Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Showing posts with label अकरावी भूगोल प्रथमसत्र परिक्षा सराव प्रश्नपत्रिका- 2021 गुण 50 First term Exam. Show all posts
Showing posts with label अकरावी भूगोल प्रथमसत्र परिक्षा सराव प्रश्नपत्रिका- 2021 गुण 50 First term Exam. Show all posts

Sunday, 28 November 2021

अकरावी भूगोल प्रथमसत्र परिक्षा सराव प्रश्नपत्रिका- 2021 गुण 50

 

प्रथमसत्र परिक्षा-2021

इयत्ता अकरावी

विषय- भूगोल

 गुण – 50                                                                        

वेळ- 2.30 तास

___________________________________________________________

सुचना- 1 सर्व प्रश्न आवश्यक आहेत.

2 प्रश्नांची उत्तरे लिहीतांना आवश्यक तेथे योग्य आकृत्या / आलेख काढावे

3 रंगीत पेंन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहेत.

4 नकाशा स्टेंसिलचा वापर योग्य तेथे करावा.

5 उजवी कडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

6 आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तर पत्रिकेस जोडावी.

 

प्रश्न 1 अ) खालील ''' आणि 'क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावुन साखळी पूर्ण करा. (गुण 4)

आम्ल लाव्हा

पाणी

साधारण त्रिकोणी आकार

रासायनिक विदारण

गाळाचे प्रमाण जास्त

वहन संथ गतिने

त्रिभूज प्रदेश

ॲमेझॉन खोरे

दक्षिण अमेरिका

विषुववृत्तीय वर्षावने

सिलीकांचे प्रमाण जास्त

भस्मिकरण

 

प्रश्न 1 ब ) पुढील विधाने सुचनेनुसार पूर्ण करा.               (गुण 3)

1) खालील भूरुपांचे गटपर्वत व खचदरी गटात विभागणी करा.

      ) सातपुडा    

      ) नर्मदा तापी नदीच्या दऱ्या  

      ) ब्लॅक फॉरेस्ट  

      ड) मेघालय पठार

 

2) गोठण वितळण विदारण प्रक्रियेचे टप्पे योग्य क्रमाने लावा.

      अ) बर्फात रुपांतर होणे

      ब) खडकांचे तुकडे पडणे

      क) खडकांच्या भेगात पाणी शिरणे

      ड) भेगा रुंदावणे

 

3) कठीण खडकाखालील मृदू खडकांची झीज होवून एक नवीन भूरूपनिर्माण होते या भूरुपातूनच पुढे सागरी कमान तयार होते. भूरूप ओळखा.

      अ) सागरी गुहा

      ब) सागरी स्तंभ

      क) सागरी कडा

      ड) तरंगघर्षित  चबूतरा

 

 

 

प्रश्न 1 क) अचूक सहसंबध ओळखा   A: विधान   R: कारण    (गुण 3)

 

1 ) A: हिमनदीत 'यु' आकाराच्या दऱ्या निर्माण होतात.

      R: हिममुळे नदीपात्राचे तळ व काठ यांचे अपक्षरण झाल्याने 'यु' आकार प्राप्त होतो.

                (अ) केवळ A बरोबर आहे.                

                (ब) केवळ R बरोबर आहे.

                (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

                (ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

2) A : टुंड्रा प्रदेशात वर्षभर बर्फाळ वातावरण असते.

     R : येथे सूर्य किरणे तिरपी पडतात

                (अ) केवळ A बरोबर आहे.                

                (ब) केवळ R बरोबर आहे.

                (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

                (ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

3) A : मोसमी हवामानाच्या प्रदेशात विशिष्ट काळातच पाऊस पडतो.

  R : येथे वर्षभर उष्णता जास्त असते.

                (अ) केवळ A बरोबर आहे.                                

                (ब) केवळ R बरोबर आहे.  

                (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

                (ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

 

प्रश्न 1 ड) योग्य पर्याय निवडा                    (गुण 3)

1) उच्च दैनिक तापमान कक्षा असणारा हवामान प्रदेश

       अ) उष्ण कटिबंधीय वर्षावने   

      ब) उष्ण कटिबंधीय गवताळ वने

       क) उष्ण कटिबंधीय ओसाड प्रदेश 

      ड) उष्ण कटिबंधीय हवामान प्रदेश

 

2) प्रस्तरभंग

       अ) खडकातील लवचीक पणा     

      ब) एकमेकांच्या दिशेने दाब

       क) वळी पर्वत               

      ड) उर्ध्वगामी हालचाल

 

3) नदीच्या संचयन कार्यातील एक भूरूप

       अ) घळई                    

      ब) नालाकृती सरोवर

       क) पूरमैदान                 

      ड) पूरतट

 

प्रश्न 2 रा)  भौगोलिक कारणे दया (कोणतेही 3)        (गुण 9)

1) मसूरी व डेहराडून हे एकाच अक्षांशावर असून देखील तेथील हवामानात भिन्नता आहे.

