Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Wednesday, 2 September 2020

प्रात्यक्षिक क्र 02‍ विदा संघटन (सांख्यिकीय माहिती)

 


प्रात्यक्षिक क्र 02‍ विदा संघटन (सांख्यिकीय माहिती)

* उपलब्ध सांख्यिकीय माहितीचे पुनरावलोकन करुन तिची उपयोगिता तपासावी लागते, याला माहितीचे संघटन करणे म्हणतात.

* उपलब्ध माहितीचे उपयोगीता वाढविण्यसाठी तिचे केलेले सुस्पष्ट विश्लेषण म्हणजे माहितीचे संघटन होय. हे विश्लेषण खालील टप्यात केले जाते.

A) माहितीची सुस्पष्ट मांडणी करुन दृष्टिक्षेपात तपासणी करणे.

B) संख्याशास्त्रांचा वापर करुन निष्कर्ष काढणे.

 

उदा.1)  एका पर्यटनस्थळी भेट देण्यसाठी आलेल्या पहिल्या 100 लोकांच्या वयाची माहिती गोळा करावयाची झाल्यास तिची मांडणी (विश्लेषण) पुढील प्रमाणे (गट करुन) वर्गीकरण करता येईल.

0 ते 15,   16 ते 30,   31 ते 45,   46 ते 60,   61 ते 75,  आणि 76 पेक्षा जास्त वयाचे लोक. किंवा

 

उदा. 2) एका वर्गातील 60 विदयार्थ्यांना मिळालेल्या गुणांची टक्केवारीचे विश्लेषण पुढील प्रमाणे करता येईल.

नापास विदयार्थी, 35 ते 45%,   46 ते 60%,  61 ते 75%,   75% च्या पुढील

 

माहितीच्या प्रकारानुसार माहितीचे सुसंघटन-

माहितीचे संकलन केल्यावर तिची सुयोग्य पध्दतीने मांडणी करावी लागते ते दोन प्रकारे करता येते.

अ) अवर्गीकृत माहिती (अवर्गीकृत विदा) – जेव्हा सांख्यिकीय माहिती मोठया प्रमाणात नसते त्या वेळेस तिचे वर्गीकरण करणे फारसे आवश्यक नसते अशी माहीती अवर्गीकृत माहिती म्हणून वापरली जाते.

उदा. एखादया कुटुबांतील सदस्यांचे मासिक उत्पन्न-  7000,   1200,  10000

) वर्गीकृत माहिती (वर्गीकृत विदा)- माहिती जेव्हा मोठया प्रमाणावर असते तसेच निरीक्षणात वारंवारता किंवा सातत्य असते तेव्हा अशा सांख्यिकीय माहितीचे वर्गीकरण करावे लागते. अशा माहितीस वर्गीकृत माहिती म्हटले जाते.

उदा. एखादया कंपनीत असलेल्या पगारदारांचे मासिक वेतनाची माहिती वर्गीकरण-

उत्पन्नाची श्रेणी

श्रेणीवार पगार दारांची संख्या

0 ते 10000                                          

20

10001- 20000                                

25

20001- 30000                                

28

30001-40000

20

40000 आणि त्यापेक्षा जास्त

7

एकूण      

100

जेव्हा माहितीचे सुसंघटन केले जाते तेव्हा मध्यमान, प्रमाण विचलनकिंवा इतर कोणत्याही सांख्यिकीय मूल्यांची गणना करतांना वर्गीकृत व अवर्गीकृत माहितीसाठी माहितीसाठी गणनेच्या पायऱ्या वेग-वेगळया असतात.

 

प्रश्न 1 खाली दोन विदासंच दिले आहेत. यापैकी कोणता विदासंच वर्गीकृत करावा लागेल त्याचे वर्गीकरण करा.


