Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Showing posts with label बारावी 20-21 च्या बोर्ड परीक्षा निकालप्रकीये संदर्भातील माहीती.. Show all posts
Showing posts with label बारावी 20-21 च्या बोर्ड परीक्षा निकालप्रकीये संदर्भातील माहीती.. Show all posts

Sunday, 11 July 2021

इयत्ता बारावी 2020-2021 च्या बोर्ड परीक्षा निकाल प्रकीये संदर्भातील महत्वाची माहीती.

 


इयत्ता बारावी 2020-2021 च्या बोर्ड परीक्षा निकाल प्रकीये संदर्भातील महत्वाची माहीती.


कार्यवाही वेळापत्रक

 


कालावधी

तपशील

दि. 07.07.2021        ( 11.00 ते 1.00 )

 मुख्याध्यापक / प्राचार्य व शिक्षक यांचे साठी मूल्यमापन  कार्यपध्दतीबाबत मंडळाच्या यु ट्युब चॅनेलवरुन प्रशिक्षण

7.07.2021  ते  14.07.2021

अपवादात्मक परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न  झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे

7.07.2021  ते  14.07.2021

विषय शिक्षकांनी विषय निहाय गुणतक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करणे.

7.07.2021  ते 14.07.2021

वर्ग शिक्षकांनी संकलित निकाल अंतिम करुन तो उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविदयालयाच्या निकाल समितीकडे सादर करणे,

08.07.2021 ते 17.07.2021

वर्ग शिक्षकांनी तयार केलेल्या निकालाचे निकाल समितीने परीक्षण व नियमन करून प्रमाणित करणे.

14.07.2021 To 21.07.2021

 मुख्याध्यापक / प्राचार्यानी निकाल समितीने प्रमाणित  केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषय निहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये  भरणे.

21.07.2021 To 23.07.2021

मुख्याध्यापक / प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेले विदयार्थ्यांचे निकाल व अनुषंगिक स्वाक्षरी प्रपत्रे सिलबंद पाकीटात विभागीय मंडळात जमा करणे. (विभागीय मंडळाच्या नियोजनानुसार)

23.07.2021 पासून पुढे

 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( . १२वी) परीक्षा निकालाबाबत विभागीय मंडळ व राज्यमंडळ स्तरावरील प्रक्रिया



 

महत्वाचे व ठळक मुद्दे-

 A कागदपत्रे जमा 

      आपल्या शाळा महाविदयालयातुन प्रविष्ठ झालेल्या सर्व प्रकारच्या विदयार्थ्यांचे निकालाचे कागदपत्र सिलबंद पाकीटात मुख्याध्यापक / प्राचार्यांच्या अभिरक्षेत ठेवून त्याची दुसरी प्रत संबंधित विभागीय मंडळाकडे निर्धारित कालावधीत जमा करावी.

 

एच.एस.सी. बोर्ड. मंडळात जमा खालील प्रमाणे निकालाच्या संमधीत कागदपत्रे जमा करावे.

 

1) इयत्ता 12 वी च्या संकलित निकालाची एक मूळ प्रत.

2) फक्त अन्य मंडळाच्या विद्यार्थ्याच्या इ. १० वीच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत. (2020 - 2021 च्या शै. वर्षातील बोर्डाचा सिट नंबर नमुद करुन)

3) इ. 11 वी अन्य मंडळातून / अन्य कनिष्ठ महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत इ.11 वीच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत. (2020 - 2021 च्या शै. वर्षातील बारावीचा बोर्डाचा  सिट नंबर नमुद करुन)

 

 

 

 

 

B) नियमित विदयार्थ्यांच्या बाबतीत मूल्यमापन करताना

               I) इ. १० वीच्या सर्वोत्तम तीन विषयांचे सरासरी गुण,

              II) इ. ११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण

           III) इ. १२ वीचे वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा,  सराव परीक्षा, सराव चाचण्या,  तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ. १२ वीचे अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक / अंतर्गत व तत्सम मूल्यमापन इत्यादींच्या आधारे विदयार्थ्यांना विषयनिहाय प्राप्त झालेले गुण विचारात घेण्यात यावेत.

              IV ) सदर गुणदान करताना शासन निर्णयातील सर्व तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात यावे.

 

गुणांचे पुर्णांकात रुपांतरण पध्दत-

                इयत्ता १० वी. इ. ११ वी व इ. १२ वी मधील प्राप्त गुणांचे इ. १२ वीसाठी भारांशानुसार निर्धारित गुणांमध्ये रूपांतर अपूर्णाकात आलेले गुण पुढील पूर्ण गुणात रुपांतरीत करावेत.

उदा.    14.00 =  14

                14.01 = 15

                14.50 = 15

                14.51 = 15

 

 

 

 

 

C) अकरावी चे गुण:


A)  अकरावी व बारावी चे विषय सारखे असतील तर

                विद्यार्थ्यास इ. 11 वीच्या अंतिम निकालामध्ये प्राप्त झालेले विषयनिहाय गुण इ. 12 वीसाठी त्या त्या विषयाकरीता विचारात घ्यावेत. अन्य मंडळातून इ. 11 वी उत्तीर्ण होवून इ. 12 वी साठी राज्य मंडळाशी सलग्न उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयात प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत संबंधित मंडळाच्या इ. ११ वीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुण विचारात घ्यावेत.

 

B) अकरावी व बारावी चे काही किंवा सर्व विषय वेगवेगळे असतील तरः

                राज्य मंडळ / अन्य मंडळाच्या विदयार्थ्याबाबत इ. १२ वीं मध्ये प्रविष्ठ झालेल्या विषयांपैकी एक किंवा अधिक विषय इ. 11 वी मध्ये घेतले नसल्यास अशा विषयांसाठी इ. 11 वी मध्ये घेतलेल्या अन्य विषयांची सरासरी विचारात घेवून 100 पैकी गुण (पूर्णाकांत) निश्चित करावेत. व ते इ. 11 वी साठी न घेतलेल्या विषयांस देवून पुढील कार्यवाही करावी इ. 11 वी तून इ. 12 वी मध्ये प्रवेश घेताना शाखा बदल केलेल्या प्रकरणांत देखील याप्रमाणे कार्यवाही करावी.

 

C) 100 पेक्षा अधिक गण एका किंवा अधिक विषयात असतील तरः

                इ. 11 वी मधील एक व अधिक विषय 100 पेक्षा अधिक गुणांचे असल्यास त्या विषयांचे प्रथम 100 पैकी गुणांत रूपांतर करून कार्यवाही करावी.

 

गुण भरण्यसाठी आवश्यक परिशिष्टे डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 https://drive.google.com/file/d/1fbqZiZZ_0dRDfSgMIX6hCK0aba2Fm8v_/view?usp=sharing