Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Monday 26 July 2021

इ. अकरावी ( CET) परीक्षा सराव प्रश्नपत्रिका विषय- भूगोल प्रकरण 3 चाचणी क्र- 2 ( प्रश्न 21 ते 40 )

 


इयत्ता अकरावी सामाईक प्रवेश परीक्षा  

   सराव प्रश्नपत्रिका  

   विषय- भूगोल   प्रकरण-  3  

चाचणी क्र- 2 ( प्रश्न 21 ते 40 )

प्रा. मनोज देशमुख 9421680541




 
















अकरावी सामाईक प्रवेश परीक्षेसाठी इयत्ता दहावीचे वस्तूनिष्ठ सराव प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा














Sunday 25 July 2021

अकरावी प्रवेश परीक्षा( CET) विषय- भूगोल सराव प्रश्नपत्रिका- 2 , प्रकरण 3 चाचणी- 1 ( प्रश्न 1 ते 20 )

 


अकरावी सामाईक प्रवेश परीक्षा( CET) सराव प्रश्नपत्रिका  

विषय- भूगोल 

                सराव प्रश्नपत्रिका- 2                 

प्रकरण 3-  सराव चाचणी क्र- 1  ( प्रश्न 1 ते 20 )

प्रा. मनोज देशमुख 9421680541  















Friday 23 July 2021

Thursday 15 July 2021

बारावीचे सुधारीत मुल्यमापन कार्यपध्दतीनुसार गुण भरण्यासाठी तांत्रिक सुचना

 





महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे. यांच्या मार्फत इ. 12 वी चे सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीनुसारदि. 16 जुलै 2021 पासून विषयनिहाय व संकलित गुणांची नोंद मंडळाच्या संगणक प्रणालीमध्ये भरणेबाबत

   तांत्रिक सूचना (Technical Instructions).

 

 

1 संगणक प्रणालीमध्ये सर्व गुण / श्रेणी / इतर मजकूर यांची नोंद करताना फक्त इंग्रजी अंक व अक्षरे वापरावीत

 

2 गुण संगणक प्रणाली मध्ये भरतांना मंडळाच्या

      A)    https://mh-hsc.ac.in 

      B)    http://mahahsscboard.in  

 या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा.

 

 

3 परीक्षेची वेपत्र (form)  भरण्यासाठी वापरलेलाच / User Name, Password  वापरुन  login  करावे.  

 

 

4  Login  केल्यानंतर विद्यार्थ्यांचे पुढीलप्रमाणे पाच प्रकार संगणकीय प्रणालीमध्ये दिसतील.

      1 नियमित विद्यार्थी (Regular Candidate)

      2 पुनर्परीक्षार्थी (Repeater Candidate)

      3 खाजगी विद्यार्थी (Private Candidate)

     4 तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी (Isolated Candidate)

      5 एनएसक्युएफ / एमसी व्हिसी अंतर्गत विषय घेऊन प्रविष्ट होणारे नियमित विद्यार्थी (NSQF Regular/ MCVC Regular)



 

5 माहिती भरण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांचा वरील पैकी एक

प्रकार निवडावा.


 

6 सदर प्रकारावर क्लिक केल्यानंतर शाळा / कॉलेज  मार्फत आवेदनपत्र (form) भरलेल्या विद्यार्थ्यांच्या नावांची यादी बैठक क्रमांक निहाय दिसेल.

 

 

7 विद्यार्थ्यांचे गुण नोंदविण्यासाठी त्याच्या नावापुढील "Fill Marks " या पर्यायावर क्लिक करावे.


 

8 तदनंतर विद्यार्थ्यांने परीक्षा आवेदनपत्रात निवडलेले विषय दिसतील. प्रत्येक विषयासमोर दिलेल्या रकान्यांमध्ये संबंधित विद्यार्थ्यास त्या त्या परीक्षा प्रकारात प्राप्त झालेले गुण / श्रेणी याची नोंद भारांशानुसार करावी.

      ( यासाठी निकाल समितीने पडताळणी करून अंतिम केलेले गुणच संगणक प्रणालीमध्ये भरण्यासाठी ग्राहय धरण्यात यावेत.)



 

9 ज्या विषयांची भाग 1 व भाग- 2 अशी विभागणी दर्शविली आहे, तेथे दोन्ही भागांसमोर गुण नोंदवावेत.



 

10 पुर्नपरिक्षार्थी व तुरळक विषयास प्रविष्ट विद्यार्थ्यांचे गुण भरतांना यापूर्वी इ. 12 वी परीक्षेस उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेच्या तपशिलासह सदर विषयाच्या लेखी परीक्षेचे व तोंडी / प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचे प्राप्त झालेले गुण स्वतंत्रपणे भरावेत.