विदा संच - 1

 सामग्री

माप

कोलम तांदूळ

1 किलो

उडदाची डाळ

½ किलो

वाल

¼ किलो

धने

100 ग्रॅम

लवंगी मिरची

200 ग्रॅम

रिठे

100 ग्रॅम

खोबरेल तेल

½ लीटर

साबण वडी

5 नग

 

विदा संच - 2

 सामग्री

माप

 

 सामग्री

माप

तादूंळ बासमती

1 किलो

 

धने

100 ग्रॅम

तांदूळ कोलम

5  किलो

 

मिरे

100  ग्रॅम

तांदूळ इंद्रायणी

10  किलो

 

लवंग

100  ग्रॅम

गहू लोकवन

10  किलो

 

खोबरेल तेल

¼ लीटर

गहू सिहोर

10  किलो

 

शेगदाणा तेल

2 लीटर

बाजरी

5  किलो

 

सोया तेल

2 लीटर

ज्वारी

5  किलो

 

तिळाचे तेल

1 लीटर

तूर डाळ

2  किलो

 

वाल

¼ किलो

चणा डाळ

2  किलो

 

चवळी

¼   किलो

उडीद डाळ

1  किलो

 

मसूर

¼  किलो

मसूर डाळ

1  किलो

 

पांढरा वटाणा

¼  किलो

साबण

10

 

हिरवा वटाणा

¼  किलो

साबण चुरा

½  किलो

 

काळा वटाणा

¼  किलो

साबण द्रावण

1  किलो

 

 

 


 

 

 

उत्तर-  जेव्हा दिलेली माहीती मोठया प्रमाणावर असते व निरीक्षणात वारंवारता किंवा सातत्य असते तेव्हा त्या माहितीचे वर्गीकरण करावे लागते. त्यामुळे विदासंच क्र 02 चे वर्गीकरण करावे लागेल ते पुढील प्रमाणे.





 

 

प्रकार

 सामग्री

माप

प्रकार

 सामग्री

माप

धान्य

तादूंळ बासमती

1 किलो

डाळी

तूर डाळ

2  किलो

तांदूळ कोलम

5  किलो

चणा डाळ

2  किलो

तांदूळ इंद्रायणी

10  किलो

उडीद डाळ

1  किलो

गहू लोकवन

10  किलो

मसूर डाळ

1  किलो

गहू सिहोर

10  किलो

मसाल्याचे पदार्थ

धने

100 ग्रॅम

बाजरी

5  किलो

मिरे

100  ग्रॅम

ज्वारी

5  किलो

लवंग

100  ग्रॅम

कडधान्य

वाल

¼ किलो

साबण

साबण

10

चवळी

¼   किलो

साबण चुरा

½  किलो

मसूर

¼  किलो

साबण द्रावण

1  किलो

पांढरा वटाणा

¼  किलो

तेल

खोबरेल तेल

¼ लीटर

हिरवा वटाणा

¼  किलो

शेगदाणा तेल

2 लीटर

काळा वटाणा

¼  किलो

सोया तेल

2 लीटर

तिळाचे तेल

1 लीटर



 

 सोडविलेले उदाहरणे

1)  एका भौगोलिक क्षेत्रात एका महिन्यात वेगवेगळया दिवशी असलेल्या कमाल तापमानाची नोंद खाली सारणीत दर्शवीली आहे.  दिलेली सांख्यिकीय माहीती योग्य वर्गांतर घेवून सुसंगटीत करा.

22  26  27  29  30  32  22  36  44  45  23  28  29  31  33  35  27  29  39  42  41  27  33  41  37  39  40   37  39  42 

उत्तर-

सर्वात लहान चल- 22  

सर्वात माठे चल- 46

वर्गांतर- 5





2) क्ष ठिकाणी वेगवेगळया दिवशी वर्षभरात पडलेल्या पावसाची नोंद (से.मी.) दर्शवीली आहे. योग्य वर्गांतर घेवून वर्गीकृत सारणीत रुपांतर करा.

42  17  16  9   5  19  23  35  31  29  24  21  10  20  13  12  45  25  31  27  46  6  14  28  15 

 

उत्तर-

सर्वात लहाण चल- 11

सर्वात मोठे चल- 35

वर्गांतर-  10




 


3)  खालील सांख्यिकीय माहिती सुसंघटित करायची आहे. त्याच्यासाठी वर्गांतर 5 ठेवायचे आहे.

26  18  21  34  18  38  22  27  22  30  25  25  38  29  20  24  28  32 33  18

उत्तर-  सर्वात लहान चल-  18

       सर्वात मोठे चल  - 38

       घ्यावयाचे वर्गांतर -  5  (16-20,    21-25,    26-30,   31- 35,   36-40)



 

 

4)  एका भौगोलिक प्रश्नाचे उत्तर देण्यसाठी विदयार्थ्यांच्या एका गटाला लागणाऱ्या वेळेची (सेकंदात) आकडेवारी खाली दिलेली आहे. वर्गांतर 10 चे अंतर घेऊन दिलेल्या माहितीचे वर्गीकरण करा.

20  25  24  33  13  26  8  19  31  11  16  21  17  11  34  14  15  21  18  17

उत्तर- सर्वात लहान चल-  8

      सर्वात मोठे चल  - 33

      घ्यावयाचे वर्गांतर -  5  (1-10,   11-20,   21- 30,   31-40)




 

5)  खालील परिच्छेद वाचा आणि सारणी पुर्ण करा.

 

एका गावात कोणाकडे किती (हेक्टर)  जमीन आहे त्याची माहिती पुढील प्रमाणे गावात दोन हजार कुटुंब आहेत ज्यांच्या कडे जमीन आहे. त्यापैकी अर्ध्या कुटुबांकडे 1 ते 3 हेक्टर या वर्गातील जमीन आहे.  दोनशे कुटुंब 3 ते 5 हेक्टर या प्रवर्गात येतात. उर्वरित कुटुंबापैकी, 50% कुटुंबाची मालकी 5-10 हेक्टर आणि 50% 10-20 हेक्टर या वर्गात आहेत. 20 आणि त्या पेक्षा अधिक हेक्टर जमीन कोणत्याही कुटुंबाकडे नाही.

उत्तर-

भूमीचे क्षेत्रफळ (हेक्टर)  (वर्गांतर)

जमीन असलेल्या कुटुबांची संख्या (वारंवारता)

1 - 3

1000

3 - 5

200

5 - 10

400

10 - 20

400

20 पेक्षा जास्त

0

एकूण

2000

 

 

Monday, 31 August 2020

बारावी प्रकरण 2 लोकसंख्या भूगोल भाग 2 लोकसंख्या लाभांश व लिंगगुणोत्तर

 

लिंगरचना

स्‍त्री व पुरुषांच्या लोकसंख्येतील प्रमाणाला लिंग गुणोत्तर म्हणतात. ते दर हजार पुरूषांमागे स्त्रियांचे असलेले प्रमाण या वरुन ठरवीले जाते भारतात लिंगगुणोत्तर खालील सूत्राच्या सहारूय्याने काढले जाते.




लिंग गुणोत्तराच्या आधारे देशातील किंवा प्रदेशातील स्त्रियांचे पुरुषांच्या तुलनेतील प्रमाण काढता येते. जगाचे सर्वसाधारण लिंग गुणोत्तराचे प्रमाण दरहजारी 990 स्त्रिया आहे. म्हणजेच जागतिक स्तरावर 1000 पुरुषांमागे 990 स्त्रिया आहेत.

·         जास्त लिंग गुणोत्तर असलेले देश- लाटविया, इस्टोनिया, रशिया व युक्रेन या देशांचे लिंग गुणोत्तर 1162 आहे.

·         कमी लिंग गुणोत्तर असलेले देश- संयुक्त अरब अमिरात (667), चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, अफगणिस्तान. थोडक्यात आशिया खंडाचे लिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे.



