Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Wednesday, 30 September 2020

अकरावी भू हालचाली, विभगांचे प्रकार गट पर्वत व खचदरी

 अकरावी भू हालचाली, विभगांचे प्रकार गट पर्वत व खचदरी

भू हालचाली, विभगांचे प्रकार, गट पर्वत व खचदरी

विभंग (प्रस्तरभंग)–पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकांच्या विरुध्द दिशेने निर्माण होणाऱ्या बलांमुळे, खडकांच्या स्तरात ताणनिर्माण होतो. या ताणामुळे खडकांना तडे पडतात तर तसेच प्रंचड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा थर काही वेळेस वलीप्रक्रियेस जुमानत नाही. अशा खडकांवर मोठया प्रमाणात ताण पडल्यास तो तुटू शकतो. खडकांच्या अशा तुटण्यास विभंग,प्रस्तरभंग,भ्रंश असे म्हणतात.

      तडे गेल्यानंतरहे खडकविस्थापित होतात हेविस्थापण अधोगामी (खाली), उर्ध्वगामी (वर) किंवा क्षितिज समांतर (मागे-पुढे) असु शकते. खडकांच्या तुटलेल्या प्रतलास विभंगप्रतल म्हणतात. त्यातुन गट पर्वत व खचदरी सारख्या भूस्वरुपांचीनिर्मिती होते

 

विभंगाचे प्रकार-


1) सामान्य विभंग

2) उलटा विभंग / उत्क्रम(विरुध्द)विभंग

1 हे विभंग खडकांचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भांने खाली सरकल्याने होतात.

1 हे विभंग खडकांचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भांने वर उचलल्या गेल्याने निर्माण होतात.

2 यात विभंग प्रतल आकाशाभिमुख असते

2 यात विभंग प्रतल भूमिअभिमुख असते

अकरावी भू हालचाली, विभगांचे प्रकार गट पर्वत व खचदरी

अकरावी भू हालचाली, विभगांचे प्रकार गट पर्वत व खचदरी



















3) कातर विभंग- काही वेळा विभंग प्रतलाच्या कोणत्याही एका बाजुच्या खडकस्तरामध्ये उर्ध्वदिशेने हालाचाल होत नाही. त्या ऐवजी खडक स्तरांची हालचाल क्षितिज समांतर दिशेने घडते

4) प्रणोदविभंग- जेव्हा विभंग प्रतलाच्या एकाबाजुचा भाग सुटा होऊन पुढच्या बाजूवर येऊन पडतो त्यावेळी अशा विभंगाची निर्मिती होते. यात प्रतलाचा कोन 450 पेक्षा कमी असतो

    



गट पर्वत- कठिण खडकांमध्ये उर्जालहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनविभंगनिर्माण होतात. दोन समांतरविभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो, तेव्हा तो ठोकळया सारखा दिसतो ठोकळया प्रमाणेदिसणाऱ्या या भागास ठोकळाकिंवा गट पर्वत म्हणतात. तसेच दोन विभंगाच्या दरम्यानचा भागस्थिर राहिल्याने व दोन्ही बाजुचे भाग खाली खचल्यानेगट पर्वतांची निर्मिती होते. गटपर्वताचे उतार तीव्रअसतात, माथा सपाट व सुरवातीस त्यावर शिखरे नसतात.  उदा. मेघालय पठार, सातपुडा पर्वत


अकरावी भू हालचाली, विभगांचे प्रकार गट पर्वत व खचदरी

खचदरी- भूकवचातील दोन सलग विभंगादरम्यानच्या भागावर ताणनिर्माण झाल्यामुळे तो भाग खाली खचतो खचलेल्या अशा भागास खचदरी म्हणतात. त्यांच्या उतार कडा या तीव्र असतात. उदा. आफ्रिकेतील रीफ्ट व्हॅली व भारतातील नर्मदा व तापी या नदयांच्या दऱ्या



अकरावी भू हालचाली, विभगांचे प्रकार गट पर्वत व खचदरी




Wednesday, 16 September 2020

लोकसंख्या लाभांश, साक्षरता आणि शिक्षण व व्यावसायीक संरचना

 

लोकसंख्या लाभांश, साक्षरता आणि शिक्षण व व्यावसायीक संरचना -

देश

सेवानिवृत्ती बाबत सुधारणांची अंमलबजावणी किंवा विचाराधीनता (वर्षामध्ये)

जर्मनी

सेवानिवृत्तीचे वय 2023 पर्यत टप्याटप्याने वाढून 66 आणि 2029 पर्यत 67 केले जाईल.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने

1960 मध्ये किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकांसाठी सेवानिवृत्तीचे वय टप्याटप्याने वाढत जाउन 67 पर्यत जाईल.

