लिंगरचना
स्त्री व
पुरुषांच्या लोकसंख्येतील प्रमाणाला लिंग गुणोत्तर म्हणतात. ते दर हजार
पुरूषांमागे स्त्रियांचे असलेले प्रमाण या वरुन ठरवीले जाते भारतात
लिंगगुणोत्तर खालील सूत्राच्या सहारूय्याने काढले जाते.
लिंग गुणोत्तराच्या आधारे देशातील किंवा प्रदेशातील स्त्रियांचे पुरुषांच्या तुलनेतील प्रमाण काढता येते. जगाचे सर्वसाधारण लिंग गुणोत्तराचे प्रमाण दरहजारी 990 स्त्रिया आहे. म्हणजेच जागतिक स्तरावर 1000 पुरुषांमागे 990 स्त्रिया आहेत.
·
जास्त लिंग गुणोत्तर असलेले देश- लाटविया, इस्टोनिया, रशिया व
युक्रेन या देशांचे लिंग गुणोत्तर 1162 आहे.
·
कमी लिंग गुणोत्तर असलेले देश- संयुक्त अरब अमिरात (667), चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, अफगणिस्तान. थोडक्यात आशिया खंडाचे लिंग
गुणोत्तर प्रमाण कमी आहे.
# भारताचे सन 2011 च्या जनगणने नुसार लिंग-गुणोत्तर 927 इतके
आहे.
लोकसंख्येचा लाभांश.
खालील तक्त्याचे
वाचन करून प्रश्नांची उत्त्रे लिहा.
तक्ता क्र. 2.1 भारत लोकसंख्येचा लाभांश.
दशक |
कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर |
कार्यशील लोकसंख्येची
टक्केवारी. |
स्तंभ 1 |
स्तंभ 2 |
स्तंभ 3 |
2001 - 10 |
1.33 : 1 |
57.1 |
2011 - 20 |
1.53 : 1 |
60.5 |
2021 – 30* |
1.81 : 1 |
64.4 |
2031 – 40* |
1.72 : 1 |
63.2 |
1)
तक्त्यातून कोणती माहिती मिळत आहे ?
उत्तर- तक्त्यातून
भारतातील दशकनिहाय कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर व कार्यशील
लोकसंख्येची टक्केवारी (भारतीय लोकसंख्येचा लाभांश) यांची माहिती मिळत आहे. (सन- 2021 च्या पुढील
माहीती अंदाजित आहे)
2) दुस-या व तिस-या स्तंभांचा सहसंबध काय ?
उत्तर- दुस-या स्तंभात कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे
गुणोत्तरातील धनात्मक सहसंबध दिसत असुन, त्या अनुशंगाने त्यातील कार्यशील
लोकसंखेचा हिस्सा किती टक्के आहे ते तिसऱ्या स्तंभातुन लक्षात येते.
3) या सहसंबधाचा
भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो ?
उत्तर- भारतात कार्यशील
लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्याने. भारताच्या आर्थिक विकासात वाढ होत आहे.
4) उपरोक्त प्रमाण पुढील दशकात कमी झाल्यास काय होईल ?
उत्तर- भारतात पुढील दशकात कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी कमी झाल्यास, अवलंबित्वाचे प्रमाण
वाढून, देशाच्या आर्थिक विकासावर ऋणात्मक परिणाम होईल.
लाभांश
म्हणजे एखादया व्यवसायातील भागधारकांना मिळालेला नफ्याचा लाभ होय. यात नफ्याचे
भागधारकांमध्ये होणारे वाटप अभिप्रेत असते. तर लोकसंख्या लाभांश म्हणजे “एखादया देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे
त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ होय.”
हा लोकसंख्येतील बदल प्रामुख्याने जन्मदर व मृत्युदर कमी झाल्याने होत
असतो. जन्मदर कमी झाल्यामुळे लहान बालकांची संख्या म्हणजेच अवलंबित्वाची संख्या
कार्यशील लोकसंख्येच्या तुलनेत कमी असते.
प्रत्येक देशात कार्यशील व अवलंबित
लोकसंख्या असते, त्यांच्या गुणोत्तरावरुन तो देश आर्थिकदृष्टया किती क्रियाशील
आहे ते ठरवता येते.
देशात कार्यशील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास ते गतीशील,
उत्पादक व कार्यक्षम असल्याने विविध संशोधने, उत्पादने, उदयोग, व्यवसाय व सेवा यात
त्यांचा सहभाग वाढतो त्यामुळे देशाच्या आर्थिक क्रियांत वाढ होऊन त्याचा अर्थव्यवस्थेवर
चांगला परिणाम होतो. व्यवसांची वाढ झाल्याने देशाची आर्थिक स्थिती सुधारते, देशाचे
दरडोई उत्पन्न व राष्ट्रीय स्थूल उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे आपोआपच त्याचा
फायदा हा जनतेला विविध सेवा, सुविधा, अनुदानाच्या रुपाने मिळू लागतो. यामुळे
कार्यशील लोकासंख्येत वाढ झाल्याने लोकसंख्या लाभांशातही वाढ होते असे म्हणता येईल.
• लोकसंख्या लाभांशाचे फायदे मिळण्यासाठी
आवश्यक घटक.
शिक्षण, आरोग्य, संशोधन इ. क्षेत्रात योग्य धोरणांची
अंमलबजावणी देशाचे शासन कशाप्रकारे करते यावर लोकसंख्या लाभांश अवलंबून असतो. त्यात
देशातील शैक्षणिक पातळी, रोजगार, गर्भधारणेची वारंवारता, करप्रणाली व प्रोत्साहन,
आरोग्य विषयक योजना, निवृत्ती वेतन व धोरण तसेच आर्थिक धोरण यावर ते अवलंबून असते.
देशात लोकसंख्या लाभांश मिळण्याचे फायदे-
1 वैयक्तिक बचत वाढते, त्यामुळे
अर्थव्यस्थेस चालना मिळू शकते.
2 मुलांची संख्या कमी त्यामुळे त्यांच्या
शिक्षणाकडे लक्ष दिले जाते. त्यातुन चांगले मानवी भांडवल मिळते.
3 महिला कार्यशील व सक्षम बनल्यास देशाच्या
आर्थिक विकासास हातभार लागतो.
4 अवलंबित्व गुणोत्तर कमी झाल्याने दरडोई
उत्पन्न वाढते.