# भारताचे सन 2011 च्या जनगणने नुसार लिंग-गुणोत्तर 927 इतके आहे.

 

 

 लोकसंख्येचा लाभांश.   

       

खालील तक्त्याचे वाचन करून प्रश्नांची उत्त्रे लिहा.

तक्ता क्र. 2.1 भारत लोकसंख्येचा लाभांश.


दशक

कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर

कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी.

स्तंभ 1

स्तंभ 2

स्तंभ 3

2001 - 10

1.33 : 1

57.1

2011 - 20

1.53 : 1

60.5

2021 – 30*

1.81 : 1

64.4

2031 – 40*

1.72 : 1

63.2

 

1)  तक्त्यातून कोणती माहिती मिळत आहे ?

उत्तर- तक्त्यातून भारतातील दशकनिहाय कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर व कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी (भारतीय लोकसंख्येचा लाभांश) यांची माहिती मिळत आहे. (सन- 2021 च्या पुढील माहीती अंदाजित आहे)

2)  दुस-या तिस-या स्तंभांचा सहसंबध काय ?

उत्तर- दुस-या स्तंभात कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तरातील धनात्मक सहसंबध दिसत असुन, त्या अनुशंगाने त्यातील कार्यशील लोकसंखेचा हिस्सा किती टक्के आहे ते तिसऱ्या स्तंभातुन लक्षात येते.

3)  या सहसंबधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो ?

उत्तर- भारतात कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्याने. भारताच्या आर्थिक विकासात वाढ होत आहे.

4)  उपरोक्त प्रमाण पुढील दशकात कमी झाल्यास काय होईल ?

उत्तर- भारतात पुढील दशकात कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी कमी झाल्यास, अवलंबित्वाचे प्रमाण वाढून, देशाच्या आर्थिक विकासावर ऋणात्मक परिणाम होईल.


      लाभांश म्हणजे एखादया व्यवसायातील भागधारकांना मिळालेला नफ्याचा लाभ होय. यात नफ्याचे भागधारकांमध्ये होणारे वाटप अभिप्रेत असते. तर लोकसंख्या लाभांश म्हणजे एखादया देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ होय.”  हा लोकसंख्येतील बदल प्रामुख्याने जन्मदर व मृत्युदर कमी झाल्याने होत असतो. जन्मदर कमी झाल्यामुळे लहान बालकांची संख्या म्हणजेच अवलंबित्वाची संख्या कार्यशील लोकसंख्येच्या तुलनेत कमी असते.


प्रत्येक देशात कार्यशील व अवलंबित लोकसंख्या असते, त्यांच्या गुणोत्तरावरुन तो देश ‍आर्थिकदृष्टया किती क्रियाशील आहे ते ठरवता येते.



देशात कार्यशील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास ते गतीशील, उत्पादक व कार्यक्षम असल्याने विविध संशोधने, उत्पादने, उदयोग, व्यवसाय व सेवा यात त्यांचा सहभाग वाढतो त्यामुळे देशाच्या आर्थिक क्रियांत वाढ होऊन त्याचा अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होतो. व्यवसांची वाढ झाल्याने देशाची आर्थिक स्थिती सुधारते, देशाचे दरडोई उत्पन्न व राष्ट्रीय स्थूल उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे आपोआपच त्याचा फायदा हा जनतेला विविध सेवा, सुविधा, अनुदानाच्या रुपाने मिळू लागतो. यामुळे कार्यशील लोकासंख्येत वाढ झाल्याने लोकसंख्या लाभांशातही वाढ होते असे म्हणता येईल.

 

• लोकसंख्या लाभांशाचे फायदे मिळण्यासाठी आवश्यक घटक.

