प्रकरण क्रं 2 लोकसंख्या भाग – 2
लोकसंख्येस मानवी संसाधन असेही मानले जात असते. लोकसंख्येच्या शारीरिक व बौदिधक या दोन्ही वैशिष्टयांचा
प्रदेशाचा विकासावर प्रभाव पडतो. कोणत्याही प्रदेशाचा विकास हा
इतर संसाधनावर अवलंबून असतो तसाच त्या प्रदेशात मानवी संसाधनाचा वापर कसा होतो यावर
सुदधा तो अवलंबून असतो. त्यामुळे लोकसंख्या भूगोलात वयोरचना, लिंग-गुणोत्तर, साक्षरता दर या बाबींचा अभ्यास करावा
लागतो.
1)
वयोरचना =
“ वयोरचना म्हणजे वयोगटांनुसार असणा-या लोकांची संख्या.“ (उदा. अर्भक, बालक, कुमार, युवक, प्रौढ, वृध्द इ.) प्रत्येक देशात या वयोगटाचा
वेगळा-वेगळा हिस्सा असतो. तो देशानुसार किंवा प्रदेशानुसार बदलत असतो.
वयोरचनेचे
लिंगानुसार वितरण दर्शविण्यासाठी लोकंसख्या अभ्यासक खालील प्रमाणे मनोऱ्याचा वापर
करतात
Add caption |
अ) बाजुच्या मनोऱ्यात ‘य’ अक्ष हा वयोगट दाखवतो.
ब) स्तंबाची लांबी ही त्या वयोगटातील लोकसंख्या दाखवते.
क) आलेखातील/ मनोऱ्यातील डाव्या बाजूस पुरंषाची संख्या व उजव्या बाजूस स्त्रियांची
संख्या वयोगटानुसार दाखविलेली आहे.
ड) आलेखातील/ मनोऱ्यातील तळाला बाल वयोगटाकडून वरच्या भागाकडे वृद्ध वयोगटाकडे
वितरण दर्शविलेले आहे
खालील आकृती मध्ये अ, आ, इ हे तीन
लोकसंख्या मनोरे दिलेले आहेत. त्यांच्या आकारांचा अभ्यास करुन आणि खालील प्रश्नांची उत्त्रे दया.
1)
कोणत्या मनो-यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे ?
उत्तर = ‘इ
’ मनो-यात बालकांची
संख्या सर्वात कमी आहे
2)
कोणत्या मनो-यात वृदधांची संख्या सर्वात कमी आहे?
उत्तर = ‘अ’ मनो-यात वृदधांची संख्या सर्वात कमी आहे
3)
कोणता मनोरा युवा राष्टाचे प्रतिनिधीत्व करतो ?
उत्तर = ‘आ’ मनोरा युवा राष्टाचे प्रतिनिधीत्व करतो
4)
कोणता मनोरा वैदयकीय खर्च जास्त असणा-या राष्टांचे प्रतिनिधित्व करतो ?
उत्तर = ‘इ’ मनोरा वैदयकीय खर्च जास्त असणा-या राष्टांचे प्रतिनिधित्व्
करतो
5)
विपुल मनुष्य् बळ असलेल्या राष्टाचे प्रतिनिधित्व् कोणता मनोरा
करतो ?
उत्तर = ‘आ’ मनोरा विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो.
6)
कोणते मनोरे विकसनशील व विकसित राष्टांचे प्रतिनिधित्व् करतात ते सांगा ?
उत्तर = ‘आ’ हा मनोरा विकसनशील तर ‘इ’ मनोरा विकसित राष्ट्रांचे
प्रतिनिधित्व करतो
गट |
वयोगट |
निदर्शक |
स्पष्टीकरण |
बाल
वयोगट |
0
ते 15 |
अवलंबित्व
गट |
या गटातील
लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास ती लोकसंख्या दुसऱ्यांवर अवलंबून असते. |
प्रौढ
वयोगट |
15
ते 59 |
कार्यशील
गट |
या वयोगटातील
लोकसंख्या उत्पादक व गतिशील असते, हा वयोगट
कार्यशील लोकसंख्या जास्त असण्याचे निदर्शक असते. |
वृध्द
वयोगट |
60
पेक्षा जास्त |
अवलंबित्व
गट |
या वयाचे
प्रमाण जास्त असलेल्या देशात अवलंबित्वाचे प्रमाण वाढतेच,
परंतु वैदयकीय, आरोग्य सुविधेवर खर्च
वाढणारा असतो. |
मनोऱ्याचे तीन प्रकार
दिसुन येतात.
1) विस्तारणारा (अ)
= या मनो-याचा तळ भाग विस्तारत जाणारा असून
शीर्षकडे तो निमुळता होत जातो याचा अर्थ वाढत्या वयोगटानुसार मृत्युदरही वाढतांना दिसुन
येतेा. हा मनोरा जन्म आणि मृत्यू दोन्ही दर जास्त आहे असे सांगतो.
2) संकोचणारा (आ)
= या मनो-यात तळ संकुचित होत जातो व तो वरच्या
भागात विस्तारला जातो. याचा अर्थ वृदधांची संख्या जास्त तर तरूणांची
संख्या कमी असा होतो. यावरून असा निष्कर्ष निघतो की जन्म्दर कमी व मृत्युदर अगदी कमी असतो.
3) स्थिरावलेला (इ)
= या मनो-यात वयोगटांच्या प्रत्येक गटाची टक्केवारी
जवळ जवळ समान(सारखी) असते. जन्म्दर आणि मृत्युदर हे दोन्ही अगदी कमी झालेले असतात.
त्यामुळे तेथे लोकसंख्येची वाढ ही नगण्य् असते
असा आपणास निष्कर्ष निघतो
ज्या देशात बाल व वृद्ध वयोगटाचे प्रमाण
जास्त असते तेथे आर्थिक भार वाढवतो. तर जेथे कार्यरत वयोगटाचे जास्त असते अशा ठिकाणी
मनुष्यबळ विपुल प्रमाणात आहे असे समजले जाते.
खाली भारताच्या
वयोरचनेचा मनोरा दिला आहे. त्याचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे लिहा
1) आकृती
2.1 नुसार भारत कोणत्या मनोऱ्यात येईल.
उत्तर- आकृती 2.1 नुसार भारत अ मनोऱ्यात येईल.
2)
भारतातील लोकसंखेच्या
रचनेनुसार भाष्य करा.
उत्तर- बाजुच्या
मनोऱ्यावरुन असे लक्षात येते की, भारतात जन्मदर जास्त आहे. तसेच भारतात 15 ते 60
या वयोगटाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे भारतात कार्यशील लोकसंख्या जास्त आहे.
No comments:
Post a Comment