प्रात्यक्षिक क्र 09
स्थल निर्देशक नकाशाचे विश्लेषण: भूमी उपयोजन आणि व्यवसाय
उद्देश-
1) स्थलनिर्देशक नकाशात भूमी उपयोजन आणि व्यवसाय कशा
पध्दतीने दर्शविले जाते हे जाणून घेणे.
2)
प्राकृतिक
घटक आणि भूमी उपयोजन आणि व्यवसाय या मधील सहसंबंध जाणून घेणे.
स्थल निर्देशक नकाशा 63 K / 12 यावर आधारीत प्रश्नांचे स्पष्टीकरण
1) मैदानी प्रदेशातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता असावा.
उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशातील
मैदानी प्रदेशातील लोक शेती हा प्रमुख व्यवसाय करत असावेत तसेच शेतीवर आधारीत
विविध व्यवसाय कमी-अधीक प्रमाणात या प्रदेशात होत असावेत.
2) पठारी
प्रदेशातील लोक कोणत्या व्यवसायात गुतंलेले असावेत.
उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशातील
पठारी प्रदेशात वनांचाप्रदेश असल्याने तेथील लोक वनउत्पादने गोळा करणे, खाणकाम,
लाकूडतोड तसेच गुर्रचराई / पशुपालन अशा स्वरुपाच्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेले
असावेत.
3) मिर्झापूर
शहरातील नागरीक कोणत्या व्यवसायात गुंतले असावेत.
उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशातील
मिर्झापूर हे जिल्हयाचे शहर असल्याने येथे शासकीय व प्रशासकीय कामकाजाबरोबर सर्वच
प्रकारचे व्दितीय, तृतीय, चतुर्थ प्रकारचे व्यवसाय कमी अधिक प्रमाणात होत असावेत.
तसेच बारामाही गंगा नदीच्या अस्तित्वामुळे येथे काही प्रमाणात मासेमारी व जलवाहतूक
देखील होत असेल. नकाशात नदी किनारी विविध घाट दिसत असल्याने काही प्रमाणात धार्मिक
विधी देखील होत असावेत. त्याच बरोबर हातमाग उदयोग, तेलबियांच्या गिरण्या व गालिचे,
चटई बनविण्याचे कारखाने येथे आहेत.
4) नाल्याच्या
परिसरातील पडीक जमिनी शोधा?
उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशातील
पूर्व भागात, खजुरी नाला व ओझाला नाल्यांच्या परिसरात पडीक जमिनी आहेत.
5) जौनपुर मध्ये
कोणते कारखाने आढळतात.
उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशातील
जौनपुर मध्ये वीटभटटी व चटई उदयोग आहेत. तसचे लाकडी खेळण्याचे कारखाने, सुगंधी तेल
उदयोग, अल्युमिनियमचे भांडे बनविण्याचे उदयोग येथे आहेत.
6)
नकाशातील कोणत्या भागात
उघडया खाणी आढळतात.
उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशातील
पठारी भागात बरकच्च्या वनक्षेत्रात C4,
C5 या संदर्भ चौकोनात उघडया खाणी आढळतात.
7) शेत जमीन
कोणत्या रंगात दाखवली आहे.
उत्तर- भारतीय स्थल दर्शक नकाशात शेत जमीन पिवळया रंगाने
दर्शवलेली असते.
8) कापडगिरण्या
कोणत्या भागात आहेत.
उत्तर- प्रस्तृत 63 K / 12 नकाशात
कापड गिरण्या मिर्झापूर, बाथुआ येथे आढळून येत आहेत. तसेच हा व्यवसाय शेती उत्पादनावर
आधारीत असल्याने या नकाशातील अनेक ठिकाणी कापड गिरण्या विखुरलेल्या असाव्यात.
9) नावेतून वाहतूक
हा व्यवयास होईल का ? असल्यास कोणत्या
प्रकारचा ?
उत्तर- प्रस्तृत 63 K / 12
नकाशात गंगा ही बारमाही असून नदीने नागमोडी वळणे घेतलेली आहेत, नदी प्रवाहाचा हा
तिसरा टप्पा असल्याने पाणी पुरवठा जास्त असेल त्यामुळे येथे स्थानिक स्तरावर
किनाऱ्यावर्ती भागात नावेतून वाहतूक होईल. नावेव्दारे मालवाहतूक व प्रवासी वाहतूक होत असेल
10) पर्यटन व्यवसाय
कोणत्या भागात विकसीत होऊ शकेल. ?
उत्तर- गंगानदीच्या किनाऱ्यावर्ती भागात विविध घाट व
मंदीरे दिसत असल्याने समाजिक व धार्मिक पर्यटन होईल. तसेच नदीपात्रात जलवाहतूकीतून
पर्यटन व्यवसाय वाढू शकेल. त्याच बरोबर नकाशाच्या दक्षिण भागात असलेल्या वनक्षेत्र
व पठारी भागात पर्यटन व्यवसाय विकसीत होऊ शकेल.
11) प्रमुख
बाजारपेठांची स्थाने शोधा. या ठिकाणी कोणत्या प्रकारचे व्यवसाय चालत असतील.
