Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Wednesday, 4 December 2019

अकरावी प्रकरण-5 हवामान बदल- उचललेली पाऊले, हवामान बदल आणि भारत, स्वाध्याय


हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी उचललेली पाऊले-
1)  9 मे 1992 ला रिओ दी जनेरिओ येथील वसुंधरा परिषदेत सर्व राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय पर्यावरण करार स्विकारलेला आहे.
2)  क्योटो प्रोटोकॉल या आंतररष्ट्रीय करारामध्ये सदस्य राष्टांकडून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहणे बाबत सहमती करण्यात आलेली आहे.
3)  ओझोन वायूचा नाश करणाऱ्या उत्पादनांचा वापर हळूहळू बंद करण्या बाबत 1987 साली मॉस्ट्रेअल करार करण्यात आला आहे.
4)  पॅरिस करारा नुसार जागतिक तापमान वाढ 1.5 अं.से मर्यादीत राखण्या बाबत ठरले आहे.

हवामान बदल आणि भारत-
      हवामान बदलाचा सर्वात जास्त धोका विकसशिल देश, अत्यल्प विकसित देश, छोटया बेटांवरील देश यांना होत असतो. उदा.फिजी बेटांचा समूह येत्या पन्नास वर्षात समुद्राच्या पाण्याखाली जाऊ शकतात.
      स्वच्छ उर्जा व पर्यावरणाची सुरक्षितता या धोरणांचा अवलंब करण्यासाठी भारत सरकार संवेदनशील आहे व हवामान बदलांबाबत महत्वपूर्ण पाऊले उचलत आहे.

1 हवामान बदलाचा राष्ट्रीय कृती आराखडा(NAPCC)- भारतात सन 2008 च्या या आराखडया नुसार वेगवेगळया आठ अभियानांच्या माध्यमातुन हवामान बदल रोखणे बाबत पाऊले उचलले गेलेली आहेत.
2 हवामान बदल अनुकूल निधी- हवामान बदलामुळे बाधीत झालेल्या राज्यांना/ प्रदेशांना मदत करणे कामी नाबार्ड संस्थेस स्वतंत्र्य जबाबदारी देण्यात आलेली आहे.
3 राष्ट्रीय स्वच्छ उर्जा निधी- भारतात कोळशाच्या वापरावर कर लावून स्वच्छ उर्जा अभियानाच्या संशोधन व विकासासाठी निधी जमा केला जातो प्रकल्पाच्या खर्चासाठी 40% निधी कर्ज किंवा अनुदान दिले जाते.

हवामानाचे बदल रोखण्यासाठी जीवनशैलीतील बदल-
1 कमी अंतर पायी चालत जाणे,
2 गरजेपुरतीच खरेदी करणे,
3 उर्जा बचत करणारी उपकरणांचा वापर,
4 लाकुड, कोळसा सारख्या जैव इंधनाचा वापर कमी करणे
5 प्लॅस्टीकचा वापर थांबविणे





स्वाध्याय-
साखळी पुर्ण करा.
उत्तर-
बर्फाचे वितळणे
समुद्रपातळीत वाढ
पूर
सौरतापाचे परिणाम 
अवकाळी पाऊस
आवर्तांच्या संख्येत वाढ
हरितगृह वायू
मिथेन
शेती
जागतिक हवामान बदल
पृथ्वीवरील सरासरी तापमान
पृथ्वीवरील जीवसुष्टी

चूकीचा घटक ओळखा-
1) जागतिक तापमान वाढीची कारणे-     चूकीचा घटक- ) सूर्याचे भासमान भ्रमण्‍
2) हवामान बदलाचे मापदंड-       चूकीचा घटक  ) कमाल आणि किमान तापमानात वाढ
3) हवामान बदल अभ्यासण्याची साधने-   चूकीचा घटक  ) प्राचीन किल्ले
4) जागतिक हवामान बदल रोखण्याचे उपाय-चूकीचा घटक ) सार्वजनिक वाहतुकीस बंदी

Monday, 2 December 2019

जागतिक हवामान बदल, बाबी व परीणाम, कारणे, अभ्यास साधने


हवामान बदल- जागतीक स्तरावरील हवामानाच्य आकृतीबंधात सातत्याने होणाऱ्या बदलास `हवामान बदल` असे म्हणतात. यामध्ये मोसमी वाऱ्याचा प्रवाहातील बदल, ऋतूंमधील बदल, वृक्षांच्या बहराच्या कालावधीतील बदल, पुर आणि दुष्काळाच्या वारंवारीतेत होणारी वाढ इ. चा समावेश असतो.

हवामान बदलाच्या बाबी व परीणाम-
1 पुरांची वारंवाता आणि तीव्रतेत झालेली वाढ- गेल्या काही कालावधीत पुरांच्या संख्येत व कालावधीत वाढ झालेली असल्याचे येते उदा. 2005 साली मुंबईत पर्जन्यामुळे आलेला पुर, तसेच सन 2013 मध्ये केदारनाथ येथे झालेली ढगफुटी, भुस्खलन व पुर. जगाच्या विवीध भागात पुरांच्या विविध भागात पुरांच्या वारंवारीतेत वाढ झालेली आहे.

2 दुष्काळ आणि चक्रीवादळे यांच्या तीव्रतेत व वारंवारितेत होणारी वाढ- तापमानाच्या वाढीमुळे इ. स. 1970 पासून पृथ्वीवर दुष्काळाच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. जागतीक तापमान वाढीमुळे सागरीय जलाचे तापमान वाढुन सागरीभागावरील पाण्याचे रेणू जास्त सक्रीय होतात व पाण्याच्या वाफेचे प्रमाणही वाढत आहे त्यामुळे वातावरणात मोठया प्रमाणात बाष्प निर्माण होते यामुळे आवर्त व प्रत्यावर्ताची निर्मीती व तीव्रतेत वाढ होते. त्यातुन चक्रीवादळे व दुष्काळ निर्माण होतात.


3 पीक वाढीच्या कालावधीत व कृषी उत्पन्नात बदल होणे- वातावरणातील वाढत्या कार्बन डायऑक्सॉईड मुळे हवामान, कृषी, वायु व मानवी आरोग्यावर परीणाम होत आहे. वातावरणातील कार्बनडायऑक्साईड चे प्रमाण 350 ppm पेक्षा जास्त हे पर्यावरणास घातक आहे. तसेच त्याचा परीणाम पर्जन्यमानावर ही होते व पर्जन्यमानाचा परीणाम पीक वाढीवर होत असतो.

4 वर्षावने आणि हवामान बदल- वने ही पृथ्वीचे तापमान कमी ठेवण्यास मदत करतात. रुंदपर्णी वर्षावनांच्या प्रदेशात वनस्पतींच्या अच्छादनामुळे बाप्पीभवनाचा वेग कमी होऊन नैसर्गीकरीत्या हवा शीतल राखली जाते. परंतु मोठया प्रमाणात या वनाची तोड किंवा ही वने जाळल्याने तेथील हवा उष्ण व कोरडी होऊ लागते. तसेच वने जाळल्याने तेथे कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळला जातो त्यामुळे वातावरणावर ताण निर्माण होतो. मोठया प्रमाणावर होणाऱ्या निर्वनीकरणामुळे पर्जन्याचा आकृतीबंध व पर्जन्याच्या प्रमाणात बदल झालेला आहे.

हवामान बदलाची नैसर्गिक कारणे-

1 सौरउर्जा- सुर्यापासून मिळणारी उर्जा ही सर्वत्र व सर्वकाळ सारखी नसते. सौरउर्जा ही तापमानावर परीणाम करीत असते त्यामुळे त्याचा परीणाम प्रत्यक्ष हवामानावरही होत असतो.

2‍ पृथ्वीचे सुर्यापासुनचे अंतर (मिलन्कोव्हीच थेरी)- यानुसार सुर्याचे पृथ्वीपासून चे अंतर कमी होते तेव्हा पृथ्वीवरील तापमानात वाढ होणे तर सूर्यापासून पृथ्वीचे अंतर वाढणे तेव्हा पृथ्वीचे तापमान कमी होते.  जेव्हा पृथ्वी सुर्यापासून दूर जाते तेव्हा पृथ्वीवर हिमयुग येण्याची शक्यता जास्त असते.

3 ज्वालामुखीय उद्रेक- ज्वालामुखीच्या उद्रेकातुन वातावरणात अनेक वायु बाहेर पडत असतात त्यात सल्फर डायऑक्साईड ही असतो. हे वायु बऱाच काळापर्यंन्त वातावरणात टिकुन राहतात त्यामुळे बऱ्याच वेळा हे वायु वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर लांबपर्यन्त पसरतात. बऱ्याच वेळा या वायुमुळे ‍पृथ्वीवर सौरताप कमी पोहचतो. मागील दोन शतकात तसेच सन 1982 (एल सिऑन) व सन 1991 (पिंटाबू) मध्ये झालेल्या मोठया ज्वालामुखी उद्रेकांमुळे  सार्वात कमी तापमानांच्या वर्षांच्या नोंदी झालेल्या आहेत. तसेच काही वर्षांसाठी काही प्रमाणात तापमान घटल्याच्याही नोंदी आहेत.

4 गोल्डीलॉक विभाग- शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वी ही सुर्यमालीकेतील जिवसृष्टी व वास्तव्यास योग्य अशा पट्टयात आहे. पुर्वी पृथ्वीवरील तापमान अतिथंड होते तेव्हा पृथ्वी या पट्टयात नव्हती. परंतु हा पट्टा कालानुरुप सुर्यापासुन दुर सरकत असल्याने पृथ्वी या पट्टयात आलेली आहे. या पट्टयात आल्यावर पृथ्वीवर जिवसृष्टीची निर्मीती झालेली आहे. अशा पट्टयाला शास्त्रज्ञ गोल्डीलॉक विभाग म्हणतात. गोल्डीलॉक विभाग हा सूर्यापासून दूर सरकत आहे. या पट्टयात होणाऱ्या अशा बदलामुळे पृथ्वीचे हवामान थंड किंवा ऊबदार होते.

हवामान बदलाची मानव निर्मीत कारणे-

·         जैविक इंधनाच्या ज्वलनातून मुख्यत: कार्बन डायऑक्साईड उत्सर्जीत होणे
·         मोठया प्रमाणातील निर्वनीकरणामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाणा वाढते.
हिमानी कालखंड- जेव्हा हिमनदयांचा विस्तार होतो तेव्हा अतिशय थंड हवामान असते त्यास हिमानी  कालखंड म्हणतात.
आंतरहिमानी कालखंड- हिमानी कालखंडात जेव्हा तापमान वाढते व हिमनदयांचीपिछेहाट होते अशा कालखंडास आंतरहिमानी कालखंड म्हणतात.

हवामान बदल अभ्यासण्याची काही साधने- (पूरा हवामान)

      प्राचीन हवामानाचा अभ्यास म्हणजेच पूरा हवामान शास्त्र (प्राचीन हवामान) होय. मानवी मागील 140 वर्षापुर्वी पासून हवामानाचा अभ्यास करण्यासाठी विविध उपकराणांचा उपयोग करीत आहे. पंरतु त्यापुर्वी ही हवामानाचा अभ्यास केला जात होता हवामानाच्या अभ्यासाची साधने पुढील प्रमाणे सांगता येतील.

1 प्रवाळ कट्टे- प्रवाळकट्टे हे हवामानाच्या बदलांना फार संवेदनशील असतात. सागरी प्रवाळ हे कॅल्शिसम कार्बोनेटला शोषून त्यापासून प्रवाळाचे सांगाडे तयार करतात. सागरी जलाचे तापमान बदलते तेव्हा सांगाडयातील कॅल्शियम कार्बोनेटची घनता ही बदलते.
      समुद्रातील प्रवाळाची उन्हाळयातील घनता व हिवाळयातील घनता वेगळी असते. प्रवाळाच्या वर्तुळांची  वाढ ही ऋतुनुसार होत असते आणि याच वर्तुळांव्दारे पाण्याचे तापमान आणि प्रवाळांची वाढ कोणत्या ऋतूत झाली हे आपणास कळू शकते.

2 वृक्षखोडावरील वर्तुळे-  पर्यावरणातील बदलत्या स्थितीनुरुप वर्तुळांच्या निर्मीतीत भिन्नता जाणवते. त्याच वर्तुळांच्या बदलांचा मागोवा घेत पूरा पर्यावरणाच्या बदलांचा अभ्यास करता येतो.

3 बर्फाच्या पृष्ठाखालील घेतलेले हिमाचे नमुने- अंटार्क्टिका व ग्रीनलँड या हिमक्षेत्रावरील पूष्ठावर हिमाचे थरावर थर साचतात. त्यात हिवाळयातील बर्फाचे थर व उन्हाळयातील बर्फाचे थर हे वेगवेगळे जाणवतात. व प्रत्येक वर्षी निर्माण होणारे हे बर्फाचे थर त्या वर्षातील हिमाबद्दल भरपुर माहिती पुरवतात.

·         पृथ्वीवरील अनेक प्रदेशांनी अधुन-मधुन आर्द्र व शुष्क कालावधी अनुभवलेला आहे. त्याची उदाहरणे खालील प्रमाणे
1 सुमारे 8000 वर्षापूर्वी राजस्थानचा प्रदेश आर्द्र व थंड होता.
2 हडप्पा संस्कृतीच्या सुमारे 4000 वर्षापूर्वी पासून शुष्कता निर्माण झाली होती.
3 भूगर्भिय काळामध्ये, सुमारे 500 ते 300 दशलक्ष वर्षापुर्वी पृथ्वी सुध्दा उबदार होती.


Wednesday, 27 November 2019

XI, Chapter 5 In the Case of Global Climate Change, Consequences of global temperature rise- Climate change


Global climate change

            Earth's average temperature is 14 de. C. Earth's average Earth's average temperature is rising. The average temperature on the Earth's surface in the twentieth century was about 0.80 d.C. It is evident from the records of various temperatures that the increase has increased. The main reason for this is the fact that gases such as carbon dioxide and methane are considered to be emitting heat in the atmosphere, which increases the atmosphere's ability to store heat, thus increasing the temperature. Although this increase in temperature does not seem very big, the results are of concern.

Consequences of global temperature rise


1 Heat wave- Hundreds of people were killed in heat waves in Chicago in 1995 and in Paris in 2003. Such heat waves, especially during the summer period, result in increased accumulation of atmospheric dust and vapor, resulting in increased storage capacity of the atmosphere and increased temperature. Heat stroke causes people to die

2 Thermal islands - heat waves have become more difficult, especially in large cities where the roads are paved in comparison to the forest areas and construction of cement concrete, industrial and vehicular pollution is high. In such places, there is an arbitrary increase in temperature.

3 Increase in sea water level - The rise in global sea level is due to the melting of ice and glaciers. This could endanger the coastal region, destroying coastal towns, flooding several islands underwater, and destroying the habitat of many fish, birds and animals. This kind of result is felt. The sea level is predicted to rise by 1 meter by 2100, with serious consequences in the coming years.

4 The melting of glaciers on the high mountain ranges and the melting of ice in the polar regions.- Although avalanche is a natural activity, excessive glaciers and glaciers melt away are serious. In the last 25 years, Gangotri glacier has receded more than 850 meters. This rate is 22 meters per year. It is unnatural to melt glaciers so fast. This means that ice formation is slower than the melting point. Similar is the case with the glaciers in Mount Kilimanjaro, the Alps

5 Other Results - As the temperature increases, some other results can be seen as follows

A Jellyfish Breeding - As ocean water temperature rises, acid levels are increasing, so jellyfish breeding is seen in large areas even in areas where jellyfish did not exist.

B Increase in number of mosquitoes - Due to the humid conditions and high temperatures required for the breeding of mosquitoes, the average temperature rise has increased the temperature of many regions. Diseases like dengue are spreading in new areas as well.

            C Coral reefs - Coral extracts the algae in their cells, giving them a color change when the temperature changes. If sea temperatures rise for 10 C to 20 C, prolonged bleaching may result in coral color or even death. And currently corals are largely dead due to bleaching activity in the sea. As a result, more than 1/5 of the world's coral reefs have been destroyed.



Climate change - Continuous change in the global climate model is called `climate change'. These include changes in seasonal wind flows, changes in seasons, changes in tree flow periods, increase in rainfall and drought frequency. Consists of

Climate Change Matters and Consequences

1 Chronic frequency and increase in severity - In the past few years, there has been an increase in the number and duration of chronic diseases eg. Floods caused by rainfall in Mumbai in 2005, as well as floods, landslides and floods in Kedarnath in 2013. In many parts of the world, there has been an increase in the frequency of floods in different parts of the world.

2 Increase in the intensity and frequency of droughts and hurricanes- temperature rise etc. S The area of ​​drought has doubled in the earth since 1970. As the temperature of the ocean increases, the water molecules on the seabed become more active and the water vapor levels are increasing. It produces hurricanes and droughts.

