फरक स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा. Differentaiate between
प्रश्न 3 रा फरक स्पष्ट करा.
1) लोकसंख्या संक्रमण : दुसरा टप्पा आणि लोकसंख्या संक्रमण: चौथा टप्पा
2) लोकसंख्या वितरण : मैदानी प्रदेश आणि लोकसंख्या वितरण: पर्वतीय प्रदेश
3) लोकसंख्या संक्रमण : पहिला टप्पा आणि लोकसंख्या संक्रमण: पाचवा टप्पा
4) कमी लोकसंख्येचे प्रदेश आणि जास्त लोकसंख्येचे प्रदेश
5) ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्युदर
●1) लोकसंख्या संक्रमण : दुसरा टप्पा आणि लोकसंख्या संक्रमण: चौथा टप्पा
अक्र |
लोकसंख्या संक्रमण : दुसरा टप्पा |
लोकसंख्या संक्रमण: चौथा टप्पा |
1 |
लोकसंख्या संक्रमणाच्या या टप्प्यास ‘आरंभीच्या काळात विस्तारणारा’ टप्पा म्हणून संबोधले जाते. |
लोकसंख्या संक्रमणाच्या या टप्प्यास ‘कमी बदल दर्शविणारा’ टप्पा म्हणून संबोधले जाते. |
2 |
या टप्प्यात मृत्युदरात घट झालेली असते, परंतु जन्मदर स्थिर असल्याने लोकसंख्या झापाटयाने वाढत असते. |
या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर कमी झालेले असतात. जन्मदर व मुत्युदर जवळजवळ सारखाच असतो त्यामुळे लोकसंख्या वाढ अत्यल्प असते. |
3 |
या टप्प्यातील देशात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैदयकीय सुविधांचा विस्तार झालेला असतो. |
या टप्प्यात उच्चतम वैदयकीय सुविधा उपलब्ध असतात पटकी, प्लेग सारख्या साथीच्या आजारांचा नायनाट झालेला असतो. |
4 |
या टप्प्यातील देशात शेती व उदयोगधंदयातील उत्पादने वाढलेली असतात. |
या टप्प्यातील देशात व्दितीय व तृतीय व्यवसायांचे प्रमाण प्राथमिक व्यवसायांपेक्षा खुप जास्त असते. |
5 |
अधिक लोकसंख्या असणारेविकसनशील देश सध्या या टप्प्यातुन जात आहेत. उदा. कांगो, बांग्लादेश, नायजर व युगांडा |
अमेरिकेची संयुक्त सस्थांने हाविकसीत देश या टप्प्यातुन जात आहे. |
(फरक स्पष्ट करा. Differentaiate between)
●2) लोकसंख्या
वितरण : मैदानी
प्रदेश आणि लोकसंख्या वितरण: पर्वतीय प्रदेश
अक्र |
लोकसंख्या वितरण: मैदानी प्रदेश |
लोकसंख्या वितरण: पर्वतीय प्रदेश |
1 |
100 मीटर पेक्षा कमी उंची असलेल्या सपाट व मंद उताराच्या प्रदेशास मैदानी प्रदेश म्हणतात |
1000 मी. पेक्षा उंच, तीव्र उतार व शिखराकडे निमुळत्या होत गेलेल्या उंच प्रदेशास पर्वतीय प्रदेश म्हणतात. |
2 |
मैदानी प्रदेशात जमीनीच्या सपाट भाग किंवा मंद उतारामुळे लोकसंख्येचे वितरण दाट आढळून येते. |
पर्वतीय प्रदेशात तीव्र उतारामुळे लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते. |
3 |
या प्रदेशात सुपिक गाळाची मृदा, जलसिचंन शेती सुघमता यामुळे लोकसंख्या वाढीस पुरकस्थिती असते. |
