Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Tuesday, 30 November 2021

बारावी भूगोल प्रात्यक्षिक वही / जर्नल XII Geography Practical Book / Journal

 





1 विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक लिहिण्यास भरपूर जागा. 


2  योग्य ठिकाणी तक्ते, आलेख, सुत्रे छापलेले

3  प्रत्येक वहीत 1 ते 10 प्रात्यक्षिके सोडवलेले

4 सर्व प्रात्यक्षिकांना स्वतंत्र क्यू-आर कोड व त्यात पाठ्यपुस्तकातील सर्वच उदाहरणे तक्ते, आलेख / आकृत्यांसह सोडवलेले

5 नमुना सर्वेक्षण करून त्याचे आठ मुद्द्यांचे निष्कर्षासह विश्लेषण छापलेले
6 प्रात्य. क्र. 2 ते 7 मधील  दोन-दोन उदाहरणे सोडवलेले. 

7 स्थलनिर्देशक नकाशा क्र. 63 K- 12 वर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे छापलेले 

8  क्यू-आर कोड स्कॅन करून प्रात्यक्षिक एकचे अतिरिक्त 02सर्वेंचे विश्लेषण पीडीएफ स्वरुपात

9  क्यू-आर कोड स्कॅन करून 63 K-12 च्या व्यतिरिक्त  नकाशाचे प्रातिनिधिक स्वरूपात प्रश्न-उत्तरे

10 होलसेल दरात उपलब्ध. 

11 पोस्ट / बस पार्सल ने पाठविण्याची व्यवस्था
 
12 संपर्क- प्रा. मनोज देशमुख  9421680541   9403386299





बारावी भूगोल प्रथमसत्र सराव प्रश्नपत्रिका गुण 50 First Tearm Practice Question Paper Marks 50

 

बारावी भूगोल प्रथम सत्र सराव प्रश्नपत्रिका गुण 50

प्रथमसत्र परीक्षा

 विषय- भूगोल

गुण -50

वेळ- 2.30 तास

...........................................................................................................................

सुचना-  1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

2) प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या /आलेख काढा.

3) रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.

4) योग्य तेथे नकाशा स्टेंसिलचा वापर करावा.

5) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

6) आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी.

 

प्रश्न 1) दिलेल्या सुचने नुसार उप-प्रश्न सोडवा

 

प्रश्न 1 )  साखळी पूर्ण करा. (गुण- 4)                           


लघु उदयोग

घनदाट वने

बॉम्बे हाय

फळे कंदमुळे गोळा करणे

नैसर्गिक वायूचे उत्पादन

टाटा लोहपोलाद उदयोग

खाणकाम

कौशल्यावर आधारीत

चिनी मातीची भांडी बनविणे

खाजगी उदयोग

वैयक्तिक

प्रतिकुल परिस्थिती

 

 

 

 

 

  



प्रश्न 1 )   अचूक सहसंबंध ओळखा   A:विधान R: कारण      (गुण- 3)                               

1) A: लोकसंख्येच्या मनोऱ्यात रूंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.

      R : लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे.

            

अ) केवळ A बरोबर आहे

ब) केवळ R बरोबर आहे

क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे

 ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

2) A : वस्तींचे विविध प्रकार असतात.

       R: विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो.


अ) केवळ बरोबर आहे

ब) केवळ बरोबर आहे

क) आणि दोन्ही बरोबर आहेत आणि हे चे अचूक स्पष्टीकरण आहे

 ड) आणि दोन्ही बरोबर आहेत परंतु हे चे अचूक स्पष्टीकरण नाही

           

 

3) A : सुपीक मैदानी प्रदेशात लोकवस्ती आढळते

   R: सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.


अ) केवळ बरोबर आहे

ब) केवळ बरोबर आहे

क) आणि दोन्ही बरोबर आहेत आणि हे चे अचूक स्पष्टीकरण आहे

 ड) आणि दोन्ही बरोबर आहेत परंतु हे चे अचूक स्पष्टीकरण नाही

     

 

 

 

प्रश्न 1 क) अचूक घटक ओळखा   (गुण- 3) 


1) टुंड्रा प्रदेशातील शिकार व्यवसाय करणारी जमात...


अ) एस्किमो 

ब) पिग्मी 

क) बोरा इंडियन 

ड) सेंटीनल


 2)  पश्चिम युरोपातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र...

अ) न्यू इंग्लंड क्षेत्र 

ब) पर्थ 

क) जर्मनी 

ड) चीन


3) सखोल उदरनिर्वाह शेतीचे प्रदेश...

अ) चीन, भारत, जपान, कोरिया, श्रीलंका 

ब) संयुक्त संस्थाने, रशिया

क) ऑस्ट्रेलिया 

ड) गवताळ प्रदेश

 

प्रश्न 1 ) चूकीचा घटक ओळखा   (गुण- 3) 


1) कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले उद्योग... 

अ) कृषी आधारीत उद्योग 

ब) बनाधारित उपयोग 

क) मोठे उद्योग 

ड) सागरी उत्पादनावर आधारीत उद्योग


2) लोकसंख्येसाठी अनुकूल घटक... 

अ) सुपीक मृदा 

ब) समशीतोष्ण हवामान 

क) उष्ण हवामान 

ड) पाण्याची उपलब्धता


3) स्थानमुक्त उद्योग... 

अ) घड्याळे तयार करणे 

ब) संगणक चकती 

क) हिरे तपासणे 

ड) वस्त्रोद्योग

 

 

 

प्रश्न 2 रा)  भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही 2)    (गुण- 6)  

1) लोकसंख्या वितरण असमान असते

2) भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते.

3) वर्तुळाकार वस्तीमध्ये घरे जवळ-जवळ असतात.

 

प्रश्न 3 रा ) फरक स्पष्ट करा. (कोणतेही 2)  (गुण- 6)

1) विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा

2) अवजड उदयोग आणि हलके उदयोग

3) मळयाची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती.

 

प्रश्न 4 अ) तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील घटक योग्य चिन्हांच्या 

व सुचिच्या सहाय्याने दर्शवा (कोणतेही- 4)      (गुण- 4)                                                    

1)  लोकसंख्या सक्रमणावस्थेतील पाचव्या टप्प्यातील कोणताही एक देश 

2) ग्रेट ब्रिटन

3) नैऋत्य अटलांटीक क्षेत्रातील मासेमारी क्षेत्र

4) आशिया खंडातील वनकटाई क्षेत्र

5) ब्राझील

 

 

  

प्रश्न 4 ब) खाली दिलेल्या लोकसंख्यामनोऱ्यांचे निरीक्षण करुन विचारलेल्या प्रश्नांची

  उत्तरे लिहा  (गुण- 3)                                                  




1) कोणता मनोरा वैदयकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचे प्रतिनिधीत्व करतो

2) विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व कोणता मनोरा करतो

3) “अ मनोऱ्याचे तळ रुंद असल्याचे कारणे कोणते ?


प्रश्न 5 वा) टीपा लिहा. (कोणतीही एक)   (गुण- 4) 

1) मळयाची शेती

2) नागरी वस्त्यांच्या समस्या



प्रश्न 6 अ) पुढील उताऱ्याचे वाचन करुन त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (गुण- 4)


            व्यक्ती किंवा वस्तू यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण करणे म्हणजे वाहतूक होय. तर विचार किंवा कल्पनांचे स्थलांतरण म्हणजे संप्रेषण होय. साधनसंपत्तीचे वितरण सर्वत्र समान प्रमाणात नाही म्हणून जेथे साधनसंपत्तीची कमतरता असते अशा ठिकाणी त्यांची वाहतूक केली जाते. कारखान्यांमध्ये प्रक्रिया करण्यासाठी कच्चा माल तर बाजारपेठांमध्ये वितरणासाठी पक्क्या मालाची ने-आण वाहतुकीच्या साधनांद्वारे होते.

 

प्राचीन काळापासून मानव दळणवळणाच्या साधनांच्या मदतीने मालाची ने-आण किंवा व्यापार करीत आला आहे. प्रारंभीच्या काळात, मानव दीर्घकाळ स्वतः वाहतुकीचे साधन म्हणून भार वाहून इच्छित स्थळी पोहचवित असे किंबहुना आजही काही विकसनशील आणि अविकसित देशात अशा प्रकारे काही मानवाच्या मार्फत वाहतूक केली जाते. अगदी प्रारंभीच्या काळातील ओझेवाहक मानव ते प्राणी आणि नंतर हातगाडी ते आधुनिक वाहने अशा क्रमाने वाहतूक विकसित होत गेली.

 

प्रश्न: 1) वाहतूक म्हणजे काय ?

2) वाहतूक कोणत्या क्रमाने विकसित होत गेली ?

3) वाहतुकीचा उपयोग कशासाठी केला जातो ?

4) कोणत्या प्रदेशात दळणवळणासाठी प्राण्यांचा वापर केला जातो ?



प्रश्न 6 ब) खालील पैकी एक सुबक आकृती काढून भागांना नावे दया.   (गुण- 2)

1) रेषीय वस्त्या

2) लोकसंख्या सक्रमण सिध्दान्त



प्रश्न 7 वा) खालील पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.  (गुण- 8)

1) प्राथमिक आर्थिक व्यवसायांचे विविध प्रकार व त्यांचे वैशिष्टे स्पष्ट करा.

2) लोकसंख्या सक्रमण सिध्दांन्तातील चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करा.

बारावी भूगोल प्रथमसत्र सराव प्रश्नपत्रिका गुण 50


https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/11/xii-geography-practical-book-journal.html





CONTACT-    9421680541        9403386299 


1 विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक लिहिण्यास भरपूर जागा. 
2  योग्य ठिकाणी तक्ते, आलेख, सुत्रे छापलेले
3  प्रत्येक वहीत 1 ते 10 प्रात्यक्षिके सोडवलेले
4 सर्व प्रात्यक्षिकांना स्वतंत्र क्यू-आर कोड व त्यात पाठ्यपुस्तकातील सर्वच उदाहरणे तक्ते, आलेख / आकृत्यांसह सोडवलेले
5 नमुना सर्वेक्षण करून त्याचे आठ मुद्द्यांचे निष्कर्षासह विश्लेषण छापलेले
6 प्रात्य. क्र. 2 ते 7 मधील  दोन-दोन उदाहरणे सोडवलेले. 
7 स्थलनिर्देशक नकाशा क्र. 63 K- 12 वर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे छापलेले 
8  क्यू-आर कोड स्कॅन करून प्रात्यक्षिक एकचे अतिरिक्त 02सर्वेंचे विश्लेषण पीडीएफ स्वरुपात
9  क्यू-आर कोड स्कॅन करून 63 K-12 च्या व्यतिरिक्त  नकाशाचे प्रातिनिधिक स्वरूपात प्रश्न-उत्तरे
10 होलसेल दरात उपलब्ध. 
11 पोस्ट / बस पार्सल ने पाठविण्याची व्यवस्था 


बारावी भूगोल प्रथम सत्र सराव प्रश्नपत्रिका गुण 50