3 Crop Growth Period and Changes in Agricultural Income - Increased carbon dioxide in the atmosphere is affecting climate, agriculture, air and human health.
Carbon dioxide in the atmosphere above 350 ppm is hazardous to the environment. It is also affected by rainfall and rainfall is affected by crop growth.

4 Precipitation and climate change - Forests help keep the earth's temperature low. In the region of wide rainfall, the cooling of the plants reduces the speed of baptism and preserves the air naturally. But due to the large amount of deforestation or burning of these forests, the air becomes hot and dry. This creates stress on the environment. Due to large-scale deforestation, the rainfall profile has changed dramatically.

Monday, 25 November 2019

अकरावी प्रकरण 5 जागतिक हवामान बदल- तापमान वाढ व परीणाम


जागतिक हवामान बदल
 पृथ्वीचे सरासरी तापमान 140 से. आहे. पृथ्वीचे सरासरी तपमान वाढत आहे. विसाव्या शतकात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सुमारे 0.80 से. ने वाढ झाली असल्याचे विविध तापमानांच्या नोंदीवरुन स्पष्ट होत आहे. याचे मुख्य कारण वातावरणात कार्बन डायऑक्सॉईड, मिथेन यासरख्या उष्ण वायुचे होणारे उत्सर्जन मानले जाते या सारख्या वायूमुळे उष्णता साठविण्याची वातावरणाची क्षमता वाढते त्यातुन तापमानात वाढ होते. तापमानाच्या या वाढीचा आकडा फार मोठा दिसत नसला तरी त्याचे परीणाम मात्र चिंता करणारे आहेत.
 जागतिक तापमान वाढीचे परीणाम-
1 उष्णतेची लाट- 1995 साली शिकागो येथे व 2003 साली पॅरिस येथे आलेल्या उष्णतेच्या लाटेंमुळे शेकडो लोक मुत्युमुखी पडले होते. अशी उष्णतेची लाट विशेषत: उन्हाळयाच्या कालावधीत वातावरणातील धुलीकण व बाष्प यांचे प्रमाण वाढल्याने वातावरणाची तापमान साठवण्याची क्षमता वाढून तापमान वाढल्याने निर्माण होत असते. यात उष्माघातामुळे लोक मुत्युमुखी पडतात.‍
2 औष्णिक बेटे-  प्रामुख्याने मोठया शहरांमध्ये जेथे वनक्षेत्रांच्या तुलनेने रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटचे बांधकाम, औदयोगिक व वाहनांचे प्रदुषण जास्त आहे अशा औष्णीक ठिकाणी उष्णतेच्या लाटा अधिक त्रास दायक झालेल्या आहेत. अशा ठिकाणी तापमानात अनियंत्रित वाढ होत आहे
3 समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ- जागतिक समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ ही बर्फाचे व हिमनदयांचे वितळणे या मुख्य कारणांमुळे होत आहे. यामुळे समुद्रकिनारपट्टीच्या प्रदेशात पुरस्थिती निर्माण होणे,‍ किनार पट्टीवरील शहरे जलमय होणे, अनेक बेटे समुद्राच्या पाण्याखाली जाणे तसेच अनेक मासे, पक्षी व प्राण्यांचे अधिवास नष्ट होणे पानथळ प्रदेश धोक्यात येणे. अशा प्रकारचे परीणाम जाणवतात. सन 2100 पर्यन्त समुद्राची पातळी 1 मिटरने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असल्याने येत्या काही काळात याचे गंभिर परीणाम समोर येतील.
4 उंच पर्वतीय हिमक्षेत्रावरील हिमनदयांचे वितळणे आणि ध्रवीय प्रदेशातील बर्फाचे वितळणे- बर्फवितळणे ही नैसर्गिक क्रिया असली तरी प्रमाणा पेक्षा जास्त हिमनदया व हिमनग वितळणे ही गंभिर बाब आहे.  मागील 25 वर्षात गंगोत्री हिमनदी 850 मीटर पेक्षा जास्त मागे सरकलेली आहे. हा दर प्रति वर्ष 22 मीटर आहे. हिमनदयांचे एवढया वेगाने वितळणे हे अनैसर्गिक आहे. याचाच अर्थ बर्फ वितळण्याच्या प्रमाणापेक्षा बर्फ निर्मीती कमी प्रमाणात होत आहे. अशीच स्थिती मांउन्ट किलोमांजरो, आल्प्स पर्वतांमधील हिमनदयांची आहे.
5 अन्य परीणाम- तापमान वाढीमुळे इतरही काही परिणाम पहावयास मिळतात ते पुढील प्रमाणे
      A जेलीफिशचे प्रजनन-  महासागराच्या पाण्याचे तापमान वाढल्याने त्यातील आम्ल पातळी वाढत आहे त्यामुळे ज्या भागात जेलीफिश चे अस्तित्व नव्हते अशा समुद्री भागातही जेलीफिश चे  प्रजनन मोठया प्रमाणात होतांना दिसत आहे.
      B डांसाच्या संखेत वाढ- डासांच्या प्रजननासाठी आर्द्र परिस्थिती व जास्त तापमानाची आवश्यकता असते, सरासरी तापमानात वाढ झाल्याने अनेक प्रदेशांचे तापमान वाढले असल्याने या पुर्वी जेथे डास आढळत नसत अशा प्रदेशातही डास आढळत असुन डासांची संख्या वाढत आहे. तसेच नवनवीन भागात डेंगू सारखे आजार पसरत आहेत.
      C प्रवाळ कट्टे नष्ट होणे- तापमानात बदल झाल्यास प्रवाळ त्यांना रंग प्राप्त करुन देणाऱ्या आपल्या पेशीत शेवाळांना बाहेर काढतात.  सागरी तापमान जर 1 अंश से ते 2 अंश से वाढ दीर्घकाळ राहील्यास विरंजन प्रकीया होवुन प्रवाळ रंगहीन होतात किंवा मृतही पावतात. आणि सध्या सागरीपाण्यात विरंजन क्रीयेमुळे प्रवाळ मोठया प्रमाणात मृत पावत आहेत. त्यामूळे जगातील 1/5 पेक्षा जास्त प्रवाळ कट्टे नष्ट झाली आहेत.

हवामान बदल- जागतीक स्तरावरील हवामानाच्य आकृतीबंधात सातत्याने होणाऱ्या बदलास `हवामान बदल` असे म्हणतात. यामध्ये मोसमी वाऱ्याचा प्रवाहातील बदल, ऋतूंमधील बदल, वृक्षांच्या बहराच्या कालावधीतील बदल, पुर आणि दुष्काळाच्या वारंवारीतेत होणारी वाढ इ. चा समावेश असतो.

हवामान बदलाच्या बाबी व परीणाम-
1 पुरांची वारंवाता आणि तीव्रतेत झालेली वाढ- गेल्या काही कालावधीत पुरांच्या संख्येत व कालावधीत वाढ झालेली असल्याचे येते उदा. 2005 साली मुंबईत पर्जन्यामुळे आलेला पुर, तसेच सन 2013 मध्ये केदारनाथ येथे झालेली ढगफुटी, भुस्खलन व पुर. जगाच्या विवीध भागात पुरांच्या विविध भागात पुरांच्या वारंवारीतेत वाढ झालेली आहे.
2 दुष्काळ आणि चक्रीवादळे यांच्या तीव्रतेत व वारंवारितेत होणारी वाढ- तापमानाच्या वाढीमुळे इ. स. 1970 पासून पृथ्वीवर दुष्काळाच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. जागतीक तापमान वाढीमुळे सागरीय जलाचे तापमान वाढुन सागरीभागावरील पाण्याचे रेणू जास्त सक्रीय होतात व पाण्याच्या वाफेचे प्रमाणही वाढत आहे त्यामुळे वातावरणात मोठया प्रमाणात बाष्प निर्माण होते यामुळे आवर्त व प्रत्यावर्ताची निर्मीती व तीव्रतेत वाढ होते. त्यातुन चक्रीवादळे व दुष्काळ निर्माण होतात.
3 पीक वाढीच्या कालावधीत व कृषी उत्पन्नात बदल होणे- वातावरणातील वाढत्या कार्बन डायऑक्सॉईड मुळे हवामान, कृषी, वायु व मानवी आरोग्यावर परीणाम होत आहे. वातावरणातील कार्बनडायऑक्साईड चे प्रमाण 350 ppm पेक्षा जास्त हे पर्यावरणास घातक आहे. तसेच त्याचा परीणाम पर्जन्यमानावर ही होते व पर्जन्यमानाचा परीणाम पीक वाढीवर होत असतो.
4 वर्षावने आणि हवामान बदल- वने ही पृथ्वीचे तापमान कमी ठेवण्यास मदत करतात. रुंदपर्णी वर्षावनांच्या प्रदेशात वनस्पतींच्या अच्छादनामुळे बाप्पीभवनाचा वेग कमी होऊन नैसर्गीकरीत्या हवा शीतल राखली जाते. परंतु मोठया प्रमाणात या वनाची तोड किंवा ही वने जाळल्याने तेथील हवा उष्ण व कोरडी होऊ लागते. तसेच वने जाळल्याने तेथे कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळला जातो त्यामुळे वातावरणावर ताण निर्माण होतो. मोठया प्रमाणावर होणाऱ्या निर्वनीकरणामुळे पर्जन्याचा आकृतीबंध व पर्जन्याच्या प्रमाणात बदल झालेला आहे.

Tuesday, 19 November 2019

सागरी लाटांचे कार्य



सागरी लाटांचे कार्य-
वाहत्या प्रमाणेच सागरी लाटाही कार्य करीत असतात. अपघर्षण प्रक्रिया ही सागरी लाटांच्या कार्यातील सर्वात परीणामकारी प्रक्रीया आहे. वारा, वाहते पाणी या कारकांच्या कार्यात मध्ये काहीवेळा वेग/गती, उर्जा यामुळे खंड पडतो यांच्या पेक्षा सागरजल भरती-ओहोटी व सागरी प्रवाह याक्रिया व्दारे सागरी पाणी/लांटा चे कार्यसातत्य जास्त असते त्यामुळे सागरजल हे कमी काळातच भूरुपांवर परीणाम करतांना आढळते.

1 सागरी कडा- तीव्र उतार असलेल्या जमिनीवर थेट आपटणाऱ्या लांटामुळे सागरी कडयांची निर्मीती होते. किंवा सागरी लांटाच्या वारंवार होणाऱ्या आघातामुळेकिनाऱ्यावरील खडकांची झीज होऊन त्यांचा उभ्या भिती प्रमाणे आकार तयार होतो त्यास समुद्रकडा असे म्हणतात.

2 सागरी गुहा-‍ किनाऱ्याचा तीव्र उतार हा पाण्याखाली जाणारा असेल तर लाटा खडकांला फोडू शकतात अशा परीस्थीतीत जर किनाऱ्याच्या खालच्या भागात मृदू खडक असल्यास मृदू खडकांची झिज लांटामुळे लवकर होते व सागरी कडेचा खालचा भाग आतल्या बाजुने झिज झाल्याने सरकु लागतो त्यातुन सागरी गुहेची निर्मीती होते. म्हणजेच कठीण खडकां खाली मृदू खडक जेव्हा लाटांमुळे अपक्षरीत होतो, तेव्हा सागरी गुहा आकारास येते.

3 सागरी कमान- सागर जलात डोंगराचा काही भाग शिरलेला असेल त्या भागात मृदू व कठीण खडक असतील अशा स्थीतीत सागरी लांटाचा मारा या डोंराच्या भागावर  सर्व बाजुनी होत असल्यास मृदू खडक जास्त झि जू लागतात व कालांतराने डोंगरात एक कपार तयार होते ती दोन्ही बाजुने मोकळी असते त्यास सागरी कमान म्हणतात.

      किंवा भूशिरावरील दोन गुहा एकमेकीस जुळल्यास सागरी कमानी तयार होतात.

4 सागरी स्तंभ- सागरी कमानीचे छत कोसळल्या नंतर तेथे सागरी स्तंभ निर्माण होतो. स्तंभासारख्या उभ्या असलेल्या या भागास सागरीस्तंभ म्हणतात. हा भाग सागरजलात एखादा मोठा उभा दगड ठेवावा असा हा भाग दिसतो
.
5 विस्तृत तरंग घर्षित मंच तरंग घर्षित चबुतरा – सागरकिनाऱ्यावर होणाऱ्या लाटांच्या आघातामुळे खडकांच्या पायथ्याचे  अपक्षरण जास्त होते व खडकांच्या पायथ्यालगत कपार निर्माण होते व कालांतराने ही कपार मोठी होऊन त्यावरील सागरी कडयांचा भाग कोसळतो  त्यामुळे सागरीकडा मुळ स्थानापासून मागे सरकतो. हे मच ओहोटीच्या वेळी स्पष्ट दिसतात कडयाचे मागे सरकणे हा त्याचा पुरावा आहे.

