Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Sunday, 25 June 2023

फरक स्पष्ट करा. Differentaiate between

 फरक स्पष्ट करा. 


फरक स्पष्ट करा. Differentaiate between

प्रश्न 3 रा फरक स्पष्ट करा.

 

1) लोकसंख्या संक्रमण :  दुसरा टप्पा आणि लोकसंख्या संक्रमण:  चौथा टप्पा


2) लोकसंख्या वितरण : मैदानी प्रदेश आणि लोकसंख्या वितरण:  पर्वतीय प्रदेश


3) लोकसंख्या संक्रमण :  पहिला टप्पा आणि लोकसंख्या संक्रमण:  पाचवा टप्पा


4) कमी लोकसंख्येचे प्रदेश आणि जास्त लोकसंख्येचे प्रदेश

 
5) ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्युदर

 

 

 

 

 (फरक स्पष्ट करा. Differentaiate between)

●1) लोकसंख्या संक्रमण :  दुसरा टप्पा आणि लोकसंख्या संक्रमण:  चौथा टप्पा


अक्र

लोकसंख्या संक्रमण : दुसरा टप्पा

लोकसंख्या संक्रमण:  चौथा टप्पा

1

लोकसंख्या संक्रमणाच्या या टप्प्यास आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्पा म्हणून संबोधले जाते.

लोकसंख्या संक्रमणाच्या या टप्प्यास कमी बदल दर्शविणारा टप्पा म्हणून संबोधले जाते.

2

या टप्प्यात मृत्युदरात घट झालेली असते, परंतु जन्मदर स्थिर असल्याने लोकसंख्या झापाटयाने वाढत असते.

या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर कमी झालेले असतात. जन्मदर व मुत्युदर जवळजवळ सारखाच असतो त्यामुळे लोकसंख्या वाढ अत्यल्प असते.

3

या टप्प्यातील देशात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैदयकीय सुविधांचा विस्तार झालेला असतो.

या टप्प्यात उच्चतम वैदयकीय सुविधा उपलब्ध असतात पटकी, प्लेग सारख्या साथीच्या आजारांचा नायनाट झालेला असतो.

4

या टप्प्यातील देशात शेती व उदयोगधंदयातील उत्पादने वाढलेली असतात.

या टप्प्यातील देशात व्दितीय व तृतीय व्यवसायांचे प्रमाण प्राथमिक व्यवसायांपेक्षा खुप जास्त असते.

5

अधिक लोकसंख्या असणारेविकसनशील देश सध्या या टप्प्यातुन जात आहेत.  उदा. कांगो, बांग्लादेश, नायजर व युगांडा

अमेरिकेची संयुक्त सस्थांने हाविकसीत देश या टप्प्यातुन जात आहे.

 

 

 (फरक स्पष्ट करा. Differentaiate between)

●2) लोकसंख्या वितरण : मैदानी प्रदेश आणि लोकसंख्या वितरण:  पर्वतीय प्रदेश 


अक्र

लोकसंख्या वितरण:  मैदानी प्रदेश

लोकसंख्या वितरण:  पर्वतीय प्रदेश

1

100  मीटर पेक्षा कमी उंची असलेल्या सपाट व मंद उताराच्या प्रदेशास मैदानी प्रदेश म्हणतात

1000 मी. पेक्षा उंच, तीव्र उतार व शिखराकडे निमुळत्या होत गेलेल्या उंच प्रदेशास पर्वतीय प्रदेश म्हणतात.

2

मैदानी प्रदेशात जमीनीच्या सपाट भाग किंवा मंद उतारामुळे लोकसंख्येचे वितरण दाट आढळून येते.

पर्वतीय प्रदेशात तीव्र उतारामुळे लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते.

3

या प्रदेशात सुपिक गाळाची मृदा, जलसिचंन शेती सुघमता यामुळे लोकसंख्या वाढीस पुरकस्थ‍िती असते.

