Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Monday, 18 May 2020

लोकसंख्या भूगोल वितरण व परिणाम करणारे घटक, Distribution of population, population density



                    लोकसंख्या भाग- 1


भूगोल अभ्यास - भूगोलात मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियाचा अभ्यास केला जातो. मानवी भूगोल ही भूगोलाची एक प्रमुख शाखा आहे. मानवी भूगोलाच्या एका शाखेत लोकसंख्येचा अभ्यास केला जातो, त्या शाखेस लोकसंख्या भूगोल असे म्हटले जाते.  लोकसंख्या भूगोलात लोकसंखेच्या 
गुणात्मक व संख्यात्मक रचनेचा 
लोकसंखेचा अर्थव्यवस्थेवर होणारा परीणाम 
प्रादेशीक विकास अशा मुद्दयांचा अभ्यास प्रामुख्याने होतो.  येथे आपण मानव एक संसाधन म्हणून अभ्यासणार आहोत.



 लोकसंख्या वितरण- जागतिक लोकसंख्येचे वितरण हे असमान आहे. म्हणजेच जगात सर्व प्रदेशात लोकसंख्या सारख्या प्रमाणात राहत नाहीत. ते खालील आकृतींच्या सहाय्याने समजावुन घेवू.




वरील आकृतींचे निरीक्षण करुन उत्तरे दया.

1) कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे-      ऑस्ट्रेलिया

2) भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबतीत कमी असलेला खंड-  ऑस्ट्रेलिया

3) ) भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला  खंड- (आशिया)

4) कोणत्या विभाजीत वर्तुळात एक खंड कमी आहे व का?-  लोकसंख्या वितरण दर्शविणाऱ्या खंडात अंटार्क्टिका खंड कमी असुन तेथे कायम (स्थायीक) वास्तव्य करणारी लोकसंख्या नाही.







खंडनिहाय लोकसंख्येच्या वितरणाची टक्केवारी-


खंड
भूमी %
लोकसंख्या %
आशिया
29.2
60
आफ्र‍िका
20.4
17
उत्तर अमेरीका
16.5
10
दक्ष‍िण अमेरीका
12
8
युरोप
6.8
4.75
आस्ट्रेलिया
5.9
0.55
अंटार्क्ट‍िका
9.2
स्थायी लोकसंख्या नाही
शिया खंडाची भूमी 30% तर त्यावर 60% लोकसंख्या राहते.

 आफ्रिका खंडाची भूमी 20% असुन तेथे जगाच्या तुलनेत 17% लोकसंख्या वास्तव्य करते.

जगाच्या तुलनेत उत्तर व दक्षिण अमेरिका खंडमिळून 28% भूक्षेत्र आहे तर येथे केवळ 18% लोकसंख्या आहे.

युरोपखंडाचे भूमीक्षेत्र जगाच्या तुलनेत 7% असुन तेथे जगातील 5% लोक राहतात.

ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी 6% असुन तेथे जगाच्या तुलनेत 1% सुध्दा लोकसख्या नाही.

अंटार्क्ट‍िका खंडाची भूमी 9% असुन तेथे स्थायिक लोकसंख्याच नाही.





लोकसंख्येची घनता-  एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण यावरुन लोकसंख्येची घनता काढता येते. लोसख्येची घनता म्हणजे दर चौ.किमी प्रदेशात राहणारी लोकांची संख्या होय.  ती पुढील सुत्राच्या सहाय्याने मिळविता येते.





जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांची लोकसंख्या घनता.
अक्र
देशांचे नाव
लोकसंख्या कोटी मध्ये
(2018 नुसार)
क्षेत्रफळ
(लक्ष चौ. किमी)
लोकसंख्येची घनता
1
चीन
142.8
96.0
149
2
भारत
135.3
32.9
411
3
अमेरीका सयुक्त संस्थान
32.7
95.3
34
4
इंडोनेशिया
26.8
19.1
140
5
पाकिस्तान
21.2
8.9
238
6
ब्राझिल
20.9
85.2
25
7
नायजेरिया
19.6
9.2
213
8
बांग्लादेश
16.1
1.5
1073
9
रशिया
14.6
171.0
9
10
मेक्सिको
12.6
19.7
64

लोकसंख्या वितरणाचा आकृतीबंध व लोकसंख्येची घनता यांमुळै एखादया क्षेत्रातील लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्टे सहजपणे जाणून घेता येतात.
लोकसंख्येच्या वितरणावर प्राकृतीक घटकांचा परिणाम झालेला असतो. ते खालील तक्याच्या अनुशंगाने लक्षात येईल. 



