Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Friday, 5 February 2021

ONLINE TEST बारावी भूगोल प्रकरण 3 व 4

 

ONLINE TEST  बारावी भूगोल प्रकरण 3 व 4     Prof Manoj Deshmukh 9421680541


प्रकरण तीन  मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
प्रकरण चार प्राथमिक आर्थिक क्रिया



1 अ ) चूकीचा पर्याय निवडा      
1 ब ) अचूक पर्याय निवडा










Prof Manoj Deshmukh 
9421680541 
Rashtrya Junior College Chalisgaon


ONLINE TEST  बारावी भूगोल प्रकरण 3 व 4 

 

 

बारावी भूगोल काही महत्वाचे व्हिडीओ खालील

 लिंकवर जाऊन पहा

 

1) बारावी भूगोल चूक की बरोबर ते लिहा व सुचनेनुसार विधाने पुर्ण करा

https://youtu.be/y7S0_FLB6Us

 

2) बारावी भूगोल अयोग्य / चूकीचा घटक ओळखा  Identify the wrong components

https://youtu.be/pPiKbGIMHko

 

3) A : विधान  R: कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा

https://youtu.be/FbKA5p0OZkQ

 

4) बारावी भूगोल अचूक गट ओळखा Identify the correct  group

https://youtu.be/vGMMqbUQ3RU

 

5) बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील योग्य पर्याय (घटक) निवडून विधाने पूर्ण करा

https://youtu.be/dfCtcZRaAS8

 

6) बारावी भूगोल सरावप्रश्न संचातील अचूक सहसंबंध ओळखुन साखळी पूर्ण करा चे उत्तरे  Complete the chain

https://youtu.be/tBnCdVUJJec




7) बारावी प्रात्यक्षिक भूगोल प्रश्नपत्रिका नमुना आराखडा, अंतर्गत मुल्यमापन व गुणदाण

https://youtu.be/15M2--84Wes

 

8) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 04 विदा विश्लेषण: गुणानुक्रम सहसंबंध

https://youtu.be/SlPxwutolcs

 

9) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 08 स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण :  मानवी वस्ती

https://youtu.be/kTQSw8hkrAU

10)  बारावी भूगोल लोकसंख्या भूगोल भाग -1 लोकसंख्या वितरण व घनता

https://youtu.be/Rx23_PLs4Ck
















 

ONLINE TEST  बारावी भूगोल प्रकरण 3 व 4 

Saturday, 30 January 2021

ONLINE TEST- 3 अकरावी भूगोल प्रकरण 3 व 4 वस्तूनिष्ठ प्रश्न

 

ONLINE TEST- 3   अकरावी भूगोल प्रकरण 3 व 4 वस्तूनिष्ठ प्रश्न

Prof Manoj Deshmukh      9421680541










रिटेल व होलसेल बुकींग साठी संपर्क 

9403386299,

9421680541 




अधिक माहीतीकरीता खालील लिंकवर क्लिक करा.









































Wednesday, 27 January 2021

अकरावी- समर्थ भूगोल प्रात्यक्षिक वही (जर्नल)

अकरावी- समर्थ भूगोल प्रात्यक्षिक वही (जर्नल) ची वैशिष्टे:

 

1 प्रात्यक्षिक वहीची ‘अ’ व ‘ब’ अशा दोन भागात विभागणी

 

2 ‘अ’ भागात विदयार्थ्यांना प्रात्यक्षिक लिखाण करणे कामी मुद्दे निहाय जागा.

 

3 मुद्देसुद लिखाण व लिखाणा पेक्षा कृतीवर भर

 

4 प्रात्यक्षिक करणे व लिखाणासाठी ‘ब’ भागात आकृत्या व मार्गदर्शन

 

5 नमुना प्रश्नपत्रीका                          

 

                              

 

संपर्क प्रा मनोज देशमुख.

राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज

चाळीसगाव

9421680541                 

9403386299





Thursday, 14 January 2021

इयत्ता अकरावी – भूगोल नोट्स् – पुस्तक परिचय

 इयत्ता अकरावी – भूगोल नोट्स् – पुस्तक परिचय

लेखक : प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख

नोट्स ची वैशिष्टे

1) शिक्षक व विदयार्थ्यांसाठी उपयोगी

2) शिक्षकांसाठी वर्गात नोट्स लिखाण करुन देणे कामी सोप्या भाषेत आवश्यक आकृत्या व नकाशासह स्पष्टीकरणास उपयोगी

3) विदयार्थ्यांसाठी स्वाध्यायापेक्षा जास्त व सर्व प्रकारचे प्रश्न व त्यांची सोप्या भाषेत उत्तरे

4) सर्व प्रकरणांवर सर्व प्रकारचे वस्तूनिष्ठ प्रश्नांचा समावेश

5) प्रकरणातील जरा विचार करा, करुन पहा, जरा डोके चालवा, शोधा पाहू, थोडे आठवूया अशा घटकांच्या बाबतीतही मार्गदर्शन

6) प्रश्नपत्रिका आराखडयानुसार स्वध्यायापेक्षा जास्तीचे प्रश्न-उत्तरे

7) प्रत्येक प्रकरणावर नोट्स व प्रश्न-उत्तरे अशा दोन विभागात रचना

8) आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे यांचा समावेश

9) पाठय पुस्तकाबाहेरील नमुना उतारे

10) नमुना प्रश्नपत्रिका (घटक चाचणी, सहामाही, वार्षिक )

11)  तज्ञ व अनुभवी भूगोल शिक्षकांकडून नोट्स चे परिक्षण

12) आवश्यकेते नुसार आकृत्या व नकाशांचा समावेश

13) पोस्ट पार्सल / कुरीयर सेवा / एस टी पार्सल व्दारे पुस्तक पाठविण्याची व्यवस्था

14) रिटेल व होलसेल बुकींग 14 जानेवारी पासुन सुरु   

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

संपर्क: 

लेखक : प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख

राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज, 

चाळीसगाव

जि.जळगाव

9403386299, 

9421680541

---------------------------------------------------------------------------------------------------------------

किंमत: रु. 130 + पोस्टेज + कुरियर 


पैसे गुगल पे, फोन पे किंवा नेट बँकिंग ने पाठवावेत.

गुगल पे, फोन पे नंबर: 9403386299

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

















Monday, 9 November 2020

अकरावी भूगोल मधील ज्वालामुखी, ज्वालामुखीचे वर्गीकरण, ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाहेर पडणारे पदार्थ, ज्वालामुखीय भूरुपे


ज्वालामुखी

ज्वालामुखी- सर्वसामान्य पणे बाह्य प्रावरणातून वायूरुप, द्रवरुप लाव्हा आणि घनरुप पदार्थ हे उद्रेकाच्या स्वरुपात पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात, त्या प्रक्रियेस ज्वालामुखी असे म्हणतात.



ज्वालामुखीचे वर्गीकरण-

1 उद्रेकानुसार-  I) केंद्रीय उद्रेक                              


II) भेगीय उद्रेक

 



2 कालावधी सातत्य यावरुन

I) जागृत ज्वालामुखी, (जपान- फुजियामा, भूमध्यसागरातील स्ट्राँम्बोली)


II) निद्रिस्त ज्वालामुखी, (इटली-व्हिस्यूव्हियस,  अलास्का- काटमाई) 


 III) सुप्त किंवा मृत ज्वालामुखी- (आफ्र‍िकेतील माउंट किलीमांजारो)


ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाहेर पडणारे पदार्थ-

A) द्रवरुप पदार्थ-  यामध्ये वितळलेल्या खडकांच्या द्रवरुप पदर्थांचा समावेश असतो. यास भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात मॅग्मा व भूपृष्ठावर आल्यानंतर लाव्हा असे म्हणतात. द्रवरुप पदर्थांचे सिलीकांच्या असलेल्या प्रमाणावरुन दोन प्रकार पडतात.    

i) आम्ल लाव्हा- यामध्ये सिलीकांचे प्रमाण जास्त असल्याने वितलन बिंदु उच्च असतो. हा असल्याने त्यांचे वहन संथ गतीने होते. 

ii) अल्कली लाव्हा- या मध्ये सिलीकांचे प्रमाण कमी असल्याने वितलन बिंदु कमी असतो. हा पातळ असल्याने तो जास्त प्रवाही असतो.



B) घनरुप पदार्थ- धुलीकण आणि खडकांचे तुकडे यांचा यात समावेश असतो. त्यांच्यातही खालील प्रमाणे गट करता येतात. यांच्या आकारावरुन व उद्रेकावरुन धुलीकण व खडकांच्या या एकत्रीत समुहास पुढील संज्ञा वापरल्या जातात.


 

 

ज्वालामुखीय धूळ

उद्रेकाच्या वेळी धुलीकण व आणि खडकांचे तुकडे अतिशय सूक्ष्म असतात त्यावेळी त्यांना ज्वालामुखीय धूळ म्हणतात.

