Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Thursday 17 February 2022

बारावी भूगोल नकाशावरील प्रश्न भाग- 1

 

बारावी भूगोल नकाशावरील प्रश्न (भाग- 1)


1) दिलेल्या नकाशा /आलेख / आकृतीचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा



1. आलेखातील निळी व काळी या रेषा काय दर्शवितात ?

 उत्तर- आलेखातील निळी रेषा जन्मदर व काळी रेषा मृत्यूदर दर्शविते.

2. आलेखातील दाखविलेला हिरवा भाग काय दर्शवितो ?

उत्तर- आलेखातील हिरवाभाग  लोकसंख्येची नैसर्गिक वाढ दर्शवितो.

3. आलेखात दाखविलेला निळा भाग काय दर्शवितो ?

उत्तर-   आलेखात निळा भाग लोकसंख्येची नैसर्गिक घट दर्शवितो.

4. कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे.

उत्तर-  पहील्या व चौथ्या टप्प्यात जन्मदर अल्पप्रमाणातच जास्त आहे, परंतु दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात जन्मदर मृत्यूदरापेक्षा अधिक आहे.

5. कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदराएवढाच आहे ?

उत्तर- आलेखात चौथ्या व पाचव्या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदर दर्शविणाऱ्या रेषा एकमेकास स्पर्श करतांना दिसत आहेत. म्हणजेच चौथ्या व पाचव्या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदरा ऐवढा आहे.

6. कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे ?

उत्तर-   आलेखात पाचव्या टप्प्यात मृत्यूदर दर्शविणारी रेषा ही जन्मदर दर्शविणाऱ्या रेषेच्या वर दिसत आहे.  त्यामुळे पाचव्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे असे म्हणता येईल. 



------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



2)



1) आकृती काय दर्शविते. –

 उत्तर- आकृतीत जन्मदर व मृत्यूदरातील तुलना दर्शवीत आहे.

 

2) जन्मदरापेक्षा मृत्युदर जास्त असल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होईल.

 उत्तर- लोकसंख्या कमी होईल.

 

3) मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असल्यास लोकसख्येवर काय परिणाम होईल.

उत्तर- मृत्युदराच्या तुलनेत जन्मदर जास्त असल्यास लोकसंख्या वाढेल किंवा लोकसंख्या जास्त होईल

 

4) दोन्ही दर समान असल्यास काय होईल?

उत्तर- जन्मदर व मृत्युदर दोन्ही समान असल्यास लोकसंख्या स्थिर राहील

 

5) दोन्ही दार समान राहू शकतात का तुमचे मत लिहा.

उत्तर- दोन्ही दर अगदी समान असु शकत नाही असे वाटते. अपवादात्मक स्थितीत एखादया ठिकाणी अल्प काळासाठी अशी स्थिती येवु शकेल



-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------




3)


1) कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या देशांचे प्रतिनिधित्व करतो 

 उत्तर-  नोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या देशांचे प्रतिनिधित्व करतो

 

2) कोणत्या मनोर्‍यात कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त आढळते

 उत्तर- नोर्‍यात कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त आढळते

 

3) कोणता मनोरा वृद्धांचा देश असल्याचे दर्शवितो

 उत्तर- मनोरा वृद्धांचा देश  असल्याचे दर्शवतो

 

4) मनोऱ्याचा तळ रुंद असल्याचे कारण कोणते

 उत्तर- या ठिकाणी जन्मदर जास्त असल्याने बालकांचे प्रमाण सर्वात जास्त आहे  त्याच बरोबर येथे  वाढत्या  वयाबरोबर मृत्यूदरही वाढलेला असल्याने या  मनोऱ्याचा तळ रुंद आहे

 

5) मनोरा स्तंभासारखा उभा का दिसतो 

 उत्तर- या ठिकाणी जन्मदरात आणि मृत्युदरात स्थिरता आलेली असल्याने, दोघांमधील फरक नगण्य आहे आणि वयोगटातील प्रत्येक गटाची लोकसंख्येची टक्केवारी जवळजवळ समान आहे म्हणून हा मनोरा संभा सारखा उभा दिसतो


----------------------------------------------------------------------------------------------------------



4)


नकाशा काय दर्शवतो

  उत्तर- नकाशा औद्योगिक प्रदेशांचे खंड निहाय वितरण दर्शवितो  किंवा जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश दर्शवितो

 

कोणत्या खंडात औद्योगिक प्रदेश जास्त आहे 

 उत्तर-  आशिया खंडात औद्योगिक प्रदेश जास्त आहे

 

कोणत्या खंडात औद्योगिक प्रदेश कमी आहेत

 उत्तर- आफ्रिका खंडात औद्योगिक प्रदेश कमी आहेत

 

4 ऑस्ट्रेलिया खंडातील औद्योगिक प्रदेशांची नावे लिहा

 उत्तर- सिडनी, पर्थ, ॲडिलेड, मेलबर्न, ऑकलंड आणि वाइकाटो, कॅन्टरबरी

 

भारतातील औद्योगिक प्रदेशांची नावे लिहा

उत्तर-  छोटा नागपूरचे पठार, मुंबई पुणे कॅरिडॉर, दिल्ली क्षेत्र, कोईमतूर-बंगळुरू, अहमदाबाद वडोदरा

---------------------------------------------------------------------------------




6 comments: