भू-हालचाली, मंद हालचाली, वळी व वळीकरण Earth Movements, Slow Movements , Folding
इयत्ता
अकरावी
भू-हालचाली
भूभागावर दिसणारे पर्वत पठारे दऱ्या इ. भरुपे पृथ्वीच्या अंतर्गत व बर्हिगत बलामुळे होते. अंतर्गत प्रक्रीयांचे मंद हालचाली व शीघ्र हालचाली असे दोन प्रकार पडतात.
ताण व दाब या अंतर्गत बलामुळे पृथ्वीचा
पृष्ठभाग हा मंद गतीने व सातत्याने बदलत आहे. पृथ्वीच्या या अंतर्गत मंद गतीमुळे /
हालचालीमुळे पर्वतांची निर्मीती व खंडाचे वितरण होत असते. अंतर्गत
प्रकीयांचेनिरीक्षण करता येत नाही परंतु परीणाम भूपृष्ठावर (पर्वत/पठारे इ.)दिसतात.
शीघ्र हालचाली या भूकवचामध्ये कार्यरत असतात
त्यांचे काही सेंकद किंवा तासांच्या कालावधीत त्यांचे भूकंप व ज्वालामुखी रुपात
परीणाम भूपृष्ठावर जाणवतात.
भू-हालचाली, मंद हालचाली, वळी व वळीकरण Earth Movements, Slow Movements , Folding
भू-हालचालींचे
पुरावे-
1
2004 च्या सुनामी नंतर सुमात्रा बेटाच्याकिनाऱ्याची उंची कामी सेंटीमिटरने वाढली.
2
हिमालय पर्वतातील शिवालिक, मध्य
हिमालय,हिमाद्री या पर्वतरांगाची निर्मीती
3
मेगापोड नावाचे बेट सुनामीनंतर लुप्त झाले.
भू-हालचाली, मंद हालचाली, वळी व वळीकरण Earth Movements, Slow Movements , Folding
भू हालचालींचे वर्गीकरण व भू हालचालींचे पुरावे व्हिडिओ पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/i1-_ERciqmM
मंद हालचाली-
अंतर्गत
भू हालचाली प्रक्रीया यातिशय गुंतागुतीच्या असुन त्या अंतर्गत बालामुळे भूकवचात
घडून येत असतात म्हणुन त्यांना भूविवर्तनकी हालचाली असे म्हणतात. या हालचाली 1) उर्ध्वगामी(उभ्या स्वरुपात) व 2) क्षितिज समांतर (आडव्या स्वरुपात)
घडत असतात. त्यावरुनच त्यांचे समांतर दोन गट पडतात.
1) उर्ध्वगामी हालचाली (खंडनिर्माण करणाऱ्या हालचाली)-
या हालचालीमुळे भूकवचाचाविस्तीर्ण भाग वर उचलला जातेकिंवा खचातो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडाचीनिर्मीती होते. म्हणुन या हालचालींना खंडनिर्माण करणाऱ्या हालचाली म्हणतात.
या
हालाचाली भुपृष्ठाकडून केंद्राकडेकिंवा केंद्रा कडून भुपृष्ठाकडे (खालीवर) मंद
गतिने होत असतात.
या हालचालींचा अवाका मोठा असतो
2) क्षीतिज संमातर हालचाली (पर्वतनिर्माण करणाऱ्या हालचाली)–
या हालचालींमुळे खडकांच्या स्तरात वळया पडतात किंवा विभंगनिर्माण होतात त्यामुळे घडीचे पर्वत किंवा गट पर्वतांचीनिर्मीण होतात म्हणुन यां हालचालींना पर्वतनिर्माण करणाऱ्या हालचाली म्हणतात. या हालचालीमुळे खडाकांच्या स्तरात ताण किंवा दाबनिर्माण होतो. या हालचालीमुळे भूपृष्ठास वळया, घडया, भेगा, पडतात त्यातुन पर्वतांचीनिर्मीती होते. खंडनिर्माण करणाऱ्या हालचालीपेक्षा यांचा वेग जास्त असतो मात्र अवाका कमी असतो. या हालचालीत खालील प्रकारची बले कार्यरत असतात.
· ताणनिर्माण करणारी बले-
खडकांच्या थरांमध्ये एकमेकांच्या विरुध्द दिशेने ताण निर्माण झाल्यास भूप्ठाला छेद, भेग, भंग किंवा तडे पडतात त्यासविभंग (प्रस्तरभंग) म्हटले जाते त्यामुळे खचदरी किंवा गट पर्वतांची निर्मीती होते.
· दाब निर्माण करणारी बले-
खडकांच्या थरांमध्ये एकमेकांच्या दिशेने दाब निर्माण होवुन भूपुष्ठास बाक/वाक, वळया तसेच भेगा पडतात त्यातुन वळी पर्वतांची निर्मीती होते. उदा.हिमालय आल्प्स, रॉकी, अँडीज इ.
वळी किंवा वळीकरण-
भूष्ठाला पडणाऱ्या वळयाचे स्वरुप खडकांचे स्वरुप, बालाचीतिव्रता व कालावधी या घटकांवर अवलंबुन असते. मृदु व लवचिक खडकांवर इतर खडकांच्या तुलनेत बलाचा प्रभाव जास्त पडतो. भूकवचात खोलवर असलेले खडक प्रचंड दाबाखाली असल्याने ते लवचिक असतात त्या मुळे ते तुटत नाहीत त्यांना वळया पडतात व वळी पर्वतांची निर्मीती बालाचा परीणाम झालेल्या खडकांचा प्रतिसाद हो तो खडक कीती कठीण आहे व बलाचा प्रवेग किती आहे यावर अवलंबुन असतो. होते. उदा.1 प्राचीन वली पर्वत- अरवली, उरल ॲपेलिशियन पर्वत 2. अर्वाचीन वली पर्वत रॉकी व हिमालय पर्वत
वलीचे भाग / प्रकार-
वळयांच्या दोन्ही बाजूंना भुजा म्हणतात. अक्षीय प्रतल वळयांचे दोन भाग
करते. ते उभे, आडवे वतिरपे असू शकते.
अपनती वली |
अभिनती वली |
1 या वळींचा मध्य भाग अधीक उंचीवर असतो
|
1 या वळींचा मध्य भाग कमी उंचीवर असतो
|
2 या वळींच्या भुजा विरुध्द दिशेस उतरतात
|
2 या वळींच्या भुजा मध्यभागी एकमेंकांकडे उतरतात
|
A- अपनती वली- जेव्हा वळींचा मध्य भाग अधीक उंचीवर व
भुजाविरुध्ददिशेस उतरतात त्या वळीस अपनतीवली म्हणतात.
B- अभिनती वली- जेव्हा वळींचा मध्य भाग कमी उंचीवर असतो
व त्याच्या भुजा मध्यभागी एकमेकांकडे उतरतात तेव्हा त्य वळीस अभिनती वली म्हणतात.
केंद्रीत बलामुळे वळीकरणाची प्रकीया होत असते मृदु व लवचिक खडकांवर केंद्रीत
बलाचापरीणाम होऊन दोन भागातील खडक एकमेंकाकडे ढकलले जातात तो भाग संकुचित व जाड
होतोत्यातुन वळया/ वळीकरण घडते. खडक मृदु व लवचिक असल्यास केद्रींत बलाचा परीणाम
होऊन वळया पडतात यात खडकांचे स्वरुप व प्रतिसाद, बलाची तिव्रता व प्रवेग, कालावधी
नुसार वळयांचा आकार प्राप्त होत असतो.
वळींचे प्रकार-
सममित वली- यांचा अक्षीयप्रतल उर्ध्वगामी असतो तर वलींच्या भुजांचा उतार समान असतो
असममित वली – यांचा अक्षीय प्रतल कललेले/तिरपे असतात. तर भुजांचे कोन कमी जास्त असतात.
उलथलेली वली- यात वलींची एक शाखा दुसऱ्या शाखेवर झुकलेली असते तसेच भुजांचा उतार एकाच दिशेने असतो मात्र कोन कमी जास्त असतात.
आडवी वली- एक वली दुसऱ्या वलीवर क्षीतीजसंमातरविसावलेली असते व वळया एकाच दिशेने वळलेल्या असतात.
समनतिक वली- सरळ वळया, अक्षीय प्रतल उभे/आडवे /तिरपे, वळया भुजा एकमेंकास समांतर
सममित वली |
असममित वली |
1 सममित वलींचा अक्षीय प्रतल उर्ध्वगामी असतो
|
1 असममित वलींचा अक्षीय प्रतल कललेला/तिरपा
असतो
|
2 या वलींच्या भुजांचा उतार समान असतो
|
2 या वलींच्या भुजांचे कोन कमी जास्त असतात
|
विभंग (प्रस्तरभंग) -
पृथ्वीच्याअंतरंगातील एकमेकांच्या विरुध्द दिशेने
निर्माण होणाऱ्या बलांमुळ, खडकांच्या स्तरांत ताणनिर्माण होतो. या ताणामुळे
खडकांना तडे पडतात तर तसेच प्रंचड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा थर
काही वेळेस वलीप्रकीयेस जुमानत नाही. अशा खडकांवर मोठया प्रमाणात ताण पडल्यास तो
तुटू शकतो. अशा खडकांच्या तुटण्यास विभंग,
प्रस्तरभंग,भ्रंश असे म्हणतात.
तडे
गेल्यानंतरहे खडकविस्तापीत होतात हेविस्तापण अधोगामी (खाली), उर्ध्वगामी (वर)किंवा क्षीतीज समांतर (मागेपुढे)असु शकते. खडकांच्या तुटलेल्या प्रतलास विभंग प्रतल म्हणतात. त्यातुनगट
पर्वत व खचदरी सारखे भूस्वरुपांचीनिर्मीती होते
भूकवचात खोलवर असलेल्या खडकांवर इतर खडकांच्या तुलनेत बलाचा/दाबाचावउर्जेचा
प्रभाव जास्त असल्याने ते मृदु व लवचिक असतात. मृदुतावलवचिकपणा या मुळे ते तुटत
नाहीत त्यांना वळया पडतात तरदाबाखाली नसलेले कठीण खडक हे वळी प्रकीयेस त्यांच्या ताठरपणा मुळे जुमानत नाही त्यामुळे ताण व दाबा मुळे ते खडक तुटतात त्यांच्यात
विभंग निर्माण होतो.
भू-हालचाली, मंद हालचाली, वळी व वळीकरण Earth Movements, Slow Movements , Folding
भू-हालचाली, मंद हालचाली, वळी व वळीकरण, विभंग Earth Movements, Slow Movements , Folding, faults
खालील हेंडींगवर क्लिक करुन अधिक माहीती मिळवा
भू हालचालींचे प्रकार गट पर्वतखचदरी
भूकंप प्रक्रीया, भूकंपछायेचा प्रदेश, मर्केली व रिश्टर प्रमाण
भू-हालचाली, मंद हालचाली, वळी व वळीकरण Earth Movements, Slow Movements , Folding