भूकंप प्रक्रीया, भूकंप छायेचा प्रदेश, मर्केली व रिश्टर प्रमाण, भूकंप निर्मितीची कारणे व भूकंप प्रवण क्षेत्रांचे वर्गीकरण
शीघ्रहालचाली- दोन प्रकार पडतात.
① भूकंप ② ज्वालामुखी
1) भूकंप
अंतर्गत हालचालींमुळे भूकवचातील खडकांमध्ये प्रचंड ताण
निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यास, तो भूकवचातच मोकळा होतो, ताण
ज्या ठिकाणी मोकळा होतो तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात या
उर्जालहरींमुळे भूकवच कंप पावते यालाच ‘भूकंप’ म्हणतात.
# भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतरंगात सर्वच भागात पोहचत नाही. भूकंप केंद्रापासून 1050 ते 1400 च्या
दरम्यान भूकंप लहरी पोहचू शकत नाही.
●भूकंप छायेचा प्रदेश- भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंपमापन केंद्रातही भूकंपलहरींची नोंद
मिळते, असे
असले तरी काही विशिष्ट क्षेत्रात लहरींची नोंद होत नाही अशा प्रदेशास भूकंपछायेचा प्रदेश म्हणतात.
i) भूकंप लहरीचे प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी व भूपृष्ठ लहरी असे तीन प्रकार आहेत. पैकी प्राथमिक लहरी, व दुय्यम लहरी या पृथ्वींच्या अंतरंगात प्रवास करतात.
ii) प्राथमिक लहरी अंतरंगातील सर्व माध्यमातुन प्रवास करतात तर दुय्यम लहरी फक्त घनरुप माध्यमातुनच प्रवास करु शकतात.
iii) भूकंपाच्या वेळी भूकंपाच्या अपिकेंद्रापासून 1050 अंतरापर्यंन्त दोन्ही लहरी प्रवास करीत असतात. व त्यांच्या नोंदी भूकंपमापन केंद्रात होत असतात
iv) 1050 वर द्रवरुप पदार्थाच्या सानिध्यात आल्याने प्राथमिक लहरींचे वक्रीभवन होते. तर दुय्यम लहरी द्रवरुप पदार्थात शोषल्या जातात. त्यापुढे दुय्यम लहरींची भूकंपमापन केंद्रात नोंद होत नाही.
v)वक्रीभवनामुळे प्राथमिक लहरी पुन्हा 1400 च्या पलीकडे असलेल्या भूकंपमापन केंद्रात नोंदविल्या जातात.
vi) प्राथमिक व दुय्यम या दोन्ही लहरींची अपिकेंद्रापासुन 1050 ते 1400 दरम्यानच्या प्रदेशात भूकंपमापन केंद्रात नोंद होत नाही. म्हणजेच हा प्रदेश दोन्ही लहरीसाठी भूकंपछायेचा प्रदेश म्हणुन ओळखला जातो.
vii) भूकंपकेंद्राच्या 1400 च्या पुढे फक्त प्राथमिक लहरींची नोंद होते. मात्र 1050 च्या पुढे दुय्यम लहरींची नोंद होत नाही. म्हणजेच प्राथमिक लहरीं पेक्षा दुय्यम लहरींचा भूकंप छायेचा प्रदेशाचा विस्तार जास्त असतो
# भूपृष्ठ लहरींना भूकंप छायेचा प्रदेश नसतो- भूपृष्ठ लहरी
(L) भूपष्ठाच्या खालुन आडव्या दिशेने प्रवास करतात. त्या पृथ्वीच्या
अंतरंगात प्रवास करीत नाही. म्हणुन त्यांची भूकंपमापीत यत्रांत नोंद होत नाही
त्यामुळे भूपृष्ठ लहरींना भूकंप छायेचा प्रदेश नसतो असे म्हटले जाते. त्यामूळे
आकृती 1.10 मध्ये भूकंपलहरींचा प्रदेश
दर्शविलेला नाही. आकृती 1.10 मध्ये ‘अ’ हा
बिंदूवर प्राथमिक व दुय्यम लहरी पोहचू
शकतात. तर ‘ब’ बिंदू भूकंप केंद्रापासून 1050
ते 1400 च्या दरम्यान
असल्याने तो भूकंपछायेच्या प्रदेशात येतो. तसेच ‘क’ बिंदू हा भूकंप केंद्राच्या
1400 च्या पुढील भागात येत असल्याने तेथे फक्त प्राथमिक लहरी पोहचतील.
● भूकंपाची तीव्रता / महत्ता –
मर्केली प्रमाण |
रिश्टर प्रमाण |
1) मर्केली प्रमाण हे भूकंपांची तीव्रता दर्शविते. |
1) रिश्टर प्रमाण हे भूकंपाची महत्ता (Magnitude) / उत्सर्जित होणारी
ऊर्जा दर्शविते |
2) मर्केली परिमाण हे रेषीय आहे. |
2) रिश्टर परिमाण लागीय मापन श्रेणीत असते |
3) मर्केली प्रमाणाचे मापन तंत्र हे निरीक्षण आहे |
3) रिश्टरप्रमाणाचे मापन यंत्राव्दारे होते |
4) या प्रमाणाव्दारे भूपृष्ठ, मानव निर्मित घटक व वास्तू यांवर होणाऱ्या परिणामांचे
संख्यात्मक निरीक्षण केले जाते |
4) या प्रमाणाव्दारे भूकंप लहरींतील ऊर्जेचे लागीय मापन केले जाते |
5) या प्रमाणात तीव्रता I ते XII या
एककात मोजली जाते |
5) या प्रमाणात तीव्रता 2.0 ते 10.0 या एककात मोजली जाते |
● भूकंप निर्मितीची
कारणे- भूकंपाची निर्मिती
प्रामुख्याने भूकवचातील उर्जा मुक्त झाल्यामुळे होते. उर्जामुक्तीची / भूकंपाची
कारणे पुढील प्रमाणे.
B) भूविवर्तनकी हालचाल- बाह्य
प्रावणावरील जास्त घनतेच्या भागावर लहान मोठे भूपट्ट तरंगत असुन ते स्थिर नाही.
दोन वेगवेगळया आकाराच्या जवळच्या भूपट्टांच्या सिमावर्ती भागातील हालचालींमुळे
घर्षण होऊन भूकंप होतो. (भूपट्टांच्या हालचाली म्हणजे- भूपट्टसरकणे, एकमेंकावर आदळणे, एक-दुसऱ्याखाली
जाणे) उदा.
भारतातील उत्तर काशी व आसाम मधील भूकंप प्रक्रिया. या प्रक्रियेमुळे भारतातील
हिमालय पर्वताचा भाग अस्थिर आहे. हिमालयीन भूकंप क्षेत्र भूकंपप्रवण प्रदेश आहे.
येथे भूकंपाची संवेदना जास्त आहे. म्हणूनच हिमालय पर्वतातील लोक भूकंपाला अधिक
संवेदनशील आहेत उदा. इंडोनेशिया, चिली मधील भूकंप
C) मानव निर्मित भूकंप- आण्विक
स्फोट, मोठया प्रमाणावरील खोदकाम, सुरुगांचा वापर, अणु-चाचण्या, बांधकामे व खाणकाम
या मानवी क्रियांमुळे देखील भुकंपाची निर्मिती होते. परंतु त्यांचे परिणाम स्थानिक
असतात.
भारतातील
भूकंप प्रवण क्षेत्रांचे वर्गीकरण-
प्रदेश |
जोखमीची
पातळी |
केंद्रशासित
प्रदेश /राज्य |
|
1 |
अतिशय कमी |
मध्य कर्नाटक, मध्य महाराष्ट्र इ. |
राज्यांची
किंवा ठिकाणांची यादी वाढविता येईल. |
2 |
कमी |
पुर्व राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, MP
इ. |
|
3 |
मध्यम |
मध्य राज्स्थान पश्चिम महाराष्ट्र, केरळ, गोवा,
इ. |
|
4 |
उच्च |
उत्तराखंड, बिहार, जम्मु कश्मीर, दिल्ली, सिक्कीम
इ. |
|
5 |
अति उच्च् |
अंदमान निकोबार बेटे, आसाम, पश्चिम गुजरात,
मणिपुर इ. |