पर्वतीय प्रदेशात ओसाड किंवा नापिक जमीन, दुर्गम भाग, पाण्याचा अभाव यामुळे लोकसंख्या विरळ असते.

4

सपाट किंवा मंद उतारामुळे या प्रदेशात वाहतुक सुविधांचा विकास झालेला असतो.

तीव्र उतार व उंचसखलपणा यामुळे वाहतूक मार्ग फारसे विकसीत नसतात.

5

मैदानी प्रदेशात कच्च्या मालाची उपलब्धता, वाहतूक सुविधा या सारख्या पुरक स्थ‍िती उपलब्ध असल्याने उदयोगधंदयाचा  विकास झालेला असतो.  त्यामुळे लोकसंख्या एकवटलेली असते.

शेती अयोग्य जमीन, घनदाट जंगले दुर्गम प्रदेश यामुळे उदयोगधदयांना फारशी चालणा मिळालेली नसते.

6

उदा. भारतातील गंगा सिधु नदीचे खोरे, इजिप्त मधिल नाईल नदीचे खोरे, मिसिसीपी नदीचे खोरे

उदा. हिमालय पर्वत, रॉकी, अँडीज, ॲपलेशियन पर्वत रांगा

 

 (फरक स्पष्ट करा. Differentaiate between)

●3) लोकसंख्या संक्रमण :  पहिला टप्पा आणि लोकसंख्या संक्रमण:  पाचवा टप्पा 


अक्र

लोकसंख्या संक्रमण : पहिला टप्पा

लोकसंख्या संक्रमण:  पाचवा टप्पा

1

लोकसंख्या संक्रमणाच्या या टप्प्यास अतिशय स्थिर टप्पा म्हणून संबोधले जाते.

लोकसंख्या संक्रमणाच्या या टप्प्यास ऋणात्मक वाढीचा टप्पा म्हणून संबोधले जाते.

2

लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर दोन्ही जास्त असल्याने लोकसंख्या वाढ स्थ‍िर असते.

लोकसंख्या संक्रमणाच्या पाचव्या टप्प्यात जन्मदर खुप कमी होवुन मृत्युदराशी समान झालेला असतो.  त्यामुळे लोकसंख्या वाढ अत्यल्प असते.

3

जन्मदर जास्त असल्याने या टप्प्यातील प्रदेशात बालकांची संख्या जास्त असते.

या प्रदेशात जन्मदर कमी असल्याने बालकांची संख्या खुप कमी झालेली असते.

4

या टप्प्यातील देशात आर्थिक स्थ‍िती विकसीत नसते.

या टप्प्यात नागरिकांची व देशाची आर्थिक स्थ‍िती उत्तम असते.

5

या टप्प्यातील देशात शेती किंवा प्राथमिक व्यवसायांचे प्रमाण जास्त असते.

या टप्प्यातील देशात तृतीयक व्यवसायांचे प्रमाण सर्वाधिक असते.

6

या टप्प्यातील देशात शैक्षणिक संधी मर्यादीत असतात तर वैदयकीय सुविधांचा अभाव असतो.

 या टप्याच्या प्रदेशात शैक्षणिक व वैदयकीय सेवा उच्च दर्जाच्या असतात.

7

स्वच्छतेचा अभाव, मोठी कुटुंबे, संसर्गजन्य रोंगाचा प्रादुर्भाव, कुपोषण अशा अनेक समस्या या प्रदेशातील लोकांना असतात.

उत्तम आरोग्य, चांगले पर्यावरण व आंनददायी जीवन या टप्प्यातील नागरीकांचे वैशिष्ट असते.

8

सदयस्थ‍ितीत एकही देश या टप्प्यात नाही.

स्वीडन व फिनलँड  हे देश या टप्प्यात येतात.

