Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Thursday 28 March 2024

अकरावी भूगोल वार्षिक प्रश्नपत्रिका

 

अकरावी भूगोल वार्षिक प्रश्नपत्रिका
सराव

वेळ- 3 तास

गुण- 80

-------------------------------------------------------------------------------------

सूचना :

 *सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

*प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या / आलेख काढावे.

*रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.

*नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.

*उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

*नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी.

अकरावी भूगोल वार्षिक प्रश्नपत्रिका
सराव

 

प्रश्न 1 ला) दिलेल्या सुचने नुसार खालील उपघटक सोडवावेत.    

(गुण- 20)

 

अ) साखळी पूर्ण करा.   (गुण- 5)

 

अन

'' स्तंभ

'' स्तंभ

'' स्तंभ

1

खंडीय बेट

शेवाळ

पूर

2

होर्मुझ

तीव्रता

बाब-एल-मान्देब

3

प्रवाळ कट्टे

मादागास्कर

विरंजन क्रिया

4

बर्फाचे वितळणे

मलाका

हिंदी महासागर

5

मर्केली प्रमान

समुद्रपातळीत वाढ

| ते XII

-------------------------------------------------------------------------------------

ब) दिलेल्या विधानांतील विधान व कारणांचा अचूक संबंध ओळखा. 

(गुण- 5)

 1) A: भारतातील त्रिभूज प्रदेश धोक्यात आले आहे.

  R:किनारी प्रदेशात हवामानात बदल झालेला आहे.

 

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.


 

2) A:  बंगालच्या उपसागराची क्षारता अरबी समुद्रापेक्षा कमी आहे.

  R: अरबी समुद्रातील पाण्याचे बाप्पीभवन तुलनेने जास्त आहे.

 

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.


 

3) A: गुरुत्व बल हा विस्तृत झीज प्रक्रियेवर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे.

R: गुरुत्व बलामुळे सर्वच गोष्टी भूपृष्ठावर येतात.

 

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

.

 

4) A: विभंगामुळे वली पर्वताची निर्मिती होते.

  R: एकमेकांविरुध्द दिशेने तान निर्माणकारी बलांमुळे विभंग निर्माण होतो.

 

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.


 

5) A: पृष्ठीय जल मातलोट प्रक्रियेस साहाय्य करते.

R: भूजल पातळी ही त्यास कारणाभूत असते.

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.


-------------------------------------------------------------------------------------

 

) चूक की बरोबर ते सांगा 

(गुण- 5)

1) उत्तरहिंदी महासागरात मान्सून वाऱ्यांचा प्रभाव सागरी प्रवाहांवर नसतो.

2) समशितोष्ण गवताळ प्रदेशात विरळ लोकवस्ती पहावयास मिळते.

3) साथीचे आजार मानवनिर्मीत नाही.

4) गट पर्वताचे दोन्ही बाजुचे उतार सौम्य असतात.

5) मोसमी हवामान प्रदेशात विशिष्ट कालखंडात पर्जन्यमान होते.

 -------------------------------------------------------------------------------------

 

 

ड) पुढील पैकी अयोग्य घटक ओळखा. 

(गुण- 5)

1) नदीच्या संचयन कार्यातील भूरूप -

अ) घळई

ब) नालाकती सरोवर

क) पूरमैदान

ड) पूरतट

 

 

2 ) जागतीक तापमान वाढीचे परिणाम -

अ) हरितगृह वायूंचे उत्सर्जन

ब) निर्वनीकरण

क) सूर्याचे भासमान भ्रमन

ड) औद्योगिकीकरण

 

3) वलीचे प्रकार -

अ) सममित वली

ब) समनतिक वली

क) उलथलेली वली

ड) आडवा विभंग

 

4) हवामान बदल अभ्यासण्याची साधने-

 

अ) हिमाच्या गाभ्यातील नमुने

ब) प्रवाळ भित्ती

क) वृक्षखोडावरील वर्तुळे

ड) प्राचीन किल्ले

 

5) अक्षांशानुसार जीवसंहती -

अ) टुंड्रा जीवसंहती

ब) वर्षावनातील जीवसंहती

क) तैगा जीवसंहती

ड) पर्वतीय जीवसंहती

-------------------------------------------------------------------------------------

 

प्रश्न २ रा) खालील प्रश्नांची भौगोलिक कारणे लिहा. (कोणतेही-4) 

(गुण- 12)

 

1)  भूपृष्ठ लहरींना भूकंपछायेचा प्रदेश नसतो..

2) सर्व कारकांपेक्षा सागराचे कार्य निरंतर चालते. .

3) महासागर हे खनिजांचे आगार असतात.

4) अवर्षण आणि पुरांच्या वारंवारितेत वाढ होत आहे.

5) दक्षिण गोलार्धात तैगा प्रदेश आढळत नाही.

6) हिमनदया आक्रसत आहेत.

 -------------------------------------------------------------------------------------

प्रश्न 3 रा)  फरक स्पष्ट करा. (कोणतेही-3)  

(गुण-  9)

 

1) उर्घ्वमुखी लवणस्तंभ आणि अधामुखी लवणस्तंभ

2) कणीय विदारण आणि  अपपर्णन

3) तैगा आणि टुंड्रा हवामान प्रदेश

4 ) जीवसंहती आणि परिसंस्था

5) वर्षावने आणि सॅव्हाना हवामान प्रदेश

-----------------------------------------------------------------------------------

 

प्रश्न 4 था    अ) जगाच्या नकाशात पुढील घटक योग्य चिन्हे व खुणा यांच्या साहाय्याने दर्शवा सुचि तयार करा. (कोणतेही-6) )  

(गुण-   6)

 

1) सॅव्हाना हवामान प्रदेश

2) मादागास्कर बेट

3) आफ्रिकेतील सॅव्हाना हवामान प्रदेश

4) सहारा वाळवंट

5) भूमध्य सागरी जीवसंहती

6) नाझका भूपट्ट

7) फुजियामा ज्वालामुखी

8) सुंदा गर्ता

 

 ---------------

ब) दिलेल्या आलेखाचे वाचन करुन त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. 

(गुण- 5)




1) हा आलेख काय दर्शवितो ?

2) सुमारे २२५ मिमी बदल कोणत्या वर्षी आहे?

3) या आलेखावरून कोणता निष्कर्ष काढाल ?

4) सन 1960 व सन 2000 या वर्षातील समुद्र पातळतील साधारण फरक किती आहे?

5) 1920 साली पाण्याची पातळीत वाढ आहे का?

 ---------------------------------------------------------------------------------------------

प्रश्न 5 वा) टिपा लिहा. (कोणतेही-3)  

(गुण- 12)

     1) वाऱ्याचे विदारण कार्य

2) जैवीक विदारण

3) वळीकरण

4) सागरी पर्यटन

5) हिंदी महासागरातील खजिन संसाधने

 --------------------------------------------------------------------------

प्रश्न 6 वा अ ) खालील दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 

(गुण- 4)


    जगात तीन प्रमुख महासागर आहेत. पॅसिफीक महसागर, अटंलाटीक महसागर व हिंदी महासागर त्यातील हिंदी माहसागर हा आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया हा तीन खंडाना त्याच्या पाण्याने जोडतो. हा महासागर आशियातील काही मोठ्या अर्थव्यवस्थांना आधार देतो ही एकच वस्तुस्थिती या महासागराचे आर्थिक व राजकीय महत्त्व अधोरेखित करते. वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय व्यस्त असणाऱ्या होर्मुझ, मलाक्का आणि बाब-एल-मान्देब या तीन गजबजलेल्या सामुद्रधुनी या महासागरात आहेत. आखाती देशांकडून निर्यात होणाऱ्या बहुतांशी कच्च्या खनिज तेलाची वाहतुक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. हिंदी महासागरात मालदीव, सेशल्स यासारखी अनेक द्वीप राष्ट्र आहेत. या सर्व राष्ट्रांची संपूर्ण अर्थव्यवस्था हिंदी महासागरातील सागरी परिसंस्था व सागरी पर्यटनावर अवलंबून असते.

 

1) आखाती देशांना हिंदी महसागराचा कोणता उपयोग होतो ? ?

2) हिंदी महासागराच्या जलाने कोण-कोणते खंड जोडले गेले आहेत ?

3) हिंदी महासागरात कोणत्या सामुद्रधुनी आहेत  ?

4) हिंदी महासागरातील दीपराष्ट्रांची नावे सांगा ?


 ---------------

ब) पुढील आकृती काढून नावे द्या. (कोणत्याही २)

(गुण- 4)

1) आपत्ती व्यवस्थापन चक्र

2) गोठण वितळण

3) गटपर्वत

------------------------------------------------------------------------------------------

 

प्रश्न 7) सविस्तर उत्तरे लिहा. (कोणतेही 1) 

(गुण- 8)

 

1) प्रदेशाच्या हवामानावर परीणाम करणारे घटक सोदाहरण स्पष्ट करा.

2) निर्वणीकरणांची कारणे स्पष्ट करा.

 अकरावी भूगोल वार्षिक प्रश्नपत्रिका
सराव

---------------------------------------------------------------------------------------------

हे वाचा - ↓↓↓↓

 अकरावी व्दीतीय घटक चाचणी-

बारावी HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिकेतील प्रश्न- 

बारावी भूगोल वार्षिक नियोजन


 

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/11/xii-geography-practical-book-journal.htm

 

 

 

अकरावी भूगोल वार्षिक प्रश्नपत्रिका