 

 

11 संगणक प्रणालीमध्ये नमूद केलेल्या विषयात अथवा विषयातील सूट यामध्ये बदल असल्यास सदर विषयासमोरील गुणांच्या सर्व रकान्यामध्ये MM असे दर्शवावे.  तसेच सर्व विषय / काही विषय / विषयांच्या काही मूल्यमापनास अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित ठिकाणी AA असे दर्शवावे. सदर दुरुस्तीचा तपशील / बदललेल्या विषयाचे गुण व इतर तपशील संबंधित विभागीय मंडळास परिशिष्ठामध्ये नोंदवून वेगळया पाकीटात पुढील कार्यवाहीसाठी जमा करावे.


 

12 विद्यार्थ्याची विषयनिहाय माहिती भरल्यानंतर "Submit" या पर्यायावर क्लिक करावे. विद्यार्थ्यांच्या भरलेल्या गुणांची पुनःश्च पडताळणी करून घ्यावी. एकदा भरलेले गुण / श्रेणी आवश्यकता असल्यास “Edit Marks" हा पर्याय निवडून बदल करता येईल.

 

13 उपरोक्तप्रमाणे विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरल्यानंतर त्याच्या नावासमोर "Confirm" हा पर्याय उपलब्ध होईल, तो क्लिक करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याची माहिती “Confirm" केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही.   तसेच “Confirm" या पर्यायावर क्लिक केल्याशिवाय गुण ग्राहय धरले जाणार नाही.


 

14 प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुण नोंदणीसाठी वरीलप्रमाणे स्वतंत्रपणे कार्यवाही करावी.


 

15 "Report " मेनू वर जाऊन विद्यार्थ्याच्या गुणांची पडताळणी करता येईल.

 

16 अतिविलंब / विशेष अतिविलंब / अतिविशेष अतिविलंब शुल्काने उशिरा आवेदनपत्र भरल्याने अथवा अन्य कारणाने ज्या विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक व इतर माहिती संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध नसेल अशा विद्यार्थ्यांचा अतिरिक्त बैठक क्रमांक विभागीय मंडळाकडून प्राप्त करुन घेण्यात यावा. सदर विद्यार्थ्याचे गुण / श्रेणी / अन्य तपशिल बैठक क्रमांकासह परिशिष्ठामध्ये भरण्यात यावेत व सिलबंद पाकिटातून विभागीय मंडळाकडे जमा करावे. अशा अतिरिक्त बैठक क्रमांकाबाबत संबंधित विभागीय मंडळामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल.


 

17 महत्वाचे संगणक प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे गुण / श्रेणी / इतर मजकूर यांची नोंद करण्याची कार्यवाही मंडळाने दिलेल्या कालावधीतच करणे अनिवार्य आहे. तद्नंतर यासाठी सदर सुविधा उपलब्ध असणार नाही.







Monday 12 July 2021

बारावी भूगोल प्रात्यक्षिकात तोंडी प्रश्न विचारणे साठी किंवा वस्तूनिष्ठ प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी उपयोगी प्रश्न

 




1 कोणत्याही प्रकारच्या सर्वेक्षणासाठी खालीलपैकी कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे

            A  सर्वेक्षणाचे उद्दिष्ट व व्याप्ती ठरविणे

            सर्वेक्षणाचा प्रदेश ठरविणे

            सर्वेक्षणाची आकडेवारी ठरविणे

            सर्वेक्षणाचा कालावधी ठरविणे

 

सर्वेक्षणात माहिती मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक आहे

            सर्वेक्षणाचा प्रदेश

            सर्वेक्षण करणाऱ्याचा अनुभव         

      सर्वेक्षणाची  आदर्श प्रश्नावली

            D   सर्वेक्षण करणाऱ्याचे व्यक्तिमत्व व कौशल्य  

 

3 प्रदेशाचे लिंग गुणोत्तर काढण्यासाठी वापरण्यात येणारे योग्य सूत्र कोणते

- एकूण पुरूषांची  संख्या / एकूण स्त्रियांची संख्या  X 100

B-  एकूण स्त्रियांची संख्या /  एकूण पुरुषांची संख्या X 1000

C- स्त्रिया / पुरुष  X 100

D-  पुरुष / एकूण श्रिया X 1000

 

 खालील संगणकीय माहितीचे निरीक्षण करा प्रश्न क्रमांक चार 4, 5   6 ची उत्तरे द्या 

26  18  21  34  18  38  22  27  22  30  25  25  38  29  20  24  28  32 33  18

 

4 यातील सर्वात मोठा चल कोणते -------------

यातील सर्वात  लहान चलन कोणते --------------------

दिलेल्या  सारणीचे वर्गीकृत साधनात रूपांतर करताना खालीलपैकी किती चे वर्गांतर घेणे योग्य आहे

 

           -15            

      - 25                        

      - 5                         .

      - 30

 

कोणत्याही माहितीचे सु- संघटन खालील पैकी कोणत्या स्वरूपात करणे सोयीचे असते

            वर्गीकृत      

    अवर्गीकृत

    रूपांतरित

    D   ऋणात्मक

 

निरीक्षणात वारंवारता किंवा सातत्य असतेअशा संगणकीय माहितीचे ----------------  करावे लागते.

            A वर्गीकरण

            गुणआवरण

            विनिमय 

            श्रेणी

 

9   सांख्यिकीय माहितीची   कक्षा काढण्याचे सूत्र-------------------

 

10  सांख्यिकीय माहितीचे मध्य काढण्याचे सूत्र---------------------------

 

11  प्रमाण चलनामध्ये  निम्नमूल्य मूल्य  काय दर्शवते  ----------------

 

12 प्रमाण विचलन उच्च मूल्य  काय दर्शवते----------------

 

13 S d.  म्हणजे काय ---------------------------

 

14 C.V. म्हणजे काय ---------------------------

 

15  गुणानुक्रम सहसंबंध किती प्रकारचे सहसंबंध विचारात घेतले जातात

            A-     4

            B-     3

            C-     2

            D-    1

 

 

16 गुणानुक्रम सहसंबंधात एका चलात वाढ  झाल्यास दुसऱ्या चलातही वाढ होते यास ------------------------------- म्हणतात.

 

            सकारात्मक सहसंबंध

            नकारात्मक सहसंबंध

            ऋणात्मक सहसंबंध

            सहसंबंध नाही

 

 

17  गुणानुक्रम सहसंबंधात एका चलात  वाढ झाल्यास दुसऱ्या  चलात घट होते यास --------------------------- म्हणतात.

            सकारात्मक सहसंबंध

            नकारात्मक सहसंबंध

            ऋणात्मक सहसंबंध

            सहसंबंध नाही

 

18 विदेच्या सादरीकरणासाठी इयत्ता बारावी मध्ये आपण किती पद्धतींचा अभ्यास केला

            A - 1

            B -

            C - 3

            D - 4

 

19  विभाजित वर्तुळातील  उप-घटकाचे  अंशात्मक मूल्य काढण्याचे सूत्र     -------------------------------

 

 

20  विभाजित वर्तुळाचे कोणतेही दोन फायदे

            A ---------------------------

            B -----------------------------

 

 

21  विभाजित वर्तुळाचे कोणतेही दोन तोटे

            A ----------------------------------

            B ---------------------------------

 

 

22  विभाजित वर्तुळ अंशात्मक मूल्य काढताना खालीलपैकी कोणत्या मूल्याचा विचार करणे अधिक संयुक्त ठरेल           

A-   100 %

B- 360अंश

C-  180  अंश

D-   0

 

23   विभाजित  आयताचे उद्दिष्ट ---------------------------------

 

24  विभाजित आयताचे  उपघटकाच्या अंशात्मक मूल्य काढण्यासाठी वापरण्यात येणारे सूत्र ---------------------


25 स्थलनिर्देशक नकाशा मानवी वस्ती कोणत्या रंगाने दर्शवतात

            लाल

            निळा

            काळा

            पिवळा

 

26   स्थल निर्देशक नकाशात वस्त्यांचे वर्गिकरण कोणत्या दोन मुख्य प्रकारात केले जाते

            ग्रामीण व नागरी

            सुसंघटित    विरळ

            रेषीय  व ग्रामीण

            शहरी  व निमशहरी

 

27  स्थलनिर्देशक नकाशात  पडीक जमीन कोणत्या रंगाने दर्शवतात -----------------------

 

28  स्थलनिर्देशक नकाशात शेत जमीन कोणत्या रंगाने दर्शवतात -----------------------------

 

29  स्थलनिर्देशक नकाशात लोहमार्ग कोणत्या चिन्हाने दर्शवतात ------------------------------------

 

30  स्थलनिर्देशक नकाशात डांबरी रस्त्यांसाठी कोणते चिन्ह वापरले जाते. ----------------------

 

31  स्थलनिर्देशक नकाशातील खालील  चिन्हे दर्शवा

           1  ------------------------------

      2  -------------------------------

      3  ------------------------------------