Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Showing posts with label हिंदी महासागराची तळरचना. Show all posts
Showing posts with label हिंदी महासागराची तळरचना. Show all posts

Wednesday 29 January 2020

हिंदी महासागराची तळरचना-


हिंदी महासागराची तळरचना-
हिंदी महासागराची तळरचना फार गुंतागुतीची आहे. हिंदी महासागरातील जलमग्न भूरुपे ही भूविवर्तनिकी हालचाली, अनाच्छादन /ज्वालामुखीय प्रकीयांमुळे झालेली आहे. या प्रकीया जशा खंडीय भागात कार्यरत असतात तशाच त्या महासागरतही कार्यकरीत असतात. त्यामुळे हिंदी महासागरात खंडात्न उतार, मध्य महासागरीय जलमग्न पर्वत रांग, महासागरीय खोरी, सागरीगर्ता व बेटे असे भूरुपे पहावयास मिळतात. हिंदी महासागराची सरासरी खोली 4000 मीटर आहे
) समुद्रबुड जमीन / भूखंड मंच-   हिंदी महासागराच्या समुद्रबुड जमीनीमध्ये मोठया प्रमाणात विविधता आढळते. भारताच्या किनारी भागात समुद्रबुड जमीन विस्तीर्ण आहे. (भारताचा पूर्वेकिनारा- अरुंद, तर पश्चीमकिनारा रुंद आहे) या तुलनेत ‍ आफ्रिका, मादागास्कर बेट, इंडोनेशिया च्या किनाऱ्यांवर अरुंद आहे.
) मध्य महासागरीय रांगा (सागरी पर्वत/पठारे)-
1) मध्य हिंदी महासागरीय रांग- या रांगेची सुरवात सोमाली व्दीपकल्पाच्या जवळ गल्फ ऑफ एडनमधून होते, पुढे दक्षिणेकडे मादागास्कर बेटाच्या पर्वेस ही पर्वतरांग दोन शाखेत विभागली जाते.
    A) नैऋत्य हिंदी जलमग्न रांग-  त्यातील ही एक शाखा नैऋत्य दिशेला प्रिन्स एडवर्ड बेटापर्यंन्त पसरली आहे
    B) मध्य हिंदी महासागरीय रांग - दुसरी शाखा अग्नेय दिशेकडे ॲमस्टरडॅम व सेंटपॉल बेटापर्यंन्त पसरलेली आहे. ही पर्वत रांग अनेक संमातर रांगांनी बनलेली आहे. ही रांग एकसंघ नाही ती अनेक ठिकाणी खंडीत झालेली आहे. उदा. ओवेन विभंग, ॲमस्टरडॅक विभंग
2) नव्वद पूर्व रांग- ही पर्वत रांग हिंदी महासागरातील बंगाल च्या उपसागरात 90पुर्व रेखावृत्तावर उत्तर दक्षिण दिशेस विस्तारलेली आहे. ही रांग अंदमान बेटाच्या पश्चिमेडून सुरु होवून खाली दक्षिणेकडे ॲमस्टरडॅक व सेंट पॉल बेटाच्या पूर्वेस संपते.
3) छागोस पठार- हींदी महासागरात भारताच्या पश्चीमेकडे मध्य हींदी महासागरीय पर्वत रांगे पर्यंन्त हे पठार पसरलेले आहे. याच पठावरावर अनेक लहान मोठया बेटांचे समुह आहेत उदा. लक्षव्दीप, मालदीव, दिएगो गर्सिआ इ.
4) इतर पठारे-  याच महासागराच्या i) दक्षिण भागात केर्गुएलेन पठार ii) मादागास्कर बेटा जवळील मदागास्कर पठार, iii) आफ्रिकेच्या दक्षिणेस अगुल्हास पठार आहे.

) बेटे- हिंदी महसागरातील खोल समुद्रातील बेटांचा विचार केल्यास ऑस्ट्रेलिया, मादागास्कर व श्रीलंका या तिन मोठे बेटे आहेत या शिवाय अनेक लहान-मोठी बेटे आणि चार व्दीपसमुह या महासागरात आढळतात त्यांची विभागणी खालील प्रकारे करता येईल.
     
1 अरबी समुद्रातील बेटे-
2 बंगालच्या उपसागरातील बेटे
3 ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्या लगतची बेटे
4 अंटार्क्टिका खंडाजवळील बेटे


1 अरबी समुद्रातील बेटे- ही बेटे दोन विभागात मांडता येतात-
                                                                                   
A) अफ्रिका खंडाच्या किनाऱ्याजवळील बेटे व 
B) मध्य पर्वतरांगे जवळची बेटे / लक्षव्दीप-छागोस रांगेतील बेटे.