पर्वतीय प्रदेशात ओसाड किंवा नापिक जमीन, दुर्गम भाग, पाण्याचा अभाव यामुळे लोकसंख्या विरळ असते. |
4 |
सपाट किंवा मंद उतारामुळे या प्रदेशात वाहतुक सुविधांचा विकास झालेला असतो. |
तीव्र उतार व उंचसखलपणा यामुळे वाहतूक मार्ग फारसे विकसीत नसतात. |
5 |
मैदानी प्रदेशात कच्च्या मालाची उपलब्धता, वाहतूक सुविधा या सारख्या पुरक स्थिती उपलब्ध असल्याने उदयोगधंदयाचा विकास झालेला असतो. त्यामुळे लोकसंख्या एकवटलेली असते. |
शेती अयोग्य जमीन, घनदाट जंगले दुर्गम प्रदेश यामुळे उदयोगधदयांना फारशी चालणा मिळालेली नसते. |
6 |
उदा. भारतातील गंगा सिधु नदीचे खोरे, इजिप्त मधिल नाईल नदीचे खोरे, मिसिसीपी नदीचे खोरे |
उदा. हिमालय पर्वत, रॉकी, अँडीज, ॲपलेशियन पर्वत रांगा |
(फरक स्पष्ट करा. Differentaiate between)
●3) लोकसंख्या संक्रमण : पहिला टप्पा आणि लोकसंख्या संक्रमण: पाचवा टप्पा
अक्र |
लोकसंख्या संक्रमण : पहिला टप्पा |
लोकसंख्या संक्रमण: पाचवा टप्पा |
1 |
लोकसंख्या संक्रमणाच्या
या टप्प्यास ‘अतिशय स्थिर’ टप्पा म्हणून संबोधले जाते. |
लोकसंख्या संक्रमणाच्या
या टप्प्यास ‘ऋणात्मक वाढीचा’ टप्पा म्हणून संबोधले जाते. |
2 |
लोकसंख्या संक्रमणाच्या
पहिल्या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर दोन्ही जास्त असल्याने लोकसंख्या वाढ
स्थिर असते. |
लोकसंख्या संक्रमणाच्या
पाचव्या टप्प्यात जन्मदर खुप कमी होवुन मृत्युदराशी समान झालेला असतो.
त्यामुळे लोकसंख्या वाढ अत्यल्प असते. |
3 |
जन्मदर जास्त असल्याने
या टप्प्यातील प्रदेशात बालकांची संख्या जास्त असते. |
या प्रदेशात जन्मदर
कमी असल्याने बालकांची संख्या खुप कमी झालेली असते. |
4 |
या टप्प्यातील देशात
आर्थिक स्थिती विकसीत नसते. |
या टप्प्यात
नागरिकांची व देशाची आर्थिक स्थिती उत्तम असते. |
5 |
या टप्प्यातील देशात
शेती किंवा प्राथमिक व्यवसायांचे प्रमाण जास्त असते. |
या टप्प्यातील देशात
तृतीयक व्यवसायांचे प्रमाण सर्वाधिक असते. |
6 |
या टप्प्यातील देशात
शैक्षणिक संधी मर्यादीत असतात तर वैदयकीय सुविधांचा अभाव असतो. |
या टप्याच्या
प्रदेशात शैक्षणिक व वैदयकीय सेवा उच्च दर्जाच्या असतात. |
7 |
स्वच्छतेचा अभाव, मोठी कुटुंबे, संसर्गजन्य
रोंगाचा प्रादुर्भाव, कुपोषण अशा अनेक समस्या या प्रदेशातील लोकांना असतात. |
उत्तम आरोग्य, चांगले पर्यावरण
व आंनददायी जीवन या टप्प्यातील नागरीकांचे वैशिष्ट असते. |
8 |
सदयस्थितीत एकही देश या
टप्प्यात नाही. |
स्वीडन व फिनलँड हे देश या टप्प्यात येतात. |
●4) कमी लोकसंख्येचे प्रदेश आणि जास्त लोकसंख्येचे प्रदेश
अक्र |
