Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Showing posts with label विभाजित वर्तुळाचे फायदे. Show all posts
Showing posts with label विभाजित वर्तुळाचे फायदे. Show all posts

Friday, 12 March 2021

विभाजित वर्तुळाचे फायदे ,तोटे व उपयोग



विभाजित वर्तुळाचे फायदे

* विभाजित वर्तूळ समजण्यास अतिशय सोपे असते.

* अज्ञात लोकांनाही विभाजित वर्तूळाव्दारे माहितीचे प्रभावी संप्रेषण होऊ शकते.

* विभाजित वर्तुळाव्दारे एका दृष्टीक्षेपात माहितीचे विश्लेषण करता येते व माहिती समजते.

* एकाच प्रकारच्या गटाच्या माहितीची तुलना करण्यासाठी उपयोगी

* विभाजित वर्तुळामुळे संख्येच्या परीक्षणाची आवश्यकता भासत नाही, आकृतीव्दारे निष्कर्ष काढता येतात

* दिलेल्या माहितीची व्याप्ती समजते.

* संख्यात्मक माहितीतील आकडेवारी मोठी असल्यास व हाताळण्यास किचकट असल्यास अशा माहितीचे विश्लेषण विभाजित वर्तुळाव्दारे चटकण होवू शकते.

* विभाजित वर्तुळात आपणास ज्या घटकावर जास्त प्रकाश टाकावयाचा आहे अशा घटकाची पाकळीचा   क्रम बदलवीता येणे शक्य असते.

 

 

 

विभाजित वर्तुळाचे तोटे

·         माहितीचे जास्त उपविभाग असल्यास विभाजित वर्तुळ समजण्यास कमी प्रभावी ठरते. तर काही वेळेस विभाजित वर्तुळ काढणे शक्य नसते.   

·         विभाजित वर्तुळाव्दारे एकाच प्रकारच्या माहितीच्या संचाची तुलना होते. ज्या ठिकाणी माहितीचे अनेक संच (गट) असतात तेथे विभाजित वर्तुळ प्रभावी नसते.

·         विभाजित वर्तुळाचे विश्लेषण करतांना तुलनात्मक चित्रामुळे चूका होवू शकतात किंवा वाचकांना त्रास होतो. तसेच विभाजित वर्तुळावरुन केलेले विश्लेषण ढोबळ स्वरुपाचे असते.

·         तसेच आकृतीवरुन घटकाचे अचूक मुल्य काढता येत नाही.   

·         कमी अंशात्मक फरक असलेल्या माहितीची अथवा उपविभागाची तुलना करतांना समस्या निर्माण होतात.

·         संख्यात्मक माहितीचे विश्लेषणाऐवजी आकृतीवर आधारीत विश्लेषणात चुकीचे निष्कर्ष निघू शकतात.

·         निगेटीव्ह (ऋणात्मक) व पॉझिटिव्ह (धनात्मक) माहितीच्या एकत्रीत विश्लेषणात विभाजित वर्तुळ प्रभावहिन असते.



उपयोग

विभाजित वर्तुळ घटकांचे वर्गीकरण करण्यास उपयुक्त असते.


विभाजित वर्तुळाचा उपयोग सामान्यत: टक्केवारी किंवा प्रमाणित माहिती दर्शविण्यासाठी होतो.


सामान्यत: प्रत्येक श्रेणीद्वारे दर्शविलेले टक्केवारी / आकडेवारी विभाजित वर्तुळाच्या पाकळीच्या पुढे प्रदान केली जात असल्याने माहीतीची तुलना करण्यास उपयोगी असते.


विभाजित वर्तुळ विदेचे सामान्य निष्कर्ष काढण्यास उपयोगी असते .


एकाच प्रकारच्या विदेच्या उपघटकांचे निरीक्षण व तुलना विभाजित वर्तुळावरुन करता येते.