(प्रत्येक खंडात लोकसंख्या वाढीसाठी व विरळ लोकसंख्येसाठी परीणाम केलेल्या प्राकृतिक घटक यादी)




खंड
दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले प्राकृतिक घटक
कमी / विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले प्राकृतिक घटक
उ. अमेरिका
समुद्र किनारी प्रदेश, पंचमहासरोवरे व या सरोवरांचा मैदानी प्रदेश, गल्फचे व प्रेअरीज मैदानी प्रदेश, मिसिसिपी नदीचे सुपीक खोरे, हवामान
रॉकी व ॲपलेशियन पर्वत, कॅनडा च्या उत्तरेकडील अतिशित व हिमाच्छादीत हवामान, कोलोरॅडो वाळवंट  
द. अमेरिका
समुद्र किनारी प्रदेश, ॲमेझॉन व ओरिनिको नदयाचे सुपीक प्रदेश, उरग्वे-पराग्वे व पंपास मैदाने, हवामान
ॲडीज पर्वत रांगा, अटकामा वाळवंट, विषृवृत्तीय हवामान व विषृवृत्तीय जंगले,
युरोप
समुद्र किनारी प्रदेश, डॉगरबँक उथळ किनारे, होल्गा, ऱ्हाईन, डॅन्युब, पो नदयांचे सुपीक प्रदेश, समशितोष्ण हवामन, भूमध्य सागरी हवामान, गल्फस्ट्रीम,
आल्प्स, कॉकेशस, स्कॅडिनेव्हीयन, क्योलेन पर्वतीय प्रदेश; टुंड्रा व तैगा हवामान तसेच उत्तरेकडील प्रदीर्घ हिवाळे,
अफ्रिका
समुद्र किनारी प्रदेश, नाईल नदीचे मैदान, नायजर नदीचा त्रिभूज प्रदेश, व्हिक्टोरीया सरोवर, उत्तरेचे भूमध्य सागरी हवामान
विषृवृत्तीय हवामान, विषृवृत्तीय व कांगो नदी प्रदेशातील जंगले, उष्णकटीबंधीय हवामान, ॲटलास पर्वतीय प्रदेश, सहारा कलहारी वाळवंट 
आशिया
समुद्र किनारी प्रदेश, गंगा-सिंधू, हो-हँग-हो, यांगत्से, इ. नदयांचे मैदानी सुपीक खोरे, मेसोपोटेमिया मैदान, मोसमी हवामान, खनिजतेल व खनिज संपत्ती उपलब्धता
हिमालय, काराकोरम, हिंदकुश व इतर पर्वतीय प्रदेश, तिबेटच्या पठरावरील बर्फाच्छादन, सैबेरीया मैदानी प्रदेशातील दलदलीचा प्रदेश, गोबी, थर, अरेबियन  इ. वाळवंट, उत्तरेकडील तैगा हवामान
ऑस्ट्रेलिया
समुद्र किनारी प्रदेश, आयर सरोवर व मरे- डांर्लिग मैदानी प्रदेश (डाऊन्स गवळताळ प्रदेश), अंतर्गत जलप्रणाली, दक्षिणेकडील समशितोष्ण हवामान, उत्तरेकडील मोसमी हवामान, खनिज साठे
पर्वतीय प्रदेश, ग्रेट ऑस्ट्रेलियन डेझर्ट प्रदेश, मध्यवर्ती भागातील शुष्क हवामान व कमी पर्जन्य प्रदेश
अंटार्टीका
दाट लोकवस्ती नाही
वर्षभर बर्फाच्छादन व अतिथंड हवामान
 

कमी लोकसंख्येच्या प्रदेशावर परीणाम करणारे घटक- बर्फाच्छादीत प्रदेश, धृवालगतचे प्रदेश, वाळंवटी व  पर्वतीय प्रदेश तसेच प्रतिकुल हवामान इ.

जास्त लोकसंख्येच्या प्रदेशास अनुकुल घटक- किनारी प्रदेश, नदयांचे सुपीक मैदानी प्रदेश,

प्राकृतिक रचने शिवाय प्रभावी प्राकृतिक घटक- वने उदा. ॲमेझॉन व कांगो नदीचे खोऱ्यातील वंनाचा प्रदेश

प्राकृतिक रचना व वनाशिवाय लोकसंख्या वितरणावर परीणाम करणारे घटक-  मृदा, खनिज संपत्ती व  उर्जा साधनांची उपलब्धता, पाण्याची उपलब्धता



लोकसंख्या वितरणावर परीणाम करणारे प्राकृतिक व मानवी घटक-


अन
प्राकृतिक व मानवी घटक
जास्त घनता असलेले प्रदेश
कमी घनता असलेले प्रदेश
1
उंचसखलपणा
मैदानी प्रदेश- गंगा-सिंधू मैदान, यांगत्से मैदान
पर्वतीय प्रदेश-‍ हिमालय, रॉकी, ॲडीज
2
हवामान
भूमध्य सागरी हवामान- कॅलिफोर्निया, युरोप
मोसमी हवामान- भारत, श्रीलंका
पश्चिम युरोपीय हवामान- फ्रान्स,जर्मनी, चिली
विषववत्तीय हवामान- कांगो नदी खोरे
अतिशित हवामान-‍ ग्रिनलँड, आलास्का
उष्ण हवामान- सहारा, थर वाळवंट
3
सानसंपत्तीची उपलब्धता
सोन्याच्या खाणी- ऑस्ट्रेलिया
खनिज तेल साठे- दुबई व अरेबियन देश
साधन सपंत्ती उपलब्ध नसलेले प्रदेश- दलदलीचे प्रदेश
4
‍ आर्थिक
व्यापारी व आर्थिक केद्र- टोकीओ, मुबंई, सुरत
कमी आर्थिक वृध्दी- लुझियाना, अफ्रिकेतील मागासलले  देश
5
सामाजिक
सामाजिक एकता, मोठे कुटुंब,रुढी परंपरा- भारत,
यध्दजन्य परिस्थिती- अनेक देशांचा सिमावर्ती प्रदेश
6
सरकारी धोरणे
टोकीओ शहरातील नागरीकांनी टोकीओ शहर सोडण्यासाठी जपान सरकार प्रोत्साहन स्वरुप पैसे देवू शकत आहे. टोकीओची घनता कमी होण्यास सुरवात झाली आहे.
अस्थिर सरकारी धोरणांमुळे बाग्लांदेशतील अनेक निर्वासित भारतात प्रवेश करतात.
7
सांस्कृतीक
अनेक धार्मीक स्थळे – वाराणसी
शिक्षणामुळे-पुणे शहराची घनता वाढलेली आहे.
सांस्कृतीक घटकांमुळे सुरक्षीत स्थळी जातात- अरेबियन, आफ्रीकेतील काही देशातील लोकसख्या संख्या कमी झालेली आहे. 



लोकसंख्येचे असमान वितरण- . वरील अभ्यासावरुन असे लक्षात येते की जगात सर्व प्रदेशात लोकसंख्या सारख्या प्रमाणात राहत नाहीत.  अनुकुल प्राकृतिक घटक, सौम्य हवामान, खनिज संपत्ती उपलब्धता, सुपिक मृदा, पाण्याची उपलब्धता या गोष्टी लोकसंख्या वाढीस पुरक असतात, मात्र हे सर्व घटक पृथ्वीवर सर्वत्र सारख्या प्रमाणात वितरीत झालेले नाहीत. तसेच मानवी जिवनास त्रासदायक असलेले प्रतिकुल हवामान, पर्वतीय प्रदेश, वाळवंटी भाग, अति थंड व हिमाच्छादीत प्रदेश, घनदाट अरण्ये व दललदीचे प्रदेश, पाण्याचे दुर्भीक्ष असलेल्या प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते. असे घटकही पृथ्वीवर असमान वितरीत झालेले आहेत.  पृथ्वीवरील मानवी जिवनास अनुकुल व प्रतिकुल घटकांच्या असमान वितरणामुळे मानवी लोकसंख्येचे वितरण असमान झालेले आहे.