6 पुळण- सागरी किनाऱ्यावरील  सहज आढळणारे संचनाचे भूरूप म्हणजे पुळण आहे. सागराच्या लांटाबरोबर  वाहत येणारी बारीक वाळू, रेती इ. पदार्थ समुद्रकिनाऱ्या लगत साचतात वाळूच्या या निक्षेपणास पुळण असे म्हणतात. भारतात गोवा, केरळ, तमिळनाडू, गणपतीपुळे, अलिबाग येथे पुळणांची निर्मीती झालेली दिसते. भारतातील सर्वात लांब पुळण मरिना पुळण हे चेन्नई येथे आहे.

7 आखात व भूशीर- समुद्र किनारी प्रदेशात खडकांची रचना मृदू व कठीण अशी समुद्रकिनाऱ्यास लंबवत असलेल्या ठिकाणी आखात व भूशीरांची निर्मीती होते.  सागरी लांटा या मृदू खडक जास्त झिजवतात त्यामुळे समुद्राचे पाणी जमीनीच्या जास्त आत जाते अशा पाणी जमिनीच्या आत शिरलेल्या भागास आखात म्हणतात तर कठीण खडक हे कमी झिजतात त्यामुळे  जमीनीचा भाग समुद्रात  शिरल्या प्रमाणे दिसतो समुद्रात ‍शिरणाऱ्या जमीनीच्या भागास भूशीर म्हणतात.

8 वाळूंचा दांडा- सागरी लांटानी आपल्या सोबत आणलेले वाळू, रेती इ. घटक किनाऱ्याकडे वाहून नेले जात असतात. परंतु या प्रवाहाच्या मार्गात खाडीमुळे, आखातामुळे किंवा उथळ भागामुळे अडथळे आल्यास सागरीलाटा या वाळूचे निक्षेपण आखाताच्या मुखाशी उथळभागातच करतात त्यातून  सागरी किनाऱ्यास समांमर अशा लांबच-लांब उंचवटयाची निर्मीती होते याला वाळूचा दांडा म्हणतात. बऱ्याचवेळा सागरी वादळ व त्सुनामी सारख्याविनाशकारी शक्तीची तिव्रता या वाळूंच्या दांडयामुळे कमी होते उदा. श्रीवर्धन, रेवदंडा

9 खाजन किंवा कायल- कधीकधी वाळूंचे दांडे आणि जमिन यांच्या दरम्यान समुद्राचा भाग बदीस्त होतो. या ठिकाणचे पाणी मंचूळ होते  अशा खाऱ्या व मचूळ पाण्याच्या सरोवरास कायल किंवा खाजन म्हणतात.

      सागरी लांटाच्याकार्यामुळे निर्माण  झालेली वाळूची दांडे ही आखाताच्या मुखाशी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंन्त  वाढत गेल्यास  आखात व वाळूंचा दांडा यात समुद्राचे पाणी अडवले जाऊन खाऱ्या पाण्याचे सरोवर तयार होते, त्यास खाजण असे म्हणतात. उदा.‍ ओडिशातील चिल्का आणि केरळ मधील वेम्बनाड सरोवर.


10 वाळूचे बेट – काळी वेळेस वाळूचे दांडे मुख्यभूमि पासून लवकर वेगळे होत नाही व समुद्राच्या आत लांब होत जातात त्यांस वाळूची दांडी म्हणतात असे वाळूचा दांडा व वाळूची दांडी समुद्राच्या पाण्यामूळे जमिनी पासून विलग झाल्यामुळे वाळूंच्या च्या त्या उंचवटयास वाळूचे बेट म्हणतात. 




इतर सर्व कारकांच्या मानाने सागरी लाटांच्या कार्यामध्ये सातत्य आहे. वारा, नदी सारख्या कारकांच्या कार्यात मध्ये काहीवेळा पुरवठा, वेग/गती, उर्जा यामुळे खंड पडतो सागरी लांटाच्या कार्यात अपक्षणाच्या जवळच निक्षेपणही सातत्याने होतांना दिसते तसेच पुळण दांडे या सारख्या निक्षेपणामुळे तयार झालेल्या भरुपांचेही अपक्षरण होतांनाही दिसते त्यामुळे सागरी लांटाचे कार्य इतर कारकां पेक्षा विश्रांती शिवाय चालते असे म्हणता येईल्‍.