प्रात्याक्षिक क्र 5 (नकाशा
क्र- 2) स्थलनिर्देशक नकाशा क्र 47 E/6-
भूउठाव
प्रस्तुत नकाशा हा डोंगराळ
प्रदेशाचा आहे. व या नकाशातील सर्वात उंच ठिकाण 608
मीटर उंचीचे असुन ते नकाशाच्या नैऋत्यदिशेला ए-3 संदर्भ
चौकोनात आहे. तर सी-1 चौकानात 581 मिटर उंचीचे ठिकाण
आहे. नकाशातील प्रदेशाची उंची 80 मीटर
ते 650 मीटर च्या दरम्यान आहे. कमीत कमी उंची
ही ए-3 या
संदर्भ चौकोनात आहे. या नकाशा प्रदेशात पूर्वेच्या तुलनेत पश्चीमेची
उंची कमी आहे म्हणजेच प्रदेशात उतार हा
पर्वेकडून पश्चीमेकडे आहे. नदया/नाले ही पूर्वेकडून पश्चीमेकडे वाहत आहे. तसेच अग्नेय कोपऱ्यातील प्रदेशाची उंची दक्षिणेकडे कमी होत
आहे. त्यामूळे सी -3 या संदर्भ चौकानात दिसत असलेल्या नदया/नाले दक्षिणेकडे वाहत
आहेत असे म्हणता येईल. नकाशात दिसत असलेले गिरी शिखराकडील समोच्च रेषा जवळ जवळ
असल्याने त्या तीव्र उतार दर्शवितात. तर नकाशातदिसणारा सखल भागात समोच्चता रेषा या
ऐकमेकांपासून लांब अंतरावर आहेत. नकाशात 512 मी, 504 ते 508 मी. उचीं दर्शक आकडे
दिसत असुन सदर भाग हा पेलंजी पठाराचा आहे ते सी-1 या संदर्भ चौकोनात आहे. याच
संदर्भ चौकोनात खडकाळ स्वरुपाची जमीन दिसत आहे.
(प्रात्याक्षिक क्र 6 नकाशा क्र- 2) स्थलनिर्देशक नकाशा क्र 47 E/6 जलप्रणाली
नकाशा प्रदेश
डोंगराळ असून प्रस्तृत नकाशात जलाशये निळया रंगाने दर्शविलेले आढळतात. या नकाशातील
जलप्रणाली वृक्षाकार असुन या नकाशात वैतरणा व तानसा या दोन प्रमुख नदया आढळून येत
आहेत. याठिकाणी डोंगराळ भाग असल्याने अनेक जलविभाजक आढळतात. डोंगररांगा मुळे
प्रमुख दोन्ही नदया वैतरणा व तानसा या दोन्ही नदयांची खोरी वेगळी झालेली दिसतात.
वैतरणा नदी
नकाशाच्या ईशान्य भागातून वाहत येत अनेक वळणे घेतांना दिसत आहे. वैतारणा नदीस
पूर्वेकडून भामा ही हगांमी नदी, केंगरी हंगामी नदी, उत्तरे कडून हातनी नदी तसेच डोंगराळ भागातुन वाहत येणारे इतरही प्रवाळ
येवुनमिळतांना दिसत आहेत.
तानसा नदीस बी-2
या संदर्भ चौकोनातुन उगम पावतांना दिसत असुन ए-2 संदर्भ चौकोनातील तळवाडा ही
हंगामी नदी तिला उत्तर दिशेकडून येवुन मिळते. या तानसा नदीवर तानसा बारमाही धरण
बांधलेले आहे. अहमदनगर जिल्हा
(प्रात्याक्षिक क्र 7 नकाशा क्र- 2) स्थलनिर्देशक नकाशा क्र 47 E/6 नैसर्गिक वनस्पती जिवन
नकाशा प्रदेश
डोंगराळ असून येथे विस्तृत जंगले आढळतात. ते राखीव व खुल्या जंगलांच्या प्रकारात
समावेश होतो. जास्त उंचीच्या भागात दाट ते जास्त दाट जंगले आहेत. ए-1, ए-2, ए-3 या
संदर्भ चौकोनात मिश्र वने आहेत. नकाशाच्या नैऋत्य भागातही मिश्र वने आहेत.
नकाशातील डोंगररांगाच्या दरम्यानच्या सखल भगात अनेक ठिकाणी विखुरलेले वृक्ष व
खुरटया वनस्पती आढळतात. नकाशाचाजास्तीत जास्त भाग डोंगराळ असल्याने लागवडी खालील क्षेत्र फारसे आढळत नाहीत. ए-1 व
ए-2 या संदर्भ चौकोनात साग वृक्षाचे वनीकरण केलेले आढळते. तर सी-1 व सी-2 संदर्भ चौकोनात खुली अरण्ये दिसत आहेत.