Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Showing posts with label HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिकेतील प्रश्न HSC Board Geography Question Paper. Show all posts
Showing posts with label HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिकेतील प्रश्न HSC Board Geography Question Paper. Show all posts

Wednesday, 10 January 2024

HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिकेतील प्रश्न HSC Board Geography Question Paper

 

HSC बोर्ड  भूगोल प्रश्नपत्रिकेतील प्रश्न HSC Board Geography Question Paper





HSC बोर्ड  भूगोल प्रश्नपत्रिकेतील प्रश्न HSC Board Geography Question Paper सष्टेंबर 2021, जुलै 2022 व मार्च 2023 या वर्षांत बारावी भूगोलाचे विचारलेले प्रश्न



सूचना

 

1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

2) प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या / आलेख काढावे.

3) रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.

4) नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा.

5) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

6) नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी.

 

HSC बोर्ड  भूगोल प्रश्नपत्रिकेतील प्रश्न HSC Board Geography Question Paper

सष्टेंबर 2021, जुलै 2022 व मार्च 2023 या वर्षांत बारावी भूगोलाचे विचारलेले प्रश्न


प्रश्न 1 अ) ,   आणि   स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पुर्ण करा. (5 गुणांसाठी)

 

अक्र

1

सागरी वाहतूक

15 ते 59 वयोगट

मोसेमारी पुरक क्षेत्र

2

कार्यशील लोकसंख्या

प्लवंग

तृतीयक व्यवसाय

3

दंतूर किनारा

बंदराचा विकास

मुनष्यबळाची उपलब्धता

4

माथेरान

मातीची निर्मीती व गुणधर्म

व्यापारास अनुकुल

5

मृदाशास्त्र

पर्यटन

मर्यादीत मासेमारी

6

 

प्राथमिक व्यवसाय

प्राकृतीक भूगोल

 

 

 

अक्र

1

आशिया खंड

डॉगर बँक

कुंभार

2

कुटीर उदयोग

पर्यटन

लोकसंख्या 60%

3

नागरी वसाहत

भूमी 30%

ईशान्य अटलांटीक महासागर

4

माथेरान

 हाताने निर्मिती उदयोग

शहर

5

मत्स क्षेत्र

नगर

तृतीय आर्थिक क्र‍िया

 

 

 

अक्र

1

प्रतिकुल हवामान

भूरचना

वैदयकीय खर्च अधिक

2

वृदृध लोकसंख्या

वजन घटीत कच्चा माल

शेताचा आकार लहान

3

सखोल उदरनिर्वाहक शेती

वाळवंटी प्रदेश

हिमालय

4

साखर कारखाना

60 वर्षपेक्षा जास्त वयोगट

कमी लोकसंख्येची घनता

5

नैसर्गिक प्रदेश

तांदुळ

ऊस उत्पादक प्रदेश

 

 

 

(ब) पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा :  (5 गुणांसाठी)

 

1) लोकसंख्या घनता वर्गीकरणानुसार जास्त घनतेची वस्ती ते कमी घनतेची वस्ती असा क्रम लावा :

          (अ) विखुरलेली वस्ती

          (क) दाट वस्ती

          (ब) एकाकी वस्ती

          (ड) अपखंडीत वस्ती

 

2) खाली दिलेल्या खंडांचा साक्षरतेनुसार उतरता क्रम लावा :

          (अ) आशिय

          (ब) युरोप

          (क) आफ्रिका

          (ड) उत्तर अमेरिका

         

3) तृतीयक व्यवसायापासून प्राप्त स्थूल राष्ट्रीय उत्पन्नानुसार दिलेल्या देशांचा चढता क्रम लावा :

          (अ) भारत

          (ब) संयुक्त संस्थाने

          (क) केनिया

          (ड) डेन्मार्क

 

4) महाराष्ट्रातील दिलेल्या विभागांच्या आर्थिक विकासानुसार चढता क्रम लावा.

