Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Wednesday, 29 January 2020

हिंदी महासागराची तळरचना-


हिंदी महासागराची तळरचना-
हिंदी महासागराची तळरचना फार गुंतागुतीची आहे. हिंदी महासागरातील जलमग्न भूरुपे ही भूविवर्तनिकी हालचाली, अनाच्छादन /ज्वालामुखीय प्रकीयांमुळे झालेली आहे. या प्रकीया जशा खंडीय भागात कार्यरत असतात तशाच त्या महासागरतही कार्यकरीत असतात. त्यामुळे हिंदी महासागरात खंडात्न उतार, मध्य महासागरीय जलमग्न पर्वत रांग, महासागरीय खोरी, सागरीगर्ता व बेटे असे भूरुपे पहावयास मिळतात. हिंदी महासागराची सरासरी खोली 4000 मीटर आहे
) समुद्रबुड जमीन / भूखंड मंच-   हिंदी महासागराच्या समुद्रबुड जमीनीमध्ये मोठया प्रमाणात विविधता आढळते. भारताच्या किनारी भागात समुद्रबुड जमीन विस्तीर्ण आहे. (भारताचा पूर्वेकिनारा- अरुंद, तर पश्चीमकिनारा रुंद आहे) या तुलनेत ‍ आफ्रिका, मादागास्कर बेट, इंडोनेशिया च्या किनाऱ्यांवर अरुंद आहे.
) मध्य महासागरीय रांगा (सागरी पर्वत/पठारे)-
1) मध्य हिंदी महासागरीय रांग- या रांगेची सुरवात सोमाली व्दीपकल्पाच्या जवळ गल्फ ऑफ एडनमधून होते, पुढे दक्षिणेकडे मादागास्कर बेटाच्या पर्वेस ही पर्वतरांग दोन शाखेत विभागली जाते.
    A) नैऋत्य हिंदी जलमग्न रांग-  त्यातील ही एक शाखा नैऋत्य दिशेला प्रिन्स एडवर्ड बेटापर्यंन्त पसरली आहे
    B) मध्य हिंदी महासागरीय रांग - दुसरी शाखा अग्नेय दिशेकडे ॲमस्टरडॅम व सेंटपॉल बेटापर्यंन्त पसरलेली आहे. ही पर्वत रांग अनेक संमातर रांगांनी बनलेली आहे. ही रांग एकसंघ नाही ती अनेक ठिकाणी खंडीत झालेली आहे. उदा. ओवेन विभंग, ॲमस्टरडॅक विभंग
2) नव्वद पूर्व रांग- ही पर्वत रांग हिंदी महासागरातील बंगाल च्या उपसागरात 90पुर्व रेखावृत्तावर उत्तर दक्षिण दिशेस विस्तारलेली आहे. ही रांग अंदमान बेटाच्या पश्चिमेडून सुरु होवून खाली दक्षिणेकडे ॲमस्टरडॅक व सेंट पॉल बेटाच्या पूर्वेस संपते.
3) छागोस पठार- हींदी महासागरात भारताच्या पश्चीमेकडे मध्य हींदी महासागरीय पर्वत रांगे पर्यंन्त हे पठार पसरलेले आहे. याच पठावरावर अनेक लहान मोठया बेटांचे समुह आहेत उदा. लक्षव्दीप, मालदीव, दिएगो गर्सिआ इ.
4) इतर पठारे-  याच महासागराच्या i) दक्षिण भागात केर्गुएलेन पठार ii) मादागास्कर बेटा जवळील मदागास्कर पठार, iii) आफ्रिकेच्या दक्षिणेस अगुल्हास पठार आहे.

) बेटे- हिंदी महसागरातील खोल समुद्रातील बेटांचा विचार केल्यास ऑस्ट्रेलिया, मादागास्कर व श्रीलंका या तिन मोठे बेटे आहेत या शिवाय अनेक लहान-मोठी बेटे आणि चार व्दीपसमुह या महासागरात आढळतात त्यांची विभागणी खालील प्रकारे करता येईल.
     
