जागतिक हवामान बदल
पृथ्वीचे सरासरी तापमान 140 से. आहे.
पृथ्वीचे सरासरी तपमान वाढत आहे. विसाव्या शतकात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी
तापमानात सुमारे 0.80 से. ने वाढ झाली असल्याचे विविध तापमानांच्या
नोंदीवरुन स्पष्ट होत आहे. याचे मुख्य कारण वातावरणात कार्बन डायऑक्सॉईड, मिथेन
यासरख्या उष्ण वायुचे होणारे उत्सर्जन मानले जाते या सारख्या वायूमुळे उष्णता
साठविण्याची वातावरणाची क्षमता वाढते त्यातुन तापमानात वाढ होते. तापमानाच्या या
वाढीचा आकडा फार मोठा दिसत नसला तरी त्याचे परीणाम मात्र चिंता करणारे आहेत.
जागतिक तापमान वाढीचे परीणाम-
1 उष्णतेची लाट- 1995
साली शिकागो येथे व 2003 साली पॅरिस येथे आलेल्या उष्णतेच्या लाटेंमुळे शेकडो लोक
मुत्युमुखी पडले होते. अशी उष्णतेची लाट विशेषत: उन्हाळयाच्या कालावधीत वातावरणातील धुलीकण व बाष्प यांचे प्रमाण वाढल्याने
वातावरणाची तापमान साठवण्याची क्षमता वाढून तापमान वाढल्याने निर्माण होत असते.
यात उष्माघातामुळे लोक मुत्युमुखी पडतात.
2 औष्णिक
बेटे- प्रामुख्याने मोठया शहरांमध्ये
जेथे वनक्षेत्रांच्या तुलनेने रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटचे
बांधकाम, औदयोगिक व वाहनांचे प्रदुषण जास्त आहे अशा औष्णीक ठिकाणी उष्णतेच्या लाटा
अधिक त्रास दायक झालेल्या आहेत. अशा ठिकाणी तापमानात अनियंत्रित वाढ होत आहे
3 समुद्राच्या
पाण्याच्या पातळीत वाढ- जागतिक समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ ही बर्फाचे
व हिमनदयांचे वितळणे या मुख्य कारणांमुळे होत आहे. यामुळे समुद्रकिनारपट्टीच्या
प्रदेशात पुरस्थिती निर्माण होणे, किनार पट्टीवरील शहरे जलमय होणे, अनेक बेटे
समुद्राच्या पाण्याखाली जाणे तसेच अनेक मासे, पक्षी व प्राण्यांचे अधिवास नष्ट
होणे पानथळ प्रदेश धोक्यात येणे. अशा प्रकारचे परीणाम जाणवतात. सन 2100 पर्यन्त
समुद्राची पातळी 1 मिटरने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असल्याने येत्या काही
काळात याचे गंभिर परीणाम समोर येतील.
4 उंच पर्वतीय हिमक्षेत्रावरील हिमनदयांचे वितळणे आणि ध्रवीय प्रदेशातील
बर्फाचे वितळणे- बर्फवितळणे ही नैसर्गिक क्रिया असली तरी
प्रमाणा पेक्षा जास्त हिमनदया व हिमनग वितळणे ही गंभिर बाब आहे. मागील 25 वर्षात गंगोत्री हिमनदी 850 मीटर
पेक्षा जास्त मागे सरकलेली आहे. हा दर प्रति वर्ष 22 मीटर आहे. हिमनदयांचे एवढया
वेगाने वितळणे हे अनैसर्गिक आहे. याचाच अर्थ बर्फ वितळण्याच्या प्रमाणापेक्षा बर्फ
निर्मीती कमी प्रमाणात होत आहे. अशीच स्थिती मांउन्ट किलोमांजरो, आल्प्स
पर्वतांमधील हिमनदयांची आहे.
5 अन्य परीणाम- तापमान वाढीमुळे इतरही काही परिणाम पहावयास मिळतात ते पुढील प्रमाणे
A जेलीफिशचे
प्रजनन- महासागराच्या पाण्याचे
तापमान वाढल्याने त्यातील आम्ल पातळी वाढत आहे त्यामुळे ज्या भागात जेलीफिश चे
अस्तित्व नव्हते अशा समुद्री भागातही जेलीफिश चे प्रजनन मोठया प्रमाणात होतांना दिसत आहे.
B डांसाच्या
संखेत वाढ- डासांच्या प्रजननासाठी आर्द्र परिस्थिती व जास्त
तापमानाची आवश्यकता असते, सरासरी तापमानात वाढ झाल्याने अनेक प्रदेशांचे तापमान
वाढले असल्याने या पुर्वी जेथे डास आढळत नसत अशा प्रदेशातही डास आढळत असुन डासांची
संख्या वाढत आहे. तसेच नवनवीन भागात डेंगू सारखे आजार पसरत आहेत.
C प्रवाळ
कट्टे नष्ट होणे- तापमानात बदल झाल्यास प्रवाळ त्यांना रंग
प्राप्त करुन देणाऱ्या आपल्या पेशीत शेवाळांना बाहेर काढतात. सागरी तापमान जर 1 अंश से ते 2 अंश से वाढ दीर्घकाळ
राहील्यास विरंजन प्रकीया होवुन प्रवाळ रंगहीन होतात किंवा मृतही पावतात. आणि
सध्या सागरीपाण्यात विरंजन क्रीयेमुळे प्रवाळ मोठया प्रमाणात मृत पावत आहेत. त्यामूळे
जगातील 1/5 पेक्षा जास्त प्रवाळ कट्टे नष्ट झाली आहेत.
हवामान बदल- जागतीक स्तरावरील हवामानाच्य आकृतीबंधात सातत्याने होणाऱ्या बदलास `हवामान बदल` असे म्हणतात. यामध्ये मोसमी वाऱ्याचा प्रवाहातील बदल, ऋतूंमधील बदल, वृक्षांच्या
बहराच्या कालावधीतील बदल, पुर आणि दुष्काळाच्या वारंवारीतेत होणारी वाढ इ. चा
समावेश असतो.
हवामान बदलाच्या बाबी व परीणाम-
1 पुरांची वारंवाता आणि तीव्रतेत झालेली वाढ-
गेल्या काही कालावधीत पुरांच्या संख्येत व कालावधीत वाढ झालेली असल्याचे येते उदा.
2005 साली मुंबईत पर्जन्यामुळे आलेला पुर, तसेच सन 2013 मध्ये केदारनाथ येथे
झालेली ढगफुटी, भुस्खलन व पुर. जगाच्या विवीध भागात पुरांच्या विविध भागात
पुरांच्या वारंवारीतेत वाढ झालेली आहे.
2 दुष्काळ आणि चक्रीवादळे यांच्या तीव्रतेत व
वारंवारितेत होणारी वाढ- तापमानाच्या वाढीमुळे इ. स.
1970 पासून पृथ्वीवर दुष्काळाच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. जागतीक तापमान
वाढीमुळे सागरीय जलाचे तापमान वाढुन सागरीभागावरील पाण्याचे रेणू जास्त सक्रीय
होतात व पाण्याच्या वाफेचे प्रमाणही वाढत आहे त्यामुळे वातावरणात मोठया प्रमाणात
बाष्प निर्माण होते यामुळे आवर्त व प्रत्यावर्ताची निर्मीती व तीव्रतेत वाढ होते.
त्यातुन चक्रीवादळे व दुष्काळ निर्माण होतात.
3 पीक वाढीच्या कालावधीत व कृषी उत्पन्नात बदल
होणे- वातावरणातील वाढत्या कार्बन डायऑक्सॉईड मुळे हवामान, कृषी, वायु व मानवी
आरोग्यावर परीणाम होत आहे. वातावरणातील कार्बनडायऑक्साईड चे प्रमाण 350 ppm पेक्षा जास्त हे पर्यावरणास घातक आहे. तसेच त्याचा
परीणाम पर्जन्यमानावर ही होते व पर्जन्यमानाचा परीणाम पीक वाढीवर होत असतो.
4 वर्षावने आणि हवामान बदल- वने ही
पृथ्वीचे तापमान कमी ठेवण्यास मदत करतात. रुंदपर्णी वर्षावनांच्या प्रदेशात
वनस्पतींच्या अच्छादनामुळे बाप्पीभवनाचा वेग कमी होऊन नैसर्गीकरीत्या हवा शीतल
राखली जाते. परंतु मोठया प्रमाणात या वनाची तोड किंवा ही वने जाळल्याने तेथील हवा
उष्ण व कोरडी होऊ लागते. तसेच वने जाळल्याने तेथे कार्बन डायऑक्साईड वातावरणात
मिसळला जातो त्यामुळे वातावरणावर ताण निर्माण होतो. मोठया प्रमाणावर होणाऱ्या
निर्वनीकरणामुळे पर्जन्याचा आकृतीबंध व पर्जन्याच्या प्रमाणात बदल झालेला आहे.