लोकसंख्येच्या वितरणावर परीणाम करणारे घटक-





) प्राकृतिक घटक-


1)  प्राकृतिक रचना ( भूरुपे)- i) मैदानी प्रदेशात विपुल जलसंपत्ती मुळे व सुपीक मृदेमुळे वैविध्यपुर्ण  शेती करण्यास हे प्रदेश समर्थ असतात. ii) शेती उत्पन्न व त्यावर आधारीत व्यवसाय व औदयागीकरणामुळे अशा प्रदेशत जास्त लोकसंख्या समावुन घेण्याची क्षमता असते त्याच बरोबर वाहतुक मार्गांच्या विकासामुळे मैदानी प्रदेशात लोकसंख्या जास्त आढळते. उदा. गंगा-सिंधू नदी मैदानी प्रदेश , यांगत्से व मिसिसिपी नदी पुरमैदांनाचा प्रदेश  iii) तर पर्वतीय प्रदेशात जास्त उंची, थंड हवामान, तीव्र उतार, अरण्ये, निकृष्ट मृदा यामुळे जिवन जगण्यास प्रतिकुल घटकांमुळे अनेक पर्वतीय भागात लोकसंख्या विरळ आढळते. उदा. रॉकी,हिमालय अँडीज पर्वतांचे प्रदेश.  iv)  परंतु पाण्याची व उदरनिर्वाहाची व्यवस्था असलेल्या पर्वतीय प्रदेशात काही प्रमाणात लोकसंख्या केंद्रीत झालेली आढळते. उदा. डेहराडून व इतर पर्वतीय पर्यटन स्थळे v)  पठारी प्रदेशात खनिज संपत्तीच्या उपलब्धतेमुळे व जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्यास येथे खनिज संपत्तीवर आधारीत जड उदयोग विकसीत होतात त्यामुळे येथे मध्यम लोकसंख्या आढळते. vi)  काही पठारांवर सुपिक मृदेमुळे लोकसंख्या जास्त आढळते. vii) समुद्रकिनारी प्रदेशातही अनुकुल हवामानामुळे खंडान्तर्गत भागा पेक्षा लोकसंख्या जास्त असते viii) म्हणजेच पठारी व पर्वतीय भागापेक्षा समुद्रकिनारी व मैदानी भागात लोकंसख्या दाट असते.


2) हवामान- अति थंड, अति उष्ण, वाळवंटी प्रदेश, अति पर्जन्याचे प्रदेश हे मानवी वस्तीस अनुकूल नसतात त्यामुळे तेथे लोकसंख्या कमी असते. उदा. विषृववृत्तीय हवामान, वाळवंटी प्रदेश  या उलट समशितोष्ण हवामान, भूमध्य सागरी हवामान, अल्हाददायक हवामात जास्त लोकसंख्या आढळते उदा. युरोप खंडातील देश


3) पाण्याची उपलब्धता- पाणी हा सर्व सजीवांसह मानवासाठीही महत्वाचा घटक असल्याने पाण्याच्या उपलब्धता असलेल्या ठिकाणी मानवी वसाहती विकसीत झालेल्या आढळतात उदा. नदयांच्या खोऱ्यातील प्रदेश व समुद्रकिनारी प्रदेशात दाट लोकसंख्या आढळते. वाळवंटातील मरुदयाण्याच्या प्रदेशातही लोकसंख्या आढळते उदा. भारतातील फलोदी, सौदी अरेबियातील अल् अहसा इ.


4) मृदा- सुपीक गाळाच्या मृदेच्या प्रदेशात शेती व्यवसाय विकसतील होतो त्यामुळे तेथे लोकसंख्या अधिक जाणवते उदा. भारतातील गंगा नदी, मिसिसिपी , यांगत्से या नदयांची पुर मैदानांचा प्रदेश. त्याच बरोबर ज्वालामुखीय मृदेच्या सुपीकतेमुळे ही ज्वालामुखीय पर्वतांच्या पायथ्याच्या प्रदेशात शेती व्यवसाय विकसीत होतो व येथेही लोकसंख्या जास्त आढळते. उदा. जावा, जपान, सिसिली







 


ब) मानवी घटक-


1) शेती- जलसिंचन, खतांचा वापर, यामुळे शेती उत्पादनात वाढ होते. त्याच बरोबर शेतीप्रकार, पीक पध्दत, लागवड पध्दत यामुळे शेती व त्यावर आधारीत लोकसंख्येवर परीणाम होतो अशा शेती प्रदेशात लोकसंख्या वाढते उदा. चीन, भारत, इंडोनेशिया, बांग्लादेश, जपान या आशिया खंडातील देशात वैशिष्टपूर्ण शेतीत भात पिकाचे उत्पादन जास्त असुन तेथे लोकसंख्या जास्त आढळते.