          (अ) विदर्भ

          (ब) पश्चिम महाराष्ट्र

          (क) खानदेश

          (ड) मराठवाडा

 

5) विषुववृत्तीय प्रदेशापासून ध्रुवीय प्रदेशांकडे वनांचा क्रम लावा :

          (अ) उष्णकटिबंधीय पानझडी वने

          (ब) विषुववृत्तीय सदाहरित वने

          (क) समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वने

          (ड) समशीतोष्ण कटिबंधीय पानझडी वने

 

 

(क) अचूक सहसंबंध ओळखा व लिहा :  (5-5 गुणांसाठी)

A : विधान R: कारण

 

1) A : सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते.

       R : सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.        


(अ) केवळ A बरोबर आहे.
(ब) केवळ R बरोबर आहे.
(क), A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

 

2) A : नगरे वाढतात, त्याबरोबर त्यांची कार्येही वाढतात.

       R : एका नगराला केवळ एकच कार्य असू शकते.

(अ) केवळ बरोबर आहे.

(ब) केवळ बरोबर आहे.

(क), A आणि हे दोन्ही बरोबर आहेत आणि हे चे अचूक स्पष्टीकरण आहे.

(ड) आणि R  हे दोन्ही बरोबर आहेत परंतु हे चे अचूक स्पष्टीकरण नाही.


3) A : मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोदयोगास पूरक आहे.

       R : उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते.

(अ) केवळ बरोबर आहे.

(ब) केवळ बरोबर आहे.

(क), A आणि हे दोन्ही बरोबर आहेत आणि हे चे अचूक स्पष्टीकरण आहे.

(ड) आणि R  हे दोन्ही बरोबर आहेत परंतु हे चे अचूक स्पष्टीकरण नाही.


 

4) A : निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे.

     R : निसर्गात अनेक चमत्कारी घटना घडत नाहीत.

 (अ) केवळ बरोबर आहे.

(ब) केवळ बरोबर आहे.

(क), A आणि हे दोन्ही बरोबर आहेत आणि हे चे अचूक स्पष्टीकरण आहे.

(ड) आणि R  हे दोन्ही बरोबर आहेत परंतु हे चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

 

5) A : तृतीयक व्यवसायामध्ये वस्तू निर्मिती होत नाही.

      R : या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते.

(अ) केवळ बरोबर आहे.

(ब) केवळ बरोबर आहे.

(क), A आणि हे दोन्ही बरोबर आहेत आणि हे चे अचूक स्पष्टीकरण आहे.

(ड) आणि R  हे दोन्ही बरोबर आहेत परंतु हे चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

6)  A : भूमध्य सामुद्रिक हवामान प्रदेशात मानवी वस्ती वाढली आहे.

       R : हे हवामान मानव व त्याच्या व्यवसायास अनुकूल असते.

      (अ) केवळ बरोबर आहे.

(ब) केवळ बरोबर आहे.

(क), A आणि हे दोन्ही बरोबर आहेत आणि हे चे अचूक स्पष्टीकरण आहे.

(ड) आणि R  हे दोन्ही बरोबर आहेत परंतु हे चे अचूक स्पष्टीकरण नाही.


 

7)  A : लोकसंख्या लाभांशाचे फायदे आपोआप मिळत नाहीत.

       R : देशातील शासन वेगवेगळ्या क्षेत्रासाठी धोरणे आखते.

 (अ) केवळ बरोबर आहे.

(ब) केवळ बरोबर आहे.

(क), A आणि हे दोन्ही बरोबर आहेत आणि हे चे अचूक स्पष्टीकरण आहे.

(ड) आणि R  हे दोन्ही बरोबर आहेत परंतु हे चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

 

8)  A: फळे, कंदमुळे गोळा करणे हा प्राथमिक व्यवसाय आहे.

       R : प्राथमिक व्यवसाय हे सेवा व्यवसाय आहेत

 (अ) केवळ बरोबर आहे.

(ब) केवळ बरोबर आहे.

(क), A आणि हे दोन्ही बरोबर आहेत आणि हे चे अचूक स्पष्टीकरण आहे.

