प्रकरण –
6
महासागर
साधनसंपत्ती
साधारण पणे 19 व्या
शतकाच्या सुरवातीला शास्त्रशुध्द पध्दतीने महासागराचा अयास होवू लागला. 1872 ते
1876 या कालखंडात चॅलेन्जर या ब्रिटिश जहाजाने केलेल्या जगप्रवासाने समुद्रा विषयी
व तेथील जीवसृष्टी संदर्भात नवीन माहीती नवीन माहिती अजेडात आणली. तर 1920 पासून Echo Sounder (प्रतिध्वनी आरेखक
यंत्र) तंत्रज्ञानामुळे विविध सागर तळाचे नकाशे बनवण्यास
सुरुवात झाली.
सागर तळरचना-
1 भूखंड मंच/ समुद्रबुड जमीन- किनाऱ्यालगत असलेला व जलमग्न भूखंडाचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. हा
सागरतळाचा सर्वात उथळ भाग आहे. हा भाग
जलमग्न, रुंद, उथळ, मंद उताराचा असतो, भूखंड मंचाचा विस्तार जगात सर्वत्र सारखा
नाही. उदा. चिली व सुमात्रा किनाऱ्या जवळ अतिशय अरुंद तर आर्क्टिक महासागरावजळील
सायबेरीयाच्या किनाऱ्या लगत 1500किमी रुंदीचा आहे. याने महासागराच्या तळाच्या एकूण
क्षेत्रापैकी सुमारे 7.6 % क्षेत्र व्यापलेले आहे.
भूखंडमंच मानवासाठी महत्वपूर्ण
आहेत. हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरणे या भागाच्या तळापर्यंन्त पोहचतात.
त्यामुळे भूखंड मंचाच्या भागावर शेवाळ व प्लवकांची निर्मीती मोठया प्रमाणावर होत
असते. हे प्लवंक सागरातील लक्षावधी जीव व माशांचे प्रमुख व आवडते खादय आहे.
त्यामुळे मासे प्लवक खादयाच्या शोधात भूखंडमंचा कडे आकर्षित होत असतात. व येथेच
प्रजननही करतात त्यामुळे भूखंड मंचावर माशाची संख्या जास्त असते, उथळ तळभागामुळे
मासेमारी करणेही सोपे असते म्हणून भूखंड मंचाच्या प्रदेशात मासेमारीचा विकास
झालेला आढळतो. उदा. ग्रॅडबॅक, जॉर्जस बॅक,
त्याच बरोबर जगातील
खनिजतेल व नैसर्गिक वायूचे सर्वात मोठे साठे समुद्रात समुद्रबुड जमीनीवरच आहेत. (उदा.-मुंबई
हाय), तसेच क्रोमाईट, हिरे,
इल्मेनाई, मॅग्नेटाईअ, प्लॅनिम सोने व पॉस्फराईट सारखी अनेकविध खनिजे, वाळू
दगडगोटे व औदयागिक सिलीका या सारख्या खनिजांचे हे उत्खनन भूखंड मंचाच्या भागावरुन
घेता येणे शक्य झाले आहे.
2 खंडान्त उतार (खंडान्त उतार व संचयन)- समुद्रबुड जमिनी/ भूखंड मचांचा विस्तार
संपल्यानंतर समुद्रतळाचा उतार तिव्र होत जातो.
या उतारांचा कोन 2० ते 5० च्या दरम्यान असु शकतो या
उतारांना खंडान्त उतार असे म्हटले जाते. या भागात समुद्राची खोली 200 ते 4000 मी
पर्यंन्त खोल असते. खंडान्त उताराने महासागराच्या तळाच्या एकूण क्षेत्रापैकी
सुमारे 8.5% क्षेत्र व्यापलेले आहे. खंडान्त
उतार हा ज्या सागरी किनाऱ्यावर पर्वत आहेत तेथे तिव्र आढळतो. किनाऱ्या पासून हे
क्षेत्र लांब असल्याने खंडान्त उताराच्या सुरवातीच्याच टप्यात नदयांनी वाहुन
आणलेला गाळ काही प्रमाणात पोहचत असतो, या क्षेत्रावर उतार तिव्र असल्याने गाळाचे
संचयन कमी प्रमाणातच असते त्यामुळे या क्षेत्रात संचयन खूपच कमी असते.
खंडान्त उतारावर मिथेन हायड्रेट ही संयुगे आढळतात. उदा. कृष्णा गोदावरी
उपतट. या भागावर पंखाकृती मैदानेही आढळतात.
उदा. आफ्रिकेजवळ कांगो हीसागरीय घळई
3 सागरी मैदाने- खंडान्त उताराच्या पुढे सागरी मैदाने आढळतात,
सागरी मैदाने आकाराचे मोठे असतात त्यावर लहान-मोठया आकारांचे जलमग्न उंचवटे पर्वत
पठारे इ. भूरूपे असतात त्यांचा उतार मंद असुन सागरी मैदानांनी महासागराच्या
तळाच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे 66 % क्षेत्र व्यापलेले आहे. सागरी मैदानांवर वाऱ्यांनी वाहून आणालेले धुलीकण,
ज्वालामुखीय राख, रासायनिक द्रव्यांचे अवक्षेपण, उल्कांचे तुकडे हे घटक गाळाच्या
स्वरुपात सापडतात.
सागरी मैदानांवर कोबाल्ट आणि तांबे युक्त मॅगनीजचे लहान मोठया आकाराचे
खडे आढळतात.
4 सागरी गर्ता- सागर तळांवर/ मैदानांवर काहीठिकाणे खोल व
अरुंद आणि तीव्र उताराची सागरी भूरुपे आढळतात. त्यांना सागरी डोह/ गर्ता म्हणतात. हे
सागरी डोह- साधारण सागरी तळ/ मैदानावरील
कमी खोलीच्या भूरुंपास सागरी डोह म्हणतात.
सागरी गर्ता- सागरी तळ/ मैदानावरील जास्त खोलीच्या कमी
रुदींच्या दूरवर पसरलेल्या भूरूपाला सागरी गर्ता म्हणतात. गर्ता सागर तळातील सर्वात खोल भाग आहे. त्या हजारो मीटरपर्यंन्त खोल
असतात त्या भूपट्टांच्या सीमावर्ती प्रदेशात आढळतात. त्यामुळे जागृत ज्वालामुखीची
व भूंकप प्रवणाची क्षेत्रे असतात. जास्त खोली व दुर्गमता यामुळे आता पर्यन्त 6000
मीटर खोल सागरीतळा पर्यंन्त तीनच मानसे जाऊ शकलेली आहे. मरीयांना गर्ता (11किमी/ 1100 मीटर खोल) तर जावा
गर्ता (7.7किमी/ 7700 मीटर खोल) गर्ता
आहेत. म्हणजेच सागरतळाच्या अतिखोल भागात मानव फारसा जाऊ शकलेला नाही. खोली, दुर्गमता
या सारख्या प्रतिकुलतेमुळे गर्तांचा अभ्यास कमी झालेला आहे त्यामुळे माहीती ही
कमीच आहे. म्हणून गर्ता बाबतचे आपले ज्ञान मर्यादीत आहे.
5 जलमग्न रांगा व पठार- सागरीताळावरील पर्वतरांगा ह
जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. या पर्वतरांगा शेकडोकिलो मीटर रुंद व
हजारोकिलोमीटर लांब असतात. काही सागरी उंचवटयांचे माथे समापा व विस्तृत असतात.
त्यांना सागरी पठार म्हणतात. उदा. हिंदी महासागरातील छागोस चे पठार.
सागरी बेटे- जलमग्न पर्वतरांगांच्या शिखंराचे भाग काही ठिकाणी सागरजल पातळीच्या
वर आलेले असतात त्यांना आपण सागरी बेटे म्हणून ओळखतो.
बेटांचे प्रकार उदा-
1 खंडीय बेटे-(बेटे भूमीखंडाचाच भाग आहे)
मादागास्कर बेट- भारतीय महासागराचा वायव्येकडील भाग
2 ज्वालामुखीय बेटे-(ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे
तयार झालेली बेटे) हवाई बेटे- पॅसिफिक महासागर
3 प्रवाळ बेटे-(प्रवाळ किटकांच्या संचयनापासुन
तयार झालेली बेटे) ॲलडॅब्रा बेटे-अटलांटीक महासागर