2) खाणकाम – चांगल्या प्रतिच्या खनिजांची असलेल्या क्षेत्रात अनेक उदयोग केंद्रीत होतात. त्यामुळे तेथे अनेक प्रकारच्या रोजगाराची निर्मीती होत असते. कुशल, अकुशल कामगार अशा प्रदेशात आल्याने हे प्रदेशत दाट बनतात. उदा. भारतातील छोटा नागपुर चे पठार, युरोप चा पश्चिम भाग, चीन मधील मांच्यरिया इ.

      खनिजाचे मुल्य जास्त असल्यास विषम नैसर्गिक परिस्थिती असतांनाही खनिजांचे उत्पादन घेतले जाते. व तेथेही लोकवस्ती दाट होते उदा. ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेशातील सोन्यांच्या खाणींचा प्रदेश व नैऋत्य आशिया खंडातील वाळवंटातील खनिज तेल उत्पादक प्रदेश.

3) वाहतूक – रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग यांच्या उपब्धतेमुळे प्रदेशात जाण्या-येण्यास सोईचे असते, त्यामुळे अशा प्रदेशात लोकसंख्या वाढते उदा. मुबंई शहर. याउलट जर जाण्या येण्यास कष्ट, वेळ व पैसा लागत असेल तर अशा प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी असते. उदा. डोंगराळ व ग्रामीण भागातील वस्त्या. सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमींचा शोध लागला बंदरांचा विकास होऊन व्यापारास चालना मिळते अशा किनारी प्रदेशात लोकसंख्या वाढलेली आढळते. 


4) नागरीकीकरण- लहाण मोठया उदयोगधंदयाच्या विकासामुळे छोटी मोठी शहरे विकसित होत असतात. तेथे लोकसंख्या वाढते व या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी वाहतुक व्यापार व इतर सेवा देणाऱ्या तृतीय व्यवसांमध्ये वाढ होते. त्याच बरोबर शैक्षणिक व वैदयकीय सुविधा, वाहतुकीच्या व मुलभुत सोईसुविधा यांची उपलब्धता, रोजगारामुळे  अनेक प्रदेशात शहरी वस्त्यांचे पट्टे आढळतात. उदा. पिपरी चिचंवड


5) राजकीय घटक व शासकीय धोरणे- शासनाच्या धोरणामुळे एखादया प्रदेशात लोकसंख्येचे केंदीकरण अथवा विकेंद्रीकरण होवू शकते. उदा. रशिया देशातील सैबेरीया या अतिविषम हवामानाच्या भागात लोकांनी स्थलांतरीत व्हावे यासाठी रशियन शासनाने विशेष भत्ते व इतर जिवणाआवश्यक सुविधा दिल्याने या प्रदेशात रशियन लोक स्थलांतरीत होत आहे. जपान मध्ये टोकीओ शहर सोडण्याकरीता तेथील प्रशासन लोकांना प्रोत्साहन स्वरुप पैसे देत आहे.

या शिवाय समुद्र किनाऱ्यापासूनचे अंतर, सुगमता, नैसर्गिक बंदरे, उर्जास्त्रोत, अंतर्गत जलवाहतुक सुविधा, कालवे, सांस्कृतिक घटक, स्थलांत,र आर्थिक क्रिया, तंत्रज्ञान  हे घटकही लोकसंख्येच्या वितरणावर परीणाम करतात.







24 comments:

  1. सर अत्यंत प्रभावी आणि शिक्षक विधार्थान 3 b उपयुकत मार्गदर्शन🙏👍

    ReplyDelete
  2. Knowledgeable notes by sir

    ReplyDelete
  3. Thank you sir 🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  4. Thank you sir 🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  5. Very Nice Notes

    ReplyDelete
  6. Thank you sir

    ReplyDelete