(ड) आणि R  हे दोन्ही बरोबर आहेत परंतु हे चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

9)  A: श्रीलंका हा देश चहाची निर्यात करतो.

       R : मळ्याच्या शेतीचा विकास झाला आहे.

 

 (अ) केवळ बरोबर आहे.

(ब) केवळ बरोबर आहे.

(क) A आणि हे दोन्ही बरोबर आहेत आणि हे चे अचूक स्पष्टीकरण आहे.

(ड) आणि R  हे दोन्ही बरोबर आहेत परंतु हे चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

 

(ड) अयोग्य घटक ओळखा व लिहा :  (5-5 गुणांसाठी)

 

1) नागरीकरणाचे घटक -

          (अ) वाहतूक व्यवस्था 

          (ब) व्यापार

          (ड) आरोग्य सुविधा

          (के) शेती

 

2)  प्राथमिक आर्थिक क्रिया -

          (अ) फळे, कंदमुळे गोळा करणे

          (ब) मासेमारी

          (क) पशुपालन

          (ड) संदेशवहन

 

3) खनिजांवर आधारित उद्योग -

          (अ) कागद निर्मिती उदद्योग

          (व) लोहपोलाद उदयोग

          (क) सिमेंट उद्योग

          (ड) अॅल्युमिनिअम उद्योग

 

4) क्षेत्रीय विकास मोजण्याचे मापदंड -

          (अ) शिक्षण

          (ब) पर्वत

          (क) आयुर्मान

          (ड) लोकसंख्या गुणवत्ता

 

 

5) मानवी भूगोलाच्या शाखा -

          (अ) सामाजिक भूगोल

          (च) राजकीय भूगोल

          (क) आर्थिक भूगोल

           (ङ) मृदा भूगोल

 

6) लोकसंख्या बदलाचे घटक

    (अ) वय

    (ब) लिंग

    (क) शरीर

    (ड) आयुर्मान

 

7) प्राथमिक आर्थिक क्रिया

    (अ) खाणकाम

    (ब) लाकूडतोड

    (क) मासेमारी

 

8) साखर उद्योगावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक

          (अ) भांडवल

          (ब) कच्चा माल

          (क) पाणी पुरवठा

          (ड) भूपृष्ठ रचना

 

9) संदेशवहनाची साधने

          (अ) दूरदर्शन

          (ब) रेडिओ

          (क) रेल्वे

          (ड) भ्रमणध्वनी

 

10) प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक

          (अ) लोकसंख्या

          (ब) आर्थिक क्रिया

          (क) भाषा

          (ड) भूमी उपयोजन

 

 

Ø अचूक पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा :  (5 गुणांसाठी)

 

1) अक्षांशांशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय

          (अ) लाकूडतोड

          (ब) मासेमारी

          (क) खाणकाम

          (ड) शेती

 

2) संयुक्त संस्थानाचे औदयोगिक विभाग देशाच्या ईशान्य भागात स्थापन झाले आहेत -

          (अ) तेथे लोकसंख्या दाट आहे

          (ब) तेथे मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध

          (क) तेथे कोळसा व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत

          (ड) तेथे वाहतूक मार्गाचे केंद्रीकरण झालेले आहे

 

3) ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक -

          (अ) पर्थ - सिडनी

          (क) सिडनी - व्हॅन्कुवर

          (ब) पर्थ - व्लॉदिवोस्टोक

          (ड) व्हॅन्कुवर - व्लॉदिवोस्टोक

 

4) स्ट्रॅबो हे तत्त्ववेत्ते या देशातील आहेत -

          (अ) इंग्लंड

          (ब) अरब

          (क) रोम

          (ड) ग्रीक

 

5) 'गेस-पिरिऑड्स' (पृथ्वीचे वर्णन ) या पुस्तकाचे लेखक -

          (अ) हेकेटस (hecataeus)

          (ब) स्ट्रॅबो

          (क) हम्बोल्ट

          (ड) रिटर

 

 

 

(ड) 'बरोबर' की 'चूक' ते लिहा (5-5 गुणांसाठी)

1) जन्मदर व मृत्युदर दोन्ही अधिक असेल तर लोकसंख्या वाढ होते.

