उद्देश-
दिलेली सांख्यिकीय माहीती विभाजित वर्तुळाव्दारे दर्शविणे
उद्दिष्टे- 1) नकाशामध्ये विविध प्रकारची आकडेवारी व त्यांचे उपघटक
दर्शविण्यासाठी विभाजित वर्तुळाचा उपयोग केला जातो.
2) आकृतीवरुन
सांख्यिकीय माहितीचे सविस्तर वर्णन करणे.
3) विभाजित
वर्तुळात दर्शविलेल्या विदेचे विश्लेषण करणे......
उदा. 1) खालील सांख्यिय माहिती विभाजित वर्तुळाच्या साहाय्याने
दर्शवा.
अक्र |
रस्त्यांचा प्रकार |
रस्ते बांधणी (किमी) |
1 |
राष्ट्रीय
महामार्ग |
2970 |
2 |
राज्य महामार्ग |
30548 |
3 |
प्रमुख जिल्हा
मार्ग |
37234 |
4 |
इतर जिल्हा मार्ग |
36403 |
5 |
ग्रामीण रस्ते |
76602 |
निष्कर्ष- प्रस्तृत विदेत ग्रामीण रस्त्यांचे
बांधणीचे प्रमाण सर्वात जास्त म्हणजेच 150 अंश (76602 कि.मी.
)
आहे. तर सर्वात कमी रस्ते बांधणी राष्ट्रीय महामार्गांची 2970 इतकी असुन त्याचे
विभाजित वर्तूळातील मूल्य 5.82 अंश आहे. तर राज्य महामार्ग यांची बांधणी 30548
किमी असुन त्यांचे विभाजित वर्तुळातील अंशात्मकमुल्य हे 59.85 आहे. विदेत प्रमुख जिल्हामार्ग व इतर
जिल्हामार्गाची अंशात्मक विभागणी अनुक्रमे 72.95 व 71.32 अंश असल्याचे लक्षात येत
आहे.
__________________________________________________________________________________________
उदा. 2) एका प्रदेशातीलकिती पर्यटक विविध
गंतव्यस्थांनाना गेले याचे वितरण खालील माहिती दाखवते. दिलेल्या विदेला विभाजित
वर्तुळाव्दारे दाखवा आणि विदेचे विश्लेषण करा.
गतव्य स्थान |
पर्यटकांची संख्या |
अभयअरण्ये व प्राणीसंग्रालय |
300 |
ऐतिहासिक स्मारके |
200 |
थीम पार्क |
350 |
संग्रालये आणि कलादालने |
150 |
नदयांचे आणि समुद्र किनारे |
250 |
|
1250 |
निष्कर्ष- प्रस्तृत विदेवरुन असे लक्षात येते की सर्वात
जास्त (350) पर्यटकांनी
हे थीमपार्क स्थळांना भेटी दिलेल्या आहेत. त्याचे विभाजित वर्तुळातील अंशात्मक मूल्य
101 अंश आहे. तर अभयअरण्ये व प्राणी संग्रलायांना
300 पर्यटकांनी (86 अंश ) भेटी
दिलेल्या आहेत. ऐतिहासिक स्मारके व सग्रालये आणि कलादालने यांना 58 अंश व 43 अंश पर्यटकांनी
भेटी दिलेल्या असुन नदयांचे व समुद्रकिनारे यांना 250 (72अंश) पर्यटकांनी भेटी दिलेल्या आहेत.
___________________________________________________________________________________________________________________________________________________
उदा. 3) खालील
विदा शहरामधील भूमी उपयोजनाचे वर्गीकरण दर्शविते. विभाजित वर्तुळाच्या सहाय्याने
दिलेल्या विदेचे सादरीकरण करा. विदेचे विश्लेषण करा.
भूमी उपयोजन |
भूमीची टक्केवारी |
निवासी |
52 |
व्यावसासिक |
15 |
औदयोगिक |
8 |
शेती |
2 |
मोकळी जागा |
5 |
संमिश्र |
18 |
एकूण |
100 |
निष्कर्ष- प्रस्तृत विदेवरुन शहरात सर्वात जास्त भूमीचे
उपयोजन निवासी भागासाठी 52% झाले असल्याचे आढळून येत
आहे. तसेच व्यावसासिक व औदयोगिक कामांसाठी
भूमीचे उपयोजन 15% व 8% असुन त्याचे विभाजित वर्तुळातील अंशात्मक मुल्य हे 54 व 29
आहे. शहरातील सर्वात कमी भूमीचा वापर हा शेतीसाठी असुन त्यांची टक्केवारी 2 आहे व
विभाजित वर्तुळात त्याचे अंशात्मक मुल्य हे 7 आहे. शहरातील मोकळी जागा व संमिश्र
भूमी उपयोजनाची टक्केवारी 5 व 18 असुन त्यांचे विभाजित वर्तुळातील अंशत्मक मूल्य
अहे 18 व 65 आहे.
_______________________________________________________________________________________________________________________
उदा. 4. एका प्रदेशात विविध प्राकृतिक भूरूपांनी
किती भूमी व्यापली आहे, याची माहिती पुढील कोष्टकात
दिली आहे. विभाजित वर्तुळाच्या मदतीने विदा दर्शवा आणि विश्लेषण करा.
प्राकृतिक भूरुपे |
भूमी % |
डोंगर |
10 |
मैदाने |
40 |
पठार |
30 |
अति उंच पर्वत |
20 |
एकुण |
100 |
निष्कर्ष-
प्रस्तृत प्रदेशात सर्वात जास्त मैदान हे भूरूप असून, त्या खालोखाल पठार हे भूरूप
आहे. तर डोंगर हे भूरूप 10% असून अतिउंच पर्वतांची टक्केवारी 20 आहे.
____________________________________________________________________________________________________________________________________________________________
उदा क्र 5 खालील विदेसाठी विभाजित वर्तुळ काढा व आपले निष्कर्ष लिहा.
भारताची विविध देश
प्रदेशात होणारी निर्यात. (टक्केवारी)
देश - प्रदेश |
निर्यातीची टक्केवारी |
युरोपियन संघ |
22.3 |
अमेरीकेची संयुक्त संस्थाने आणि
कॅनडा |
20.1 |
ओपेक |
15 |
आफ्रिकी देश |
4.5 |
आग्नेय आशियाचे देश |
28.9 |
कॅरेबियन देश |
2.2 |
इतर |
7 |
निष्कर्ष- भारताची सर्वात जास्त् निर्यात ही आग्नेय
आशियायी देशांसोबत आहे. तर युरोपियन संघ
देशाशी 22.3% आढळून येत आहे. तर अमेरिकेची
संयुक्त सं. आणि कॅनडा यांच्य 20.1 %निर्यात आहे. ओपेक
राष्ट्रांसोबत 21% ,आफ्रिकी देश 4.5%, कॅरेबीयन
देश 2.2% निर्यात भारताची वरील विभाजीत वर्तुळात आढळुन येत आहे. इतर देशांसोबत 7% निर्यात असल्याचे ही लक्षात
येते.
खालील लिंकचा वापर करुन
विविध व्हिडीओ पहा
1 प्रात्यक्षिक क्र 08
स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण सर्व प्रश्नांची उत्तरे.
2 प्रात्यक्षिक क्र 4 विदा विश्लेषण
गुणानुक्रम सहसंबंध
3 बारावी प्रात्यक्षिक नमुना
प्रश्नपत्रिका- प्रश्नपत्रिका आराखडा, मुल्यमापन योजना व अंतर्गत गुण विभागणी