उत्तर- मिर्झापुर, विध्यांचल, कच्छवा, छानवार, धर्मदेव,
भारपुरा बाजार हे बाजारपेठेचे ठिकाणे असुन येथे शेतमालावर आधारीत उदयोग, कुटीर व लघू
उदयोग असतील त्याच बरोबर इतर व्दितीयक व तृतीय व्यवसायही येथे चालत असावेत.
12) विंध्याचल नगरात
कोणकोणत्या सुविधा आहेत ते सांगा.
उत्तर- सर्व प्रकारच्या नागरी सुविधा उदा. वाहतूक,
वैदयकीय, शैक्षणिक, पोस्ट, पर्यटन, कायदा सुव्यवस्था व धार्मिक सुविधा, मंनोरंजन केंद्रे असावेत. त्याच
बरोबर जलसिंचनाच्या सुविधा आहेत.
13) प्राकृतिक
रचनेचा विचार करता लोक कोणता व्यवसाय करत असावेत ते सांगा.?
उत्तर- I)
गंगा नदीच्या किनाऱ्यावर्ती सुपिक
गाळाच्या प्रदेशात शेती व त्यावर आधारीत व्यवसाय उदा. पशुपालन व पशुधन व्यवसाय
तसेच इतर प्राथमिक व्यवसाय इ. II) गंगानदी पात्रात मासेमारी व जलवाहतूक III)
नकाशाच्या दक्षिण भागात असलेल्या पठारी वनक्षेत्र भागात वनउत्पादने गोळा करणे तसेच
काही भागात खाणकाम व्यवसाय करत असावेत.
14) प्रदेशात केले
जाणारे तृतीयक व्यवसाय कोणते ?
उत्तर- व्यापार आणि वाणिज्य, वाहतूक, संदेशवहन इतर सेवा
15) प्रदेशातील
प्रमुख प्राथमिक व्यवसाय कोणते.
उत्तर- शेती,
पशुपालन, खाणकाम, वनउत्पादने गोळा करणे इ.
_____________________________________________________________________________________________________________
नकाशा क्र 47 J / 15
स्थल निर्देशक नकाशा 47 J / 15 यावर आधारीत प्रश्नांचे स्पष्टीकरण
1) प्रस्तृत नकाशात प्रदेशात प्राथमिक व्यवसाय चालत
असावेत ?
उत्तर- नकाशा क्र 47 J / 15 मधील प्रदेशात
शेती, मासेमारी, पशुपालन
इ. प्राथमिक व्यवसाय चालत असावेत
2) दिलेल्या नकाशातील मैदानी प्रदेशात
लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता असावा?
उत्तर- प्रस्तृत नकाशा क्र
47 J / 15 मधील मैदानी प्रदेशात लोकांचा शेती व मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असावा
3) नकाशाच्या वायव्य
भागात मुख्यत: कोणता उदयोग / व्यवसाय आढळतो?
उत्तर- नकाशाच्या वायव्य
भागात साखर कारखाना आढळतो.
4) प्रस्तृत नकाशात शेतजमिनीचा कोणत्या रंगाने
दर्शवीलेली आहे. ?
उत्तर- भारतीय स्थल दर्शक नकाशात शेत जमीन पिवळया रंगाने दर्शवलेली
असते
5) नकाशातील भिगवण गावातील लोक कोणत्या
व्यवसायात गुंतले असावेत?
उत्तर- भिगवण गावातील लोक
शेती, मासेमारी, पशुपालन या सारख्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असावेत
6) नकाशातील कोणत्या भागात पर्यटन व्यवसाय होऊ
शकतो?
उत्तर- पर्यटन व्यवसाय
कुंभारगाव वस्तीच्या भागात होऊ शकतो
7) प्राकृतिक रचनेचा विचार करता लोक कोणता
व्यवसाय करत असावेत ते सांगा?
उत्तर-प्राकृतिक रचनेचा विचार करता येथील लोक शेती हा व्यवसाय करतात
बारावी भूगोल काही महत्वाचे व्हिडीओ खालील लिंकवर जाऊन पहा
1 ) बारावी भूगोल सराव प्रश्नसंचातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा
2) बारावी भूगोल अयोग्य / चूकीचा घटक ओळखा Identify the wrong components
3) A : विधान R: कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा
4) बारावी भूगोल सरावप्रश्न संचातील अचूक सहसंबंध ओळखुन साखळी पूर्ण करा चे उत्तरे
5) बारावी प्रात्यक्षिक भूगोल प्रश्नपत्रिका नमुना आराखडा, अंतर्गत मुल्यमापन व गुणदाण
6) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 04 विदा विश्लेषण: गुणानुक्रम सहसंबंध
7) बारावी भूगोल प्रात्यक्षिक 08 स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण : मानवी वस्ती
8) बारावी भूगोल लोकसंख्या भूगोल भाग -1 लोकसंख्या वितरण व घनता
HTTPS://YOUTU.BE/RX23_PLS4CK
८वा प्राशन
ReplyDelete