1 अरबी समुद्रातील बेटे-
2 बंगालच्या उपसागरातील बेटे
3 ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्या लगतची बेटे
4 अंटार्क्टिका खंडाजवळील बेटे


1 अरबी समुद्रातील बेटे- ही बेटे दोन विभागात मांडता येतात-
                                                                                   
A) अफ्रिका खंडाच्या किनाऱ्याजवळील बेटे व 
B) मध्य पर्वतरांगे जवळची बेटे / लक्षव्दीप-छागोस रांगेतील बेटे.


A) अफ्रिका खंडाच्या किनाऱ्याजवळील बेटे-
  i) मादागास्कर बेट- या गटातील हे सर्वात मोठे बेट असुन काही भूगर्भशास्त्रज्ञांच्या मतानुसार हे         मादागास्कर बेट पूर्वि आफ्रिका खंडाचाच भाग होते ते प्रथम मुळ आफ्रिका खंडापासून होवून इंडो-          ऑस्ट्रेलिया भूपट्टाला जावुन मिळाले व  नंतर अंतरीक हालचालीमुळे पुन्हा तेथूनही वेगळे होवून     विलग झालेले असुन आज दिसते तेथे आहे. मादागास्कर बेट हे संवेदनशील भूकंप प्रवणक्षेत्र आहे.
  ii) कोमोरो बेटे, बेस्सास दी इंडिया आणि युरोपा बेट- ही सर्व बेटे आफ्रिका खंडाच्या पूर्व दिशेला                                                                                                 आहेत.
  iii) रियुनियन, मॉरिशस व सेशल्स बेट-  ही बेटे मादागास्कर बेटाच्या पूर्व दिशेला आहे.
  iv) सोकोत्रा बेट- मादागास्कर बेटाच्या उत्तर दिशेला आहे.
      वरील सर्व बेटे हिंदी महासागरीय मध्य रांगेच्या पश्चीमेची बाजु व आफ्रिका खंडाच्या पुर्वेबाजू यांच्या दरम्यान आहेत.
B) मध्य पर्वतरांगे जवळची बेटे / लक्षव्दीप-छागोस रांगेतील बेटे- लक्षव्दीप, मालदीव आणि छागोस बेटे या पैकी बहुतेक बेटे प्रवाळ संचयनातुन तयार झालेल्या कंकणव्दीपाच्या स्वरुपात आढळणारे व्दीपसमुह आहेत.
या शिवाय पाकीस्तानच्याकिनारी भागात बुंदेल आणि इराणच्या पार्शियाच्या आखातात किश, हेंडोरावी, लावान, सिरी इ.बेटे आहेत इरतही बेटे आहेत.
2 बंगालच्या उपसागरातील बेटे-
i) श्रीलंका बेट- हे या विभागातील सर्वात मोठे बेट असुन भारताच्या दक्षिणेला आहे.
ii) अंदमान-निकोबार बेटांचा समुह-  हे बेटे भारताच्या दक्षिणेला नव्वद पुर्व पर्वतरांगेच्या पुर्वेकडे आहेत.
iii) सुमात्राबेट समुह- हा बेटांचा समुह अंदमान निकोबार बेटांच्या पश्चिमेकडे आहे.
      सुमात्रा बेटांच्या पश्चिमेकडे काही बेटांची साखळी आढळते त्यातील बरेच बेटे हे ज्वालामुखीय बेटे आहेत. व ही सर्व बेटे भूपट्ट सीमेशी निगडीत आहेत. ही सर्व बेटे जलमग्न पर्वतांचे शिखराचे  भाग असुन ते समुद्राच्या पाण्याच्या वर आलेले आहेत.
3 ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्या लगतची बेटे व अंटार्क्टिका खंडाजवळील बेटे- या विभागात रच थोडी बेटे आहेत त्यापैकी अश्मोर,क्रिसमस व कोकोस हे बेटे महत्वाची आहेत.
) महासागरीय खोरी किंवा मैदाने- सागरतळावरील खोलवर असलेल्या सपाट भागास महासागरीय खोरी म्हणतात. भूपष्ठावरील आणलेला अवसाद तसेच सागरी भागात निर्माण झालेला अवसाद संचयनाचे अखेरचे स्थान म्हणजे महासागरी मैदाने /खोरी.हिंदी महासागरात दहा प्रमुख खोरी आहेत मध्य हींदी महासागर खोरे, सोमाली खोरे, गंगा खोरे, अरेबीयन खोरे, अघुल्हास नाताळ खोरे,  मास्कारेन खोरे, पश्चिम ऑस्ट्रेलिया खोरे, मॉरिशन खोरे, ओमन खोरे, नैऋत्य हिंदी महासागर खोरे
) सागरी खळगे आणि गर्ता-   सागरी गर्ता हा महासागरातील अति खोल भाग असतो. हिंदी महासागरात गर्तांची संख्या इतर महासागरांच्या तुलनेने कमी आढळते.
     i.    सुंदा गर्ता- हिंदी महासागराच्या पुर्व दिशेला भारत-‍ ऑस्ट्रेलिया व पॅसिफिक भूपट्टांच्या सीमावर्ती प्रदेशात जावा-सुमात्रा बेटाजवळ सुंदा गर्ता असुन तिची खोली 7450 मी (4073 फॅदम)आहे.
    ii.    ओब गर्ता- अग्नेय हिंदीमहासागर पर्वत रांगेच्या दक्षिण बाजुला ओब गर्ता असुन तिची खोली 6875 मीटर (3759 फॅदम) आहे. या दोन्हीं गर्ता भूपट्ट हालचांलीमुळे अतिसंवेदनशील भूंकपप्रवण क्षेत्रात मोडतात.‍