 

राख

उद्रेकाच्या वेळी धुलीकण, खडकांचे लहान आकाराचे तुकडे अशा घनरुप पदार्थांना राख म्हणतात.

 

सकोणाश्म

उद्रेकाच्या वेळी धुलीकण व खडक हे घनरुप पदार्थ जेव्हा टोकदार असतात तेव्हा त्यांना सकोणाश्म म्हणतात.

 

ज्वालामुखीबॉम्ब

काही वेळा घनरुप लाव्हा पदार्थ हा हवेमध्ये लहान तुकडयांच्या स्वरुपात जमिनीवर पडण्याअगोदर फेकला जातो त्यास ज्वालामुखीय बॉम्ब म्हणतात.


C) वायुरुप पदार्थ- उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी मुखाच्या वर धुराचे गडद ढग दिसुन येतात. धुराच्या ढगाच्या आकारावरुन त्यास फुलकोबी ढग म्हणतात. यामधील काही वायु ज्वलनशील असल्याने ज्वालामुखीच्या मुखाशी ज्वाला निर्माण होतात.

 

ज्वालामुखीय भूरुपे-

1) लाव्हा घुमट- ज्यावेळी मॅग्मा हा मुखातून बाहेर येऊन तेथेच घनरुप बनतो. त्यावेळी तेथेच घुमटाकार टेकडीची निर्मिती होते. मॅग्माचा प्रवाहीपणा अशा घुमटांचे आकार ठरवतो.

* तीव्र उताराच्या उंच घुमटाकार टेकडयांची निर्मिती आम्ल लाव्हारसापासून होते.

* कमी उंचीचे विस्तृततळ असलेले घुमट अल्कली लाव्हापासून तयार होतात.

 

2) लाव्हा पठारे- भेगीय ज्वालामुखीतून मोठया प्रमाणात विस्तृत भूपृष्ठावर पसरणाऱ्या लाव्हारसापासून लाव्हा पठारांची उत्पत्ती होते. उदा. भारतातील दख्खनचे पठार



3) ज्वालामुखीय काहील (कॅल्डेरा) / ज्वालामुखीय विवर- ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी काहीवेळा खूप मोठया प्रमाणावर पदार्थ बाहेर पडत असतांना त्याचवेळी खूप मोठया प्रमाणात दाबमुक्ती होते अशा वेळी उद्रेकानंतर या भागात मोठया आकाराचे व खोल खळगे तयार होते त्यास ज्वालामुखीय काहील (कॅल्डेरा) म्हणतात. कालांतराने येथे पाणी साचून सरोवरांचीही निर्मिती होते.

*अशाच लहान आकाराच्या काहीलांना ज्वालामुखीय विवर म्हणतात


 


4)विवर सरोवर-.ज्या ज्वालामुखीचा एका उद्रेकानंतर, पुन्हा दीर्घकाळ उद्रेक झालेला नसतो त्याला मृत ज्वालामुखी असे म्हटले जाते. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखीय काहील निर्माण झालेला असतो त्या काहील / खड्डयामध्ये पावसाचे पाणी भरले जाते त्यामुळे मृतज्वालामुखी मध्ये विवर सरोवराची निर्मिती होते


 

5) ज्वालामुखीय खुंटा- ज्यावेळी ज्वालामुखीच्या मुखाशी लाव्हारसाचे घनीभवन होते त्यावेळी तेथे ज्वालामुखीय खुंटा या भूरुपांची निर्मिती होते


 

6) खंगारक शंकू- ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठया प्रमाणात बाहेर पडणारे घनरुप पदार्थ, राख, अर्धवट जळालेले पदार्थ व सकोणाश्म यांना खंगारक म्हणतात. या खंगारकाच्या संचयनातून तयार झालेल्या शंक्वाकृती टेकडी ला खंगारक शंकू म्हणतात. उदा. इटलीतील नुओवो पर्वत


7) समिश्र शंकू- लाव्हारस व अर्धवट जळालेले पदार्थ अशा दोन वेगवेगळया पदार्थांच्या एकावर एक तयार झालेल्या स्तरांमुळे तयार झालेल्या शंकुला संमिश्र शंकू म्हणतात. या प्रक्रियेत दोन वेगवेगळया पदार्थांपासून शंकू तयार झालेला असतो म्हणून याला समिश्र शंकू म्हणतात