प्रात्यक्षिक 10 स्थल निर्देशक नकाशाचे विश्लेषण वाहतूक आणि संदेशवहन
उद्देश - (१) प्रदेशातील वाहतूक व संदेशवहनाची विविध साधने अभ्यासणे.
(२) प्राकृतिक रचना व वाहतूक यांचा सहसंबंध
अभ्यासणे.
(३) वाहतूक व संदेशवहनाच्या प्रदेशातील भूमीका
अभ्यासणे.
63 K/12 या नकाशावर आधारीत प्रश्नांची उत्तरे
(1) नकाशातील दोन प्रमुख
लोहमार्ग कोणते ?
उत्तर –प्रस्तूत नकाशात (i) अलाहाबाद ते मुघल
सराय (मिर्झापूर मार्गे)
(ii) दलप ते छापरा, प्रमुख लोहमार्ग आहेत.
(2) नकाशातील चार प्रमुख
लोहमार्ग स्थानके कोणती ?
उत्तर – नकाशात दुलापूर, दलपातपूर, विंध्याचल, बेलवन ही प्रमुख लोहमार्ग स्थानके दिसत आहेत.
(3) कोणत्या भागात डांबरी
रस्ते आहेत ?
उत्तर – प्रस्तृत नकाशात पश्चिम भागात डांबरी
रस्ते आढळतात
(4) राष्ट्रीय महामार्गाने
जोडलेली शहरे कोणती ?.
उत्तर - जिल्ह्यातील सर्वच मोठी शहरे राष्ट्रीय महामार्गाने जोडलेली आढळून येते.
(5) पठारी प्रदेशातून
जाणारा एकमेव रस्ता कोणता ?
उत्तर - पठारी
प्रदेशात साधा रस्ता हा एकमेव वाहतूकमार्ग आहे.
(6) हिराई नदीवरील प्रमुख
साधा रस्ता कोणता ?
उत्तर – हिराई नदीवरील
प्रमुख साधा रस्ता बैलगाडीचा, पायदळाचा
आहे.
(7) मिर्झापूर - विंध्याचल
यांना जोडणारा व लोहमार्गाला समांतर जाणारा रस्ता कोणता ?
उत्तर – मिर्झापूर -
विंध्याचल यांना जोडणारा रस्ता राज्यमार्गाचा आहे.
(8) नावेचा वापर कधी होत
असावा ?
उत्तर – वर्षभर, नावेचा वापर होत
असावा.
(9) कोणत्या वस्त्या नाविक
मार्गाने जोडल्या आहेत ?.
उत्तर – विंध्याचल, मिर्झापूर, भाटेवरा, दलपट्ट, दिंगुपट्ट, जारजेरी, साह कोल्हूआ, बिसुंदरपूर, नेवारिया, गिरगाव, बारणी, धरमदेवा, भाटुली इत्यादी.
_____________________________________________________________________________________________________________________________________
47 J /15
47 J / 15 या नकाशावर आधारीत प्रश्नांची उत्तरे
1) नकाशातील रेल्वे स्थानकांची नावे सांगा?
उत्तर- प्रस्तृत नकाशा 47 J / 15
मध्ये भिगवण व पारेवाडी ही दोन रेल्वे स्थानके आहेत
2) नकाशात प्रमुख लोहमार्ग कोणता आहे?
उत्तर- प्रस्तृत नकाशा 47 J / 15
मध्ये मुंबई ते चेन्नई राष्ट्रीय लोहमार्ग आहे
3) कोणत्या भागात डांबरी रस्ते
आहेत?
उत्तर- प्रस्तृत नकाशा 47 J / 15
मध्ये नैऋत्य व ईशान्य भागात डांबरी रस्ते आहेत
4) राष्ट्रीय महामार्ग कोणत्या
शहरातून जातो?
उत्तर- प्रस्तृत नकाशा 47 J / 15
मध्ये राष्ट्रीय महामार्ग भिगवण शहरातून जातो
5) राष्ट्रीय लोहमार्ग कोणत्या
दिशेने गेला आहे?
उत्तर- प्रस्तृत नकाशा 47 J / 15
मध्ये राष्ट्रीय
लोहमार्ग पूर्व पश्चिम दिशेने गेला आहे