      शिक्षण, आरोग्य, संशोधन इ. क्षेत्रात योग्य धोरणांची अंमलबजावणी देशाचे शासन कशाप्रकारे करते यावर लोकसंख्या लाभांश अवलंबून असतो. त्यात देशातील शैक्षणिक पातळी, रोजगार, गर्भधारणेची वारंवारता, करप्रणाली व प्रोत्साहन, आरोग्य विषयक योजना, निवृत्ती वेतन व धोरण तसेच आर्थिक धोरण यावर ते अवलंबून असते.

देशात लोकसंख्या लाभांश मिळण्याचे फायदे-

1 वैयक्तिक बचत वाढते, त्यामुळे अर्थव्यस्थेस चालना मिळू शकते.

2 मुलांची संख्या कमी त्यामुळे त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जाते. त्यातुन चांगले मानवी भांडवल मिळते.

3 महिला कार्यशील व सक्षम बनल्यास देशाच्या आर्थिक विकासास हातभार लागतो.

4 अवलंबित्व गुणोत्तर कमी झाल्याने दरडोई उत्पन्न वाढते.

Sunday, 30 August 2020

लोकसंख्या भाग – 2 वयोरचना

प्रकरण क्रं 2   लोकसंख्या भाग – 2

लोकसंख्येस मानवी संसाधन असेही मानले जात असते. लोकसंख्येच्या शारीरिक व बौदिधक या दोन्ही वैशिष्टयांचा प्रदेशाचा विकासावर प्रभाव पडतो. कोणत्याही प्रदेशाचा विकास हा इतर संसाधनावर अवलंबून असतो तसाच त्या प्रदेशात मानवी संसाधनाचा वापर कसा होतो यावर सुदधा तो अवलंबून असतो. त्यामुळे लोकसंख्या भूगोलात वयोरचना, लिंग-गुणोत्तर, साक्षरता दर या बाबींचा अभ्यास करावा लागतो.

1)  वयोरचना =

वयोरचना म्हणजे वयोगटांनुसार असणा-या लोकांची संख्या.“ (उदा. अर्भक, बालक, कुमार, युवक, प्रौढ, वृध्द इ.) प्रत्येक देशात या वयोगटाचा वेगळा-वेगळा हिस्सा असतो. तो देशानुसार किंवा प्रदेशानुसार बदलत असतो.

वयोरचनेचे लिंगानुसार वितरण दर्शविण्यासाठी लोकंसख्या अभ्यासक खालील प्रमाणे मनोऱ्याचा वापर करतात


Add caption

अ) बाजुच्या मनोऱ्यात अक्ष हा वयोगट दाखवतो.

) स्तंबाची लांबी ही त्या वयोगटातील लोकसंख्या दाखवते.

) आलेखातील/ मनोऱ्यातील डाव्या बाजूस पुरंषाची संख्या व उजव्या बाजूस स्त्रियांची संख्या वयोगटानुसार दाखविलेली आहे.

) आलेखातील/ मनोऱ्यातील तळाला बाल वयोगटाकडून वरच्या भागाकडे वृद्ध वयोगटाकडे वितरण दर्शविलेले आहे

 

 




 

खालील आकृती मध्ये अ, आ, इ हे तीन लोकसंख्या मनोरे दिलेले आहेत. त्यांच्या आकारांचा अभ्यास करुन आणि खालील प्रश्नांची उत्त्रे दया.


1)  कोणत्या मनो-यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे ?

उत्तर =  मनो-यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे

2)  कोणत्या मनो-यात वृदधांची संख्या सर्वात कमी आहे?

उत्तर = मनो-यात वृदधांची संख्या सर्वात कमी आहे

3)  कोणता मनोरा युवा राष्टाचे प्रतिनिधीत्व करतो ?

उत्तर = मनोरा युवा राष्टाचे प्रतिनिधीत्व करतो

4)  कोणता मनोरा वैदयकीय खर्च जास्त असणा-या राष्टांचे प्रतिनिधित्व करतो ?  