 

 (फरक स्पष्ट करा. Differentaiate between) 

●4) कमी लोकसंख्येचे प्रदेश आणि जास्त लोकसंख्येचे प्रदेश 


अक्र

विरळ लोकसंख्येचे प्रदेश

जास्त लोकसख्येचे प्रदेश

1

150 पेक्षा कमी लोकसंख्येचे प्रमाण असणाऱ्या प्रति चौरस कि.मी. क्षेत्रास विरळ लोकसंख्येचे प्रदेश मानले जाते.

451 पेक्षा जास्त लोकसंख्येचे प्रमाण असणाऱ्या प्रति चौरस कि.मी. क्षेत्रास प्रदेश जास्त लोकसंख्येचे प्रदेश मानले जाते.

2

प्रतिकुल हवामान असणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते.

अनुकुल व सौम्य हवामानाच्या प्रदेशात लोकसंख्या जास्त आढळते.

3

वाळवंटी प्रदेश, घनदाट वने, हिमाच्छादीत प्रदेश, उंच पर्वतीय प्रदेश, धृवीय प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते.

सौम्य व अल्हाददायक व मोसमी हवामान, नदयांचे सुपिक मैदानी खोरे, पाण्याची उपलब्धता, समुद्र किनारी प्रदेशात लोकसंख्या जास्त आढळते.

4

या प्रदेशात मानवी जीवन खडतर असल्याने लोकसंख्या कमी असते

या प्रदेशात मानवी जीवनास उपयुक्त अशी स्थिती उदयोगधंदयाचा विकास, वाहतुक सुविधा यामुळे  लोकसंख्या जास्त असते.





 (फरक स्पष्ट करा. Differentaiate between)

 ●5) ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्युदर

 

अ क्र

ढोबळ जन्मदर

ढोबळ मृत्युदर

1

एका प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांच्या (अर्भकांच्या) संख्येच्या दराला ढोबळ जन्मदर म्हणतात

एका प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे मूत्यु पावलेल्या आलेल्या बालकांच्या (अर्भकांच्या) संख्येच्या दराला ढोबळ जन्मदर म्हणतात

2

ढोबळ जन्मदर लोकसंख्येतील बदलात महत्वाची भूमीका बजावतो.

ढोबळ मृत्युदराची जन्मदराप्रमाणेच लोकसंख्येतील बदलात भूमीका असते.

3

ढोबळ जन्मदर हा वाढता असल्यास त्या प्रदेशातील लोकसंख्या वाढत असते.

जन्मदरापेक्षा मृत्यूदर कमी अथवा जास्त असल्यास त्या प्रदेशातील लोकसंख्या कमी अथवा जास्त होते. 

4

 ढोबळ जन्मदराचे प्रमाण कमी असलेले देश विकसीत असतात तर ढोबळ जन्मदराचे प्रमाण जास्त असलेले प्रदेश विकसनशील किंवा अविकसीत असतात.

अविकसतील देशात ढोबळ मृत्यूदर जास्त आढळतो.  तर विकसीत देशात मृत्युदराचे प्रमाण कमी असते.

5

सन 2017 ची आकडेवारी नुसार ढोबळ जन्मदर जास्‍त असलेला देश नायजर (46.5) आहे. तर ढोबळ जन्मदर कमी असलेला प्रदेश ग्रीस (8.2) आहे

सन 2017 ची आकडेवारी नुसार ढोबळ मृत्युदर जास्त असलेला प्रदेश ग्रीस (11.6)  आहे. तर मृत्युदर कमी असलेला प्रदेश भारत (7.2) आहे. 

 

 अधिक माहीतीसाठी खालील मुदृयांवर क्लिक करा.

बारावी भूगोल नकाशावरील प्रश्न

वस्तूनिष्ठ प्रश्न : अचूक घटक ओळखा

योग्य पर्याय निवडून विधाने पुर्ण करा

Online Test : अचूक सहसंबध ओळखा 














 

 

 


4 comments: