Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Wednesday, 7 August 2024

HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिका जुलै 2024 व नमुना उत्तरे Board Geography Question Paper and Sample Answers

 

 

HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिका जुलै 2024 व नमुना उत्तरे Board Geography Question Paper and Sample Answers






HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिका जुलै 2024 व नमुना उत्तरे Board Geography Question Paper and Sample Answers


सूचना-

1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

 2) प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या आलेख काढावे.

 3) रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.

 4) नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.

 5) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

 6) नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी.


HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिका जुलै 2024 व नमुना उत्तरे Board Geography Question Paper and Sample Answers

 

---------------------------------

---------------------------------

प्रश्न 1. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवा.                 

[20]

 

(अ) '' '' आणि '' स्तंभातील घटकांचे सहसंबंध साखळी पूर्ण कराः   

5

 

1) ग्राहकोपयोगी वस्तू

(क) प्राकृतिक भूगोल

(य) व्यापारी क्षेत्र

2) भूगोल

(ख) आंतरराष्ट्रीय

(र) हवामान शास्त्र

3) स्थलांतर

(ग) औदयोगिक क्षेत्र

(ल) औषध निर्मिती

4) औपचारिक प्रदेश

(घ) वेगळ्या सीमा

(व)भारत ते ऑस्ट्रेलिया

5)नागरी भूमी उपयोजन

(ड)थेट वापरासाठी तयार

(श) राज्य

 

 

(स) वाहन निर्मिती


उत्तर-


1) ग्राहकोपयोगी वस्तू

(ड)थेट वापरासाठी तयार

(ल) औषध निर्मिती

2) भूगोल

(क) प्राकृतिक भूगोल

(र) हवामान शास्त्र

3) स्थलांतर

(ख) आंतरराष्ट्रीय

(व)भारत ते ऑस्ट्रेलिया

4) औपचारिक प्रदेश

(घ) वेगळ्या सीमा

(श) राज्य

5)नागरी भूमी उपयोजन

(ग) औदयोगिक क्षेत्र

(य) व्यापारी क्षेत्र

 

 

(ब) दिलेली विधाने व कारणे यातील अचूक सहसंबंध ओळखा :

5 

(A: विधान    R: कारण)

 

1) A: अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.

     R: लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैदयकीय खर्च वाढतात.

अ) केवळ A बरोबर आहे.   

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

उत्तर- क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे

.

 

 

2) A: नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्ये ही वाढतात.

      R: नगरांना केवळ एकच कार्य असते.

 

अ) केवळ A बरोबर आहे.   

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

 उत्तर- अ) केवळ A बरोबर आहे.   

 

 

3) A: भारतात औदयोगिक उत्पादनात विविधता आढळते.

   R: भारत हा कृषीप्रधान देश आहे.

 

अ) केवळ A बरोबर आहे.   

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

उत्तर- ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

 

 

4) A : लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा परस्परसंबंध आहे.

     R : लोकसंख्येचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो.

 

अ) केवळ A बरोबर आहे.   

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

 

उत्तर- क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

 

 

 

 

 

 

5) A: संगणकाचे ज्ञान हे अतिरिक्त कौशल्य म्हणून भूगोल अभ्यासकाला आवश्यक आहे.

     R: भूगोलामध्ये संगणकीय 'अॅप' चा वापर होत नाही.

 

अ) केवळ A बरोबर आहे.   

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

 

उत्तर- अ) केवळ A बरोबर आहे.   

 

 

 

 

क) चुकीचा घटक ओळखा व लिहा :  

5

 

1) लोकसंख्येचे घटक

अ) वयोरचना

ब) लिंगरचना

क) भूरचना

ड) व्यावसायिक रचना

 

उत्तर- क) भूरचना.   

 

 

 

2) मानवी वस्त्यांचे घरांमधील अंतरानुसार प्रकार-

अ) केंद्रित वस्ती

ब) विखुरलेली वस्ती

क) एकाकी वस्ती

ड) प्रादेशिक वस्ती

 

उत्तर- ड) प्रादेशिक वस्ती

 

 

 

3) मालकीवर आधारित उद्योग -

अ) सहाय्यभूत क्षेत्र

ब) सार्वजनिक क्षेत्र

क) खाजगी क्षेत्र

ड) सहकार क्षेत्र

 

उत्तर- अ) सहाय्यभूत क्षेत्र.   

 

 

 

4) प्रादेशिक विकासाचे मापदंड

अ) साक्षरता

ब) भाषा

क) आर्युमान

ड) लोकसंख्येची गुणवत्ता

 

उत्तर- ब) भाषा.   

 

 

 

 

5) भूगोलाचे अभ्यासक

अ) हेकेट्स

ब) टॉलेमी

क) शेक्सपिअर

ड) स्टॅबो

 

उत्तर- क) शेक्सपिअर.   

 

 

 

 

ड) खालील विधाने 'बरोबर' की 'चूक' ते लिहा :

5

 

1) लोकसंख्येचे वितरण व घनता यांच्यावर स्थलांतराचा परिणाम होतो.

 

उत्तर- हे विधान बरोबर आहे.   

 

 

2) मानव हा समाजशील प्राणी नाही.

 

उत्तर- हे विधान चूक आहे.   

 

 

3) बेकरी उद्योग बाजारपेठेजवळ स्थापन केले जात नाहीत.

 

उत्तर-  हे विधान चूक आहे.   