उत्तर = मनोरा वैदयकीय खर्च जास्त असणा-या राष्टांचे प्रतिनिधित्व्करतो

5)  विपुल मनुष्य्बळ असलेल्या राष्टाचे प्रतिनिधित्व्कोणता मनोरा करतो ?  

उत्तर = मनोरा विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो.

6)  कोणते मनोरे विकसनशील व विकसित राष्टांचे प्रतिनिधित्व्करतात ते सांगा ?

उत्तर = हा मनोरा विकसनशील तर  मनोरा विकसित राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो

गट

वयोगट

निदर्शक

स्पष्टीकरण

बाल वयोगट

0 ते 15

अवलंबित्व गट

या गटातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास ती लोकसंख्या दुसऱ्यांवर अवलंबून असते.

प्रौढ वयोगट

15 ते 59

कार्यशील गट

या वयोगटातील लोकसंख्या उत्पादक व गतिशील असते,  हा वयोगट कार्यशील लोकसंख्या जास्त असण्याचे निदर्शक असते.

वृध्द वयोगट

60 पेक्षा जास्त

अवलंबित्व गट

या वयाचे प्रमाण जास्त असलेल्या देशात अवलंबित्वाचे प्रमाण वाढतेच, परंतु वैदयकीय, आरोग्य सुविधेवर खर्च वाढणारा असतो.

मनोऱ्याचे तीन प्रकार दिसुन येतात.

  1) विस्तारणारा () = या मनो-याचा तळ भाग विस्तारत जाणारा असून शीर्षकडे तो निमुळता होत जातो याचा अर्थ वाढत्या वयोगटानुसार मृत्युदरही वाढतांना दिसुन येतेा. हा मनोरा जन्म आणि मृत्यू दोन्ही दर जास्त आहे असे सांगतो.

  2) संकोचणारा () = या मनो-यात तळ संकुचित होत जातो व तो वरच्या भागात विस्तारला जातो. याचा अर्थ वृदधांची संख्या जास्त तर तरूणांची संख्या कमी असा होतो. यावरून असा निष्कर्ष निघतो की जन्म्दर कमी व मृत्युदर अगदी कमी असतो.

 3) स्थिरावलेला () = या मनो-यात वयोगटांच्या प्रत्येक गटाची टक्केवारी जवळ जवळ समान(सारखी) असते. जन्म्दर आणि मृत्युदर हे दोन्ही अगदी कमी झालेले असतात. त्यामुळे तेथे लोकसंख्येची वाढ ही नगण्य्असते असा आपणास निष्कर्ष निघतो

      ज्या देशात बाल व वृद्ध वयोगटाचे प्रमाण जास्त असते तेथे ‍आर्थिक भार वाढवतो. तर जेथे कार्यरत वयोगटाचे जास्त असते अशा ठिकाणी मनुष्यबळ विपुल प्रमाणात आहे असे समजले जाते.

खाली भारताच्या वयोरचनेचा मनोरा दिला आहे. त्याचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे लिहा



 

1) आकृती 2.1 नुसार भारत कोणत्या मनोऱ्यात येईल.

उत्तर- आकृती 2.1 नुसार भारत मनोऱ्यात येईल.

2)  भारतातील लोकसंखेच्या रचनेनुसार भाष्य करा.

उत्तर- बाजुच्या मनोऱ्यावरुन असे लक्षात येते की, भारतात जन्मदर जास्त आहे. तसेच भारतात 15 ते 60 या वयोगटाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे भारतात कार्यशील लोकसंख्या जास्त आहे.


Wednesday, 8 July 2020

लोकसंख्या भूगोल भाग 1 व्हिडिओ

खालील लिंक वर क्लिक करून बाराावी  प्रकरण पहीले लोकसंंख्या भूगोल मधील भूगोल अभ्यास विषय, लोकसंंख्या वितरण या बाबतचा व्हिडिओ पहा 

 https://youtu.be/Rx23_PLs4Ck