Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Thursday, 8 July 2021

प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका 20 गुण - (2) Geography Practical Question Paper

 प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका 20 गुण - (2)

प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका 20 गुण - (2)  Geography Practical Question Paper

--------------------------------

बारावी भूगोल प्रात्यक्षिक सराव

 प्रश्नपत्रिका 20 गुण

विषय- भूगोल (39)

प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका नमुना आराखडा

वेळ- 3.00 तास

गुण -20

-----------------------------------------------------------

प्रश्न 1)  “Balbharati GeoSurvey” या ॲपच्या सहाय्याने सर्वेक्षण करणे

( विदयार्थ्यांनी केलेल्या 15 कुटूंबांचे सर्वेक्षणाचे संकलन, विश्लेषण व नकाशा शिक्षकांना सादर करुन भूगोल प्रात्यक्षिक वहीत त्याचा समावेश करणे.)  (5 गुण)

 

प्रश्न 2 अ)  खालील सांख्यिकीय माहीती (विदा) सारणीच्या अनुशंगाने 05 चे वर्गांतर घेऊन माहिती सुसंघटीत करा.  (प्रात्यक्षिक क्रमांक 02 विदा संघटन यावर आधारीत प्रश्न)    (2 गुण)


      23, 35, 40, 31, 23, 26, 39, 23, 25, 39, 27, 35, 30, 21, 30, 43, 34, 25, 29, 33

 


प्रश्न 2 आ) खालील आकडेवारी काही शेतकऱ्यांचे भू-धारण क्षेत्र दर्शविते त्या आधारे प्रमाण विचलन काढा व उत्तराचे विवेचन करा.       (4 गुण)



शेतकरी

भू-धारण क्षेत्र (हेक्टर)

1

10

2

15

3

9

4

14

5

7

6

9

7

16

8

12

9

9

10

17

 

 

किंवा


प्रश्न 2 आ) ‍विदा विशलेषण- खालील तक्त्यात काही नागरी प्रदेशातील लोकसंख्या व साक्षरतेचे प्रमाण दिलेले आहे त्या आधारे स्पियरमन गुणांक सहसंबंध पध्दतीचा वापर करुन सहसंबध काढा व उत्तराचे विवेचन करा.    (4 गुण)



प्रदेश

A

B

C

D

E

F

G

H

I

J

नागरी लोकसंख्या %

38

47

5

12

9

60

35

15

22

18

साक्षरतेचे प्रमाण

48

45

12

13

10

73

29

36

14

20

 



प्रश्न 3 रा  दिलेल्या सांख्यिकीय माहीतीच्या आधारे विभाजीत वर्तुळ काढा.    (3 गुण) 


भूमी उपयोजन

भूमीची टक्केवारी

निवासी

52

व्यावसासिक

15

औदयोगिक

8

शेती

2

मोकळी जागा

5

संमिश्र

18

एकूण

100

 

 

 

 

                             

 

                                        


  किंवा 



प्रश्न 3 रा  खालील सांख्यिकीय माहिती विभाजित आयताच्या साहाय्याने दर्शवा.  (3 गुण) 



  वयोगट Age Group

पुरुष संख्या

No. of Males

स्त्र‍िया संख्या

No. of females

0-14

186087665

164398204

15-24

121879786

107583437

25-54

271744709

254834569

55-64

47846122

47632532

65+

37837801

42091086

एकूण Total 

665396083

616539828

 

 

प्रश्न 4 था) स्थलनिर्देशक नकाशा 63 K-12 वर आधारित प्रश्नांचे थोडक्यात विश्लेषण करा. ( कोणतेही चार )     (4 गुण)


    1) नकाशातील दोन प्रमुख लोहमार्ग कोणते

    2) नकाशातील चार प्रमुख लोहमार्ग स्थानके कोणती ?

    3) गंगा नदीच्या उत्तरेस असलेल्या बाजारपेठा असलेली दोन चिन्हांचा त्यान शहरेकोणती

    4) नकाशाच्या वायव्य भागात कोणते शहर वसले आहे

    5) नावेतून वाहतूक हा व्यवसाय होईल का? असल्यास कोणत्या प्रकारचा ?

