अकरावी प्रथम नमुना सराव
प्रश्नपत्रिका क्र- 2
गुण-  50
वेळ 2.30 तास
सुचना-  1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
2)
प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या /आलेख काढा.
3) रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
4) योग्य तेथे नकाशा स्टेंसिलचा वापर करावा.
5) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
6) आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस
जोडावी
प्रश्न 1 ला  अ) साखळी पूर्ण करा. गुण ( गुण 4)
ब) पुढील विधाने
दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा  ( गुण 3)
1) पुढील जीवसंहतीचा विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे असा क्रम लावा 
अ) टुंड्रा
ब) विषुववृत्तीय वने 
क) बोरियल 
ड) वाळवंट
२) नदीच्या उगम क्षेत्रापासून ते मुखापर्यंत तयार होणाऱ्या भूरूपांचा क्रम.
अ) धबधवा 
ब) नागमोडी वळण  
क) त्रिभुज प्रदेश 
ड) रांजण खळगे 
३) सागरमध्य ते सागर किनाऱ्यापर्यंत आढळणाच्या भूरूपांचा योग्य क्रम लावा.
अ) पुळण 
ब) भुखंड मंच 
क) सागरी गर्ता 
ड) खंडान्त उतार
क) चूकीचा घटक ओळखा ( गुण 3)
१) विदारणावर परिणाम करणारे घटक
अ) दाब 
ब) तापमान 
क) उतार 
ड) पर्जन्य
२) जागतिक तापमान वाढीचे परिणाम
अ) सागर पातळीत वाढ  
ब) हिमनद्या वितळणे 
क) कमाल किमान तापमानात वाढ 
ड) पीक उत्पादनात वाढ
३) हिंदी महासागरातील सागरी प्रवाह
अ) मोझांबिक प्रवाह 
ब) अगुल्हास प्रवाह 
क) आस्ट्रेलियन प्रवाह 
ड) बैग्वेला प्रवाह,
ड) खालील
विधानातील विधान व कारणांचा अचूक सहसंबंध ओळखा. ( गुण 3) 
   
  A : विधान,   R : कारण
1) A : भूकंपामुळे जमिनीला हादरे
बसतात. 
    R: ज्वालामुखीमुळे भृपृष्ठावर उष्ण पदार्थ बाहेर फेकले जातात.
अ) केवळ A बरोबर 
ब) केवळ R बरोबर
क) A आणि R  दोन्ही बरोबर आहेत. आणि R हे A चे अचूक
स्पष्टिकरण आहे. 
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत. आणि
दोन्ही R हे A चे अचूक स्पष्टिकरण नाही.
2) A :  विभंगामुळे वली पर्वताची निर्मिती होते, निर्माणकारी बलांमुळे
विभंग निर्माण होतो,
    R: एकमेकांविरुद्ध दिशेने ताण
अ) केवळ A बरोबर 
ब) केवळ R बरोबर
क) A आणि R  दोन्ही बरोबर आहेत. आणि R हे A चे अचूक
स्पष्टिकरण आहे. 
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत. आणि
दोन्ही R हे A चे अचूक स्पष्टिकरण नाही.
३) A : पृष्ठीय जल मातलोट क्रियेस सहाय्य करते.
    R:  भूजल पातळी ही त्यास
कारणीभूत करते. 
अ) केवळ A बरोबर 
ब) केवळ R बरोबर
क) A आणि R  दोन्ही बरोबर आहेत. आणि R हे A चे अचूक
स्पष्टिकरण आहे. 
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत. आणि
दोन्ही R हे A चे अचूक स्पष्टिकरण नाही
प्रश्न २ रा) भौगोलिक कारणे लिहा.
(कोणतेही तिन) ( गुण 9)
1) विषृववृत्तीय प्रदेशात वर्षभर एकच ऋतू आढळतो.
2) वाळवंटी जीवलंहतीत काटेरी वनस्पती आढळतात.
3) मानव हा विदारणाचा एक कारक आहे.
4) भूपृष्ठ लहरींना भूकंपछाया प्रदेश नसतो. 
5) वळया ह्या खडकांची ताकद आणि बलाच्या
तीव्रतेवर अवलंबून असतात. 
प्रश्न 3 ) फरक स्पष्ट करा. (कोणतेही
तीन) ( गुण 9)
1) उपनदया आणि वितरीका
2) सममित वली आणि असममित वली
3) कायिक विदारण आणि रासायनिक विदारण
4) मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली
5) विषृववृत्तीय प्रदेश आणि मौसमी हवामान प्रदेश
प्रश्न 4) नकाशात पुढील घटक योग्य चिन्हे
व सुचीव्दारे दर्शवा (कोणतेही पाच)  ( गुण 5)
१) फुजी जागृत ज्वालामुखी 
2) डोंगर बॅक क्षेत्र 
3) हिमालय भूकंप क्षेत्र
4) दक्षिण अमेरिकेतील वाळवंटी प्रदेश
5) भूमध्य सागर
6) कतार खळग्याचा देश ( इजिप्त)
7) टुंड्रा प्रदेश
प्रश्न 5 वा ) टिपा लिहा. (कोणतेही
दोन)  ( गुण 8)
1) नदीचे संचयन कार्य 
2) गट पर्वत व खचदरी
3) वाळवंटी हवामान प्रदेश
प्रश्न 6 वा ) खालील उतारा वाचून
दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा,  ( गुण 4)
पृथ्वीवरील सरासरी तापमानात वाढ होत आहे. वातावरणात कॉर्बनडाय ऑक्याईडवायू चे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. सूर्याकडून येणारे अतिनील किरण हे सजीवांच्या दृष्टीने घातक आहेत. या अतिनील किरणांपासून सजीवांचे रक्षण करणारे सुरक्षाकवच म्हणजे वातावरणातील ओझोन वायूचा थर अतिनील किरणांना शोषून घेऊ शकणाऱ्या या ओझोनची निर्मिती पृथ्वीच्या पृष्ठभागांपासून शकणाऱ्या या ओझोनची निर्मिती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दहा किलोमीटर ते पन्नास किलोमोटर उंचीवर असणाऱ्या स्थिरावरणात म्हणजे स्थितांबर होते. वातावरणातील ओझोनचे प्रमाण मोजण्यासाठी साधारणपणे वर्णपट मापकाचा वापर केला जातो.
दक्षिण ध्रुवावरच्या वातावरणातील विस्तृत भागावरील ओझोनचे प्रमाण घटले असल्याचे स्पष्ट झाले. वातावरणाचा हा भाग तेव्हापासून ओझोनचे छिद्र म्हणून ओळखला जाऊ लागला
प्रश्न- 
1) वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण वाढत आहे?
2) ओझोनचे छिद्र ही संज्ञा स्पष्ट करा. ? 
3) ओझोन मानवी जीवनास कसा उपयुक्त आहे. 
4) ओझोन वायू मोजण्याचे मापक कोणते?
ब) खालील घटकाची सुबक आकृती काढून भागांना नावे दया. (कोणतीही एक) ( गुण 2)
1) कातर विभंग
2)  भूछत्र खडक
उत्तरांसाठी खालील नोट्स चा आधार घ्या.
contact- 9421680541 9403386299
खालील हेंडींगवर क्लिक करुन अधिक माहिती मिळवा
अकरावी प्रथमसत्र प्रश्नपत्रिका गुण 50 सरावी चाचणी क्रमांक- 1 ( PDF )
अकरावी प्रथमसत्र प्रश्नपत्रिका
गुण 50 सरावी चाचणी क्रमांक- 2 ( PDF )
