प्रात्यक्षिक क्र 08
स्थल निर्देशक नकाशाचे विश्लेषण: मानवी वस्ती
उद्देश- स्थल निर्देशक नकाशाचे विश्लेषण मानवी घटकांच्या सहाय्याने करणे.
उद्दिष्टे- 1) स्थल निर्देशक नकाशात मानवी वस्ती कशा पध्दतीने
दर्शविल्या जातात हे जाणून घेणे.
2) प्राकृतिक
घटक आणि मानवी वस्तींमधला सहसंबंध जाणून घेणे.
स्थल निर्देशक नकाशा 63 K / 12 यावर आधारीत प्रश्नांचे
स्पष्टीकरण
1) नकाशातील मोठया वस्त्या / शहरे कोणती ?
उत्तर- प्रस्तृत
63 K / 12 नकाशात सर्वात मोठे मिर्झापूर नावाचे जिल्हयांचे
शहर आहे, तसेच विंध्याचल, खमना, खारार, कच्छवा इ. या वस्त्या देखील मोठया आहेत.
2) नकाशात ग्रामिण
वस्त्या जास्त आहेत की शहरी ?
उत्तर- प्रस्तृत
63 K / 12 नकाशात ग्रामिण वस्त्यांचे प्रमाण जास्त् आहे.
3) पठारी प्रदेशावर
वस्त्यांच्या कोणता प्रकार आढळतो का ? का ?
उत्तर- प्रस्तृत
63 K / 12 नकाशात दक्षिण दिशेला पठारी भाग
असुन तेथे विखुरलेल्या स्वरुपात / विरळ ग्रामीण वस्त्यांचे प्रकार आढळतात. काही
वस्त्या रेषीय प्रकाराच्या देखील आढळत आहेत.
4) मैदानी
प्रदेशावर वस्त्यांचा कोणता प्रकार आढळतो.? का ?
उत्तर- प्रस्तृत
63 K / 12 नकाशाच्या उत्तरेस गंगा नदीचा सुपिक गाळाचा मैदानी
प्रदेश असुन तेथे केंद्रीत स्वरुपाच्या वस्त्यां आढळतात. कारण हा प्रदेश सुपिक
गाळाचा असल्याने येथे शेती व त्यावर आधारीत इतर व्यवसाय, रोजगार उपलब्ध असल्याने
लोकसंख्येच्या जास्त घनतेमुळे तेथे वस्त्यांचे केंद्रीकरण झालेले असावे. या
प्रदेशात येथ रेषीय व त्रिकोणकृती वस्त्यांचे प्रारुप काही प्रमाणात आढळते
5) नकाशात कोणत्या
दिशेस मर्झापुर शहराची वाढ होत आहे. ?
उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशात
मिर्झापूर शहराच्या उत्तरेस गंगा नदीचा नैसर्गिक अडथळा असल्याने मिर्झापुर शहराच्या
उत्तर दिशेस वाढीवर नदीमुळे मर्यादा आलेल्या आहेत, परंतू पुर्व-पश्चिम बाजुस नदीला
समांतर शहराची वाढ झालेली दिसते तसेच दक्षिण दिशेला शहराची वाढ झालेली आहे.
6) मिर्झापुर
शहराच्या पश्चिम दिशेस कोणते नगर वसलेले आहे.
उत्तर- प्रस्तृत
63 K / 12 नकाशात मिर्झापुर शहराच्या पश्चिमेस विध्यांचल नगर
वसले असल्याचे आढळून येत आहे.
7) गंगा नदीच्या
उत्तरेस असलेल्या बाजारपेठा असलेली दोन शहरे कोणती.
उत्तर- प्रस्तृत
63 K / 12 नकाशात खामरीया, कच्छवा, मजवान, खरार व खमना हे
बाजारपेठेची काही शहरे आढळतात.
8) नकाशाच्या
वायव्य भागात कोणते शहर वसले आहे. ?
उत्तर- प्रस्तृत
63 K / 12 नकाशात खमारीया व खमना हे शहरे वसलेले दिसून येत
आहेत.
9) पठारी भागातील
वनप्रदेश वस्तीहीन का असावा. ?
उत्तर- प्रस्तृत
63 K / 12 नकाशात दक्षिणेकडे पठारी भाग असुन I)
येथे समोच्चता रेषा जवळजवळ
असल्याने हा प्रदेश तीव्र उताराचा असावा, II)
बरकच्छा या राखीव जगलामुळे येथे
मानवी क्रियावर निर्बध आहेत III)
या भागात वाहतूक व इतर सुविधांचा
अभाव आहे या प्रतिकुलतेमुळे पठारी वनप्रदेश वस्तीहीन असवा.
10) नकाशातील
कोणत्या भागात लोकसंख्येची घनता जास्त आहे.
उत्तर- नकाशातील पश्चिम व उत्तर भागात लोकसंख्येची घनता
जास्त आहे तसेच गंगा नदीच्या किनाऱ्यावर्ती भागात देखील लोकसंख्या जास्त आहे.
11) लोकसंख्या
वितरणाच्या आकृतीबंधावर भाष्य करा.
उत्तर-
प्रस्तृत 63 K / 12 नकाशात लोकसंख्या आकृतीबंधावर प्राकृतीक रचनेचा प्रभाव जाणवतो
नकाशाच्या उत्तर भागात गंगेच्या किनारी प्रदेशात शेती व्यवसायाच्या विकासामुळे
लोकसंख्या घनता जास्त आढळते तर नकाशाच्या दक्षिण भागात पठारी प्रदेशात बरकच्छा
आरक्षित जंगलामुळे लोकसंख्या विरळ आढळते.
_______________________________________________________________________________________________________________________________________________
स्थल निर्देशक नकाशा 47 J / 15 यावर आधारीत प्रश्नांचे स्पष्टीकरण
1) नकाशातील मोठ्या
वस्त्यांची नावे सांगा?-
उत्तर-
प्रस्तृत 47 J / 15 नकाशात
भिगवन व राशीन या मोठया वस्त्या आढळून येत आहेत.
2) नकाशात ग्रामीण
वस्त्या का शहरी वस्त्या जास्त आहेत?
उत्तर-
प्रस्तृत 47 J / 15 नकाशात
ग्रामीण वस्त्याचे प्रमाण शहरी वस्त्यांपेक्षा जास्त आहेत
3) मैदानी प्रदेशात
वस्त्यांचा कोणता प्रकार आढळतो?
उत्तर-
प्रस्तृत 47 J / 15 नकाशात
रेषाकृती वस्त्यांचे प्रारुप आढळून येत आहे. कारण भीमा नदीच्या व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक
9
च्या दोन्ही बाजुला वस्त्या सरळ रेषेत विकसीत झालेल्या असल्याने या नकाशात
रेषाकृती वस्त्या आढळतात.
4) भिगवण ही वसाहत
नकाशाच्या कोणत्या भागात आहे ?
उत्तर-
प्रस्तृत 47 J / 15 भिगवण
ही वसाहत नकाशाच्या नैऋत्य भागात आहे
5) भीमा नदीच्या
किनारी वसलेली कोणतेही दोन वस्त्यांची नावे सांगा?
उत्तर-
प्रस्तृत 47 J / 15
कुंभारगाव, डिकसळ, खेड, वाटलुज इ.
6) नकाशाच्या
कोणत्या भागात लोकसंख्येची घनता जास्त आहे?
उत्तर-
प्रस्तृत 47 J / 15 नकाशात नैऋत्य भागात लोकसंख्येची घनता जास्त
आहे.
बारावी भूगोल काही महत्वाचे व्हिडीओ खालील लिंकवर जाऊन पहा
1 ) बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा
2) बारावी भूगोल अयोग्य / चूकीचा घटक ओळखा Identify the wrong components
3) A : विधान R: कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा
4) बारावी भूगोल सरावप्रश्न संचातील अचूक सहसंबंध ओळखुन साखळी पूर्ण करा चे उत्तरे
5) बारावी प्रात्यक्षिक भूगोल प्रश्नपत्रिका नमुना आराखडा, अंतर्गत मुल्यमापन व गुणदाण
6) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 04 विदा विश्लेषण: गुणानुक्रम सहसंबंध
7) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 08 स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण : मानवी वस्ती
8) बारावी भूगोल लोकसंख्या भूगोल भाग -1 लोकसंख्या वितरण व घनता