 


प्रश्न 5 वा मौखिक परीक्षा व प्रात्यक्षिक कार्य. (02 गुण) 





प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका 20 गुण - (2)

प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका 20 गुण - (2)  Geography Practical Question Paper

---------------------------------------------------












प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका 20 गुण - (2)  Geography Practical Question Paper



प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका 20 गुण - (2)

https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/11/xii-geography-practical-book-journal.html




अधिक माहीती करीता खालील हेडींगवर किंवा लिंक वर क्लिक करा






बारावी भूगोल प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका 20 गुण - 1 Geography Practical Question Paper

  




बारावी भूगोल प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका खालील पोपटीरंगाच्या लिंकवर क्लिक करुन पहा व ओपन झाल्यावर वरच्या भागातील बाणावर क्लिक करुन डाऊनलोड करा.  


https://drive.google.com/file/d/1EAJ6W6rj_okUYc0ZcQyj6R7scdcRFATj/view?usp=sharing










बारावी भूगोल प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका खालील पोपटीरंगाच्या लिंकवर क्लिक करुन पहा व ओपन झाल्यावर वरच्या भागातील बाणावर क्लिक करुन डाऊनलोड करा. 


https://drive.google.com/file/d/1EAJ6W6rj_okUYc0ZcQyj6R7scdcRFATj/view?usp=sharing









 


Thursday, 24 June 2021

बारावी भूगोल चूक की बरोबर ते सांगा

 



चूक की बरोबर ते सांगा 

 

1 ऑस्ट्रेलिया खंडात कायम निवासी लोकसंख्या सर्वात कमी आहे-  

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

आशिया खंडाची खंडांतर्गत भूमिची टक्केवारी सर्वात कमी आहे-

उत्तर- हे विधान चूक आहे

 

अंटार्टिका खंडावर लोकसंख्येची घनता दाट आहे

उत्तर- हे विधान चूक आहे

 

विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये लोकसंख्येची घनता अतिशय कमी आढळते  

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

तिबेटच्या पठारावर लोकसंख्या घनता अधिक आहे

उत्तर- हे विधान चूक आहे

 

 

ध्रुवीय प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त आढळते

उत्तर- हे विधान चूक आहे

 

 

स्थलांतरामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

नागरी भागाकडे लोकसंख्येच्या स्थलांतराचे प्रमाण अधिक आढळते

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

9 प्रदेशाची स्वयम् स्वयंपूर्णता स्थलांतरामुळे संपुष्टात येते

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

10 लोकसंख्येतील साक्षरता प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

11  लोकसंख्येच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून ग्रामीण व शहरी असे दोन वर्ग करता येतात

 उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

12 मानव हा समाजशील प्राणी असल्याने तो नेहमी समूहाने राहणे पसंत करतो

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

13  एका केंद्राच्या भोवती केंद्रीय वस्तीचा विकास होतो.

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

14  दोन नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्रकाठी चौकोनी वस्त्या आढळतात

उत्तर- हे विधान चूक आहे

 

 

15  ग्रामीण व नागरी क्षेत्रांमधील भूमीस ग्रामीण नागरी झालरक्षेत्र असे म्हणतात

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

16  दक्षिण आफ्रिकेच्या कल्हरी वाळवंटातील बुशमेन आदिवासी जमाती त्यांच्या चरितार्थासाठी शिकार करतात

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

17  उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांचे लाकूड अतिशय मऊ असते

उत्तर- हे विधान चूक आहे

 

 

18  सूचिपर्णी वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेले असतात.

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

19  जपान आणि चीन सारख्या काही देशांमध्ये मासेमारीचे पारंपारिक कौशल्य उच्च दर्जाचे आहे

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

20  शेती खालील प्रदेश आणि पशुपालन यांचे वितरण बऱ्याच प्रदेशात एकत्रित आढळून येत नाही

उत्तर- हे विधान चूक आहे

 

 

21  मानवाने समुद्र व महासागराच्या तळातून सुद्धा तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे 

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

22 शेती या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण आफ्रिका खंडात जास्त आहे

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

23  उद्योगांचे वर्गीकरण आकारकच्च्या मालाचे स्त्रोतउत्पादनाचे स्वरूप आणि मालकी या आधारे केले जाते

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

24  तृतीय आर्थिक व्यवसायात प्राथमिक व्यवसाय प्रमाणे निसर्गातून जसेच्या तसे उत्पादन घेतले जाते

उत्तर- हे विधान चूक आहे

 

 

25 व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाण-घेवाण होय

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

26  आंतरराष्ट्रीय व्यापार चालणे किंवा बंद होणे हे शासन धोरणावर अवलंबून असते

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

27  पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक आर्थिक व्यवसाय आहे

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

28  समान गुणधर्माच्या आधारे सदर प्रदेशाची श्रेणीबद्ध उतरंड करता येते

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

29 भौगोलिक घटकांचा वाहतुकीवर व व्यापारावर परिणाम होतो

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

30  मेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर उद्योगांचा विकास कमी झाला आहे

उत्तर- हे विधान चूक आहे

 

 

31  निरक्षरता, दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

 

 

32  गायरान किंवा कायम चराऊ जमीन ही प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते

उत्तर- हे विधान बरोबर आहे.