लोकसंख्या
बदलाचे घटक- ①वय, लिंग व वास्तव्याचे
ठिकाण तसेच ② रोजगाराचा प्रकार, शिक्षण व आर्युमान या
घटकांच्या सहाय्याने लोकसंख्यचे वेगळेपण किंवा वर्गवारी करता येते.
▪
आकृती काय दर्शविते. –(जन्म व मृत्यूदरातील तफावत)
▪
जन्मदरापेक्षा मृत्युदर जास्त असल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होईल. – (लोकसंख्या कमी
होईल)
▪ मृत्यूदरापेक्षा
जन्मदर जास्त असल्यास लोकसख्येवर काय परिणाम होईल.
–( लोकसंख्या वाढेल)
▪
दोन्ही दर समान असलयास काय होईल? असे शक्य
आहे का?- (लोकसंख्या स्थिर राहील काही
ठिकाणी शक्य आहे )
लोकसंखेतील बदल
– लोकसंखेतील बदल हा एखादया प्रदेशातील विशिष्ट कालावधीमध्ये लोकांच्या संख्येत
झालेला बदल असतो. हा बदल
①सकारात्मक (वाढ) किंवा नकारात्मक (घट)असु शकतो.
②हा बदल
संख्यात्मककिंवा टक्केवारीच्या स्वरुपातही असतो.
③ हा बदल आर्थिक
विकासाचा एक निर्देशक असतो. तसेच
④ सामाजिक उत्थानाचे प्रतिक म्हणून सुध्दा
लोकसंख्या बदलाकडे पहाता येते.
● लोकसंख्या बदलाचे परिमाण- जन्म, मृत्यू आणि स्थलांतर हे लोकसंख्या
बदलातील तीन घटक आहेत.
i) साधारण पणे जन्म व
मृत्यूदरास ढोबळ दर माणले जाते, कारण हे दर सांगताना लोकसंख्येची वयोरचना,
प्रजननशील वयोगट विचारात घेतलेले नसतात. परंतु
ii) प्रत्यक्ष जन्म व मृत्यूदर सांगताना
देशाच्या लोकसंख्येतील वयोरचना विचारात घेतलेली असते कारण जन्मदर व मृत्यूदर एकाच
वेळी सर्व वयोगटांसाठी सारखा नसतो.
A) ढोबळ जन्मदर-
एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अर्भके.
उदा. एका शहरात 2019 साठी 3250 अर्भके जन्माला आली,
त्या शहरातील लोकंसख्या 223000 होती तर ढोबळ जन्मदर पुढील प्रमाणे काढता येईल.
B) ढोबळ मृत्यूदर- एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे होणारे मृत्यू होय. लोकसंख्येतील
वाढ केवळ वाढत्या जन्मदरानेच वाढत असते असे नाही तर मृत्यूदर कमी होत गेल्यानेही
लोकसंख्या वाढत असते. त्यामुळे मृत्यूदर
देखील लोकसंख्येच्या वाढीत भूमीका बजावतो.
खालील
तक्यात काही देशांचा ढोबळ जन्मदर व ढोबळ मृत्यूदर चढत्या क्रमाने दर्शविला आहे.
निरीक्षण करा.
देश
|
ढोबळ जन्मदर सन 2017
|
देश
|
ढोबळ मृत्युदर सन 2017
|
|
ग्रीस
|
8.2
|
चीन
|
7.1
|
|
स्वीडन
|
11.5
|
भारत
|
7.2
|
|
अमेरिकेची
सुयुक्त संस्थाने
|
11.8
|
अमेरिकेची
सुयुक्त संस्थाने
|
8.5
|
|
चीन
|
12.4
|
नायजर
|
8.5
|
|
भारत
|
18.1
|
स्वीडन
|
9.1
|
|
नायजर
|
46.5
|
ग्रीस
|
11.6
|
जगातील काही काही देशांचा ढोबळ जन्मदर व ढोबळ मृत्यूदर
देश
|
ढोबळ जन्मदर सन 2017
|
ढोबळ मृत्युदर सन2017
|
स्वीडन
|
11.5
|
9.1
|
भारत
|
18.1
|
7.2
|
ग्रीस
|
8.2
|
11.6
|
चीन
|
12.4
|
7.1
|
अमेरिकेची
सुयुक्त संस्थाने
|
11.8
|
8.5
|
नायजर
|
46.5
|
8.5
|
जन्मदर व मृत्यूदर यातील सहसंबंध (लोकसंख्या वाढ व विस्पोट) – जन्मदर व मृत्यूदरामुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट होते.
① जन्मदर व मृत्यूदर हे दोन्ही जास्त असल्यास लोकसंख्यावाढ ही स्थिर असते.
② जन्मदर जास्त व मृत्यूदर घटता राहील्यास लोकसंख्या झपाटयाने वाढत जाते.
③ जन्मदर कमी व मृत्यूदर कमी असल्यास लोकसंख्या वृध्दी अत्यल्प असते. परंतु जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी असल्यास लोकसंखेत मध्यम वाढ पहावयास मिळते.
④ परंतु जर जन्मदर कमी होत राहील्यास (घटता), त्याच बरोबर मृत्यूदर कमी परंतु जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी नसल्यास लोकसंख्यावाढ अत्यल्प प्रमाणात असते
⑤ जन्मदर खुप कमी होऊन मृत्यूदरा ऐवढा होतो तेव्हा काही देशांमध्ये लोकसख्येत घट होते तर काही ठिकाणी लोकसंख्यावाढ अत्यंत कमी असते.
अक्र
|
जन्मदर
|
मृत्यूदर
|
लोकसंख्येवर होणारा परिणाम
|
1
|
जास्त
|
जास्त
|
लोकसंख्या स्थिर व कमी वाढ
|
2
|
जास्त
|
घटता
|
लोकसंख्येची वाढ वेगाने
|
3
|
जास्त
|
कमी
|
लोकसंख्येत मध्यम स्वरुपाची वाढ
|
4
|
घटता
|
कमी
|
लोकसंख्येत अत्यल्प वाढ
|
5
|
कमी
|
कमी
|
लोकसंख्येत अत्यंत कमी वाढ किंवा काही ठिकाणी
लोकसंख्येत घट
|