Sunday, 5 January 2020

प्रकरण – 6 महासागर साधनसंपत्ती काही भाग


प्रकरण – 6
महासागर साधनसंपत्ती
                                            
      साधारण पणे 19 व्या शतकाच्या सुरवातीला शास्त्रशुध्द पध्दतीने महासागराचा अयास होवू लागला. 1872 ते 1876 या कालखंडात चॅलेन्जर या ब्रिटिश जहाजाने केलेल्या जगप्रवासाने समुद्रा विषयी व तेथील जीवसृष्टी संदर्भात नवीन माहीती नवीन माहिती अजेडात आणली. तर 1920 पासून Echo Sounder (प्रतिध्वनी आरेखक यंत्र) तंत्रज्ञानामुळे विविध सागर तळाचे नकाशे बनवण्यास सुरुवात झाली.
सागर तळरचना-









1 भूखंड मंच/ समुद्रबुड जमीन- किनाऱ्यालगत असलेला व जलमग्न भूखंडाचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. हा सागरतळाचा सर्वात उथळ भाग आहे.  हा भाग जलमग्न, रुंद, उथळ, मंद उताराचा असतो, भूखंड मंचाचा विस्तार जगात सर्वत्र सारखा नाही. उदा. चिली व सुमात्रा किनाऱ्या जवळ अतिशय अरुंद तर आर्क्टिक महासागरावजळील सायबेरीयाच्या किनाऱ्या लगत 1500किमी रुंदीचा आहे. याने महासागराच्या तळाच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे 7.6 % क्षेत्र व्यापलेले आहे.
      भूखंडमंच मानवासाठी महत्वपूर्ण आहेत. हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरणे या भागाच्या तळापर्यंन्त पोहचतात. त्यामुळे भूखंड मंचाच्या भागावर शेवाळ व प्लवकांची निर्मीती मोठया प्रमाणावर होत असते. हे प्लवंक सागरातील लक्षावधी जीव व माशांचे प्रमुख व आवडते खादय आहे. त्यामुळे मासे प्लवक खादयाच्या शोधात भूखंडमंचा कडे ‍आकर्षित होत असतात. व येथेच प्रजननही करतात त्यामुळे भूखंड मंचावर माशाची संख्या जास्त असते, उथळ तळभागामुळे मासेमारी करणेही सोपे असते म्हणून भूखंड मंचाच्या प्रदेशात मासेमारीचा विकास झालेला आढळतो. उदा. ग्रॅडबॅक, जॉर्जस बॅक,
      त्याच बरोबर जगातील खनिजतेल व नैसर्गिक वायूचे सर्वात मोठे साठे समुद्रात समुद्रबुड जमीनीवरच आहेत. (उदा.-मुंबई हाय), तसेच क्रोमाईट, हिरे, इल्मेनाई, मॅग्नेटाईअ, प्लॅनिम सोने व पॉस्फराईट सारखी अनेकविध खनिजे, वाळू दगडगोटे व औदयागिक सिलीका या सारख्या खनिजांचे हे उत्खनन भूखंड मंचाच्या भागावरुन घेता येणे शक्य झाले आहे.
2 खंडान्त उतार (खंडान्त उतार व संचयन)- समुद्रबुड जमिनी/ भूखंड मचांचा विस्तार संपल्यानंतर समुद्रतळाचा उतार तिव्र होत जातो.  या उतारांचा कोन 2ते 5च्या दरम्यान असु शकतो या उतारांना खंडान्त उतार असे म्हटले जाते. या भागात समुद्राची खोली 200 ते 4000 मी पर्यंन्त खोल असते. खंडान्त उताराने महासागराच्या तळाच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे 8.5% क्षेत्र व्यापलेले आहे. खंडान्त उतार हा ज्या सागरी किनाऱ्यावर पर्वत आहेत तेथे तिव्र आढळतो. किनाऱ्या पासून हे क्षेत्र लांब असल्याने खंडान्त उताराच्या सुरवातीच्याच टप्यात नदयांनी वाहुन आणलेला गाळ काही प्रमाणात पोहचत असतो, या क्षेत्रावर उतार तिव्र असल्याने गाळाचे संचयन कमी प्रमाणातच असते त्यामुळे या क्षेत्रात संचयन खूपच कमी असते.  
