Blogger
Monday, 2 December 2019
जागतिक हवामान बदल, बाबी व परीणाम, कारणे, अभ्यास साधने
Wednesday, 27 November 2019
XI, Chapter 5 In the Case of Global Climate Change, Consequences of global temperature rise- Climate change
Monday, 25 November 2019
अकरावी प्रकरण 5 जागतिक हवामान बदल- तापमान वाढ व परीणाम
Tuesday, 19 November 2019
सागरी लाटांचे कार्य
Wednesday, 16 October 2019
भू-हालचाली, मंद हालचाली, वळी व वळीकरण, विभंग Earth Movements, Slow Movements , Folding, faults
भू-हालचाली, मंद हालचाली, वळी व वळीकरण Earth Movements, Slow Movements , Folding
भू-हालचाली, मंद हालचाली, वळी व वळीकरण Earth Movements, Slow Movements , Folding
भू-हालचाली
भूभागावर दिसणारे पर्वत पठारे दऱ्या इ. भरुपे पृथ्वीच्या अंतर्गत व बर्हिगत बलामुळे होते. अंतर्गत प्रक्रीयांचे मंद हालचाली व शीघ्र हालचाली असे दोन प्रकार पडतात.
भू-हालचालींचे
पुरावे-
भू हालचालींचे वर्गीकरण व भू हालचालींचे पुरावे व्हिडिओ पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/i1-_ERciqmM
मंद हालचाली-
1) उर्ध्वगामी हालचाली (खंडनिर्माण करणाऱ्या हालचाली)-
या हालचालीमुळे भूकवचाचाविस्तीर्ण भाग वर उचलला जातेकिंवा खचातो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडाचीनिर्मीती होते. म्हणुन या हालचालींना खंडनिर्माण करणाऱ्या हालचाली म्हणतात.
2) क्षीतिज संमातर हालचाली (पर्वतनिर्माण करणाऱ्या हालचाली)–
या हालचालींमुळे खडकांच्या स्तरात वळया पडतात किंवा विभंगनिर्माण होतात त्यामुळे घडीचे पर्वत किंवा गट पर्वतांचीनिर्मीण होतात म्हणुन यां हालचालींना पर्वतनिर्माण करणाऱ्या हालचाली म्हणतात. या हालचालीमुळे खडाकांच्या स्तरात ताण किंवा दाबनिर्माण होतो. या हालचालीमुळे भूपृष्ठास वळया, घडया, भेगा, पडतात त्यातुन पर्वतांचीनिर्मीती होते. खंडनिर्माण करणाऱ्या हालचालीपेक्षा यांचा वेग जास्त असतो मात्र अवाका कमी असतो. या हालचालीत खालील प्रकारची बले कार्यरत असतात.
· ताणनिर्माण करणारी बले-
खडकांच्या थरांमध्ये एकमेकांच्या विरुध्द दिशेने ताण निर्माण झाल्यास भूप्ठाला छेद, भेग, भंग किंवा तडे पडतात त्यासविभंग (प्रस्तरभंग) म्हटले जाते त्यामुळे खचदरी किंवा गट पर्वतांची निर्मीती होते.
· दाब निर्माण करणारी बले-
खडकांच्या थरांमध्ये एकमेकांच्या दिशेने दाब निर्माण होवुन भूपुष्ठास बाक/वाक, वळया तसेच भेगा पडतात त्यातुन वळी पर्वतांची निर्मीती होते. उदा.हिमालय आल्प्स, रॉकी, अँडीज इ.
वळी किंवा वळीकरण-
भूष्ठाला पडणाऱ्या वळयाचे स्वरुप खडकांचे स्वरुप, बालाचीतिव्रता व कालावधी या घटकांवर अवलंबुन असते. मृदु व लवचिक खडकांवर इतर खडकांच्या तुलनेत बलाचा प्रभाव जास्त पडतो. भूकवचात खोलवर असलेले खडक प्रचंड दाबाखाली असल्याने ते लवचिक असतात त्या मुळे ते तुटत नाहीत त्यांना वळया पडतात व वळी पर्वतांची निर्मीती बालाचा परीणाम झालेल्या खडकांचा प्रतिसाद हो तो खडक कीती कठीण आहे व बलाचा प्रवेग किती आहे यावर अवलंबुन असतो. होते. उदा.1 प्राचीन वली पर्वत- अरवली, उरल ॲपेलिशियन पर्वत 2. अर्वाचीन वली पर्वत रॉकी व हिमालय पर्वत
वलीचे भाग / प्रकार-
अपनती वली |
अभिनती वली |
1 या वळींचा मध्य भाग अधीक उंचीवर असतो
|
1 या वळींचा मध्य भाग कमी उंचीवर असतो
|
2 या वळींच्या भुजा विरुध्द दिशेस उतरतात
|
2 या वळींच्या भुजा मध्यभागी एकमेंकांकडे उतरतात
|
वळींचे प्रकार-
सममित वली- यांचा अक्षीयप्रतल उर्ध्वगामी असतो तर वलींच्या भुजांचा उतार समान असतो
असममित वली – यांचा अक्षीय प्रतल कललेले/तिरपे असतात. तर भुजांचे कोन कमी जास्त असतात.