युनायटेड किंगडम

पुरूष व महिला या दोघांचेही सेवानिवृत्ती वेतनाचे वय ऑक्टोबर 2020 पर्यत 66 2026 ते 28 दरम्यान 67 करण्यात येईल.

ऑस्ट्रेलिया

सेवानिवृत्तीचे वय 2023 पर्यत वाढवून 67 होईल.

चीन

पुरूष आणि महीला या दोघांसाठी सेवानिवृत्तीचे वय 2045 पर्यत 65 वाढवण्याची योजना आहे.

जपान

सेवानिवृत्तीचे वय 70 पर्यत वाढवण्याच्या विचारात आहे.

 भारत

सेवानिवृत्तीचे वय सरासरी 60 वर्षे आहे. आस्थापने नुसार 55 ते 65 असे बदलते प्रमाण आढळते.

1) वरील तक्ता काय दर्शवितो ?

उत्तर- वरील तक्यात जगातील काही देशांचे सेवानिवृत्तीचे वय दर्शविलेले आहे.

2) विकसित आणि विकसनशील असे या देशांचे वर्गीकरण करा.

उत्तर-

A) विकसित देश - जर्मनी, अमे. संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, जपान, चीन

B) विकसनशील देश -  भारत

3) या देशांमध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यामागील कारणे कोणती कसू शकतात ?

उत्तर- येथील आयुर्मान जास्त असल्याने वृध्दांचे प्रमाण जास्त आहे तसेच या देशांमध्ये लहान मुले आणि युवकांचे प्रमाण कमी होत असल्याने या देशांनी सेवानिवृत्तीचे वय वाढविले असावे.

4) सेवानिवृतीच्या वयातील वाढीचा संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल ?

उत्तर- देशाचा निवृत्ती वेतनावर होणारा खर्च कमी होईल.

5) चीन 2045 पर्यंत सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यावर का विचार करत असेल ?

उत्तर- कारण त्या काळात तेथील वयोरचनेमध्ये बालक व युवकांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असल्याने. पुढील कामकाजासाठी मनुष्यबळाचा योग्य वापर होण्यासाठी चीन सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा विचार करत असेल.

6) विकसित देशांतील ही उदाहरणे विचारात घेतल्यास भारताने सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे आवश्यक आहे का? या बद्दल तुमचे मत व्यक्त करा.

उत्तर- भारतात तरुणांची संख्या जास्त असल्याने भारतात सेवानिवृत्तीच्या वयात वाढ होणे आवश्यक नाही.

7) वयोरचना, आयुर्मान आणि देशांची आर्थिक स्थिती यांच्या सहसंबंधांबद्दल निष्कर्षात्मक टीप लिहा.

उत्तर- युवककिंवा प्रौढांची (कार्यशील) संख्या जास्त असल्यास देशाच्या आर्थिक विकासास चालना मिळते. तर बालके व वृध्दांचे (अवलंबित्वांची संख्या) प्रमाण जास्त असल्यास तेथील ‍आर्थिक, वैदयकीय सुविधांवर ताण पडतो. तसेच देशाचे आयुर्मान जास्त असल्यास ‍दिर्घकाळ कामकरणाऱ्यांची संख्या वाढते त्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो. 

  आयुर्मान वाढल्यामुळे सेवानिवृत्ती वेतनाचा देशाच्या निधी, अन्य तरतुदी व वैदयकीय सुविधांवर दबाब पडतो. तसेच जास्त आयुर्मानामुळे देशात वृध्दांची सख्या वाढते.  आयुर्मान वाढलेले लोक अधिक वयापर्यंत काम करु शकतात. अनेक देशांमध्ये लहान मुले व युवकांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे अनेक देशांनी उपलध्द मनुष्य बाळाचा योग्य वापर करण्याच्या उद्देशाने व निवृत्ती वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय वाढविले आहे.