2) स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही.

3) भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात नाही.

4) कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयात अनेक फळ प्रक्रिया उद्योग आढळतात.

5) भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे.

6) लोकसंख्येचे वितरण सर्वत्र समान असते.

7) भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत नसते.

8) प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो.

9) भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे.

10) भूगोल विषयाचा अभ्यास आंतरविदद्याशाखीय आहे. प्रश्न

 

 

 

प्रश्न 2 खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा (कोणतीही चार प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात 12 गुण)

 

1)    उद्‌योगधंदयाचे वितरण असमान आहे.

2)    कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झाला आहे.

3)    कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयात अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात.

4)    ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते.

5)    तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश असतो.

6)    नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे.

7)    भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे.

8)    भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते.

9)    मानवी भूगोलाचे स्वरूप विभिन्न शाखांशी निगडित आहे.

10)                      वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते.

11)                      विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे.

12)                      शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे.

13)                      स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही.

14)                      हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे.

15)                      हिमालय पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही.

 

 

 

 

प्रश्न 3. खालील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात.- 9 गुण)

 

1)    ओसाड भूमी आणि बिगरशेती भूमी

2)    केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती

3)    खाणकाम आणि मासेमारी

4)    जलवाहतूक आणि हवाई वाहतूक

5)    देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश

6)    द्वितीयक आर्थिक क्रिया आणि तृतीयक आर्थिक क्रिया

7)    प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश

8)    प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसाय

9)    प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसाय

10)                      भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन

11)                      मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती

12)                      मळ्याची शेती आणि विस्तृत शेती

13)                      मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल

14)                      लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पहिला टप्पा आणि पाचवा टप्पा

15)                      विस्तारणारा लोकसंख्या मनोरा आणि संकोचणारा लोकसंख्या मनोरा

 

 

 

प्रश्न 4. (अ) तुम्हांस दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा (कोणतेही सहा बाबी नकाशात सुची सह दर्शवायच्या असतात 6 गुण)

 

1)    अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र - मुंबई

2)    ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश

3)    

4)    ऑस्ट्रेलियातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश

5)    चहा निर्यात करणारा प्रमुख देश

6)    जपानमधील एक प्रमुख औदयोगिक शहर

7)    डॉगर बँक मत्स्यक्षेत्र

8)    दोन खंडादरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग

9)    नाईल नदी खोरे

10)                      पंचमहासरोवराजवळील औदयोगिक क्षेत्र

11)                      पनामा कालवा

12)                      भारतातील पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त असलेले राज्य

13)                      भारतातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असणारे राज्य

14)                      मुंबई महानगर

15)                      रॉकी पर्वतीय प्रदेश

16)                      लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील पाचव्या टप्यातील देश - स्वीडन

17)                      संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये महाकाय नगर- न्यूयॉर्क

18)                      सर्वात कमी लिंगगुणोत्तर असणारा देश संयुक्त अरब अमिरात

19)                      सहारा वाळवंट

20)                      सुएझ कालवा

21)                      हूर औदयोगिक क्षेत्र

 

 

 

 

 

प्रश्न 4. (ब) खालील आलेखाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा              ( नकाशावरील 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात 5 गुण)



1) दिलेल्या आकृतीत काय दर्शविले आहे ?

2) कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात जास्त आहे

3) लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता

4) 16.96 % टक्केवारी कोणत्या खंडाची आहे?

5) या आकृतीमध्ये किती खंड दर्शविले आहेत?







1) प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या वर्षी गुंतलेली आहे?

2) द्वितीयक आर्थिक क्रियांमध्ये 1979 आणि 1991 तील गुंतलेल्या लोकांची टक्केवारी सांगा.

3) 1951 ते 2011 मध्ये सर्वांत कमी प्रमाणात गुंतलेल्या आर्थिक क्रिया कोणत्या?

4) 2011 या वर्षी द्वितीयक आणि तृतीयक आर्थिक क्रियात वाढ होण्याचे कारण काय असावे?

