अकरावी भूगोल सराव परीक्षा नमुना प्रश्नपत्रीका प्रकरण 6,7,8,9,
गुण -50 वेळ 2.30
सूचना- 1
सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
2 आवश्यक तेथे आकृत्या काढून नावे दयावीत
3
रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
4
नकाशा स्टेन्सिलच्या वापरास परवानगी आहे.
5
उजवीकडील अंक प्रश्नाचे गुण दर्शवितात.
6 आलेख व नकाशा पुरवणी
उत्तर
पत्रिकेस जोडावी
प्रश्न 1 अ- साखळी पुर्ण करा. 4
प्रश्न 1 ब
पुढील विधाने दिलेल्या सुचनेनुसार पूर्णकरा. 3
1) हिंदी महासागरातील खालील खोरे उत्तरेकडून
दक्षिणेकडे स्थानानुसार क्रमाने लावा.
अ) सोमाली खोरे
ब) मॉरिशस खोरे
क) ओमान खोरे
ड) अरेबियन खोरे
2) पुढील जीवसंहतीचा विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे असा क्रम लावा.
अ) टुंड्रा
ब) विषुववृत्तीय वर्षावने
क) बोरीयल वने
ड) वाळवंट
3) आपत्ती व्यवस्थापन चक्रानुसार खालील
उपाययोजना / घटकांचा योग्य क्रम लावा.
अ) पुनर्वसन
ब) सुसज्जता
क) प्रतिसाद
ड) उपशमन
इ) पुनर्प्राप्ती
प्रश्न 1 क दिलेल्या विधानातील विधाने व कारणांचा
अचूक सहसंबंध ओळखा- 3
1) A : भूकंपप्रवण
क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना वारंवार
भूकंपास तोंड दयावे लागते.
R : भूकंपप्रवण
क्षेत्रात भूकंपाचे धोके कमी करण्यासाठी क्षमता निर्माण होते.
अ) केवळ A बरोबर
आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
2) A : तैगा वनात वृक्षतोड मोठया प्रमाणात होते.
R : तैगा वनात अनेक प्रकारच्या वनस्पती एकत्रीत मोठया प्रमाणात वाढतात.
अ) केवळ A बरोबर
आहे.
आ) केवळ R बरोबर
आहे.
इ) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि
R हे
A च अचूक स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि
R हे
A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
3) A : हिंदी महासागर भारताच्या
हवामानाच्या दृष्ट्रीने महत्वाची भूमीका बजावतो.
R :
हिंदी महासागरात मोसमी वाऱ्यांची निर्मिती होते.
अ) केवळ A बरोबर
आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R
हे A चे
अचूक स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R
हे A चे
अचूक स्पष्टीकरण नाही.
प्रश्न 1 ड चुकीचा घटक ओळखा. 3
1) बंगालच्या
उपसागरातील बेट
अ) श्रीलंका
ब) लक्षव्दीप-मालदीव
क) आंदमान-निकोबार
ड) जावा सुमात्रा
2) सागरी बेटे
अ) प्रवाळ
बेटे
ब) गाळाचे
बेटे
क) ज्वालामुखीय
बेटे
ड) खंडीय
बेटे
3) महासागराचे उपयोग
अ) आष्वीक
उर्जा
ब) पिण्याचे
पाणी
क) वाहतुक
ड) पर्यटन
प्रश्न 2
रा. खालील प्रश्नाची भौगोलिक कारणे लिहा. (कोणतेही तीन) 9
1. हवामान बदल नेहमीच माननिर्मित नसतो
2. समुद्रकिनारी प्रदेश चक्रीवादळास
जास्त
विकारक्षम
असतात.
3. वाळवंटी प्रदेशात काटेरी वनस्पती आढळतात.
4. हिंदी महासागराचा पूर्वकिनारपट्टीचा भाग
भूकंप
प्रवण
क्षेत्रात येतो.
5. महागसार हे खनिजांचे आगार असतात.
प्रश्न 3 रा फरक स्पष्ट करा.
(कोणतेही तीन ) 9
1 जैवीक साधन संपत्ती आणि अजैविक
साधनसंपत्ती
2 अरबी
समुद्र आणि बंगालचा उपसागर
3 सागरी
गर्ता आणि सागरी पर्वत
4 जीवसंहती आणि परिसंस्था
5 उष्ण
कटीबंधीय गवताळ जीवसहंती आणि
समशीतोष्ण
कटीबंधीय गवताळ जीवसहंती
प्रश्न 4) जगाच्या नकाशात पुढील घटक योग्य
चिन्हांच्या
सहाय्याने दर्शवा. (कोणतेही-5)
5
1 ग्रिनलँड
2 विषुववृत्त
3 व्हेल्ड गवताळ प्रदेश
4 भूमध्य सागरी हवामानाचा उत्तर अमेरीकेतील एक देश
5 नव्वद पूर्व रांग
6 सुंदा गर्ता
7
मादागास्कर बेट
प्रश्न 5
टीपा लिहा (कोणत्याही दोन) 8
1 विशेष आर्थिक विभाग
2 हिंदी महासागरातील खनिज तेल आणि नैसर्गिक
वायू
यांची उपलब्धता
3 जलीय जीवसंहतीचे स्तर
4 मानवनिर्मित आपत्ती
प्रश्न 6 अ) खालील उताऱ्याचे वाचन
करुन
त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. 4
भारत हा उष्णकटीबंधीय देश आहे. संपूर्ण
भारताभोवती समुद्रकिनारा नाही, एकीकडे हिमालय आहे, तर दुसरीकडे समुद्रकिनारा त्यामुळे या घटकांचा
परिणाम भारतातील हवामानाच्या अंदाजावर होतो.
आपल्याकडे पावसाचा अंदाज म्हणजे जमिनीवरील हवा गरम होणे,
त्यात बाष्पाचे
प्रमाण, हे
बाष्पवर जाऊन थंड होणे आणि त्यानंतर वादळी वारे आणि ढग अशा पद्धतीने पाऊस येतो
यावर अवलंबुन आहे. यामध्ये एवढी अचूकता नसते. यामध्ये विभागवार, राज्यवार पूर्वानुमान वर्तवता येते. पण हे अंदाज व्यापक
भागासाठी लागू असतात. यात प्रादेशिक अचूकता
मांडता येत नाही. यासंदर्भात हवामानतज्ज्ञ आणि इंडियन
मेटरोलॉजिकल सोसायटी, पुणे
यासंस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. आर. कुलकर्णी सांगतात की, परदेशात अचूकपूर्वानुमान देण्यासाठी
वापरली जाणारी जगातील सगळी मॉडेल्स वापरून तीन-तीन तासांचे अंदाज घेतात तयानुसार
आपल्यालाही भारतासाठी पूर्वानुमानसुद्धा आपल्यालाही देता येते. मात्रया
पूर्वानुमानामध्ये काही प्रमाणात चूक असतेच. भारतीय मोसमी हवामानाची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने परदेशाप्रमाणे
अचूकता येत नाही. मात्र एखादा कमीदाबाचा पट्टा निर्माण झाला तर विस्तृत प्रमाणात
पाऊस पडतो आणि वर्तवलेले अंदाज बऱ्यापैकी योग्य ठरू शकतात.
1 भारतात पाऊस पडणाऱ्या प्रक्रियेचा
अंदाज कसा
घेताला जातो?
2 देशातील हवामानाचे अंदाज कशामुळे
100% खरे
ठरत नाहीत?
3 पावसाचा अंदाज कोणत्या
परिस्थितीत योग्य ठरु
शकतो?
4 उताऱ्यात आलेली भारताची हवामानीय
भौगोलिक
परिस्थिती कोणती?
प्रश्न 6 ब) खालील पैकी कोणतीही एक आकृती
काढून भागांना योग्य नावे दया. 2
1 उत्तर हिंदी महासागरातील सागरी प्रवाह
2 आपत्ती व्यवस्थापन चक्र
समाधान संगीता चौधरी
ReplyDeleteKaren gaikwad
ReplyDeleteOk
ReplyDeleteOk
ReplyDeleteBHARAT Ahire
ReplyDeleteOkay
ReplyDelete