उदा. जपान मधील आयुर्मान सुमारे 84 वर्ष आहे. तेथील सेवानिवृत्तीचे वय 60 वरुन 70 वर्ष करण्याचा विचार सुरु आहे.

उदा. चीन मध्ये सेवा निवृत्तीचे वय 2045 मध्ये बदलले जाणार आहेत. 

 

 

साक्षरता आणि शिक्षण-

देशांनुसार साक्षरतेची व्याख्या बदलते. भारतात  ज्या व्य्क्तीस लिहिता, वाचता आणि गणिती क्रिया समजून करता येतात ती व्य्क्ती साक्षर मानली जाते. भारतात सात वर्षावरील व्यक्तीस साक्षरतेच्या गणनेसाठी विचारात घेतले जाते.

      साक्षरतेमुळे समाजातील विविध घटकांची विचार प्रक्रिया व वैज्ञानिक दृष्ट्रीकोन यात सकारात्मक बदल होतात. त्यामुळे व्दितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायांना चालना मिळते. लोकांच्या राहणीमाणाचा दर्जा सुधारतो. उदयोग व्यवसायांच्या विविध संधी उपलब्ध झाल्याने देशाची आर्थिक स्थिती सुधारते.  देशातील शैक्षणिक, वैदयकीय, व्यावसायीक सेवासुविधा व शासनाच्या अनेक चांगल्या धोरणांवर सकारात्मक परिणाम होतो.  स्त्रियांचा समाजातील दर्जा सुधारतो. साक्षरतेमुळे अनेक आर्थिक व सामाजिक सुधारणा घडून येतात. म्हणून साक्षरतेच्या प्रमाणास देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे दयोतक मानले जाते.

      


आलेखाचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे दया.

 

 

1) कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात जास्त्आहे ?

उत्तर- मध्य आशिया युरोप व उत्तर अमेरिका पूर्व व आग्नेय आशिया या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात जास्त्आहे

2) कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे ?

उत्तर- उत्तर आफ्रिका व पश्चिम आशिया दक्षिण आशिया व सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकी देश या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे

3) स्त्री साक्षरतेचे प्रमाण कोणत्या प्रदेशात पुरूषांपेक्षा जास्त्आहे ?

उत्तर- स्त्री साक्षरतेचे प्रमाण आशिया, मध्य युरोप व उत्तर अमेरिका या प्रदेशात पुरूषांपेक्षा जास्त्आहे

4) आलेखाबाबतचे तुमचे निष्कर्ष लिहा.

उत्तर- आलेखावरून आपणास असे दिसून येते की जे देश विकनशील व अविकिसित आहेत अशा देशात पुरूषांपेक्षा स्त्रियांचे साक्षरते प्रमाण कमी आहे. विकसित देशात स्त्री व पुरूषांचे साक्षरतेत फारसा फरक दिसून येत नाही.

 

साक्षरतेबाबत भौगोलिक स्पष्टीकरण-     

1) युरोप उत्तर अमेरिका पूर्व व आग्नेय आशिया प्रदेशात सर्वाधिक साक्षरता दिसून येते

2) उत्तर आफ्रिका व पश्चिम आशिया दक्षिण आशिया व सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकी देश येथे साक्षरता कमी आहे.

3) आशिया, युरोप व उत्तर अमेरिका हे भाग वगळता जगात कोणत्याही खंडात किंवा उपखंडात स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे.

4) सर्वात कमी साक्षरता दर सहाराच्रा दक्षिणेकडील देशांमध्ये आहे.

 

 

4 व्यावसायिक संरचना-

      व्यवसायिक संरचनेत प्राथमिक, व्दितीयक, तृतीयक व चतुर्थक अशा प्रकारची व्यवसायांची रचना आहे. त्यात देशातील कार्यशील लोकसंख्या कोणत्या प्रकारच्या व्यवसायात गुतंलंली आहे. त्यावरुन देशाचा आर्थिक स्तर ठरतो. विकसीत राष्ट्रांमध्ये औदयोगिक आणि पायाभूत सुविधा प्रामुख्याने उपलब्ध असल्याने तेथील लोकसंख्या व्दितीयक, तृतीयक, व चतुर्थक व्यवसायात मोठया प्रमाणात गुंतलेली असते. त्यामुळे शेती या प्राथमिक व्यवसायामध्ये या देशातील लोक कमी प्रमाणात आढळतात.

ज्या देशात प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण जास्त असे देश कृषी प्रधान असतात. तेथील विकास कमी प्रमाणात असल्याने ते अविकसीत किंवा विकसनशील म्हणून ओळखले जातात.  

     तक्ता क्र.2.3 = भारत व्यावसायिक संरचना ( 1901 -2011 )

 

सेवाक्षेत्र

वर्ष

1901

1951

1961

1971

1981

1991

2001

2011

अ) प्राधमिक सेवाक्षेत्र (1+2+3+4)

अ) प्राधमिक सेवाक्षेत्र (1+2+3+4)

71.9

72.7

72.3

72.6

69.4

67.4

57.4

49

1.शेतकरी

50.6

50

52.8

43.4

41.6

38.5

29.6

26.4

2.शेतमजूर

16.9

19.7

16.7

26.3

24.9

26.4

25.4

20.3

3.पशुपालन,वनसंकलन,मासेमारी

4.3

2.4

2.3

2.4

2.3

1.9

1.7

1.5

4.खाणकाम

0.1

0.6

0.5

0.5

0.6

0.6

0.7

0.8

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आ) दवितीयक सेवाक्षेत्र (5+6)

आ) दवितीयक सेवाक्षेत्र (5+6)

12.5

10

11.7

10.7

12.9

12.1

16.8

23.5

5.उदयोगधंदे

11.7

9

10.6

9.5

11.3

10.2

12.4

16.9

6.बांधकाम

0.8

1

1.1

1.2

1.6

1.9

4.4

6.6

 

 

 

 

 

 

 

 

 

 

इ) तृतीयक सेवाक्षेत्र (7+8+9)

इ) तृतीयक सेवाक्षेत्र (7+8+9)

15.6

17.3

16

16.7

17.7

20.5

25.8

27.5

7.व्यापार आणि वाणिज्य्‍

6

5.3

4

5.6

6.2

7.5

11.1

12.1

8.वाहतूक साठवण आणि दळणवळण.

1.1

1.5

1.6

2.4

2.7

2.8

4.1

4.8

9.इतर सेवा.

8.5

10.5

10.4

8.7

8.8

10.2

10.6

10.7

 

एकूण

100

100

100

100

100

100

100

100

                                                                         

तक्ता क्र. 2.3 मधील माहितीचे काळजीपूर्वक वाचन करा प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) तक्ता काय दर्शवितो ?

उत्तर- भारताची सन 1901 ते 2011 या कालावधीची व्यावसायिक संरचना या तक्त्यात दर्शविलेली आहे.

2) सर्वात जास्त्कार्यशिल लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे ? कोणत्या वर्षी ?

उत्तर- भारतात प्राथमिक सेवाक्षेत्रात, शेती व्यवसायात कार्यशील लोकसंख्या सर्वाधिक गुंतलेली आहे. सन 1951 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या शेती व्यवसात गुंतलेली असल्याचे दिसते.

3) कोणत्या व्यवसायात सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे ? कोणत्या वर्षी ?

उत्तर- भारतात व्दितीयक सेवाक्षेत्रात, बांधकाम व्यवसायत सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे. सन 1951 मध्ये फक्त 1.0% लोकसंख्या बांधकाम व्यवसायात गुंतलेली दिसते.

4) कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात वाढताना दिसत आहे?

उत्तर- कार्यशील लोकसंख्या तृतीयक सेवाक्षेत्रातील व्यवसायात वाढतांना दिसून येते.

5) कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात कमी होताना दिसत आहे ?

उत्तर- कार्यशील लोकसंख्या प्राथमिक सेवाक्षेत्रातील व्यवसात कमी होताना दिसत आहे.

6) 1901 व 2011 या सालातील अ आ इ ओळीतील सांख्यिकीय माहितीच्या आधारे सुयोग्य्‍ आलेख तयार करा ?

उत्तर-



 

 7) स्तंभलेखाची तुलना करून तुमचे निष्कर्ष परिच्छेदात लिहा ?

उत्तर- भारतातील कार्यशील लोकसंख्या ही प्राथमिक व्यवसातून कमी कमी होत आहे व्दितीयक व तृतीयक व्यवसात कार्यशील लोकांचे प्रमाण वाढत आहे.