Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Showing posts with label अकरावी प्रथमसत्र सराव प्रश्नपत्रिका 2023 Geography. Show all posts
Showing posts with label अकरावी प्रथमसत्र सराव प्रश्नपत्रिका 2023 Geography. Show all posts

Saturday 7 October 2023

अकरावी भूगोल प्रश्नपत्रिका Geography Question paper, Practice Paper भूगोल प्रश्नपत्रिका सराव पेपर

 अकरावी  भूगोल प्रश्नपत्रिका Geography Question paper, Practice Paper भूगोल प्रश्नपत्रिका सराव पेपर



    इयत्ता अकरावीच्या विदयार्थ्यांसाठी  भूगोल प्रश्नपत्रिका Geography Question paper, Practice Paper  भूगोल प्रश्नपत्रिका, सराव पेपर, प्रथम सत्र परीक्षेची तयारी च्या दुष्ट्रीकोनातुन विदयार्थ्यांना भूगोल विषय सोपा वाटावा तसेच विदयार्थ्यांनी जास्तीत जास्त भूगोल अभ्यासक्रमांचा अभ्यास करावा या साठी खालील अकरावी  भूगोल प्रश्नपत्रिका Geography Question paper, Practice Paper भूगोल प्रश्नपत्रिका सराव पेपर 50 गुणांचा देत आहोत. प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी विदयार्थ्यांनी 2.30 तास घ्यावे व आपल्याला सोयीच्या वेळेनुसार अकरावी प्रथमसत्र भूगोल प्रश्नपत्रिका सोडवावी ही अपेक्षा आहे

अकरावी भूगोल प्रश्नपत्रिका Geography Question paper, Practice Paper भूगोल प्रश्नपत्रिका सराव पेपर

अकरावी भूगोल प्रश्नपत्रिका Geography Question paper, Practice Paper भूगोल प्रश्नपत्रिका सराव पेपर


 

अकरावी प्रथमसत्र सराव प्रश्नपत्रिका 2023

गुण-  50                                                                               वेळ 2.30 

------------------------------------------------------------------------------

सुचना-  1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

2) प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या / आलेख काढा.

3) रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.

4) योग्य तेथे नकाशा स्टेंसिलचा वापर करावा. 

5) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

6) आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी

 

 

प्रश्नअ) साखळी पूर्ण करा.  ( गुण 4)


ब)  चूकीचा घटक ओळखा  ( गुण 3)

1) नदीच्या संचयन कार्यातील भूरूप

    अ) घळई 

    ब) नालाकृती सरोवर     

    क) पूरमैदान                 

    ड) पूरतट

   

 

2) वळींचे प्रकार

    अ) सममित              

    ब) उत्क्रम    

    क) समनतिक      

    ड) असममित

 

3) विस्तृत झीजेचे प्रकार

    अ) खंड विखंडन                    

    ब) भूस्खलन               

    क) मातलोट                

    ड) दरड कोसळणे

 

 

 

) अचूक घटक ओळखा       ( गुण 3)

 

1) कोरडया हवामानाच्या प्रदेशात होणारे विदारण

    अ) रासायनिक 

    ब) मानव निर्मित                

    क) कायिक

    ड) जैविक

 

2) खडकांचा मुख्य प्रकार

    अ) बेसाल्ट

    ब) अग्निजन्य

    )  चुनखडक

    ड) स्लेट

 

3) वाऱ्याचे खनन कार्य

    अ) भूछत्र खडक                     

    ब) कडा              

    क) गुहा             

    ड) लोएस

 

 

 

)  खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा      ( गुण 3)

    

1) प्राथमिक भूंकप लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश दुय्यम लहरींपेक्षा जास्त असतो

    

2) सरक ही वेगवान हालचाल आहे.

    

3) यूआकाराची दरी हे भूरूप हिमनदीच्या खनन कार्यामुळे घडते.

 

 

 

 

प्रश्न 2 रा) भौगोलिक कारणे लिहा. (कोणतेही तिन)        ( गुण 9)

    

1) हिमालयात राहणारेलोक भूकंपाला अधिक संवेदनशील असतात.  

    

2) तापमान हा कणीय विदारणाचा कारक आहे.

    

3) मानव हा विदारणाचा एक कारक आहे.

    

4) वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते.  

   

5) मसुरी व डेहराडून हे एकाच अक्षांशावर असून देखील तेथील हवामानात भिन्नता आहे.  

 

 

 

प्रश्न 3 रा ) फरक स्पष्ट करा. (कोणतेही तीन)            ( गुण 9)

 

    1) मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली

    2) अपनती वली आणि अभिनती वली

    3) विदारण आणि अपक्षरण

    4) पुरतट आणि पुरमैदान

    5) मौसमी हवामान प्रदेश आणि भूमध्य सागरी हवामान प्रदेश

 

 

 

प्रश्न 4) नकाशात पुढील घटक योग्य चिन्हे सुचीव्दारे दर्शवा                     (कोणतेही पाच)   ( गुण 5)

 

    1) भारतातील त्रीभूज प्रदेश  

    2) भूमध्य समुद्र         

    3) फुजी जागृत ज्वालामुखी

        4)  ग्रीनलँड

    5) दक्षिण अमेरिकेतील वर्षावनांचा एक देश  

    6) स्कॉशिया भूपट्ट      

    7) चिली देश

 

 

 

प्रश्न 5 वा ) टिपा लिहा. (कोणतेही दोन)      ( गुण 8)

    1) भूकंप निर्मितीचे कारणे  

    2) अपपर्णन       

    3) मोसमी हवामान प्रदेश

    4)  संचनय प्रक्रिया

 

 

 

प्रश्न 6 वा ) खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ( गुण 4)

 

 

    पृथ्वीवरील सरासरी तापमानात वाढ होत आहे. वातावरणात कॉर्बनडाय ऑक्याईडवायू चे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. सूर्याकडून येणारे अतिनील किरण हे सजीवांच्या दृष्टीने घातक आहेत. या अतिनील किरणांपासून सजीवांचे रक्षण करणारे सुरक्षाकवच म्हणजे वातावरणातील ओझोन वायूचा थर अतिनील किरणांना शोषून घेऊ शकणाऱ्या या ओझोनची निर्मिती पृथ्वीच्या पृष्ठभागांपासून शकणाऱ्या या ओझोनची निर्मिती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दहा किलोमीटर ते पन्नास किलोमोटर उंचीवर असणाऱ्या स्थिरावरणात म्हणजे स्थितांबर होते. वातावरणातील ओझोनचे प्रमाण मोजण्यासाठी साधारणपणे वर्णपट मापकाचा वापर केला जातो.

          दक्षिण ध्रुवावरच्या वातावरणातील विस्तृत भागावरील ओझोनचे प्रमाण घटले असल्याचे स्पष्ट झाले. वातावरणाचा हा भाग तेव्हापासून ओझोनचे छिद्र म्हणून ओळखला जाऊ लागला.

 

 प्रश्न-

1) वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण वाढत आहे?

2) ओझोनचे छिद्र ही संज्ञा स्पष्ट करा. ?

3) ओझोन मानवी जीवनास कसा उपयुक्त आहे.

4) ओझोन वायू मोजण्याचे मापक कोणते?

 

 

 

ब)  सुबक आकृती काढून भागांना नावे दया(कोणतीही एक)  ( गुण 2)

     1) खंड विखडंन 

    2)  सागरी कमान








अकरावी भूगोल प्रश्नपत्रिका Geography Question paper, Practice Paper भूगोल प्रश्नपत्रिका सराव पेपर


होलसेल बुंकीगसाठी संपर्क साधा 

9421680541, 9403386299






 


 खालील घटकांवर क्लिककरुन अधिक माहीती मिळवा

अकरावी भूगोल सरावप्रश्नापत्रिका क्रमांक – 2 

अकरावी भूगोल वार्षिकनियोजन

बारावी भूगोल वार्षिकनियोजन

अकरावी भूगोल घटकचाचणी गुण 25 

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/11/25-xi-geography-first-unit-test-i.html