विरळ लोकसंख्येचे प्रदेश |
जास्त लोकसख्येचे प्रदेश |
1 |
150 पेक्षा कमी लोकसंख्येचे प्रमाण
असणाऱ्या प्रति चौरस कि.मी. क्षेत्रास विरळ लोकसंख्येचे प्रदेश मानले जाते. |
451 पेक्षा जास्त लोकसंख्येचे प्रमाण
असणाऱ्या प्रति चौरस कि.मी. क्षेत्रास प्रदेश जास्त लोकसंख्येचे प्रदेश मानले
जाते. |
2 |
प्रतिकुल हवामान असणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते. |
अनुकुल व सौम्य हवामानाच्या प्रदेशात लोकसंख्या जास्त आढळते. |
3 |
वाळवंटी प्रदेश, घनदाट वने, हिमाच्छादीत
प्रदेश, उंच पर्वतीय प्रदेश, धृवीय प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते. |
सौम्य व अल्हाददायक व मोसमी हवामान,
नदयांचे सुपिक मैदानी खोरे, पाण्याची उपलब्धता, समुद्र किनारी प्रदेशात
लोकसंख्या जास्त आढळते. |
4 |
या प्रदेशात मानवी जीवन खडतर असल्याने लोकसंख्या कमी असते |
या प्रदेशात मानवी जीवनास उपयुक्त अशी स्थिती उदयोगधंदयाचा विकास,
वाहतुक सुविधा यामुळे लोकसंख्या जास्त
असते. |
(फरक स्पष्ट करा. Differentaiate between)
●5) ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्युदर
अ क्र |
ढोबळ जन्मदर |
ढोबळ मृत्युदर |
1 |
एका प्रदेशात एका
वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांच्या
(अर्भकांच्या) संख्येच्या दराला ढोबळ जन्मदर म्हणतात |
एका प्रदेशात एका
वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे मूत्यु पावलेल्या आलेल्या
बालकांच्या (अर्भकांच्या) संख्येच्या दराला ढोबळ जन्मदर म्हणतात |
2 |
ढोबळ जन्मदर
लोकसंख्येतील बदलात महत्वाची भूमीका बजावतो. |
ढोबळ मृत्युदराची
जन्मदराप्रमाणेच लोकसंख्येतील बदलात भूमीका असते. |
3 |
ढोबळ जन्मदर हा
वाढता असल्यास त्या प्रदेशातील लोकसंख्या वाढत असते. |
जन्मदरापेक्षा
मृत्यूदर कमी अथवा जास्त असल्यास त्या प्रदेशातील लोकसंख्या कमी
अथवा जास्त होते.
|
4 |
ढोबळ जन्मदराचे
प्रमाण कमी असलेले देश विकसीत असतात तर ढोबळ जन्मदराचे प्रमाण जास्त असलेले
प्रदेश विकसनशील किंवा अविकसीत असतात. |
अविकसतील देशात
ढोबळ मृत्यूदर जास्त आढळतो. तर विकसीत देशात
मृत्युदराचे प्रमाण कमी असते. |
5 |
सन 2017 ची आकडेवारी
नुसार ढोबळ जन्मदर जास्त असलेला देश नायजर
(46.5) आहे. तर ढोबळ जन्मदर कमी असलेला
प्रदेश ग्रीस (8.2) आहे |
सन 2017 ची आकडेवारी
नुसार ढोबळ मृत्युदर जास्त असलेला प्रदेश ग्रीस (11.6) आहे. तर मृत्युदर कमी असलेला प्रदेश भारत (7.2) आहे. |
अधिक माहीतीसाठी
खालील मुदृयांवर क्लिक करा.
वस्तूनिष्ठ प्रश्न : अचूक घटक ओळखा
योग्य पर्याय निवडून विधाने पुर्ण करा
Online Test : अचूक सहसंबध ओळखा