A) अफ्रिका खंडाच्या किनाऱ्याजवळील बेटे-
  i) मादागास्कर बेट- या गटातील हे सर्वात मोठे बेट असुन काही भूगर्भशास्त्रज्ञांच्या मतानुसार हे         मादागास्कर बेट पूर्वि आफ्रिका खंडाचाच भाग होते ते प्रथम मुळ आफ्रिका खंडापासून होवून इंडो-          ऑस्ट्रेलिया भूपट्टाला जावुन मिळाले व  नंतर अंतरीक हालचालीमुळे पुन्हा तेथूनही वेगळे होवून     विलग झालेले असुन आज दिसते तेथे आहे. मादागास्कर बेट हे संवेदनशील भूकंप प्रवणक्षेत्र आहे.
  ii) कोमोरो बेटे, बेस्सास दी इंडिया आणि युरोपा बेट- ही सर्व बेटे आफ्रिका खंडाच्या पूर्व दिशेला                                                                                                 आहेत.
  iii) रियुनियन, मॉरिशस व सेशल्स बेट-  ही बेटे मादागास्कर बेटाच्या पूर्व दिशेला आहे.
  iv) सोकोत्रा बेट- मादागास्कर बेटाच्या उत्तर दिशेला आहे.
      वरील सर्व बेटे हिंदी महासागरीय मध्य रांगेच्या पश्चीमेची बाजु व आफ्रिका खंडाच्या पुर्वेबाजू यांच्या दरम्यान आहेत.
B) मध्य पर्वतरांगे जवळची बेटे / लक्षव्दीप-छागोस रांगेतील बेटे- लक्षव्दीप, मालदीव आणि छागोस बेटे या पैकी बहुतेक बेटे प्रवाळ संचयनातुन तयार झालेल्या कंकणव्दीपाच्या स्वरुपात आढळणारे व्दीपसमुह आहेत.
या शिवाय पाकीस्तानच्याकिनारी भागात बुंदेल आणि इराणच्या पार्शियाच्या आखातात किश, हेंडोरावी, लावान, सिरी इ.बेटे आहेत इरतही बेटे आहेत.
2 बंगालच्या उपसागरातील बेटे-
i) श्रीलंका बेट- हे या विभागातील सर्वात मोठे बेट असुन भारताच्या दक्षिणेला आहे.
ii) अंदमान-निकोबार बेटांचा समुह-  हे बेटे भारताच्या दक्षिणेला नव्वद पुर्व पर्वतरांगेच्या पुर्वेकडे आहेत.
iii) सुमात्राबेट समुह- हा बेटांचा समुह अंदमान निकोबार बेटांच्या पश्चिमेकडे आहे.
      सुमात्रा बेटांच्या पश्चिमेकडे काही बेटांची साखळी आढळते त्यातील बरेच बेटे हे ज्वालामुखीय बेटे आहेत. व ही सर्व बेटे भूपट्ट सीमेशी निगडीत आहेत. ही सर्व बेटे जलमग्न पर्वतांचे शिखराचे  भाग असुन ते समुद्राच्या पाण्याच्या वर आलेले आहेत.
3 ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्या लगतची बेटे व अंटार्क्टिका खंडाजवळील बेटे- या विभागात रच थोडी बेटे आहेत त्यापैकी अश्मोर,क्रिसमस व कोकोस हे बेटे महत्वाची आहेत.
) महासागरीय खोरी किंवा मैदाने- सागरतळावरील खोलवर असलेल्या सपाट भागास महासागरीय खोरी म्हणतात. भूपष्ठावरील आणलेला अवसाद तसेच सागरी भागात निर्माण झालेला अवसाद संचयनाचे अखेरचे स्थान म्हणजे महासागरी मैदाने /खोरी.हिंदी महासागरात दहा प्रमुख खोरी आहेत मध्य हींदी महासागर खोरे, सोमाली खोरे, गंगा खोरे, अरेबीयन खोरे, अघुल्हास नाताळ खोरे,  मास्कारेन खोरे, पश्चिम ऑस्ट्रेलिया खोरे, मॉरिशन खोरे, ओमन खोरे, नैऋत्य हिंदी महासागर खोरे
) सागरी खळगे आणि गर्ता-   सागरी गर्ता हा महासागरातील अति खोल भाग असतो. हिंदी महासागरात गर्तांची संख्या इतर महासागरांच्या तुलनेने कमी आढळते.
     i.    सुंदा गर्ता- हिंदी महासागराच्या पुर्व दिशेला भारत-‍ ऑस्ट्रेलिया व पॅसिफिक भूपट्टांच्या सीमावर्ती प्रदेशात जावा-सुमात्रा बेटाजवळ सुंदा गर्ता असुन तिची खोली 7450 मी (4073 फॅदम)आहे.
    ii.    ओब गर्ता- अग्नेय हिंदीमहासागर पर्वत रांगेच्या दक्षिण बाजुला ओब गर्ता असुन तिची खोली 6875 मीटर (3759 फॅदम) आहे. या दोन्हीं गर्ता भूपट्ट हालचांलीमुळे अतिसंवेदनशील भूंकपप्रवण क्षेत्रात मोडतात.‍