2) दक्षिण गोलार्धात तैगा प्रदेश आढळत नाही.

3) हिमालयात अनेक गिरीशृंग, मेषशिला, हिमगव्हर लोंबत्या दऱ्या आढळतात.

4) मानव हा विदारणाचा एक कारक आहे.

5) मृत ज्वालामुखी मध्ये विवर सरोवराची निर्मिती होते.   

 

प्रश्न 3 रा) फरक स्पष्ट करा (कोणतेही -3)              (गुण 9)   

1) मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली

2) कणीय विदारण आणि अपपर्णन

3) कायीक विदारण आणि रासायनिक विदारण

4) पुरतट आणि पुरमैदान

5) मौसमी हवामान प्रदेश आणि  भूमध्य सागरी हवामान प्रदेश

 

प्रश्न 4 था) जगाच्या नकाशात घटक योग्य चिन्ह व सूचिच्या सहाय्याने दर्शवा (कोणतेही-5) (गुण 5)

      1) चिली देश  

      2) उत्तर अमेरीकेतील वाळवंटी प्रदेश     

      3) कतार खळग्याचा देश

      4) गंगा नदीचा त्रिभूज प्रदेश     

      5) फुजी जागृत ज्वालामुखी      

      6‍) स्कॉशिया भूपट्ट

      7) सॅव्हांना हवामान प्रदेश

 

प्रश्न 5 वा) टिपा लिहा (कोणत्याही -2)                 (गुण 8)

      1)  कार्स्ट पध्दतीच्या भूरुपांसाठी आवश्यक घटक

      2) विस्तृत झिजेचे प्रकार

      3) गट पर्वत व खचदरी

 

प्रश्न 6 अ ) खालील उताऱ्याचे वाचन करुन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (गुण 4)

भारत हा उष्णकटीबंधीय देश आहे. संपूर्ण भारताभोवती समुद्रकिनारा नाही. एकीकडे हिमालय आहे. तर दुसरीकडे समुद्रकिनारा त्यामुळे या घटकांचा परिणाम भारतातील हवामानाच्या अंदाजावरही होतो. आपल्याकडे पावसाचा अंदाज म्हणजे जमिनीवरील हवा गरम होणे, त्यात बाष्पाचे प्रमाण, हे बाष्प वर जाऊन थंड होणे आणि त्यानंतर वादळी वारे आणि ढग अशा पद्धतीने पाऊस येतो यावर अवलंबुन आहे.  यामध्ये एवढी अचूकता नसते. यामध्ये विभागवार, राज्यवार पूर्वानुमान वर्तवता येते. पण हे अंदाज व्यापक भागासाठी लागू असतात. यात प्रादेशिक अचूकता मांडता येत नाही. यासंदर्भात हवामानतज्ज्ञ आणि इंडियन मेटरोलॉजिकल सोसायटी, पुणे या संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. आर. कुलकर्णी सांगतात की, परदेशात अचूक पूर्वानुमान देण्यासाठी वापरली जाणारी जगातील सगळी मॉडेल्स वापरून तीन-तीन तासांचे अंदाज घेतात तयानुसार आपल्यालाही भारतासाठी पूर्वानुमानसुद्धा आपल्यालाही देता येते. मात्र या पूर्वानुमानामध्ये काही प्रमाणात चूक असतेच. भारतीय मौसमी हवामानाची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने परदेशाप्रमाणे अचूकता येत नाही. मात्र एखादा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर विस्तृत प्रमाणात पाऊस पडतो आणि वर्तवलेले बऱ्यापैकी अंदाज योग्य ठरू शकतात.

 

1) भारतात पाऊस पडणाऱ्या प्रकीयेचा अंदाज कसा घेतला जातो. ?

2) देशातील हवामानाचे अंदाज कोणत्या कारणांमुळे/अभावामुळे 100% खरे ठरत नाहीत ?

3) पावसाचा अंदाज कोणत्या परीस्थीतीत योग्य ठरु शकतो.?

4) उताऱ्यात आलेली भारताची हवामानीय भौगोलीक परीस्थीती कोणती?

 

प्रश्न 6 ब) खालील पैकी कोणत्याही एका घटकांची सुबक आकृती काढून भागांना नावे दया.   (गुण 2)

       1) भारतात येणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा प्रवाह मार्ग

       2) विदारणाची गोढण वितळण प्रक्रिया






आदर्श उत्तरांसाठी संदर्भ घ्या......



                                                                                                      




cont. 9421680541

    9403386299