      खंडान्त उतारावर मिथेन हायड्रेट ही संयुगे आढळतात. उदा. कृष्णा गोदावरी उपतट. या भागावर पंखाकृती मैदानेही आढळतात.  उदा. आफ्रिकेजवळ कांगो हीसागरीय घळई
3 सागरी मैदाने-  खंडान्त उताराच्या पुढे सागरी मैदाने आढळतात, सागरी मैदाने आकाराचे मोठे असतात त्यावर लहान-मोठया आकारांचे जलमग्न उंचवटे पर्वत पठारे इ. भूरूपे असतात त्यांचा उतार मंद असुन सागरी मैदानांनी महासागराच्या तळाच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे 66 % क्षेत्र व्यापलेले आहे. सागरी मैदानांवर वाऱ्यांनी वाहून आणालेले धुलीकण, ज्वालामुखीय राख, रासायनिक द्रव्यांचे अवक्षेपण, उल्कांचे तुकडे हे घटक गाळाच्या स्वरुपात सापडतात.
सागरी मैदानांवर कोबाल्ट आणि तांबे युक्त मॅगनीजचे लहान मोठया आकाराचे खडे आढळतात.
4 सागरी गर्ता- सागर तळांवर/ मैदानांवर काहीठिकाणे खोल व अरुंद आणि तीव्र उताराची सागरी भूरुपे आढळतात. त्यांना सागरी डोह/ गर्ता म्हणतात. हे
  सागरी डोह- साधारण सागरी तळ/ मैदानावरील कमी खोलीच्या भूरुंपास सागरी डोह म्हणतात.
  सागरी गर्ता-  सागरी तळ/ मैदानावरील जास्त खोलीच्या कमी रुदींच्या दूरवर पसरलेल्या भूरूपाला सागरी गर्ता म्हणतात. गर्ता सागर तळातील सर्वात खोल भाग आहे. त्या हजारो मीटरपर्यंन्त खोल असतात त्या भूपट्टांच्या सीमावर्ती प्रदेशात आढळतात. त्यामुळे जागृत ज्वालामुखीची व भूंकप प्रवणाची क्षेत्रे असतात. जास्त खोली व दुर्गमता यामुळे आता पर्यन्त 6000 मीटर खोल सागरीतळा पर्यंन्त तीनच मानसे जाऊ शकलेली आहे. मरीयांना गर्ता (11किमी/ 1100 मीटर खोल) तर जावा गर्ता (7.7किमी/ 7700 मीटर खोल) गर्ता आहेत. म्हणजेच सागरतळाच्या अतिखोल भागात मानव फारसा जाऊ शकलेला नाही. खोली, दुर्गमता या सारख्या प्रतिकुलतेमुळे गर्तांचा अभ्यास कमी झालेला आहे त्यामुळे माहीती ही कमीच आहे. म्हणून गर्ता बाबतचे आपले ज्ञान मर्यादीत आहे.   
5 जलमग्न रांगा व पठार-  सागरीताळावरील पर्वतरांगा ह जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. या पर्वतरांगा शेकडोकिलो मीटर रुंद व हजारोकिलोमीटर लांब असतात. काही सागरी उंचवटयांचे माथे समापा व विस्तृत असतात. त्यांना सागरी पठार म्हणतात. उदा. हिंदी महासागरातील छागोस चे पठार.
      सागरी बेटे- जलमग्न पर्वतरांगांच्या शिखंराचे भाग काही ठिकाणी सागरजल पातळीच्या वर आलेले असतात त्यांना आपण सागरी बेटे म्हणून ओळखतो.
बेटांचे प्रकार उदा-  
1  खंडीय बेटे-(बेटे भूमीखंडाचाच भाग आहे) मादागास्कर बेट- भारतीय महासागराचा वायव्येकडील भाग
2  ज्वालामुखीय बेटे-(ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेली बेटे) हवाई बेटे- पॅसिफिक महासागर
3  प्रवाळ बेटे-(प्रवाळ किटकांच्या संचयनापासुन तयार झालेली बेटे) ॲलडॅब्रा बेटे-अटलांटीक महासागर