उलथलेली वली- यात वलींची एक शाखा दुसऱ्या शाखेवर झुकलेली असते तसेच भुजांचा उतार एकाच दिशेने असतो मात्र कोन कमी जास्त असतात.
आडवी वली- एक वली दुसऱ्या वलीवर क्षीतीजसंमातरविसावलेली असते व वळया एकाच दिशेने वळलेल्या असतात.

समनतिक वली- सरळ वळया, अक्षीय प्रतल उभे/आडवे /तिरपे, वळया भुजा एकमेंकास समांतर
सममित वली |
असममित वली |
1 सममित वलींचा अक्षीय प्रतल उर्ध्वगामी असतो
|
1 असममित वलींचा अक्षीय प्रतल कललेला/तिरपा
असतो
|
2 या वलींच्या भुजांचा उतार समान असतो
|
2 या वलींच्या भुजांचे कोन कमी जास्त असतात
|
विभंग (प्रस्तरभंग) -
भू-हालचाली, मंद हालचाली, वळी व वळीकरण Earth Movements, Slow Movements , Folding
भू-हालचाली, मंद हालचाली, वळी व वळीकरण, विभंग Earth Movements, Slow Movements , Folding, faults
खालील हेंडींगवर क्लिक करुन अधिक माहीती मिळवा
भू हालचालींचे प्रकार गट पर्वतखचदरी
भूकंप प्रक्रीया, भूकंपछायेचा प्रदेश, मर्केली व रिश्टर प्रमाण
अकरावी प्रथमसत्र प्रश्नपत्रिका
गुण 50 सरावी चाचणी
-------------------------------------------
अकरावी
संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित
अकरावी समर्थ भूगोल नोट्स
नोट्स
ची वैशिष्टे
1)
शिक्षक व विदयार्थ्यांसाठी उपयोगी
2)
शिक्षकांसाठी वर्गात नोट्स लिखाण करुन देणे कामी, सोप्या भाषेत आवश्यक आकृत्या व नकाशासह
स्पष्टीकरणास उपयोगी
3)
विदयार्थ्यांसाठी स्वाध्यायापेक्षा जास्त व सर्व प्रकारचे प्रश्न व त्यांची सोप्या
भाषेत उत्तरे
4)
सर्व प्रकरणांवर सर्व प्रकारचे वस्तूनिष्ठ प्रश्नांचा समावेश
5)
प्रकरणातील जरा विचार करा, करुन
पहा, जरा डोके चालवा, शोधा पाहू, थोडे आठवूया अशा घटकांच्या बाबतीतही मार्गदर्शन
6)
प्रश्नपत्रिका आराखडयानुसार स्वध्यायापेक्षा जास्तीचे प्रश्न-उत्तरे
7)
प्रत्येक प्रकरणावर नोट्स व प्रश्न-उत्तरे अशा दोन विभागात रचना
8)
आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे
यांचा समावेश
9)
पाठय पुस्तकाबाहेरील नमुना उतारे
10)
नमुना प्रश्नपत्रिका (घटक
चाचणी, सहामाही, वार्षिक )
11) आवश्यकेते नुसार आकृत्या व नकाशांचा समावेश
12) पोस्ट पार्सल / कुरीयर सेवा / एस टी
पार्सल व्दारे पुस्तक पाठविण्याची व्यवस्था
-----------------------------------------------------------------------------------------------------
संपर्क:
प्रा.
मनोज देशमुख
--------------------------------------------------------------
-
बारावी प्रात्यक्षिक भूगोल 1 ते 10 प्रात्यक्षिकांची माहीती व सोडविलेले उदाहरणे खालील लिंकवर क्लिक करुन माहीती मिळवा बारावी प्रात्य...
-
HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत्रिका जुलै 2024 व नमुना उत्तरे Board Geography Question Paper and Sample Answers HSC बोर्ड भूगोल प्रश्नपत...
-
लोकसंख्या संक्रमण सिंध्दांन्त- लोकसंख्या संक्रमण सिंध्दांन्त- लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे विचारात घेऊन सर्वसाधारणपणे लोकसंख्या वाढीची स्...