5) कोणते वर्ष आर्थिकदृष्ट्या अधिक उन्नतीचे आहे?

 

 

 



1) कोणत्या वयोगटाची लोकसंख्या जास्त आहे?

2) कोणत्या वयोगटाची लोकसंख्या कमी आहे?

3) 30 ते 39 या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण किती टक्के आहे?

4) 10% स्त्रियांची टक्केवारी कोणत्या वयोगटाची आहे?

5) 50 ते 59 या वयोगटात पुरुषांचे प्रमाण किती टक्के आहे?

 

 

 

प्रश्न 5. खालील विषयांवर संक्षिप्त लिहा:  (कोणत्याही तीनटिपांचीसविस्तर उत्तरे लिहायची असतात 12 गुण)

1)    ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया

2)    जगातील प्रमख औद्योगिक प्रदेश

3)    प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक

4)    भूगोल अभ्यासकाची कौशल्ये

5)    भूगोलाच्या शाखा

6)    भूगोलातील आधुनिक कल

7)    भूरचनेचा लोकसंख्या वितरणावरील प्रभाव

8)    मळ्याची शेती

9)    लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा

10)                      लोकसंख्येची व्यावसायिक संरचना

11)                      व्यापारात वाहतुकीची भूमिका

12)                      व्यापारी तत्त्वावरील लाकूडतोड व्यवसाय

13)                      संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व

14)                      स्थानमुक्त उद्योग

 

 

प्रश्न 6. (अ) खालील दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

( उताऱ्यावरील चार प्रश्नांची उत्तरे लिहावी 4 गुण)

 

          मानव खनिजांचा उपयोग प्राचीन काळापासून करत आला आहे. हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जात असे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पे ही त्यांच्या खनिज वापराशी निगडित आहेत. पाषाण युगाच्या शेवटच्या टप्यावर मानवाने भूमिगत खाणकामाचे कौशल्य आत्मसात केले. अनुक्रमे कास्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग या क्रमाने कालखंड खनिजांच्या वापरानुसार अधोरेखीत करण्यात आले. या प्राथमिक आर्थिक क्रियेतूनच मानवाची प्रगती होत गेली आहे. मानवाने समुद्र आणि महासागराच्या तळातून सुद्धा खनिज तेल व नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

 

प्रश्न :

1)    मानवाने खनिजांचा उपयोग कोणकोणत्या वस्तू बनवण्याकरिता केला आहे?

2)    मानवाने भूमिगत खाणकामाचे कौशल्य केव्हा आत्मसात केले?

3)    खनिजांच्या वापरानुसार कोणकोणते कालखंड आहेत?

4)    मानवाने महासागराच्या तळातून कोणकोणती उत्पादने घेतली आहेत?

 

 

 

 

 

 

 

'पर्यटन नियोजन'

कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पर्यटन क्षेत्रात नियोजित विकासाची आवश्यकता खूप महत्त्वाची आहे. यात अनेक उदयोग जटिल मार्गाने एकत्र काम करीत आहेत. आणि त्यांना विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मूलभूतपणे (नियोजन म्हणजे विविध प्रतिस्पर्थ्यांमधील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढविण्याच्या दृष्टीने आणि विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मर्यादित स्रोत वाटप करण्याचा प्रयत्न केला जातो. टूरिझम नियोजन ही अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे निश्चित उद्दिष्ट्ये साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणे, श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर प्रक्रिया आहे, समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्त्वे आहेत. हे प्रामुख्याने स्थानिक समुदायांद्वारे दर्शविलेल्या स्वीकृतीच्या पातळीवर अवलंबून असते. प्रक्रियेत त्यांचा सहभाग आवश्यक आहे. पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक संस्कृती आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हे परिणाम नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात. गंतव्यस्थानाच्या शाश्वत विकासासाठी, नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामास चालना देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे.

 

प्रश्न :

1)    पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते?

2)    नियोजनात समुदायांचे महत्त्व काय आहे?

3)    नियोजनाचे कोणतेही दोन फायदे लिहा.

4)    नियोजन हे दीर्घकालीन कार्य का असते?

 

 

          नैसर्गिक संसाधनात भूमीला विशेष महत्त्व आहे. कारण अन्नधान्य, घरे, तलाव, उदयोग, रस्ते, लोहमार्गाची उभारणी, चारा व वृक्ष लागवडींसाठी भूमीचीच आवश्यकता असते. देशात सुपीक जमीन जास्त असल्यास शेतीतील उत्पादकता जास्त असते. वन संपत्तीमुळे पशुपालन, औषधी वनस्पतीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल साधला जातो. भारत देशाचे भौगोलिक क्षेत्रफळ ३२,८७, २६३ चौ. कि.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात सातवा क्रमांक आहे. लागवडीखालील क्षेत्रात भारताचा सातवा क्रमांक आहे. लागवडीयोग्य क्षेत्र १८,६४,००,००० हेक्टर आहे. देशातील एकूण क्षेत्रफळापैकी याचे प्रमाण ७७% आहे. देशातील मात्र एकूण लागवडी खालील क्षेत्राच्या ४६ टक्केच क्षेत्राचा लागवडीसाठी उपयोग होतो. देशातील लोकसंख्येत

वाढ, उ‌द्योगांचा विकास, रस्ते व तलाव निर्मिती यांसारख्या कारणांमुळे लागवडीखालील क्षेत्रात घट होत आहे.भारतात भूमीच्या गुणधर्माबाबत खूप भिन्नता आढळते. उत्तरेकडील राज्य पर्वतीय क्षेत्रात असल्यामुळे त्याठिकाणी लागवडीखालील जमिनीचे क्षेत्र, जमिनीची सुपीकता कमी आहे. राजस्थान व गुजरात राज्यांचा काही भाग वाळवंटी स्वरूपाचा आहे. तर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सुपीक जमीनीचे प्रमाण जास्त आहे.

 

प्रश्न :

1)    सर्वात महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन कोणते आहे?

2)    भूमीचे विविध उपयोग कोणते?

3)    जगातील देशांच्या क्षेत्रफळाच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक कितवा आहे?

4)    भारतातील लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी उपाय सुचवा.

 

 

 

 

 

 

प्रश्न 6. (ब) आकृती काढून नावे दया (कोणत्याही दोन 4 गुण) :

 

1)    वयोरचनेचा विस्तारणारा मनोरा

2)    रेषीय वस्ती

3)    भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारी कौशल्ये

4)    त्रिकोणी वस्ती

5)    उदयोगांचे कच्च्यामालाच्या स्रोतानुसार वर्गीकरण

6)    प्राथमिक आर्थिक क्रिया

7)    लोकसंख्या संक्रमण सिद्धांत

8)    स्थिरावलेला मनोरा

9)    भूगोलाचा अन्य विषयांशी असलेला सहसंबंध

 

 

प्रश्न 7. सविस्तर उत्तरे लिहा  : (कोणत्याही एका प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहावे 8 गुण)

1)    लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक उदाहरणासहित स्पष्ट करा.

2)    साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.

3)    लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक लिहा.

4)    प्रदेश कशाला म्हणतात? भारत सरकारने प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी केलेले उपाय लिहा.

5)    सखोल उदरनिर्वाहक शेतीबद्दल माहिती लिहा.

6)    उदयोगाच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा.



1) बारावी भूगोल चूक की बरोबर ते लिहा व सुचनेनुसार विधाने पुर्ण करा



बारावी भूगोल अयोग्य चूकीचा घटक ओळखा  Identify the wrong components




बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील योग्य पर्याय (घटक) निवडून विधाने पूर्ण करा





बारावी प्रात्यक्षिक भूगोल प्रश्नपत्रिका नमुना आराखडा, अंतर्गत मुल्यमापन व गुणदाण




https://geographyjuniorcollege.blogspot.com/2022/02/1.html

काशावरील प्रश्न व त्यांची उत्तरे