण

21

19

40

 

 


 


 

  


 

 

निष्कर्ष- सर्वेक्षण नमुन्यातील केवळ 5% लोकसंख्या निरक्षर आहे. तसेच पदव्युत्तर पेक्षा पुढील शिक्षण कोणाचेही नाही.पुरुषांमध्ये शिक्षणाचे सरासरी प्रमाण जास्त आहे. तर पदवी स्तरावर शिक्षणाचे प्रमाणही पुरुषांचे जास्त आहे. 

          

4) कुटुंबाचा पेशा / रोजगार / व्यवसाय

केलेल्या 15 कुटूबांच्या सर्वेक्षणातील कुटुंबप्रमुखांच्या व्यवसायाचा विचार करुन विभाजीत वर्तुळ तयार करुन विश्लेषण करणे व्यवसायाची टक्केवारी चे विश्लेषण करणारा स्तंभालेख




 


                    किंवा




 

 

 

निष्कर्ष- सर्वेक्षित आकडेवारीवरुन असे लक्षात येते की, एकूण कुटुबांपैकी प्राथमिक व्यवसायात 33.33% लोक गुंतलेले आहेत. तर व्दितीयक व्यवसायात 13.33% लोक गुंतलेले आहेत तर तृतीय व्यवसायात सर्वात जास्त म्हणजे 53.33% लोक गुंतलेले आहेत. तसेच अकार्यशील घटक या ठिकाणी नाहीत.

 

5) कुटुंबाचे उत्पन्न-

केलेल्या 15 कुटूबांच्या सर्वेक्षणातील कुटुंबाचे उत्पन्नाचे विश्लेषण करणे


 


 

                                   किंवा



 

निष्कर्ष-  सर्वेक्षित कुटुंबात सर्वच प्रकारचे उत्पन्न गटातील कुटुंब आढळून येतात. 50000 पेक्षा कमी उत्पन्न गटात 13.33 %  कुटूंब आहेत, तर 50001 ते 1000000 या श्रेणीत सर्वेक्षित कुटुंबापैकी 80 % कुटूंब येतात. तर दहा लाखापेक्षा जास्त उत्पन्न गटात केवळ 6.67% कुटुंब आहेत.

 

 

 

 

 

 

6) कुटुंबाचे रहात्या घराच्या स्वरुपाचे विश्लेषण-

सर्वेक्षण केलेल्या 15 कुटुंबाचे राहत्या घराचे विश्लेषण करणे. 

 

 

निष्कर्ष- सर्वेक्षण केलेल्या कुटुबांपैकी 6.67% कुटुबांकडे पत्र्याचे घर आहे.  बंगला व फ्लॅट मध्ये राहणारे कुटूंबाची टक्केवारी 20 असुन उर्वरीत सर्व कुटूंब हे इतर प्रकारच्या घरांमध्ये राहत असल्याचे दिसत आहे. 

 


7) वाहतूकीच्या साधनांच्या वापरानुसार कुटुबांची टक्केवारी-




 

 

 

 

निष्कर्ष-  सर्वेक्षण केलेल्या कुटुंबामध्ये वाहन नसलेले एकही कुटुंब नाही. तर 6.67% कुटूंबाकडे सायकल असुन 73.33% कुटूंब हे दुचाकी वाहनाधारक आहेत. 20%  कुटूंबाकडे चारचाकी वाहन आहे.

 

 

 

8) घरात स्वच्छतागृह असलेल्या कुटुबांची टक्केवारी

 



 निष्कर्ष-  सर्वेक्षित कुटुंबामध्ये स्वच्छातागृह नसणाऱ्याचे प्रमाण नाही. तर तात्पुरत्या स्वरुपाचे स्वच्छतागृह असणाऱ्योची टक्केवारी 6.67 आहे.  उर्वरीत सर्वांकडे पक्क्यास्वरुपाचे स्वच्छतागृह आहेत.

 

 


9) सर्वेक्षित 15 कुटुंबातील रोजगारासाठी नियमित केलेल्या प्रवासाचे अंतर व त्यासाठी दररोज होणारा खर्च यांचे परस्पर सहसंबध काढणे

(संदर्भ प्रात्यक्षिक क्रमांक -4 गुणानुक्रम सहसंबंध काढणे)

कुटुंब

रोजगारासाठी

नियमित प्रवासाचे अंतर  (X)

R1

रोजचा प्रवासासाठी लागणारा खर्च (Y)

R2

(R1-R2)

(R1-R2)2

1

 

 

 

 

 

 

2

 

 

 

 

 

 

3

 

 

 

 

 

 

4

 

 

 

 

 

 

5

 

 

 

 

 

 

6

 

 

 

 

 

 

7

 

 

 

 

 

 

8

 

 

 

 

 

 

9

 

 

 

 

 

 

10

 

 

 

 

 

 

11

 

 

 

 

 

 

12

 

 

 

 

 

 

13

 

 

 

 

 

 

14

 

 

 

 

 

 

15

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



निष्कर्ष-



 

नमुना सर्वेक्षण क्र- 2 (इतरांनी केलेले नमुना सर्वेक्षणाचे काही मुद्दयांचे अनुशंगाने विश्लेषण)

PDF स्वरुपात पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 https://drive.google.com/file/d/1nQ-afkz0F7Oxc7h3dQal9pNKBeZnr5vq/view?usp=sharing


 




 

नमुना सर्वेक्षण क्र- 3 ( इतरांनी केलेले नमुना सर्वेक्षणाचे काही मुद्दयांचे अनुशंगाने विश्लेषण)

PDF स्वरुपात पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/1nQmqRLUEJtQVOLjeOywxDOYOB6eyd-fl/view?usp=sharing

 

 

-------------------------------------------------------------------------------------------------------


इयत्ता अकरावी / बारावी

 समर्थ भूगोल नोट्स व 

समर्थ भूगोल प्रत्यक्षिक वही जर्नल







5 comments: