अकरावी भू हालचाली, विभगांचे प्रकार गट पर्वत व खचदरी
भू हालचाली, विभगांचे प्रकार, गट पर्वत व खचदरी
●विभंग (प्रस्तरभंग)–पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकांच्या विरुध्द दिशेने निर्माण होणाऱ्या बलांमुळे,
खडकांच्या स्तरात ताणनिर्माण होतो. या ताणामुळे खडकांना तडे पडतात तर तसेच प्रंचड
दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा थर काही वेळेस वलीप्रक्रियेस जुमानत
नाही. अशा खडकांवर मोठया प्रमाणात ताण पडल्यास तो तुटू शकतो. खडकांच्या अशा
तुटण्यास ‘विभंग’, ‘प्रस्तरभंग’, ’भ्रंश’ असे म्हणतात.
तडे गेल्यानंतरहे खडकविस्थापित होतात हेविस्थापण
अधोगामी (खाली), उर्ध्वगामी (वर) किंवा क्षितिज समांतर (मागे-पुढे) असु शकते. खडकांच्या
तुटलेल्या प्रतलास विभंगप्रतल म्हणतात. त्यातुन गट पर्वत व खचदरी सारख्या भूस्वरुपांचीनिर्मिती होते
विभंगाचे प्रकार-
1) सामान्य विभंग |
2) उलटा विभंग / उत्क्रम(विरुध्द)विभंग |
1 हे विभंग खडकांचा
एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भांने खाली सरकल्याने होतात. |
1 हे विभंग खडकांचा
एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भांने वर उचलल्या गेल्याने निर्माण होतात. |
2 यात विभंग प्रतल
आकाशाभिमुख असते |
2 यात विभंग प्रतल
भूमिअभिमुख असते |
|
|
3) कातर विभंग- काही वेळा विभंग प्रतलाच्या कोणत्याही एका बाजुच्या खडकस्तरामध्ये उर्ध्वदिशेने हालाचाल होत नाही. त्या ऐवजी खडक स्तरांची हालचाल क्षितिज समांतर दिशेने घडते
4) प्रणोदविभंग- जेव्हा विभंग प्रतलाच्या एकाबाजुचा भाग सुटा होऊन पुढच्या बाजूवर येऊन पडतो त्यावेळी अशा विभंगाची निर्मिती होते. यात प्रतलाचा कोन 450 पेक्षा कमी असतो
● गट पर्वत- कठिण खडकांमध्ये उर्जालहरी एकमेकांकडे
आल्याने दाब पडूनविभंगनिर्माण होतात. दोन समांतरविभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर
उचलला जातो, तेव्हा तो ठोकळया सारखा दिसतो ठोकळया प्रमाणेदिसणाऱ्या या भागास
ठोकळाकिंवा ‘गट पर्वत’ म्हणतात. तसेच
दोन विभंगाच्या दरम्यानचा भागस्थिर राहिल्याने व दोन्ही बाजुचे भाग खाली
खचल्यानेगट पर्वतांची निर्मिती होते. गटपर्वताचे उतार तीव्रअसतात, माथा सपाट व सुरवातीस त्यावर शिखरे नसतात. उदा. मेघालय पठार, सातपुडा
पर्वत
● खचदरी- भूकवचातील
दोन सलग विभंगादरम्यानच्या भागावर ताणनिर्माण झाल्यामुळे तो भाग खाली खचतो
खचलेल्या अशा भागास ‘खचदरी’ म्हणतात.
त्यांच्या उतार कडा या तीव्र असतात. उदा. आफ्रिकेतील
रीफ्ट व्हॅली व भारतातील नर्मदा व तापी या नदयांच्या दऱ्या
suryawanshi Archana Sandip
ReplyDeleteShaikh muskan abdul
ReplyDeleteShaikh muskan abdul
ReplyDeleteCharan psrdhi
ReplyDelete