Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Showing posts with label बारावी भूगोल नकाशावरील प्रश्न भाग- 2. Show all posts
Showing posts with label बारावी भूगोल नकाशावरील प्रश्न भाग- 2. Show all posts

Thursday 17 February 2022

बारावी भूगोल नकाशावरील प्रश्न भाग- 2

 

बारावी भूगोल नकाशावरील प्रश्न भाग- 2




दिलेल्या नकाशा /आलेख / आकृतीचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा


1)

बारावी भूगोल नकाशावरील प्रश्न भाग- 2

1) कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे ?                                     

उत्तर - ऑस्ट्रेलिया खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे



2) भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबतीत कमी असलेला खंड ?                         

उत्तर – भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबतीत कमी असलेला खंड ऑस्ट्रेलिया आहे



3) भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता ?                        

उत्तर – भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड आशिया आहे



4) कोणत्या विभाजीत वर्तुळात एक खंड कमी आहे व का?

उत्तर – लोकसंख्या वितरण दर्शविणाऱ्या खंडात अंटार्क्टिका खंड कमी असुन तेथे कायम (स्थायीक) वास्तव्य करणारी लोकसंख्या नाही.



5) युरोप खंडाची भूमीची टक्केवारी किती?

उत्तर – युरोप खंडाची भूमीची टक्केवारी 6.80% आहे.




----------------------------------------------------------------------------


2)



 1 आलेख काय दर्शवतो

 उत्तर- आलेखात वय व लिंगानुसार ( स्त्री- पुरुष ) यांची टक्‍केवारी लोकसंख्या मनोऱ्याव्दारे दर्शवलेली आहे

 

2 कोणत्या वयोगटात पुरुषांची टक्केवारी जास्त आहे

 उत्तर- 0 ते 9  या वयोगटात पुरुषांची टक्केवारी जास्त आहे

 

कोणत्या वयोगटात स्त्रियांची टक्केवारी कमी आहे

  उत्तर-  70 पेक्षा अधिक हा वयोगट वगळता सर्वच वयोगटात स्त्रियांची टक्केवारी कमी आहे. म्हणजेच 0 ते 69 या वयोगटात स्त्रियांची टक्केवारी कमी आहे.

 

4  30 ते 39 वयोगटात कोणाचे प्रमाण जास्त आहे

 उत्तर- 30 ते 39 या वयोगटात पुरुषांचे प्रमाण जास्त आहे

 

कोणत्या वयोगटात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे

 उत्तर- कोणत्याही वयोगटात पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांचे प्रमाण जास्त नाही



------------------------------------------------------------------------------------------------------

3)




कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात जास्त आहे

 उत्तर- मध्य आशिया, युरोप, उत्तर अमेरिका व पूर्व आणि आग्नेय आशिया या प्रदेशात साक्षरतेचा दर सर्वात जास्त आहे

 

कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे

 उत्तर- उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया, दक्षिण आशिया आणि सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकी देश या प्रदेशांमध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे

 

स्त्री साक्षरतेचे प्रमाण कोणत्या प्रदेशात पुरुषांपेक्षा जास्त आहे

  उत्तर-  स्त्री  साक्षरतेचे प्रमाण मध्य आशिया, युरोप व उत्तर अमेरिका या ठिकाणी जास्त आहे

 

आलेखा बाबतचे तुमचे निष्कर्ष लिहा

  उत्तर-  I) जगात साक्षरतेचे प्रमाण असमान आहे,

II) साक्षरता जास्त असलेले प्रदेश विकसीत व विकसनशिल आढळतात

III) साक्षरता कमी असलेले देश सामाजिक दृष्टया मागासलेले आहेत.

IV) स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण जास्त असलेले युरोप व उत्तर अमेरीका हे प्रदेश विकसीत आढळतात.  

  

 

आलेख काय दर्शवितो 

 उत्तर-  आलेखात प्रदेशानुसार सन 2016 मधील  लिंग व प्रौढ साक्षरतेचे प्रमाण दर्शवलेले आहे



----------------------------------------------------------------------------------------------

4)




आलेत काय दर्शवतो

 उत्तर- आलेख जागतिक खंडनिहाय भूमीची टक्केवारी दर्शवीत आहे

 

कोणत्या खंडात भूमीची टक्केवारी जास्त आहे

 उत्तर- आशिया खंडाची भूमीची टक्केवारी (29.2 %)  ही सर्वात जास्त आहे

 

3 कोणत्या खंडात भूमीची टक्केवारी कमी आहे

 उत्तर-  ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी ची टक्केवारी (5.90 %) सर्वात कमी आहे

 

कोणत्या खंडात 9.2 % भूमी ची टक्केवारी आहे

 उत्तर- अंटार्टिका खंडाची भूमि ची टक्केवारी 9.2 % आहे

 

 

5 युरोप खंडाची भूमी किती टक्के आहे

 उत्तर- युरोप खंडाची भूमी ची टक्केवारी 6.8 आहे



------------------------------------------------------------------------------------------------






नकाशा काय दर्शवतो

 उत्तर- दिलेल्या नकाशात जगतीक प्रमुख आर्थिक  क्रियांचे वितरण  दर्शवलेले आहे

 

नकाशात कोण-कोणत्या आर्थिक व्यवसायांचे वितरण दाखवले आहे

 उत्तर- नकाशात शेती, पशूपालन, मासेमारी, खाणकाम व लाकूडतोड या  प्राथमिक आर्थिक  व्यवसायांचे वितरण दाखवले आहे

 

लाकूडतोड हा व्यवसाय प्रामुख्याने कोणत्या अक्षवृत्त दरम्यान आढळतो 

 उत्तर- लाकूडतोड हा 30 अंश ते  60 अंश व्यवसाय दरम्यान आढळतो

 

कोणत्या प्रदेशात प्राथमिक क्रिया आढळत नाही? त्याचे कारण काय असावे?

 उत्तर- अंटार्टिका खंड, ग्रीनलँड तसेच उत्तर कॅनडा च्या भागात प्राथमिक आर्थिक क्रिया आढळत नाहीत कारण या भागांमध्ये अतिथंड हवामान असून तेथे बर्फाचे प्राबल्य आहे. अशा प्रतिकुल हवामानामुळै या प्रदेशात  मानवी वस्त्या नाहीत, त्यामुळे येथे प्राथमिक आर्थिक क्रिया आढळत नाहीत

 

मासेमारी व्यवसाय महासागरामध्ये विशिष्ट ठिकाणीच का आढळत असावेत

 उत्तर- मासेमारीसाठी आवश्यक भूखंडमंच, दंतुर किनारा, थंड सागरी प्रवाह यांचा संगम, अशा काही नैसर्गिक स्थितीची आवश्यकता असते आणि मासेमारीसाठी उपयुक्त असे स्थिती काही विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध असल्याने  मासेमारी व्यवसाय विशिष्ट ठिकाणी विकसित झालेले आहेत

 

युरोप खंडात कोणकोणत्या आर्थिक क्रिया अधिक आढळतात

 उत्तर- युरोप खंडात शेती, खाणकाम, पशूपालन, याबरोबरच मासेमारी या आर्थिक क्रिया अधिक आढळतात

 

समुद्रामध्ये दर्शविलेले खान कामाचे चिन्ह कोणते उत्पादन दर्शवत असेल

 उत्तर- समुद्रातील खाणकामाचे चिन्ह हे खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे उत्पादन दर्शवत असेल

 

कोणत्या खंडात खाणकाम व्यवसाय आढळत नाही? का?

 उत्तर- अंटार्टिका खंडावर खाणकाम व्यवसाय आढळत नाही कारण येथे कोणत्याही देशास अथवा सस्थेंस  खाणकाम करावयाची आंतरराष्ट्रीय परवानगी नाही  किंवा तसे आंतरराष्ट्रीय संकेत आहेत

 

9 जगातील सर्वात जास्त मासेमारी कोणत्या महासागरात केली जाते

 उत्तर- जगात पॅसिफिक महासागर भागात मासेमारी जास्त प्रमाणात केली जाते

 

10  मकरवृत्ताच्या दक्षिणेकडे कोणकोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया केल्या जातात

 उत्तर- मकरवृत्ताच्या दक्षिणेकडे मासेमारी, खाणकाम, पशूपालन आणि काही प्रमाणात लाकूडतोड या प्राथमिक आर्थिक क्रिया आढळतात

 

11  आग्नेय आशियातील बेटांच्या समूहावर कोणत्या आर्थिक क्रिया केल्या जातात

 उत्तर- आग्नेय आशियातील  बेटांवर खाणकाम    लाकूडतोड  या आर्थिक क्रिया आढळतात

 

12   चारही  गोलार्ध यांचा विचार करता कोणत्या गोलार्धात शेती व्यवसाय कमी आढळतो

 उत्तर-  चारहि गोलार्धांचा विचार केल्यास आफ्रिका खंडात शेती व्यवसाय सर्वात कमी  आढळतो

 

        

 उत्तर-  30 अंश अंश अक्षवृत्त यांच्या दरम्यान शेतीस अनुकूल हवामान यामुळे या अक्षवृत्तांची च्या दरम्यान शेतीचा  विकास झालेला आहे  अक्षवृत्त यांच्या दरम्यान मोसमी हवामानाच्या प्रदेशात सखोल शेती विकसित झालेली आहे