Tuesday, 31 December 2019

प्रात्याक्षिक क्र 5,6,7 एकत्रित नकाशा क्र 47 E/6 अहमदनगर जिल्हा


प्रात्याक्षिक क्र 5  (नकाशा क्र- 2) स्थलनिर्देशक नकाशा क्र 47 E/6- भूउठाव

प्रस्तुत नकाशा हा डोंगराळ प्रदेशाचा आहे. व या नकाशातील सर्वात उंच ठिकाण 608 मीटर उंचीचे असुन ते नकाशाच्या नैऋत्यदिशेला ए-3 संदर्भ चौकोनात आहे. तर सी-1 चौकानात 581 मिटर उंचीचे ‍ठिकाण आहे. नकाशातील प्रदेशाची उंची 80 मीटर ते 650 मीटर च्या दरम्यान आहे. कमीत कमी उंची ही  ए-3 या संदर्भ चौकोनात आहे.  या नकाशा प्रदेशात पूर्वेच्या तुलनेत पश्चीमेची उंची कमी आहे म्हणजेच प्रदेशात उतार हा पर्वेकडून पश्चीमेकडे आहे. नदया/नाले ही पूर्वेकडून पश्चीमेकडे वाहत आहे. तसेच अग्नेय कोपऱ्यातील प्रदेशाची उंची दक्षिणेकडे कमी होत आहे. त्यामूळे सी -3 या संदर्भ चौकानात दिसत असलेल्या नदया/नाले दक्षिणेकडे वाहत आहेत असे म्हणता येईल. नकाशात दिसत असलेले गिरी शिखराकडील समोच्च रेषा जवळ जवळ असल्याने त्या तीव्र उतार दर्शवितात. तर नकाशातदिसणारा सखल भागात समोच्चता रेषा या ऐकमेकांपासून लांब अंतरावर आहेत. नकाशात 512 मी, 504 ते 508 मी. उचीं दर्शक आकडे दिसत असुन सदर भाग हा पेलंजी पठाराचा आहे ते सी-1 या संदर्भ चौकोनात आहे. याच संदर्भ चौकोनात खडकाळ स्वरुपाची जमीन दिसत आहे.

(प्रात्याक्षिक क्र 6 नकाशा क्र- 2) स्थलनिर्देशक नकाशा क्र 47 E/6‍ जलप्रणाली
       नकाशा प्रदेश डोंगराळ असून प्रस्तृत नकाशात जलाशये निळया रंगाने दर्शविलेले आढळतात. या नकाशातील जलप्रणाली वृक्षाकार असुन या नकाशात वैतरणा व तानसा या दोन प्रमुख नदया आढळून येत आहेत. याठिकाणी डोंगराळ भाग असल्याने अनेक जलविभाजक आढळतात. डोंगररांगा मुळे प्रमुख दोन्ही नदया वैतरणा व तानसा या दोन्ही नदयांची खोरी वेगळी झालेली  दिसतात.
       वैतरणा नदी नकाशाच्या ईशान्य भागातून वाहत येत अनेक वळणे घेतांना दिसत आहे. वैतारणा नदीस पूर्वेकडून भामा ही हगांमी नदी, केंगरी हंगामी नदी, उत्तरे कडून हातनी नदी  तसेच डोंगराळ भागातुन वाहत येणारे इतरही प्रवाळ येवुनमिळतांना दिसत आहेत.
       तानसा नदीस बी-2 या संदर्भ चौकोनातुन उगम पावतांना दिसत असुन ए-2 संदर्भ चौकोनातील तळवाडा ही हंगामी नदी तिला उत्तर दिशेकडून येवुन मिळते. या तानसा नदीवर तानसा बारमाही धरण बांधलेले आहे. अहमदनगर जिल्हा

(प्रात्याक्षिक क्र 7 नकाशा क्र- 2) स्थलनिर्देशक नकाशा क्र 47 E/6‍ नैसर्गिक वनस्पती जिवन
       नकाशा प्रदेश डोंगराळ असून येथे विस्तृत जंगले आढळतात. ते राखीव व खुल्या जंगलांच्या प्रकारात समावेश होतो. जास्त उंचीच्या भागात दाट ते जास्त दाट जंगले आहेत. ए-1, ए-2, ए-3 या संदर्भ चौकोनात मिश्र वने आहेत. नकाशाच्या नैऋत्य भागातही मिश्र वने आहेत. नकाशातील डोंगररांगाच्या दरम्यानच्या सखल भगात अनेक ठिकाणी विखुरलेले वृक्ष व खुरटया वनस्पती आढळतात. नकाशाचाजास्तीत जास्त भाग डोंगराळ असल्याने  लागवडी खालील क्षेत्र फारसे आढळत नाहीत. ए-1 व ए-2 या संदर्भ चौकोनात साग वृक्षाचे वनीकरण केलेले आढळते. तर सी-1 व सी-2  संदर्भ चौकोनात खुली अरण्ये दिसत आहेत.


प्रात्याक्षिक क्र 6 स्थलनिर्देशक नकाशा क्र 47 E/6‍ जलप्रणाली


(प्रात्याक्षिक क्र 6 नकाशा क्र- 2) स्थलनिर्देशक नकाशा क्र 47 E/6‍ जलप्रणाली
अहमदनगर 
       नकाशा प्रदेश डोंगराळ असून प्रस्तृत नकाशात जलाशये निळया रंगाने दर्शविलेले आढळतात. या नकाशातील जलप्रणाली वृक्षाकार असुन या नकाशात वैतरणा व तानसा या दोन प्रमुख नदया आढळून येत आहेत. या ठिकाणी डोंगराळ भाग असल्याने अनेक जलविभाजक आढळतात. डोंगररांगा मुळे प्रमुख दोन्ही नदया वैतरणा व तानसा या दोन्ही नदयांची खोरी वेगळी झालेली दिसतात.
       वैतरणा नदी नकाशाच्या ईशान्य भागातून वाहत येत अनेक वळणे घेतांना दिसत आहे. वैतारणा नदीस पूर्वेकडून भामा ही हगांमी नदी, केंगरी हंगामी नदी, उत्तरे कडून हातनी नदी  तसेच डोंगराळ भागातुन वाहत येणारे इतरही प्रवाळ येवुन मिळतांना दिसत आहेत.
       तानसा नदीस बी-2 या संदर्भ चौकोनातुन उगम पावतांना दिसत असुन ए-2 संदर्भ चौकोनातील तळवाडा ही हंगामी नदी तिला उत्तर दिशेकडून येवुन मिळते. या तानसा नदीवर तानसा बारमाही धरण बांधलेले आहे.
       या व्यतिरीक्त भातसाई, चापनाई, राखडी या ही हंगामी नदया नकाशात बी-1, सी-2 व सी-3 चौकोनात दिसत असुन त्या वळणावळणाने वाहत आहेत


Sunday, 15 December 2019

अकरावी ‌व्दितीय घटक चाचणी नमुना, गुण 25


व्दितीय चाचणी परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका 
इयत्ता - अकरावी
                                   विषय- भूगोल

वेळ-1.30 तास                                                             गुण-25

सूचना- 1 सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
2 उजवी कडील अंक प्रश्नाचे गुण दर्शवितात.
3. आवश्यकतेथे सुबक आकृत्या काढून भांगाना नावे दयावीत.

प्रश्न 1 अ- खालील अ-ब-क गटातील योग्य सहसंबध वापरुन सयुक्तीक साखळी पुर्ण 
करा.                                                               4

बर्फाचे वितळणे
मरियाना
जागतिक 8.5 टक्के क्षेत्र
सागरी गर्ता
समुद्र पातळीतील वाढ
पुर
सौरतापाचे परीणाम
भूखंडाची सिमा
आवर्त-प्रत्यावर्तात वाढ
खडांन्त उतार
अवकाळी पर्जन्य
11000 मीटर खोल

  
प्रश्न 1 ब- चुकीचा घटक ओळखा. 
                                                                    3
1   जागतिक तापमान वाढीचे कारणे
  )हरीत वायु उत्सर्जन ब) निर्वनीकरण क) सूर्याचे भासमान भ्रमण 
) औदयोगिकरण

2   सागरी बेटांचे प्रकार –
) खंडीय बेटे ब) ज्वालामुखीय बेटे क) गाळाच्या संचयनाने तयार झालेली 
बेटे ) प्रवाळ बेटे

3   सागरी मैदानात आढळणारे घटक –
)ज्वालामुखीय राख  ब) खनिज तेल  क) उल्कांचे तुकडे  ) लोह

प्रश्न 2  रा.  खालील प्रश्नाची भौगोलीक कारणे लिहा. (कोणतेही तिन)              9
      1 भविष्यात महासागरातील काही बेटे नकाशातुन नामशेष होण्याची शक्यता आहे.
      2 सध्याच्या काळात हवामान बदल अभ्यासणे गरजेचे आहे
      3 महासागराचे तळ हे खनिजांचे आगार असतात.
      4 महासागराखाली सुध्दा भूपष्ठावरील भूरुपांप्रमाणेच भूरुपे असतात.
      5. अवर्षण आणि पुरांच्या संखेत वाढ होत आहे.

प्रश्न 3 रा खालील पैकी कोणत्याही एका घटकावर टीप लिहा.                     4
      1 आकस्मीत पुर
      2‍ महासागरातील जैविक साधन संपत्ती   

                       
प्रश्न 4 था खालील पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर 
          लिहा.                                                        5
      1     महासागरातील प्रदुषण मानवासाठी कसे घातक आहे यावर चर्चा करा.
      2     जागतिक तापमान वाढीचे परीणाम