 

4) तृतीयक व्यवसायात केवळ सेवांचा समावेश असतो.

 

उत्तर- हे विधान बरोबर आहे.   

 

 

5) प्रदेश खूप लहान किंवा खूप मोठे असू शकतात.

 

उत्तर- हे विधान बरोबर आहे.   

 

 

 

 

 

प्रश्न 2. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही चार)

[12]

 

 

1) पर्वतीय प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते,

2) ग्रामीण भागांकडून शहरांकडे स्थलांतर वाढत आहे.

3) मुख्य शहरांलगतची उपनगरे वेगाने विकसित होत आहेत.

4) दक्षिण अमेरिकेत उ‌द्योगांचा विकास मर्यादित आहे.

5) हवाई वाहतुकीच्या वापराचे प्रमाण वाढत आहे.

6) निरक्षरता व दारिद्रय हे घटक प्रादेशिक विकासावर परिणाम करतात.

 

 

 

प्रश्न 3. खालील फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन):   

[9]

 

1) त्रिकोणी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती

2) विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा

3) ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्युदर

4) मोठे उद्योग आणि कुटीर उद्योग

5) मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल

 

 

प्रश्न 4. (अ) दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा (कोणतेही सहा):    6               

 [11]

 

 

1) जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश.

2) भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाकाय नगर.

3) आशियातील सर्वाधिक आयुर्मान असणारा देश.

4) संयुक्त संस्थानांतील गवताळ प्रदेश.

5) दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील प्रमुख औद्योगिक देश.

6) युरोप, आफ्रिका व आशिया खंडांना जोडणारा कालवा.

7) आफ्रिकेतील सर्वात मोठे वाळवंट.

(8) उत्तर अटलांटिक महासागरातील कमी लोकसंख्येचे बर्फाच्छादित बेट.

 

 

(ब) दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा  

5


प्रश्न :

1 )युरोप खंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते ?

2) दिलेल्या नकाशातील कोणता लोहमार्ग दोन खंडांना जोडतो?

3) कोणत्या खंडात कायमस्वरूपी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत?

4) कोणता कालवा पॅसिफिक व अटलांटिक महासागरांना जोडतो?

5) आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव सांगा?

  ------------------------------------

प्रश्न 5. खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा (कोणत्याही तीन) :

12

 

1) स्थलांतरित शेती.

2) कच्च्या मालावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण.

3) संदेशवहनाची साधने व त्यांचे महत्त्व.

4) भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे.

5) भूगोलातील आधुनिक कल,

  ------------------------------------

प्रश्न 6. (अ) खालील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा :  (4)

[8]

 

 

खाणकाम: खनिजांचा वापर

 

मानव खनिजांचा वापर प्राचीन काळापासून करत आला आहे. हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जात असे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पेही त्याच्या खनिज वापराशी निगडित आहेत. पाषाणयुगाच्या शेवटच्या टप्प्यावर मानवाने खनिजांच्या वापर करण्याचे कौशल्य आत्मसात केले. खनिजांच्या वापरानुसार

अनुक्रमे कांस्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग हे कालखंड अधोरेखित करण्यात आले.

मानवाने समुद्र आणि महासागरांच्या तळातूनसुद्धा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

भूकवचात सापडणारी खनिजे मानव निर्माण करू शकत नाही. पृथ्वीवर खनिजांचे वितरण असमान आहे. त्यामुळे खाणकाम व्यवसाय पूर्णपणे खनिजांच्या उपलब्धतेवरच अवलंबून असतो. या व्यवसायाच्या विकासाचा अक्षांशाशी थेट संबंध नसतो. एखादया ठिकाणी खनिजांची उपलब्धता असली तरीही प्रत्यक्षात खाणकाम व्यवसाय त्या प्रदेशाची भूगर्भरचना, खनिजांचे मूल्य, हवामान, भांडवल गुंतवणूक, तंत्र, कुशल मजूर पुरवठा इ. घटकांवर अवलंबून असतो. यांत्रिकीकरणामुळे हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे.

 

प्रश्न :

1) मानवाने समुद्र व महासागरांच्या तळातून कोणती खनिज उत्पादने घेतली आहेत?

2) प्राचीन काळापासून मानव खनिजांचा वापर कशासाठी करत आहे?

3) खाणकाम व्यवसाय कोणत्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे?

(4) खाणकाम व्यवसाय हा अक्षांशाशी थेट संबंधित का नाही?

 

 

( ब) सुबक आकृती काढून नावे दया (कोणतेही दोन):  

 4

 

1) प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी सार्वजनिक वस्तूंची / सेवांची तरतूद. 2) लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील पहिला व दुसरा टप्पा.

3) भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगांचे वर्गीकरण.

 

 ------------------------------------

प्रश्न 7. सविस्तर उत्तरे लिहा (कोणताही एक) : 

8

1) लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक उदाहरणांसह स्पष्ट करा.

 

2) प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय हे सांगून प्राथमिक आर्थिक क्रियांचे प्रकार स्पष्ट करा.

 

-------------------------------------------------------------------------

HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिका जुलै 2024 व नमुना उत्तरे Board Geography Question Paper and Sample Answers


Contact- 9421680541

---------------------------------

HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिका जुलै 2024 व नमुना उत्तरे Board Geography Question Paper and Sample Answers



---------------------------------------------------------------------------
------------------------------------------------

 हे वाचा- 


1 comment: