(प्रात्याक्षिक क्र 6 नकाशा क्र- 2) स्थलनिर्देशक नकाशा क्र 47 E/6 जलप्रणाली
अहमदनगर
नकाशा प्रदेश
डोंगराळ असून प्रस्तृत नकाशात जलाशये निळया रंगाने दर्शविलेले आढळतात. या नकाशातील
जलप्रणाली वृक्षाकार असुन या नकाशात वैतरणा व तानसा या दोन प्रमुख नदया आढळून येत
आहेत. या ठिकाणी डोंगराळ भाग असल्याने अनेक जलविभाजक आढळतात. डोंगररांगा मुळे
प्रमुख दोन्ही नदया वैतरणा व तानसा या दोन्ही नदयांची खोरी वेगळी झालेली दिसतात.
वैतरणा नदी
नकाशाच्या ईशान्य भागातून वाहत येत अनेक वळणे घेतांना दिसत आहे. वैतारणा नदीस
पूर्वेकडून भामा ही हगांमी नदी, केंगरी हंगामी नदी, उत्तरे कडून हातनी नदी तसेच डोंगराळ भागातुन वाहत येणारे इतरही प्रवाळ
येवुन मिळतांना दिसत आहेत.
तानसा नदीस बी-2
या संदर्भ चौकोनातुन उगम पावतांना दिसत असुन ए-2 संदर्भ चौकोनातील तळवाडा ही
हंगामी नदी तिला उत्तर दिशेकडून येवुन मिळते. या तानसा नदीवर तानसा बारमाही धरण
बांधलेले आहे.
या व्यतिरीक्त भातसाई, चापनाई, राखडी या ही
हंगामी नदया नकाशात बी-1, सी-2 व सी-3 चौकोनात दिसत असुन त्या वळणावळणाने वाहत
आहेत