अकरावी प्रात्याक्षिक क्र 7
स्थलनिर्देशक
नकाशाचे विश्लेषण- नैसर्गिक वनस्पती
उद्देश- स्थलनिर्देशक नकाशाच्या
निरीक्षणाव्दारे नकाशातील नैसर्गिक
वनस्पती जिवन समजावुन घेणे.
उद्दीष्टे-
1 स्थलनिर्देशक नकाशात नैसर्गिक वनस्प्ती कशा पध्दीने दर्शलेल्या असतात त्यांचा
अभ्यास करणे
2 स्थलनिर्देशक नकाशातील जलसाठे, भूउठाव
यांच्या अनुशंगाने वनस्पती जिवन कसे विकसीत झाले याचा अभ्यास करणे
3 नकाशातील वनक्षेत्र, राखीव वने,
संरक्षित वने, खुरटया वनस्पती यांचा अभ्यास करणे
4 नकाशातील वनस्पती प्रजाती, वनीकरण किंवा
गवताळ प्रदेश यांची ओळख व अभ्यास करणे.
उपयोग-
1 नकाशातील वनस्प्ती जिवनाचा अभ्यास करुन पर्यावरण संतुलन व तापमान
वाढ यांच्या उपाय योजना कामी या अभ्यासच
उपायोग होतो.
2 जलसंवर्धन, वाढते तापमान, पुर आपत्ती
व्यवस्थापन, दुष्काळ निवारण कार्यक्रमा अंतर्गत उपाय योजना करणे कामी या अभ्यासाचा उपयोग होतो.
( प्रात्याक्षिक क्र 7 नकाशा क्र- 1) स्थलनिर्देशक नकाशा क्र 63
K/12 नैसर्गिक वनस्पती जिवन
प्रस्तूत
नकाशाचाजास्तीत जास्त भाग हा मैदानी प्रदेशाचा असला तरी नकाशाच्या दक्षिण भागात
मुख्यत्वे ऐ-3, बी-3, सि-3 या संदर्भ चौकोनात
बाराच भाग हा हिरव्या रंगाने दर्शविलेला आहे. या ठिकाणी लहाण उंचीच्या
टेकडया / पठारी भाग असुन या भागात बारकच्चा राखीव जंगल व दांन्ती राखीव जंगल हे
विस्तृत नैसर्गिक वनस्पती
क्षेत्र आढळते. दोन्ही विस्तृत जंगले मिश्र वने असुन त्यांच्यात खैर ही प्रमुख
वनस्पती आढळते. तसेच बांबु चे वन ही नकाशाच्या दक्षिण भागात दिसत आहे. पठाराच्या वरच्या भागात मैदानावर वनस्पती घनता
कमी आहे. बी-2 या संदर्भ चौकोनाच्या दक्षिणेला ही लहाण 167 मी. उंचीची टेकडी सुध्दा हिरव्या रंगाने
दर्शविलेली असुन तिथे सुध्दा खुले जंगल आहे. या व्यतिरीक्तचा नकाशाचा बहुतेक भाग
हा पिवळया रंगाने दर्शविलेला आहे येथे शेती योग्य जमीन असुन मानवी जलसिंचनाच्या
सोई तसेच गंगा व तिच्या उप-नदयाच्या खोऱ्यांचे सुपीक मैदान या मुळे शेतीचा विकास
झालेला आढळतो. त्यामुळे विखुरलेल्या स्वरुपात वृक्ष आढळतात. पंरतु नैसर्गिक वनस्पतींचा विचार करता
नकाशाच्या दक्षिण भागात त्यांची घनता नकाशात सर्वात जास्त आहे. इतर भागात विखुरलेल्या स्वरुपात वनस्पती आहे
पंरतु त्यांची घनता शेती विकासामुळे तुलनेने कमी आहे.
(प्रात्याक्षिक क्र 7 नकाशा क्र- 2) स्थलनिर्देशक नकाशा क्र 47 E/6 नैसर्गिक वनस्पती जिवन
नकाशा प्रदेश
डोंगराळ असून येथे विस्तृत जंगले आढळतात. ते राखीव व खुल्या जंगलांच्या प्रकारात
समावेश होतो. जास्त उंचीच्या भागात दाट ते जास्त दाट जंगले आहेत. ए-1, ए-2, ए-3 या
संदर्भ चौकोनात मिश्र वने आहेत. नकाशाच्या नैऋत्य भागातही मिश्र वने आहेत.
नकाशातील डोंगररांगाच्या दरम्यानच्या सखल भगात अनेक ठिकाणी विखुरलेले वृक्ष व
खुरटया वनस्पती आढळतात. नकाशाचाजास्तीत जास्त भाग डोंगराळ असल्याने लागवडी खालील क्षेत्र फारसे आढळत नाहीत. ए-1 व
ए-2 या संदर्भ चौकोनात साग वृक्षाचे वनीकरण केलेले आढळते. तर सी-1 व सी-2 संदर्भ चौकोनात खुली अरण्ये दिसत आहेत.