विभाजित वर्तुळाचे फायदे
* विभाजित वर्तूळ
समजण्यास अतिशय सोपे असते.
* अज्ञात लोकांनाही विभाजित वर्तूळाव्दारे
माहितीचे प्रभावी संप्रेषण होऊ शकते.
* विभाजित वर्तुळाव्दारे एका दृष्टीक्षेपात माहितीचे विश्लेषण
करता येते व माहिती समजते.
* एकाच प्रकारच्या गटाच्या माहितीची
तुलना करण्यासाठी उपयोगी
* विभाजित वर्तुळामुळे संख्येच्या
परीक्षणाची आवश्यकता भासत नाही, आकृतीव्दारे निष्कर्ष काढता येतात
* दिलेल्या माहितीची व्याप्ती समजते.
* संख्यात्मक माहितीतील आकडेवारी मोठी असल्यास व हाताळण्यास किचकट
असल्यास अशा माहितीचे विश्लेषण विभाजित वर्तुळाव्दारे चटकण होवू शकते.
* विभाजित वर्तुळात आपणास ज्या घटकावर
जास्त प्रकाश टाकावयाचा आहे अशा घटकाची पाकळीचा क्रम बदलवीता येणे शक्य असते.
विभाजित वर्तुळाचे तोटे
·
माहितीचे जास्त
उपविभाग असल्यास विभाजित वर्तुळ समजण्यास कमी प्रभावी ठरते. तर काही वेळेस विभाजित
वर्तुळ काढणे शक्य नसते.
·
विभाजित वर्तुळाव्दारे
एकाच प्रकारच्या माहितीच्या संचाची तुलना होते. ज्या ठिकाणी माहितीचे अनेक संच (गट) असतात तेथे विभाजित
वर्तुळ प्रभावी नसते.
·
विभाजित वर्तुळाचे विश्लेषण करतांना तुलनात्मक
चित्रामुळे चूका होवू शकतात किंवा वाचकांना त्रास होतो. तसेच विभाजित वर्तुळावरुन
केलेले विश्लेषण ढोबळ स्वरुपाचे असते.
·
तसेच आकृतीवरुन घटकाचे
अचूक मुल्य काढता येत नाही.
·
कमी अंशात्मक फरक असलेल्या माहितीची अथवा उपविभागाची तुलना करतांना
समस्या निर्माण होतात.
·
संख्यात्मक माहितीचे विश्लेषणाऐवजी आकृतीवर आधारीत विश्लेषणात चुकीचे
निष्कर्ष निघू शकतात.
·
निगेटीव्ह (ऋणात्मक) व पॉझिटिव्ह (धनात्मक) माहितीच्या एकत्रीत विश्लेषणात विभाजित
वर्तुळ प्रभावहिन असते.
उपयोग
विभाजित वर्तुळ घटकांचे वर्गीकरण करण्यास उपयुक्त असते.
विभाजित वर्तुळाचा उपयोग सामान्यत: टक्केवारी किंवा प्रमाणित माहिती
दर्शविण्यासाठी होतो.
सामान्यत:
प्रत्येक श्रेणीद्वारे दर्शविलेले टक्केवारी / आकडेवारी विभाजित वर्तुळाच्या
पाकळीच्या पुढे प्रदान केली जात असल्याने माहीतीची तुलना करण्यास उपयोगी असते.
विभाजित वर्तुळ विदेचे सामान्य निष्कर्ष काढण्यास उपयोगी असते
.
एकाच प्रकारच्या विदेच्या उपघटकांचे
निरीक्षण व तुलना विभाजित वर्तुळावरुन करता येते.
Aakanksha Rajput
ReplyDelete7875996939
ReplyDelete