Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Showing posts with label लोकसंख्या संक्रमण सिंध्दांन्त. Show all posts
Showing posts with label लोकसंख्या संक्रमण सिंध्दांन्त. Show all posts

Tuesday, 9 June 2020

लोकसंख्या संक्रमण सिंध्दांन्त



लोकसंख्या संक्रमण सिंध्दांन्त-


लोकसंख्या संक्रमण सिंध्दांन्त- लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे विचारात घेऊन सर्वसाधारणपणे लोकसंख्या वाढीची स्थित्यंतरे देणारे खालील प्रमाणे एक नमुना चित्र तयार केले आहे त्यालाच आपण लोकसंख्या संक्रमण प्रतिमान म्हणतो. त्याचे निरीक्षण करुन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.


          लोकसंख्या संक्रमण सिध्दांन्तात लोकसंख्या वाढीचा काळ व कल हा सिध्दांताचा पाया आहे. प्रत्येक प्रदेशात नेहमी सारखा जन्मदर व मृत्यूदर राहत नाही, त्यामुळे लोकसंख्या वाढ, घट यांचा दरसुध्दा समान राहत नाही. या सिध्दांन्तानुसार प्रत्येक प्रदेश हा काळानुसार लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे पार करीत असतो. 

लोकसंख्या संक्रमण सिंध्दांन्त-

1. आलेखातील निळी व काळी या रेषा काय दर्शवितात ?
 उत्तर- आलेखातील निळी रेषा जन्मदर व काळी रेषा मृत्यूदर दर्शविते.

2. आलेखातील दाखविलेला हिरवा भाग काय दर्शवितो ?
उत्तर- आलेखातील हिरवाभाग  लोकसंख्येची नैसर्गिक वाढ दर्शवितो.

3. आलेखात दाखविलेला निळा भाग काय दर्शवितो ?
उत्तर-  आलेखात निळा भाग लोकसंख्येची नैसर्गिक घट दर्शवितो.

4. कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे.
उत्तर-   पहील्या व चौथ्या टप्प्यात जन्मदर अल्पप्रमाणातच जास्त आहे, परंतु दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात जन्मदर मृत्यूदरापेक्षा अधिक आहे.

5. कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदराएवढाच आहे ?
उत्तर-  आलेखात चौथ्या व पाचव्या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदर दर्शविणाऱ्या रेषा एकमेकास स्पर्श करतांना दिसत आहेत. म्हणजेच चौथ्या व पाचव्या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदरा ऐवढा आहे.

6. कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे ?
उत्तर-  आलेखात पाचव्या टप्प्यात मृत्यूदर दर्शविणारी रेषा ही जन्मदर दर्शविणाऱ्या रेषेच्या वर दिसत आहे.  त्यामुळे पाचव्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे असे म्हणता येईल.


लोकसंख्या संक्रमण सिध्दान्ताचे टप्पे-


1) पहीला टप्पा- (अतिशय स्थिर)- या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदर दोन्हीही जास्त असतात. त्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर असते. या टप्प्यात देशाची अर्थव्यवस्था शेती किंवा इतर प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असल्याने येथे व्दितीयक व तृतीयक व्यवसाय कमीच असतात त्यामुळे अशा देशांची आर्थिक स्थिती विकसित नसते. या प्रदेशात प्रजनन दर जास्त असतोच तर प्रदेशात विज्ञान व तंत्रज्ञानाचा अभाव, वैदयकीय सुविधांचा अभाव, संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव, कुपोषण यामुळे मृत्यूदरही जास्त असतो. सध्या कोणताही देश या लोकसंख्या संक्रमण सिध्दान्ताच्या टप्प्यात आढळत नाही.

2) दुसरा टप्पा- (आरंभीच्या काळात विस्तारणारा)- या टप्प्यात विज्ञान व तंत्रज्ञान विकास, आरोग्य सुविधांचा विस्तार व रोगराईवर मात यामुळे मृत्यूदरात घट झालेली आढळते परंतु जन्मदर स्थिर असतो त्यामुळे लोकसंख्या वाढ झपाटयाने होत असते. म्हणूनच या टप्प्याला लोकसंख्येचा विस्पोट टप्पा म्हणतात. शेती व उदयोगातील उत्पादन तसेच वाहतूक सुविधा या टप्प्यात वाढल्या असतात. अधिक लोकसंख्या असणारे व विकसनशील देश या टप्पातुन जात आहेत  उदा. कांगो, बाग्लांदेश, नायजर, व युगांडा इ. देश या टप्प्यात आहेत.

3) तिसरा टप्पा- (नंतरच्या काळात विस्तारणारा)- या टप्प्यात मृत्युदर आणखीन कमी होतो तर जन्मदर सध्दा कमी होऊ लागतो, परंतु जन्मदर हा मृत्युदरापेक्षा जास्तच असतो त्यामुळे या टप्प्यात लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो, परंतु लोकसंख्या वाढत असते. देशाचा प्रगतीचा वेग व लोकांचे उत्पन्न्‍ व राहणीमान या टप्प्यात वाढलेले असल्याने या टप्प्यात गरीबी कमी होत असते व्दितीयक व तृतीयक व्यवसायांचा विस्तार, वाढलेली शैक्षणिक पातळी, लोकांना कुटुंब नियोजनाचे पटलेले महत्व, लहाण आकाराचे कुटुंब या टप्प्यात आढळून येतात. विकसनशिल टप्प्यातुन विकसीत टप्प्याकडे जाणारे देश या गटात बसतात.   उदा. चीन

i) भारतात सध्यस्थितीत लोकसंख्या मृत्युदर कमी झालेला असुन जन्मदर घटत आहे त्यामुळे भारतातील लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे, कुटुब नियोजनामुळे कुटुंबांचा आकारही लहान होत आहे, परंतु लोकसंख्या वाढतच आहे.  ii)  भारतात काही दशकांपासुन उंचावलेली शैक्षणिक व सामाजीक स्थिती व त्यामुळे वाढलेला व्दितीयक, तृतीयक व्यवसायांचा विस्तार आणि आर्थिक प्रगतीचा वाढलेला वेगामुळे लोकांचे दरडोई उत्पन्न व राहणीमान उंचावलेले आहे. iii) हे सर्व लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातील घटक भारतात आढळत असल्याने भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे असे म्हणता येईल.

4) चौथा टप्पा- (कमी बदल दर्शविणारा) - लोकसंख्या संक्रमणाच्या या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यापेक्षा जन्मदर आणखी कमी झालेला असतो पंरतु मृत्युदरापेक्षा कमी नसतो, त्यामुळे लोकसंख्या वाढ अंत्यत कमी असते. या टप्प्यात उच्च दर्जाच्या वैदयकीय सुविधा, पटकी-प्लेग सारख्या साथीच्या आजारांचा नायनाट, आरोग्या बद्दलची लोकांची जागरुकता यामुळे मृत्युदर खूपच कमी असतो. या टप्प्यात व्दितीयक व तृतीयक व्यवसायांचा वाटा प्राथमिक व्यवसायांपेक्षा खूप जास्त असतो त्यामुळे देशांची व देशातील नागरिकांची आर्थिक स्थिती चांगली असते. उदा. सयुक्त संस्थान

5) पाचवा टप्पा- ( ऋणात्मक वाढीचा टप्पा ) - या टप्प्यात जन्मदर खूप कमी होऊन मृत्युदराच्या अगदी जवळ असतो त्यामुळे लोकसंख्या वाढ अत्यंत कमी असते. या टप्पयात काही ठिकाणी तर जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी झालेला आढळतो येथे मात्र लोकसंख्येत घट होऊ लागते. या टप्प्यात वृध्दांचे प्रमाण जास्त तर बालकांचे प्रमाण कमी असते. तृतीय व्यवसायाचं वाढलेले प्रमाण, उंचावलेले राहणीमान, नागरीकांची व देशाची उत्तम आर्थिक स्थिती यामुळे आरोग्य, पर्यावरण व आनंददायी जीवन या ठिकाणी पहावयास मिळते.  उदा. स्विडन फिनलँ

  सरासरी ढोबळ जन्मदर 7 व ढोबळ मृत्यूदर 8 असेल तर तो देश लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात यईल-  पाचव्या
जर ढोबळ मृत्युदर 20 व ढोबळ जन्मदर 24 असेल तर तो देश लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात असेल- तिसऱ्या अथवा चौथ्या